झोप!!!

0
0

आज सकाळी नेहमी प्रमाणे अलार्म पुढे ढकलत ढकलत ७. ३० ला कसे बसे उठलो... आरामात आवरले आणि ऑफिसला यायला निघालो... ऑफिसला पोहचायला साधारण दोन स्टॉप चे अंतर राहिले असेल तोच मला एक जांभई आली. झोपेतून उठून साधारण दोन तास झाले नव्हते तरीही मला परत झोप येण्याची चिन्हे!!! मग थोडे आठवायचा प्रयत्न केला साधारणता रात्री कधी झोपलो असेल ते!!! काल रात्री तर साडे अकरा पर्यंत झोप लागली होती. म्हणजे साधारण ८ तासाची झोप मिळाली असेल. मग तरीही मला जागे होवून दोनच तास झाले असताना परत का झोप येत असावी??? बरे उठल्यावर मस्त गरम पाण्याने अंघोळ आणि एक कप चहा झालेला होता.... तरीही साधारण हे सगळे झाल्यानंतर अर्ध्यापाऊण तासातच झोप यायला लागली!!! असे आज काल वारंवार होत आहे खरे... बरेच वेळा एखाद्या ग्रुप मध्ये बसले असताना जांभई देणे सभ्यतेच्या शिष्टाचाराला धरून नाही.. मग काय कारण असावे??? एम आय डिप्राईव्हड ऑफ स्लीप????

असेच बसल्या बसल्या मग गुगल सर्च सुरू झाले. स्लीप ह्या विषयावर मराठीतून माहिती शोधायचा प्रयत्न केला, विकिपीडियावर एकच वाक्य सापडले.. "प्राण्यांमधील नैसर्गिक विश्रांतीची अवस्था. जगण्यासाठी नियमित झोपेची गरज असते." आपण का झोपतो हे पाहता असताना ह्या सापडला. ह्यानुसार आपण का झोपतो ह्याचे सुयोग्य कारण कोणालाही माहीत नाही पण आपल्या सामान्य क्रिया चालू राहण्यासाठी झोपेची आवश्यकता असते. तसेच झोपल्याने शरीरातली ऊर्जा वाचते हा ही एक असाच(!) समज आहे. झोपेची कमतरता असण्याचे परिणाम काय आहेत??? तर बराच काळ झोपेच्या कमतरतेने मृत्यू सुद्धा होवू शकतो. सामान्यता झोपेच्या कमतरतेमुळे अंग दुखणे, डोके दुखणे, तोंड कोरडे पडणे हे झोप येण्याचे किंवा कमी असण्याचे लक्षणे आहेत... पण सगळ्यात कॉमनली आढळणारे लक्षण म्हणजे जांभई. काही संशोधकांच्या मते जांभई देणे हे मेंदू शांत ठेवण्याचा प्रक्रियेचा भाग आहे. काही शास्त्रज्ञांनुसार जी रसायने मेंदू मध्ये भावना निर्माण करतात त्याच केमिकल मुळे जांभई येते. अजून एका मतानुसार शरीरात कार्बन डायॉक्साईड च्या कमतरते मुळे जांभई येते व त्यामुळेच शरीरात प्राणवायूचा पुरवठा केल्या जातो. ह्या दुव्यावर जांभई मेंदू चे तापमान निश्चितीकरता वापरल्या जाते ह्याचा निश्चितीसाठी केलेल्या प्रयोगाचे निरीक्षणे आहेत.
हे सगळे वाचूनही मला माझ्या झोप येण्याचे किंवा जांभई का येते त्याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. ह्यामुळेच ह्या दुव्यावर जाऊन मी माझी झोप माझ्या शरीराच्या गरजेनुरुप आहे का नाही हे तपासून घ्यायचा प्रयत्न केला. त्या नुसार मी जितक्या वेळ झोपतो तितकी जेमतेम गरजेपुरती आहे. दुपारी जर १५ मिनिटे झोपलो तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता हे तर काही शक्य नाही म्हणून अजून नवीन कारणे आणि नवीन उपाय शोधायला जातोय..
(हा लेख लिहायचा उद्देश माझी झोप उडवणे व तुम्हाला झोप यायला लावणे असा काहीसा होता.. पहिला भाग तर सफल झालाय पुढचे बघूयात)

ह्म्म्म...

तरीच!!!!

