ज्योतिष्य ! खरेच शास्त्र आहे का ?
ज्योतिष्य ! खरेच शास्त्र आहे का ?
अलीकडेच वाचनात आलेल्या काही लेखांवरून असे लक्षात आले की फलज्योतिष्यास थोतांड मानले की आपण विज्ञाननिष्ठ, पुरोगामी विचारांचे ठरतो अशी बहुतेक लोकांची समजूत असावी..... आणि काही लेखांमध्ये मूळ विषय बाजूला राहून अध्यात्माची एक बाजू मांडली गेली...
माझ्या माहितीप्रमाणे वैज्ञानिक दृष्टीकोनातूनच जर शास्त्र कशास म्हणावे असे तर त्यासाठी एक फार महत्वाचा निकष लावला जातो... तो म्हणजे.... त्या शास्त्राचे निष्कर्ष हे सदासर्वकाळ .. सर्व ठिकाणी ... सर्व लोकांस त्या त्या परिस्थितीत जसे मिळावयास हवे... तसेच सारखे मिळावयास हवे..... फलज्योतिष्यात तसे होत नाही... बर्याच ज्योतिष्यांचे एकाच व्यक्तीच्या कुंडली बाबत निरनिराळे मत असू शकते...... वेगवेगळे भविष्य का सांगितले जाते... एक उदाहरण देतो... आजचे वैद्यकशास्त्र हे पुष्कळच प्रगत झाले आहे.... त्याच्या वेगवेगळ्या शाखा आहेत.... समजा अॅलोपॅथी ह्या एका शाखेत विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला गेला... विद्यार्थ्यांनी तो ग्रहण केला...... डॉक्टर्स... आता सर्वांना एकच अभ्यासक्रम शिकवला गेला आहे..... ज्यात सर्व रोगांची लक्षणे ... निदाने ठाम आहेत ... तेव्हा सर्व डॉक्टर्स ने केलेले रोगनिदान सारखे यायला हवे... सर्वांची उपचार पध्दती सारखी असायला हवी...... आणि सर्व काही सारखे असल्या कारणाने उपचारांपासून मिळणारे परिणामही सारखे असायला हवे.... पण तसे होत नाही.... कित्येक ऑपरेशन्स फेल जातात.... निदाने चूकतात..... सर्वात महत्वाचे म्हणजे आपणही सेकंड ओपिनियन घेतो....... या सर्वात एक गोष्ट आपण साफ विसरून जातो ती म्हणजे कुठलेही शास्त्र शिकणार्या विद्यार्थ्याची वैयक्तिक ग्रहणक्षमता.... त्या ज्ञानाचा योग्य तो उपयोग करण्याची क्षमता.....
हल्ली ज्योतिष्य सांगणार्यांचे भरघोस पीक आले म्हणजे ते सर्व जण ज्योतिष्यशास्त्रात तितकेच निष्णात आहेत असे आपण कसे गृहीत धरतो.... बनावट पदव्या मिळवून नोकरीधंदा करणारे पुष्कळजण आहेत आपल्याकडे .... सगळ्यांना एकाच माळेत ओवण्यासारखी गोष्ट आहे ही... अजून एक मुद्दा असा की ते चमत्कारिक..बुध्दीला न पटणार्या गोष्टी सांगतात....किंवा त्यांनी जे सांगितले त्या मागचा कार्यकारणभाव नाही आला माझ्या लक्षात , त्यांनी जे सांगितले तसे झाले नाही .... म्हणून सरसकट ज्योतिष्यशास्त्र हे शास्त्रच नव्हे असे म्हणणे माझ्या तरी बुध्दीला पटत नाही..आणखी एक गोष्ट अशी की आपल्याला झटपट परिणाम हवे असतात म्हणूनच डॉक्टर्सकडे आयुर्वेदाचार्यांपेक्षा जास्त गर्दी असते.. तीच गोष्ट ज्योतिष्यशास्त्रास लागू होते की.......
कुठलीही माहीती असलेली गोष्ट किंवा माहिती ही वैज्ञानिक दृष्टीकोनातून सिद्ध नाही झाली याचा अर्थ असा नव्हे की ती चूक आहे...... कदाचित त्यामागील कारण कळावयास आणखी कालावधी लागू शकतो की...... आणि कुठले शास्त्र परिपूर्ण आहे.... ?? संशोधनास आणि सुधारणेस अनंत वाव आहे.
बाय दी वे आपल्याकडे पुर्वी चौसष्ट कला आणि चौदा विद्या शिकवल्या जायच्या......
