प्रचलित नावे : टाकळी हाजी/कुंड माउली/निघोज/मळगंगा (टाकळी हाजी असाच उल्लेख करावा,कारण एक हाजी टाकळी नावाचे गाव नगर-पुणे वेशीवर आहे.)
कसे जायचे : पुणे-नगर महामार्गावर,सुप्रसिध्द्,अष्टविनायकांपैंकी एक रांजणगावच्या गणपतीच्या चौफुल्यावर,डाव्या बाजुला वळण घेतले की सोने-सांगवी,पाबळ फाटा क्रॉस केला की टाकळी हाजी.
वेळ : पुण्यापासुन ६० कि.मी..दुचाकीवर ,१ ते १.५ तास...
रस्ता : रांजणगाव पर्यंत हाय-वे पुढे २५ एक कि.मी. ग्रामसडक.....तीन-एक कि.मी. थोडासाच खराब....
जाताना बघण्यासारखे :
१) वाघोलीतले वाघेश्वरीचे मंदीर...ईथे एक पेशवेकालीन समाधीही आहे..बोटींग आहे...
२) तुळापुर ::जायच्या मुख्य रस्त्यापासुन ६ किमी आत...ईतर काहीही सांगण्याची गरज नाही.
३) कोरेगाव भीमा : नदीच्या कठड्यावर वसलेले गाव...
४) रांजणगावचा गणपती : अष्टविनायकांपैकी एक



जाताना हे बघुन डोक्याला शॉट लागला...मीठाबरोबर थेट मिरच्या...ईथे आम्हाला धमालरावांची आठवण झाली.

....घोडनदीच्या किनार्यावर ....शिवकालीन मंदीरे आणे एक अपुर्ण राजवाडा....






धोके आणी सुचना :
१) रांजणगावपासुन थेट टाकळी हाजी पर्यंत,मुख्य रस्त्यावर दुचाकी-चारचाकीचे गॅरेज नाही.थोडस गावात शिरावं लागत..आठ ते नऊ किमी...
२) खळगी वरुनच पहावीत...खोलात शिरु नये...रांजणखळग्यांमध्ये प्रवाहात अनेक जण वाहुन गेलेत,त्यांची शव देखील मिळाली नाहीत.......काही दिवसांपुर्वी...पावसाळ्यात वाळुचा ट्रक वाहुन गेलाय...तो आख्खा ट्रक सापडला नाही...आता पाणी आटलेले असले तरी पाण्याचा प्रवाह कुठुन सुरु होतो आणी कुठुन नाहीसा होतो ते कळत नाही.


















पुढील भागात :::पाण्याखाली दडलेला,पण आठ दरवाजे असलेला राजवाडा.....
जबरा फोटो आहेत
जबरा फोटो आहेत खळग्यांचे..
(जाता जाता : ही आपाली नाव कोरुन ऐतिहासीक वास्तु वा निरर्गसौंदर्य खराब करायची घाणेरडी सवय कधी जाणार कळत नाही.
)
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
+१
सुहास, फोटो एक लंबर आहेत. गुगल म्यापाची लिंक दे ना, म्हणजे हे ठिकाण नक्की कुठे आहे ते नीट समजेल.
(गुगल-म्यापाधीन) अदिती
निघोज मॅप
येथे दुवा दिसतो आहे. सुहास बरोबर आहे ना?
झक्कास... विस्तीर्ण नदी पात्र
झक्कास... विस्तीर्ण नदी पात्र आणि मिरच्या बघून समाधी लागायच्या बेतात आहे.
सांभाळून...
नाहीतर पडाल.. रांजणखळग्यात...
सुहास.. मस्तच आहेत ते फोटो.... या ठिकाणाबद्दल कुठेतरी भटकंतीच्या पुस्तकात वाचले होते..पण तिथे एकच फोटो होता.. तू दिलेले वेगवेगळ्या कोनातून काढलेले फोटो त्या खळग्यांची रौद्रता दाखवतात..
मी समाधी लागेल असे म्हणले...
मी समाधी लागेल असे म्हणले... लुडकणार असे नाही म्हणले. समाधी लागली तर त्या व्यक्तिचे रक्षण स्वतः परमेश्वर करतो. जाऊ द्या...