जर कुणाचे सगळ्यात जास्त आवडते काम झोपणे हेच असेल... तर त्यावर आम्ही काय बोलणार????
बाकी, झोपेवर नियंत्रण कसे मिळवायचे यावर अंहनं जास्त बोलू.. आपलं लिहू शकतील!!! हास्य

सांभाळा स्वतःला...

शरीराच्या कोणत्याही छोट्याशा कुरबुरीवरुन माहितीचं उत्खनन करुन गहन आजारांबाबत चिंता करत बसणं हे वेड लागण्याचं पहिलं लक्षण आहे!

निवांत झोपा जरा! बरं वाटेल.
हापिसाच्या जीममध्ये एखाद्या मित्राला घेऊन जा..त्याला म्हणावं "जरा लक्ष ठेव, कोणी येत नाही ना ते बघ. आणि एखाद्या बेच्यावर द्या ताणून....." हास्य

शरीराच्या कोणत्याही छोट्याशा

शरीराच्या कोणत्याही छोट्याशा कुरबुरीवरुन माहितीचं उत्खनन करुन गहन आजारांबाबत चिंता करत बसणं हे वेड लागण्याचं पहिलं लक्षण आहे!

लै भारी टोला!!!
यार लोकांच्या जांभईयेण्यावरुन टोकण्याबद्दल कंटाळा आलय wink



-निखिल

>>लै भारी टोला!!! अहो, टोला

>>लै भारी टोला!!!
अहो, टोला नाही..खरंच!

>>यार लोकांच्या जांभईयेण्यावरुन टोकण्याबद्दल कंटाळा आलय
सांगायचं, मी माणुस आहे म्हणुन मला असं होतं. तुम्हाला होत नसेल तर तुम्हीच डॉक्टरकडे जाऊन तपासुन घ्या. माणसाची बेसीक लक्षणं तुमच्यात का सापडत नाहीत ते!

कधी निब्बद्ध....

कधी निब्बद्ध लिहिला होतास का??? सुद्ध भाषेत??? जरा टिंबं टांबं जागच्या जागी असली असती ना मग???

बेच्यावर नशीब बोच्यावर नाही

बेच्यावर
नशीब मात्रे सोबत काना नाही दिलास
अनेक प्रश्न निर्माण झाले असते



-निखिल

टिंब टांबं..... लै भारी

टिंब टांबं.....
Laughing out loud Laughing out loud
लै भारी वाटलं वाचायला!!

अरे ढ...

हे मी नाही.. एक देशपांडेच म्हणून गेलेत....

(संदर्भ: वर्‍हाड निघालं लंडनला)

छ्या: आयुष्यात तुला कधी असले संदर्भ सांगायची वेळ येईल असे वाटले नव्हते... पार निराशा केलीस.... इतर पुस्तकांची पारायणे अंमळ जास्त चालू आहेत असे दिसते.. wink

शप्पथ्थ! अज्जुन नाही

Sad
शप्पथ्थ! अज्जुन नाही आठवलं!
नक्की कुठे आहे? म्हणजे कोणत्या घटनेशी आहे?

संदर्भ..

अरे ते बाप्पा पोरांना अभ्यास करायला सांगतात ना...
शिलोक म्हणा...श्लोक नाही.. शिलोक.. ते ही सुद्ध भाषेत..
परवचा म्हणा.. निब्बद्ध लिहा.. निबंध नव्हे.. निब्बद्ध.. सगळी टंबं टांबं जागच्या जागी पाहिजेत... तेव्हाचे आहे हे.. तू राजा शिवछत्रपतीच्या संगतीत असले चांगले चांगले संदर्भ हरवू नकोस रे... wink

झोप नसणारी गोष्ट

झोप नसणारी गोष्ट कुठली?
हॅहॅहॅ
जाग



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

रेम (रॅपिड आय मुव्हमेंट) स्लीप....

आणी नॉन रेम स्लीपबाबत आहे की तुम्ही दिलेल्या दुव्यात. नॉन रेम स्लीप कमी झाली की असं होतं. स्लीप डिसऑर्डर बाबत माहिती शोधा त्यात असं होण्याची कारणं मिळतील.



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

शोधुन झालीएत हो

शोधुन झालीएत हो कारणे....
एग्जॅक्टली कळत नाहिए
त्यातलाच एक केला आत्ता... हा लेख लिहुन हास्य



-निखिल

निख्या... खूप झोपणे आणि छान

निख्या... खूप झोपणे आणि छान झोपणे यात लै लै फरक आहे.