चौदा विद्या आणि चौसष्ठ कला
१४ विद्या आणि ६४ कला याबद्द्ल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. त्या १४ विद्या आणि ६४ कलांची ही ओळख.
चौदा विद्या
चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अश्या एकूण चौदा
वेद : १. ऋग्वेद २. यजुर्वेद ३. सामवेद ४. अथर्ववेद
सहा वेदांगे
१. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र.
२. ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या.
३. निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र.
४. कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र.
५. छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान.
६. शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन.
१. न्याय,
२. मीमांसा,
3. पुराणे
४. धर्मशास्त्र.
चौसष्ट कला
१. पानक रस तथा रागासव योजना - मदिरा व पेय तयार करणे.
२. धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे.
३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.
४. आकर ज्ञान - खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे.
५. वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे.
६. पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे.
७. वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.
८. व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे.
९. वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे.
१०. शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे.
११. अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान असणे.
१२. वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे.
१३. बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.
१४. चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- पाकक्रिया, स्वयंपाक करणे.
१५. पुस्तकवाचन- काव्यगद्यादी पुस्तके व ग्रंथ वाचणे.
१६. आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे.
१७. कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे.
१८. हस्तलाघव- हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामे करणे.
१९. प्रहेलिका - कोटी, उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे.
२०. प्रतिमाला - अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.
२१. काव्यसमस्यापूर्ती - अर्धे काव्य पूर्ण करणे.
२२. भाषाज्ञान - देशी-विदेशी बोलींचे ज्ञान असणे.
२३. चित्रयोग - चित्रे काढून रंगविणे.
२४. कायाकल्प - वृद्ध व्यक्तीला तरुण करणे.
२५. माल्यग्रंथ विकल्प - वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे.
२६. गंधयुक्ती - सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.
२७. यंत्रमातृका - विविध यंत्रांची निर्मिती करणे.
२८. अत्तर विकल्प - फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे.
२९. संपाठय़ - दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.
३०. धारण मातृका - स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.
३१. छलीक योग- चलाखी करून हातोहात फसविणे.
३२. वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.
३३. मणिभूमिका - भूमीवर मण्यांची रचना करणे.
३४. द्यूतक्रीडा - जुगार खेळणे.
३५. पुष्पशकटिका निमित्त ज्ञान - प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे.
३६. माल्यग्रथन - वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे.
३७. मणिरागज्ञान - रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे.
३८. मेषकुक्कुटलावक - युद्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे.
३९. विशेषकच्छेद ज्ञान - कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे.
४०. क्रिया विकल्प - वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.
४१. मानसी काव्यक्रिया - शीघ्र कवित्व करणे.
४२. आभूषण भोजन - सोन्या-चांदी वा रत्नामोत्यांनी काया सजवणे.
४३. केशशेखर पीड ज्ञान - मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.
४४. नृत्यज्ञान - नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे.
४५. गीतज्ञान - गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे.
४६. तंडुल कुसुमावली विकार - तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.
४७. केशमार्जन कौशल्य - मस्तकाला तेलाने मालीश करणे.
४८. उत्सादन क्रिया - अंगाला तेलाने मर्दन करणे.
४९. कर्णपत्र भंग - पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.
५०. नेपथ्य योग - ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे.
५१. उदकघात - जलविहार करणे. रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे.
५२. उदकवाद्य - जलतरंग वाजविणे.
५३. शयनरचना - मंचक, शय्या व मंदिर सजविणे.
५४. चित्रकला - नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे.
५५. पुष्पास्तरण - फुलांची कलात्मक शय्या करणे.
५६. नाटय़अख्यायिका दर्शन - नाटकांत अभिनय करणे.
५७. दशनवसनांगरात - दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे.
५८. तुर्ककर्म - चरखा व टकळीने सूत काढणे.
५९. इंद्रजाल - गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे.
६०. तक्षणकर्म - लाकडावर कोरीव काम करणे.
६१. अक्षर मुष्टिका कथन - करपल्लवीद्वारे संभाषण करणे.
६२. सूत्र तथा सूचीकर्म - वस्त्राला रफू करणे.
६३. म्लेंछीतकला विकल्प - परकीय भाषा ठाऊक असणे.
६४. रत्नरौप्य परीक्षा - अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.