हॅ हॅ हॅ बिका सत्ययुगात समाधी
हॅ हॅ हॅ बिका सत्ययुगात समाधी = समाधीच
पण या कलियुगात समाधी = डुलकी म्हणुन मकने सावधान केले असावे.
(समाधी = डुलकी संदर्भ भाईकाकांचा असामी-असामी)
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
अरेच्चा तुम्ही लोक पोचलात पण
अरेच्चा तुम्ही लोक पोचलात पण कलियुगात? बरं बरं... येऊ आम्ही सावकाश. अजून वेळ नाही झालीये अवताराची.
बरं बरं ज्या कुठल्या युगात
बरं बरं ज्या कुठल्या युगात आहात तिथे असा पण उगाच शंबूकाच्या कानात काही बरळू नका. नाहीतर काही लोक चिडतील सत्ययुगातील लोकं शूद्रांच्या कानात तापलेलं शिसं ओतत होती म्हणून.
-पुण्याचे पेशवे
हो बरोबर आहे मि खुप वेळा
हो बरोबर आहे मि खुप वेळा गेलोय निघोजला मस्त आहे ते ठिकाण आणि गाव पण
तुमची भेट द्यायची ठिकाणे
तुमची भेट द्यायची ठिकाणे पाहून 'मिरच्या झोंबल्या.' बाकी फोटो क्लास. भेट द्यायला हवी असेच ठिकाण.
अवांतर- मांडवगड नि महेश्वरला कालच जाऊन आलो नि तिकडे 'दाल बाफलेही' चक्क हाणले. मजा आला.
हा आमचा स्वभाव
मी मध्यंतरी डाल बाफले हाणले
मी मध्यंतरी डाल बाफले हाणले होते. पण मला ते फार आवडले नाहीत. असो. त्यापेक्षा तिकडची रतलाम शेव छान लागते. असो.
-पुण्याचे पेशवे
छान सफर घडवली...
मस्तानीची कबर असलेले पाबळ त्याच भागात आहे. आणि पाच पीरांचे गाव वडगांव पाचपीर पण.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
सुहाश्या मस्त फोटो... मॅप
सुहाश्या मस्त फोटो...
मॅप द्या रे ह्या जागेचा कोणीतरी...
-निखिल
जबरा
जबरा
च्यामायल्ला!!!!
अविवाहित मित्रांसाठी प्रेमळ सल्ला: सुखी आहात लेको...लग्नाची घाई करु नका.एकदा संसाराच्या रगाड्यात अडकलात की हे असलं फिरणं बिरणं विसरा!!!!
ह्या सुहाश्यानं चांगलं फोन करुन बोलावलेलं, पण आम्ही किती करंटे... घरसंसाराच्या जबाबदार्या बोकांडी घेऊन त्या पुर्ण करत बसलो! नायतर मीसुध्दा नसतो का हा इतका भारी फेरफटका मारुन आलो?
च्यायला..कायच्या काय आहेत ती खळगी! एखादा खाली उतरला तर वरुन दिसायचाही नाही राव!
बाकी सुहासराव,
त्या मिरच्या आणि मीठाचा फोटो तेव्हढा टाकायला नको होता राव तुम्ही! फोटो पाहुनच तोंड खवळलं ना राव१!!!!!!!!
अरे द्मु.. सुहासचा पण बँड
अरे द्मु.. सुहासचा पण बँड वाजलाय हे विसरलास की काय???
बरोबर आहे की...
पण तो कुठे राजा शिवछत्रपती वाचतोय हल्ली?
अरे हो... विसरलेच होते की...
अरे हो... विसरलेच होते की...
मावशी... राजा शिवछत्रपती
मावशी... राजा शिवछत्रपती वाचलं की संसार सुखाचा होतो का हो? लवकर सांगा... माझ्याकडे आहे ते पुस्तक. लग्गेच वाचायला घेतो.
ओ काका .. तुम्ही "झाशी की
ओ काका .. तुम्ही "झाशी की राणी " किंवा गेला बाजार "किरण बेदीं"चं एखाद पुस्तक वाचायला हवं होतं .. असो दिवस गेले ते आता
आता तुम्ही "चाळीशीनंतरचे कमीजेवण" हे पुस्तक वाचा 
त्यानेच आयुक्ष सुखी होईल हॅहॅहॅ ..