बिका आहो छान झोप होवुनही

बिका आहो छान झोप होवुनही सकाळीच जांबई यायला सुअरवात होते...
कदाचीत डोके जास्त तापते ना थंड होण्यासाठी असेल



-निखिल

बियरची शिरोधारा घ्या! फरक न

बियरची शिरोधारा घ्या!
फरक न पडल्यास बियरची शिरोबस्ती!

असे प्रयोग करुन झाले... पण...

असे प्रयोग करुन झाले... पण...



-निखिल

हा प्रतिसाद..

जांभई देता देताच टंकलेला दिसतोय...
म्हणूनच जांभई ची जांबई... सुरूवात चे -सुअरवात नि कदाचित चे कदाचीत झाले असावे..
निखिल... खरेच नि जिम मध्ये जाऊन बेंचवर (अनुस्वार दिलेला आहे) दहा पंधरा मिनिटे ताणून दे नि आमच्यावरचा असा व्याकरण-भाषा अत्याचार थांबव.....!!!!

सुअरवात!! मी विचारातच पल्डो

Laughing out loud
सुअरवात!!
मी विचारातच पल्डो धाप्पकन..डुकराची कोणती वात असते म्हणुन. मग म्हणलं असेल बुवा..औरंगाबादकर काय काय शोधुन काढतील काही नेम नाही.

शुद्धलेखनाच्या चुकेला

शुद्धलेखनाच्या चुकेला व्याकरणाच्या चुका का म्हणताय???
असो ईथे शुचि (शुद्धिचिकित्स्क (कॉ.रा:-सहजकाक)) बसवण्यात यावा



-निखिल

सहजकाका....

अरेरे....सहजकाकांचा हकनाक काकबळी गेला..

असो, झोपतो आता....

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

असो,

झोपतो आता.... Star



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

जागे होता की काय?

जागे होता की काय?

नाय नाय... झोपलो होतो... आताच

नाय नाय...

झोपलो होतो... आताच जागा झालो.

घेऊन आलोच.... Beer ............ स्वारी.. हं Tired !



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

....

zzzzzzzzzzzzzzzzzzzz

खाऊन घे रे ...

काहितरी खाऊन घे रे, उपाशी पोटी झोपु नये.
राहुलच्या निषेधासाठी किती आत्मक्लेष करुन घेशील ?

निख्या अंमळ *त्या आहे *

निख्या अंमळ *त्या आहे

* म्हणजे ता नाही

खुलाश्याबद्दल धन्यवाद

खुलाश्याबद्दल धन्यवाद



-निखिल

बाळा जो जो रे....

Crying



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

अरेच्या पाध्ये इथे पण पोहोचले

अरेच्या पाध्ये इथे पण पोहोचले का ? असो.

कुठे आहेत....

कुठे आहेत....



-निखिल

शोधा म्हणजे सापडेल

शोधा म्हणजे सापडेल wink

हं. जांभई येते

हं.

जांभई येते प्रेशर-डिफरन्समुळे! हा फरक कमी जाणवावा म्हणून मी जांभई दिली, तर तो फरक समोरच्याला जाणवू लागतो. आणि मग जांभईचा डॉमिनो इफेक्ट दिसतो.

असो. अलिकडे मलाही अंमळ जास्त झोप येते. मग मी दुपारी सरळ डेस्कावर डोकं टेकून झोपून टाकते.

मग मी दुपारी सरळ डेस्कावर

मग मी दुपारी सरळ डेस्कावर डोकं टेकून झोपून टाकते.
अरे वा आम्हाला ही सुविधा उपलब्ध का नाही???



-निखिल

तुम्हाला डेस्क आहे ना? मग

तुम्हाला डेस्क आहे ना? मग वापरा की नीट 'डोकं लावून'!

+१

आमच्या शेजारच्या क्युबिकलमध्ये एक काकू होत्या, त्यांना दुपारचं जेवण झालं की झोप इतकी अनावर व्हायची की पंधरा मिनिटांत पेंगायला सुरुवात...मग ३-४ वेळा डेस्कावर ठणाठण डोकं आपटुन घेतलं की सपशेल शरणागती पत्करुन छान अर्धा पाऊण तास डेस्कावरच ताणुन द्यायच्या हास्य
अगदी आठवण झाली त्यांची!

झोप हे लेखाचे नाव आएह की

झोप हे लेखाचे नाव आएह की लेखाकाची वाचकाना ऑर्डर आहे?
अवांतरः झोपेत मेंदूचा काहीभाग काळ विश्रांती घेतो. झोपेमुळे मेंदूत सीरोटोनीन सारखी स्टीरॉईड्स तयार होतात जी शरीराची झीज भरून काढण्यात उपयोगी ठरतात.