{ सौ.कांचन कराई यांच्या गुगल बझ वरून साभार }
ब्रिटीशर्सने आपल्या वर राज्य करण्या करिता आपली शिक्षण पध्दती सर्वात आधी मोडीत काढली ........ त्यासाठी त्यांनी काही सर्व्हे केले होते.... त्याचे रिपोर्टस आपणास पान ८९ वर खालील लिंकवर पाहावयास मिळतील ... शिवाय हे पुस्तक आणखी बर्याच गोष्टींवरही प्रकाश टाकू शकेल.....
THE BEAUTIFUL TREE Indigenous Indian Education in the Eighteenth Century by Dharampal... http://www.scribd.com/doc/10932582/The-Beautiful-Tree-of-Indigenous-Indi...
सांगण्याचा मुद्दा असा की ....एखादी गोष्टीचा अभ्यास जोपर्यंत मी स्वत: करत नाही ... ती गोष्ट मुळासकट जाणून घेत नाही.. अनुभवत नाही... त्याचे काही प्रयोग स्वत: करुन तपासत नाही किमान तो पर्यंत तरी मी त्या गोष्टी बाबत माझे मत नाही ठरवणार........
हेच ज्योतिष्य”शास्त्रा” बाबत मला वाटते ....
.jpg)
{मस्त॑ रे.. सविस्तर प्रतिसाद}
मस्त॑ रे..
सविस्तर प्रतिसाद लेख पुन्हा वाचून देतो.
ही पोच समज
Hope is a good thing...
{राज ! पोचपावती करिता धन्यवाद}
सविस्तर प्रतिसादाची वाट पाहतो !
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
{इंटरेस्टींग माहिती}
इंटरेस्टींग माहिती आहे.
जाणकारांच्या प्रतिसादांची वाट पहात आहे. जेणेकरुन आमच्या माहितीमधे आणखी भर पडेल.
मीऽच तो...
{एखादी गोष्टीचा अभ्यास}
एखादी गोष्टीचा अभ्यास जोपर्यंत मी स्वत: करत नाही ... ती गोष्ट मुळासकट जाणून घेत नाही.. अनुभवत नाही... त्याचे काही प्रयोग स्वत: करुन तपासत नाही किमान तो पर्यंत तरी मी त्या गोष्टी बाबत माझे मत नाही ठरवणार........>>>
सहमत ! बाकीचा प्रतिसाद नंतर सावकाशीने देइन. सद्ध्या येणारे प्रतिसाद वाचायची उत्सुकता लागुन राहीली आहे.
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{सविस्तर प्रतिसाद नंतर}
मी आपला वाटच पाहात बसलोय ... !
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
{शास्त्र म्हणजे विज्ञान ह्या}
शास्त्र म्हणजे विज्ञान ह्या भ्रामक कल्पनेतुन हा वाद उभा राहिला आहे.
माझ्या मते आणि मी जो काही तुटपुंजा अभ्यास केला आहे त्यावरुन भारतीय साहित्यात शास्त्र म्हणजे त्या विषयाचा केला गेलेला विस्तृत अभ्यास आणि त्याचे मौखिक किंवा लेखी केले गेलेले संकलन, ज्यात त्या संकलना पर्यंत असलेले सर्व त्या विषयाचे ज्ञान संक्षेप वा विस्ताराने एकत्र मिळते.
या नुसार वर उल्लेख केलेला कल्प ज्यात यज्ञ विधींची माहिती आहे ते शास्त्र या संज्ञेला पात्र आहे परंतु त्याला आपण विज्ञान म्हणू का? तर नाही. म्हणुन भौतिकशास्त्र असे म्हटल्यावर जी विज्ञानाची शाखा आहे तिला खरे तर भौतिकी विज्ञान असे म्हणायला हवे होते परंतु पुर्वसुरींनी त्यात चूक केली आहे. शास्त्र म्हणजे विज्ञान नव्हे. त्यामुळे ज्योतिष शास्त्र म्हणले की त्यात त्या विषयाची समग्र माहिती संकलीत होते परंतु जसे काही जणांना त्याचे पडताळा मिळत नाही, कारण अजून तो विषय नीट अभ्यासला गेलेला नाही. ज्यावर पुन्हा कधीतरी.
बाकी प्रतिसाद वाचत आहेच...
नाना (केपी स्पेशालिस्ट)
{शास्त्र म्हणजे विज्ञान}
शास्त्र म्हणजे विज्ञान नव्हे
+१
Hope is a good thing...
{शास्त्र म्हणजे विज्ञान नव्हे.}
+२ (ज्योतिष्य हे ऑकल्ट सायन्स आहे).