नको नको ..... मला कळले ते
नको नको ..... मला कळले ते प्रकरण... माझी सध्या तरी ते पुस्तक वाचायची अज्जिबात इच्छा नाही. पुढे मागे बघू.
काय टार्या
तू काय सध्या 'अविवाहितांचे जामजेवण' ची पारायणे करतो आहेस वाट्ट!!
चतुरंग सामक
ह्हा ह्हा ह्हा तुम्ही
ह्हा ह्हा ह्हा
तुम्ही काय जोडे मारायची एकही संधी सोडू नका !!!
तो धम्या तिकडे फक्त "शिवाजी म्हाराजंच" वाचतोय "झाशी की राणी" का नाही वाचत रे ? म्हणून त्याला का खडसावत नाहीये ? आँ ?
आच्च्च्च्चा त्यादिवशी नंदन रोशणी चे पार्टस वाचत होता म्हणे
कोण काय वाचतो हल्ली काय कळत नाही बॉ ... त्यात सोनम तै कुठे दिसत नाहीत .. पुस्तकवाचन आणि हृदयपरिवर्तन ह्यावर त्यांचा गाढा अभ्यास आणि विष्वास आहे.
- (राज्जे सिवाजींचा फैन) टारझन
कोण काय वाचतो हल्ली काय कळत
कोण काय वाचतो हल्ली काय कळत नाही बॉ ... त्यात सोनम तै कुठे दिसत नाहीत .. पुस्तकवाचन आणि हृदयपरिवर्तन ह्यावर त्यांचा गाढा अभ्यास आणि विष्वास आहे.
ते इथे काय विचारतं ने. ते कोनाला झंटलमन मान्साला विचारा ने. अनि त्येंचा विशेश अन्भव तुम्हाला आमाले काय विचारता..
-पुण्याचे पेशवे
>>>माझी सध्या तरी ते पुस्तक
>>>माझी सध्या तरी ते पुस्तक वाचायची अज्जिबात इच्छा नाही.
नशीब.. नाहीतर पारायणे करण्याची तयारी होती तुमची!!!!
>>>पुढे मागे बघू.
असो!!!!
लेका धम्या बायकोला घेऊन फिर
लेका धम्या बायकोला घेऊन फिर की... (आत्ता लगेच शक्य नाही हे माहित आहे) ... तु तर अनुभवलीच असेल की बायको बरोबर फिरण्यातली गम्मत....
लग्नाची घाई करु नका.एकदा संसाराच्या रगाड्यात अडकलात की हे असलं फिरणं बिरणं विसरा!!!!
तरी सुद्धा असे कसे म्हणु शकतोस?
विस्तीर्ण नदी पात्र आणि
विस्तीर्ण नदी पात्र आणि मिरच्या बघून समाधी लागायच्या बेतात आहे.>>>.
अगागागागगा..........
@धम्या...
पण आम्ही किती करंटे... घरसंसाराच्या जबाबदार्या बोकांडी घेऊन त्या पुर्ण करत बसलो! नायतर मीसुध्दा नसतो का हा इतका भारी फेरफटका मारुन आलो?>>>
करंटे!!!....अरे, अशी हजारो स्थळे ,लाखो आमंत्रणे आणी करोडो मिरच्या तुझ्या दोस्तीवर ओवाळुन साला त्या रांजणखळग्यात फेकुन देउ, मालक....."" आपण फक्त आमच्या वैनींची काळजी घ्या "".........बाकी तु एकदा सांग साला त्या मिरची वाल्याला तुझ्या सोसायटीच्या आवारात दुकान टाकायला लावुन्,नाय मिरच्या घरपोच करायला लावल्या तर नावाचा बाळ्या नाय !!.....
मिठा-मिरच्यांची दुकाने ढिग
मिठा-मिरच्यांची दुकाने ढिग लावशील रे पण रांजणखळगी कशी पाडशील त्याच्या परसात? ऑ?