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

लेख वाचुन झोप आली अस म्हणू

लेख वाचुन झोप आली अस म्हणू काय?? wink

रात्री झोपण्याची वेळ १० करा. मग होइल झोप पुरेशी.

उपाय आहे

दुपारी जर १५ मिनिटे झोपलो तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता हे तर काही शक्य नाही म्हणून अजून नवीन कारणे आणि नवीन उपाय शोधायला जातोय..

तुमच्या कुंपणीतल्या अधिकार्‍यांना पटवा हे लेख दाखवा. दुपारी झोपल्याने प्रॉडक्टीव्हीटी वाढते म्हणे.
दुवा १ - %TEXT% , दुवा २ - %TEXT%

बाकी तुझ्या धाग्यामुळे अंमळ झोप आली.

निख्या,

लई म्हणजे लई खेचायची मनात आलं होतं पण म्हणलं जाऊ दे झोपेशी संबंध आहे उगाच नको पोराला तंगवायला!wink

व्यायाम कर. सकाळी लवकर जाग येत असली तर साधारण ४५ मिनिटं झपझप चालून ये. सकाळ सोयीची नसेल तर संध्याकाळी जा. जवळच्या ग्राऊंडला फेर्‍या मार किंवा थोड्या निवांत रस्त्यावर कडेकडेने गेलास तरी चालेल. आफिसात काम असतं ही सबब सांगू नकोस. कामातून वेळ काढूनच जायचं काय होईल फार तर एकतास मी मराठीवर तुझे प्रतिसाद दिसणार नाहीत एवढेच! wink
रात्री झोपताना एक ग्लास कोमट दूध किंचित हळद आणि साखर टाकून घे. बाकी रुटीन चालू दे.
असं एक आठवडा करुन बघ नाहीतर येशील लगेच एका दिवसात "काऽऽही फरक पडला नाही हो" म्हणत!!

(झोप पेशालिस्ट)चतुरंग

(झोप पेशालिस्ट)चतुरंग तरीच

(झोप पेशालिस्ट)चतुरंग
तरीच काकू सारख्या लक्ष ठेऊन असतात तुमच्यावर. wink



-पुण्याचे पेशवे

तुमच्या सल्ला मनावर घेतला

तुमच्या सल्ला मनावर घेतला आहे.. आता प्रत्येक्षात कधी उतरेल माहीत नाही....



-निखिल

आळशां

आळशांचा राजा!!!!

= हे ट्राय करा...... झोप

Laughing out loud Evil Drunk 8) Big smile = Beer हे ट्राय करा...... झोप येईल मस्त wink



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

बरेच काही प्रश्न आहेत. तुम्ही

बरेच काही प्रश्न आहेत.
तुम्ही झोपता त्या नंतर काही कारणामुळे झोप चाळवली जाते का? त्यानंतर तुम्ही शांत झोपता का? असे असेल तर तुमची झोप शांत होत नाही.




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

सोपा उपाय! १. आंतरजालावर

सोपा उपाय!
१. आंतरजालावर (फालतुगीरी करत) फिरणे बंद करा. कसले ते काथ्याकुट अन कसल्या त्या चर्चा!??

२. चतुरंग म्हणतात त्याप्रमाणे एक दोन तास खेळ-व्यायाम करा.

३. दिवसातुन एखादी विनोदी मालिका (टीव्हीवरची) पहात चला.

४. जांभयांचा विचार करु नका.



-Nile

१. आंतरजालावर (फालतुगीरी करत)

१. आंतरजालावर (फालतुगीरी करत) फिरणे बंद करा. कसले ते काथ्याकुट अन कसल्या त्या चर्चा!?
सकाळी आठ ते रात्री १०.३० च्या शेड्युल मधे हाच तर एक विरंगुळा आहे...

२. चतुरंग म्हणतात त्याप्रमाणे एक दोन तास खेळ-व्यायाम करा
हा उपाय करायचा आहेच...

३. दिवसातुन एखादी विनोदी मालिका (टीव्हीवरची) पहात चला.
तसेही रात्री १०.३० ला घरी पोहचल्या नंतर ईंडिया टिव्ही बघतोच... ह्याहुन अधिक विनोदी काही सापडु शकत नाहि...

४. जांभयांचा विचार करु नका.
बर बर...



-निखिल

प्रतिक्रिया वाचतांना फारच मौज

प्रतिक्रिया वाचतांना फारच मौज वाटली...



*****