{नेमकी हीच ओरड}
होमीओपॅथी बाबत केली जाते............ ऑकल्ट सायन्स... म्हणून.
And then !
{ऑकल्ट म्हणजे काय ????? आपलं}
ऑकल्ट म्हणजे काय ????? आपलं विंग्रजी थोडे कच्चे आहे म्हणून विचारतो...
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
{मराठीत वीचक्राफ्ट व वींग्रजीत}
मराठीत वीचक्राफ्ट व वींग्रजीत पून्हा त्याला "जादूटोणा", "तंत्र मंत्र", "जडीबूटी" वगैरे वगैरे संदर्भात संबोधले जाते. थोडक्यात गूढ गोश्टीं संबधीत हा शब्द आहे.
And then !
{...... ज्योतिष शास्त्र म्हणले}
......
ज्योतिष शास्त्र म्हणले की त्यात त्या विषयाची समग्र माहिती संकलीत होते परंतु जसे काही जणांना त्याचे पडताळा मिळत नाही, कारण अजून तो विषय नीट अभ्यासला गेलेला नाही.......
असेच म्हणतोय मी सुद्धा ........... अवलिया... पुन्हा कधीतरी कशाला.... तुम्ही लिहू शकताय ना या विषया वर मग जरूर लिहाच ... वाचायला आवडेल....
केपी स्पेशालिस्ट म्हणजे ... ????? कृष्णमूर्ती पध्दत काय ..?
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
{सगळे सविस्तर उत्तर देणार}
सगळे सविस्तर उत्तर देणार म्हणताहेत...

तोवर मी माझ्या लहान डोक्याचे बोबडे विचार मांडतो इथे पटकन...शॉर्ट मध्ये... पटतात का बघ... नाहीतर स्पष्टीकरण तसही मिळणारच असं दिसतंय...
आणि बाकी लोकांना - मी जे लिहितोय ते पूर्णतःच चुकीचे असेल तर उगी माझ्यावर ओरडू नका... मी माझी ज्योतिष शास्त्राबद्दलची कल्पना मांडतोय...
हे हि मान्य नसेल तर धागा रिकामा जात होत म्हणून उगी काहीतरी खरडतोय म्हणून समजा....
सुरुवात एका उदाहरणावरून करूयात... तुझ्या शरीराला एक व्यवस्था समज, जी स्वयंभू आहे... आता हिच्यात काळानुसार बदल होत जातात, काही अवयव येतात, काही जातात, काही काम करणं सुरु करतात, काही बंद करतात, पण हि प्रणाली सुरु राहते... आता जर ह्या प्रणाली चा तू सखोल अभ्यास केलास तर तू हिच्यात येणाऱ्या प्रत्येक अवयावर भाष्य करू शकतो, इतकंच काय तर त्याचं भविष्य देखील सांगू शकतोस... अगदी १६व्या वर्षी फुटणाऱ्या मिसुरडीतला कोवळा केस असू दे, किंवा टक्कल पडतांना गळणारा केस असू दे... डोळे, हृदय...सगळ्यांच्या बाबतीत तू भाष्य करू शकतो जर शरीर नामक प्रणाली चा तुझा अभ्यास सखोल असेल तर...
आता हीच संकल्पना आपल्या जगाशी लावूयात... इथे जग म्हणजे पृथ्वी नव्हे... तर तिला सामावणारी सोलर सिस्टीम, तिला सामावणारी आकाशगंगा...आणि अजूनकाही... हि सर्व एक प्रणाली समज जी सुद्धा स्वयंभू आहे... आणि पण हिला मन नसल्यामुळे (मेंदू म्हणू शकतोस) हिच्या कार्यप्रणालीमध्ये आकस्मित बदल होत नाहीत...आता जर तू हिचा सखोल आभ्यास केलास, तर तू हिच्या अवयवांवरही भाष्य करू शकतोस...आणि मग त्यातलाच एक अवयव म्हणजे पृथ्वी आणि तिच्या अवयावांपैकी एक म्हणजे मानसं ह्या बद्दलही भाष्य करू शकतोस... शेवटी सगळ्या गोष्टी आश्रित असतात रे एकमेकांच्या... त्यामुळे एखाद्या माणसाचा जन्म म्हणजे पृथ्वीच्या अंगावर फुटणारा आणि एक केस समज... मग हा कुठे उगवला, कधी उगवला, त्यावरून तू त्याचा वर्ग ठरवू शकतोस, मग त्या वर्गाचे सर्व गुणधर्म त्याला लागू होतील...मुळात तू त्याची मुलभूत बांधणीच सांगू शकतोस...आणि ज्या अर्थी हि पूर्ण प्रणाली बदलणार नाही आहे...म्हणजे आकस्मितपणे...त्यामुळे तू त्याचे भविष्य सुद्धा वर्तवू शकतोस... हे शास्त्र सुद्धा असंच काम करत असावं...