-पुण्याचे पेशवे
मस्त रे सुहास्या......एक नंबर
मस्त रे सुहास्या......एक नंबर
मस्त रे सुहास
एकदम सुंदर फोटो आहेत. अगदी या ठिकाणाचा मोह पडेल असे
फोटोच बोलके आहेत तेव्हा कसे जायचे ते सांगून तू पुढील भागाच्या "पाण्याखाली दडलेला,पण आठ दरवाजे असलेला राजवाडा....." याचे वर्णन करण्यासाठी शब्द राखून ठेवले आहेस असे वाटते
(जुन्या ठिकाणांच्या शोधात असलेला) सागर
अवांतर : पुढील भागाची उत्सुकतेने वाट पहात आहे. पाण्याखालच्या राजवाड्याचा इतिहास थोडा सविस्तर लिहिता आले तर बघ, चर्चेला मजा येईन..
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
ज ह ब र्या !!! सुहास सर्वच
ज ह ब र्या !!!
सुहास सर्वच फोटो अतिशय सुंदर. माहिती पण छान दिली आहेस.
सुहास, जबरदस्त माहिती दिली
सुहास, जबरदस्त माहिती दिली तू.
या ठिकाणी असले वेगळे भुरूप कसे निर्माण झाले?
येथील नदीचे नाव काय?
बहूदा पुर्वी नदीचा प्रवाह फारच वेगवान असल्याने अन हा खडक तुलनेने वेगळा असल्याने असले भुरूप झाले असावे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
सही
आहाहा!!! इयत्ता आठवी (तुकडी "अ") मधे असताना निघोज, कान्हूर (जाताजाता रांजणगाव) अशी भौगोलीक सहल गेल्याची आठवली. कुंडाचे फोटो पाहून मजा आली. अगदी स्मृतीरममाणताच म्हणायची हो!
निघोजचा अजुन एक दुवा .
असेच पुढल्या भागात कान्हूरचे लवणस्तंभ दर्शन घडव रे बाबा!!!
बाप रे.... जबरदस्त फोटो
बाप रे....
जबरदस्त फोटो रे....
हेवा वाटतो लेका... थांब लवकरच मी बरा होऊन मग भटकंती चालू करतो तेव्हा आपण एक मस्त ट्रिप करु.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हॅहॅहॅ!!!
म्हणजे सुहास तु पूनमवर थांब वाट बघत!
मग भटकंती चालू करतो तेव्हा
मग भटकंती चालू करतो तेव्हा आपण एक मस्त ट्रिप करु.>>.
राज्या, ह्या प्रतिसादाला " चुकीचे " असे टाचण का देउ नये ह्याचा त्वरीत खुलासा करावा
सही
फोटो आणि वर्णन जबरदस्त! खळग्यांचे फोटो तर क्लासच आलेत. काही फोटो पाहून नर्मदेवरचा भेडाघाट आठवला.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
जहबहरा
ज ह ब ह रा हा
मस्तच रे सुहाशा. आम्ही ऐकलेले
मस्तच रे सुहाशा. आम्ही ऐकलेले याच्याबद्दल पण पाहीलेले कधी नाय. नाही म्हणायला इतका वेळ मिळतच नाही. तुझ्यामुळे अनेक आम्ही जाऊ न शकलेले भाग बघायला मिळाले.
-पुण्याचे पेशवे
लै भारी रे
लै भारी रे सुहास. पण पुढचा भाग कधी लेका ?
नायतर देउ का मकीला कॉन्ट्रॅक्ट श्राद्धाचे ?
लै भारी ...
लै भारी ... मस्त
पुढील भाग काय पुढील वर्षी काय
पुढील भाग काय पुढील वर्षी काय रे ???
मकला सुपारी देऊ का..
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
पुढील भाग काय पुढील वर्षी काय
पुढील भाग काय पुढील वर्षी काय रे ???
हा काय " तो ती व मी -लफडा अनलिमीटेड" वाटला काय ? टाकतो ह्याच वर्षी ...बरोबर ३१ डिसे. २०१० ला
मकला सुपारी देऊ का.. >>
हे हे अरे मक ला दुसरे काम नाही का ?
काय रे लावलंय माझ्या
काय रे लावलंय माझ्या नांवाने...????
आधी जाऊन धम्याच्या घरी श्राद्धाचं जेऊन या..
मग घालूयात सवडीने एकेकांची (पक्षी: कथांची) श्राद्धे!!!
अप्रतिम
अप्रतिम