मी इथेही असतो -- साधं-सरळ
{वाचतो आहे..... अजून काही}
वाचतो आहे..... अजून काही सविस्तर प्रतिसाद येण्याचे बाकी आहेत...
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
{हेच म्हणतो...जास्त काही कळत}
हेच म्हणतो...जास्त काही कळत नाही ह्यातलं...बघुया पामराला काही कळतंय का
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{शास्त्र?}
ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही हे ठरवण्यासाठी आधी शास्त्र म्हणजे काय याची तुमची व्याख्या सांगा. मग ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही हे ठरवता येईल.
तसेच ज्योतिष नि खगोल यात तुम्ही फरक करता की नाही हे सांगा. कारण ज्योतिष हे शास्त्र नसेल तर पौर्णिमा, अमावास्या वगैरे तिथी तसेच ग्रहणांचे दिवस हे बरोबर कसे सांगते असे विचारणारे बरेच महाभाग - दुर्दैवाने - आमच्या माहितीत आहेत. त्यामुळे 'ज्योतिष; म्हणजे नक्की काय हे ही जरा खुलासेवार सांगा.
खरंतर आम्ही या धाग्यावर प्रतिसाद देणार नव्हतो कारण धागाविषय हा एक खिचडी झालेला आहे. ज्योतिष विषयाबद्दल लिहिताना इतर गोष्टी, वेदांगे, कला, विद्या इ.इ. बद्दल लिहिण्याने विषय भरकटणार याची १००% खात्रीच होती. अजून तरी बहुतेक प्रतिसादक 'पास' म्हणत असल्याने तसे झालेले दिसत नाही. विषयाचे नेमकेपण चर्चेसाठी महत्त्वाचे असते. तुम्ही तर इतका मोठा ढीग रचला आहे की हत्ती नि आंधळ्यांसारखी स्थिती व्हावी. प्रत्येकजण वेगवेगळ्या बाजूने भिडणार या ढिगाला.
अवांतरः चौसष्ट कलांपैकी बहुतेक इतक्या फुटकळ आहेत की केवळ अट्टाहासाने यादी वाढवण्यासाठीच नोंदवल्या आहेत असे वाटते. याशिवाय इतर अनेक उपयुक्त कला यात नोंदलेल्या नाहीत.
अतिअवांतरः चरखा घेऊन टकळीने सूत कातणे ही कला इथे पाहून स्वयंघोषित क्रांतिकारक विचारांच्या ऊर्फ गांधीद्वेष्ट्या सदस्यांच्या मनाला किती यातना होतील नै?
अति-अति अवांतरः मुळात चरखा हा एतद्देशीय प्रकार नाही. तो तुर्कस्थानातून इकडे आला असे मानले जाते (म्हणून तुर्ककर्म???). मग तो या चौसष्ट कला नोंदल्या गेल्या इतक्या जुन्या काळी इकडे आला की काय? (अर्रर्र... मुळात तुर्कस्तानातून इकडे आला हे मान्यच नसणे ही शक्यता विसरलोच की. हे पाश्चात्य इतिहासकारांचे ओझे किती दिवस वागवावे लागणार देव जाणे.)
अति-अति-अति अवांतरः
शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन.
सूची बनवणारा काय हिंदी भाषिक होता काय हो? (ह. घ्या)
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{ररा.... बरोबर आहे तुमचं....}
ररा.... बरोबर आहे तुमचं....
१) ती लिस्ट खिचडी करणार हे लक्षात आलं होतं.... पण ती लिस्ट मी " बाय दी वे " दिली होती...... ती पक्की विश्वासार्ह आहे की नाही हे मी नाही सांगू शकणार........
२) मला जे म्हणायचे आहे ते मी नेमकेपणाने... सुरुवातीच्या आणि सर्वात शेवटच्या पॅरा मध्ये मांडले आहे की....
३) ज्योतिष्य बाबत मला कळते असे नाही म्हणत मी... पण किमान जे लोक ज्योतिष्यावरील धाग्यावर मत प्रदर्शन करताना सरसकट थोतांड म्हणतात...... एखादा दूसरा मुद्दा पकडून त्या अनुषंगानेच प्रतिसाद देतात.... ते डोळसपणे अभ्यास करून तो देत आहेत ... असे मला त्या प्रतिसादांवरून वाटले नाही.... ( एखादा दुसरा सन्माननीय अपवाद )...
४) आणखी एक असे.... की आपल्याला एक तर ज्योतिष्य "शास्त्रा" बाबत काही फारशी माहिती नाही... त्यामुळे म्हंटले किमान कुणीतरी अभ्यासकाने याबाबत सखोल प्रतिसाद या धाग्यावर दिला तर उत्तमच आहे...
५) "शास्त्रा"ची माझी व्याख्या बदलती आहे.......
( आता तुमची थोडीशी कॉपी बरं का
)
अवांतर : अधिक शोध घेता आम्हाला चौसष्ट कलांची एक नवी यादी विकीपिडीयाच्या कृपेने मिळाली.....मात्र त्यात ६३ आहेत... ती अभ्यासूंच्या दर्शनार्थ ठेवत आहोत... कृपया लाभ घ्यावा... काही सुधारणा असतील... तर.... स्वागतच आहे...
************************************************************************
* चौसष्ट कला *
वेद
वेदांग
स्मृती
अक्षर
नाटक
भारत
धनुर्विद्या
संधीविग्रह
लक्षता
युद्ध
निरोध
संधी
भटसमय
सत्व
ब्रह्मयोग
ज्योतिष
शिल्पशास्त्र
पान
मृट
चावन
लैर्भेविष्ट
अष्टमा
आकाशगमन
धुर्गमन
परकायाप्रवेश
संग्रामविजय
अपेक्षा
अतिहास्य
नीतीशास्त्र
कनकपरीक्षा
सामुद्रिक
स्तंभन
मोहन
उच्चाटण
धुरायण मधुर
रंभाशयन
वाकसाहाण
देशप्रवेशन
चित्रलेखन
मंत्रवेद
ना ना वेद
वाद्यवादन
त्रीमिर
वाहन
रसवाद्य
वीसावदी मंत्र
प्रत्यक्षाकार
विधित्व
अग्निस्तंभन
शूल स्तंभन
कोचन
मैंद्रक
सूपशास्त्र
रतीशास्त्र
ओवीबंध
चक्षुलक्षण
रत्नपरीक्षा
अश्वपरीक्षा
नारीपरीक्षा
पुरुषपरीक्षा
संगीतलक्षण
वायुस्तंभन
इंद्रजाल
??
अति अवांतर :
विद्यार्थीदशा चालू असल्याने आम्हाला जरा मुद्दे मांडूनच उत्तरे लिहायची सवय झाली आहे.... त्यामुळे... १,२,३,४...इ. इ.
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
{गुर्रर्र}
आता तुमची थोडीशी कॉपी बरं का
अवांतर : अधिक शोध घेता आम्हाला चौसष्ट कलांची एक नवी यादी विकीपिडीयाच्या कृपेने मिळाली...
जल्ला अब्रूचे धिंडवडे काढलेस की रे. ना आम्ही विकिपीडिया विश्वासार्ह मानतो ना आमच्या कोणत्या लेखनात तेथील संदर्भ वापरतो. (का त्याचे एक उदाहरण आमच्या 'रोश आणि अॅडम्स'च्या एका पुढील भागात येइलच.) विकिपीडिया हा हौशी लोकांनी तयार केलेला 'माहितीकोश' आहे, त्याला मी 'ज्ञानकोश' मानत नाही.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{वेद वेदांग स्मृती अक्षर नाटक }
वेद
वेदांग
स्मृती
अक्षर
नाटक
भारत
धनुर्विद्या
संधीविग्रह
लक्षता
युद्ध
निरोध
निरोध.. ही कसली कला?
{कल्पना नाही जामोप्या ! मी}
कल्पना नाही जामोप्या !
मी म्हंटलेच आहे ना वर .....
ती ( यादी) अभ्यासूंच्या दर्शनार्थ ठेवत आहोत... कृपया लाभ घ्यावा... काही सुधारणा असतील... तर.... स्वागतच आहे...
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
{शास्त्र वि. विज्ञान}
शास्त्र वि. विज्ञान मधला फरक संपूर्ण कळला नाही.
शास्त्र म्हणजे त्या विषयाचा केला गेलेला विस्तृत अभ्यास आणि त्याचे मौखिक किंवा लेखी केले गेलेले संकलन, ज्यात त्या संकलना पर्यंत असलेले सर्व त्या विषयाचे ज्ञान संक्षेप वा विस्ताराने एकत्र मिळते.
हे समजले.
शास्त्र म्हंजे बॉडी ऑफ नॉलेज म्हणता येईल काय ?
पण मग विज्ञान म्हंजे काय ?
विज्ञान ही प्रक्रिया (a process that uses the "scientific method") असे म्हणावे का ?
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{वैज्ञानिकतेचा निकष }
"मी मराठी"वर निरनिराळ्या संदर्भात विज्ञान आणि अंधविश्वास यांवर बर्याच टिप्पण्या होत असतात. काही वर्षांपूर्वी अंधविश्वास या विषयावर एक इंग्रजी परिच्छेद माझ्या वाचनात आला. त्यात असं म्हंटलं होतं की जगात ठिकठिकाणी शेकडो अंधविश्वास अजूनही टिकून आहेत. उदाहरणार्थ, आपल्याकडे असा एक समज आहे की कुत्र्याचं रडणं ऐकू आलं की जवळपास कुठेतरी एखाद्या माणसाचा मृत्यु होतो. आता हे जर आपण एखाद्या शास्त्रज्ञाला सांगितलं तर त्याबद्दल तो ताबडतोब पुरावा मागेल. त्याला किती अवधीत या दोन्ही गोष्टी एकापाठोपाठ एक घडल्या त्याची आकडेवारी लागेल. त्यासाठी दोन-तीन उदाहरणं देऊन पुरणार नाहीत; शेकडो उदाहरणं लागतील. त्याशिवाय त्याला कुत्रं रडलंय पण त्यानंतर जवळपास कुठेही मृत्यु झाला नाही असं कधी झालाय का आणि कुत्रं रडल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचं केलेलं भाकीत खरं झालाय का ही माहिती सुद्धा लागेल. यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी व दुसर्याचं नकारार्थी असेल तर तुमचं विधान शास्त्रज्ञाच्या विवेचक बुद्धीसमोर टिकणार नाही. त्यावर भोळसट माणसं विश्वास ठेवतील पण ते विज्ञानाच्या दृष्टीनी असत्य असेल. आकडेवारीच्या पुराव्याशिवाय शास्त्रज्ञ कुत्र्याचं रडणं व मृत्यूची चाहूल यात काही सर्वसामान्य अनुभवाशी जुळणारा एखादा दुवा आहे का याचाही विचार करील. जसे, कुत्र्याला भविष्यातल्या गोष्टी जाणवण्याचं एखादं इन्द्रिय आहे का? असल्यास त्याचं कार्य कशाप्रकारे चालतं?
वैज्ञानिक शोधांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातून जे तंत्रज्ञान विकसित होतं त्याचे दृश्य परिणाम (विधायक किंवा विध्वंसक) सर्वसामान्य लोकांना सारखेच अनुभवायला येतात. शिवाय असे अनुभव पूर्वनियोजन करून पुन्हा पुन्हा घेता येतात. कदाचित त्यमुळेच वैज्ञानिक सिद्धांत समजले नाहीत तरी खरे असले पाहिजेत असा विश्वास लोकांमधे निर्माण होत असावा.
शेवटी जाताजाता
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी कॉलेजच्या विज्ञानशाखेत जेव्हा प्रवेश घेतला त्यावेळी पहिल्याच दिवशी प्राध्यापकांनी सायन्सची व्याख्या सांगितली ती अशी :
Science is the continuous discovery of its own mistakes.
विज्ञानातला हा प्रांजळपणा तर विज्ञानाची विश्वासार्हता वाढवत नसेल?
{काका ...... यामागील कारण}
काका ...... यामागील कारण मला माहित नाही... पण या कुत्र्यांच्या बाबतीत मी दोन अनुभव घेतलेत..........
१ ) मी चौथीत असताना.... बिल्डींग च्या गच्चीवर जाऊन रोज एक कुत्रं रडायचे.... ते लक्षात रहायचे कारण म्हणजे .... त्या कुत्र्याला हाकलायला मीच जायचो... कदाचित... घरचे किंवा बिल्डींग मधील इतर कोणी मी लहान असल्याने पटकन पाठवत असतील ... पण त्याला हाकलायचो मीच... कुत्रे रडण्याची पहिलीच आठवण आहे माझी...
७/८ दिवसांत माझीच आजी वारली साध्या आजाराचे निमित्त होऊन ...
२ ) दुसरा अनुभव आता ३/४ वर्षांपुर्वी घेतला आहे.....
आमच्या घरासमोर थोडेसे बाजूला एक मारवाडी कुटूंबीय रहात होते.... त्यातल्या काकूंना कर्करोग होता..... त्या जाणार हे नक्कीच होते.... पण त्या व्यवस्थित फिरायच्या ... बोलायच्या ... त्यांनी सांगितल्याशिवाय कुणालाच कळायचे नाही की त्या आजारी आहेत....म्हणून...... त्याच्या दारासमोर अचानक दिवाळीच्या काही दिवस अगोदर गल्लीत फिरणारे कुत्रे विष्ठा करायला लागले... रोज त्याच जागी.... आणि रोजच्या रोज.... भर दिवाळीतही हा प्रकार चालू होता... त्यांची तब्येत बिघडली आणि लक्ष्मीपुजनाच्या दिवशी त्या गेल्या .......... कुत्र्यांनी नंतर जागा बदलली.... कुठे ते माहीत नाही.
मूळ धाग्यास हे विषयांतर असू शकेल... पण विषय निघाला आणि डोक्यात होते... म्हणून.....
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
{शास्त्रच आहे हे, एक संपुर्ण}
शास्त्रच आहे हे, एक संपुर्ण शास्त्र. अत्यंत अभ्यासाची गरज असते या विषयासाठी.
अनेकजण नावे ठेवणारे दिसत आहेत ते फुटकळ लोकांच्यामुळे जे स्वतःला ज्योतिषी म्हणवतात व आपले खिसे भरतात.
{हम्म्म ! धन्यवाद ... हा}
हम्म्म ! धन्यवाद ... हा धागा वर आणण्याकरिता ! ज्यासाठी हे लिहीले होते ती चर्चा पुन्हा सुरू झाली तर चांगलेच आहे !
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
{10/05/2011 - 14:04 ह्यावेळी प्रकाशित केले.}
हं.. जातकाने 10/05/2011 - 14:04 ह्यावेळी प्रश्न विचारला आहे प्रश्नकुंडली मांडली आहे.
उत्तर सापडल की लिहितोच. हे हे हे, दक्षिणेच तेव्हढ लक्षात असुदे...
{अनुमान काय निघते ते}
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
{शास्त्र कि विज्ञान?}
मित्रांनो,
ज्योतिष खरे शास्त्र आहे काय? इत्यादि चर्चा नेहमी चालू राहणार.
पहा ना, दि ४ डिसेबर २०१२ च्या मटामधील 'भविष्याचे वर्तमान' हा भला मोठा लेख...
प्रा. सुभाष पवार यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे, "भविष्याचा वेध घेत अपेक्षित अडचणींवर मात करण्यासाठी प्रयत्न करण्यास मदत करणारे शास्त्र म्हणजे ज्योतिष शास्त्र. ज्योतिष शास्त्राचे अभ्यास करणारे आणि ज्योतिषी यांचा भविष्य काळ उज्वल आहे. हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही."
लेख वाचून आश्चर्य वाचले की म. टा व अन्य पुरोगामी विचारांशी बांधिलकी असलेल्या, वाहिलेल्या पेपरमधे असे लिहून येणे किंवा आणणे कसे शक्य झाले? आता या लेखाला प्रत्यावाद करणारी मंडळी सरसाऊन काय काय लिहितात हे पहाणे रंजक ठरेल.
नाडी ग्रंथ प्रेमी
शशिकांत ओक
{काय चाल्लंय काय?}
विद्या काय
कला काय.
मधेच ब्रिटीश शिक्षण काय.
प्रतिसादात कुत्री! बाप रे!
इथे माझा पास.
"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.
{प्रतिसादात कुत्री! हे कोणाला}
प्रतिसादात कुत्री!
हे कोणाला व का उद्देशून आहे?
करतो. करेन. व करेगें
{काही चाल्लेलं नाहीये इब्लिस }
काही चाल्लेलं नाहीये इब्लिस
विद्या काय
कला काय.
मधेच ब्रिटीश शिक्षण काय ........ या गोष्टी बाय दी वे होत्या..... तसे म्हंटले आहे की स्पष्ट वरती.... !
आणि प्रतिसादात कुत्री ! साठी त्याच प्रतिसादातील शेवटची ओळ वाचलीत तर बरे होईल ....
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
{हे वाचा:}
http://www.mimarathi.net/node/6185#comment-64709
या कुत्र्यांचा ज्योतिषाशी काय संबंध ते समजले नाही म्हणून पास दिला होता हो.
"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.