माय नेम इज नॉट खान....
शाहरुख चा माय नेम इज खान प्रदर्शित होतोय. चित्रपट वादग्रस्त व्हावा, चर्चेत यावा यासाठी करावयाचे त्या आधीचे सगळे कार्यक्रम सुरु आहेत. कोण करतय, कसं करतय, न्युज चॅनेल वाले आपल्या पाट्या टाकतायत. पब्लिक ला म्हणजेच तुम्हाला सगळे ठाउकच आहे. ते जाउ द्या तो आपला विषय नाही.
नुकताच http://blogs.timesofindia.indiatimes.com/indus-calling/entry/my-name-is-... हा तरुण विजय यांचा लेख वाचला.आपल्या पैकी अनेकांनी वाचला असेल. काश्मीरी पंडीतांची समस्या, त्यांची दु:खे या बद्द्ल कला जगात अन एकंदरच एक तर्हेची उदासीनता दिसुन येते. एरवी अनेक गोष्टींवर मते व्यक्त करणारी बोलभांड मंडळी या विषया वर क्वचितच बोलतांना लिहितांना दिसतात. अनुपम खेर सारखा एखादाच कळकळीने दु:ख व्यक्त करतो. मुंबईला जे.जे. कलादालना मधे सहज एकदा गेलो असताना तिथे २६/११ च्या घटने वर काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन होते, आणि त्याच वेळी ईस्रायलने पॅलेस्टाईन वर केलेला हल्ला जवळ जवळ महिना भर सुरु होता, त्या संदर्भात काढलेले बुरखा घालुन जेवत असलेल्या अनेक महिलांचे भले मोठे चित्र-लास्ट् सपर असे नाव देवुन -सोबत ठेउन चित्रकार मंडळीनी आपली धर्मनिरपेक्षता सांभाळली होती. मला अगदी विचारावेसे वाटले होते की बाबांनो इतक्या दूर पॅलेस्टाईन मधील लोकांचे युध्दामुळे होणारे हाल तुम्हाला दिसतात, तुम्ही त्यावर चित्र काढता, चांगली गोष्ट आहे, पण आपल्याच देशातल्या काश्मिरी पंडीतांची दु:खे तुम्हाला दिसत नाहीत का? त्यावर चित्र काढावे असे तुम्हाला का वाटत नाही? पण चित्रकार तिथे नव्हते त्या मुळे विचारता आले नाही. या विषया वर चित्रपट आले नाही असे नाही पण ते सुद्धा असेच आपली धर्मनिरपेक्षता सांभाळत पोलिटिकली करेक्ट असेच. हाच मुद्दा या लेखात अधिक चांगला मांडला आहे असे वाटल्यामुळे मी मराठी करांसाठी हे लिहिले. तरुण विजय यांचा लेख वाचून तुम्हाला काय वाटते ते जरुर लिहा. आणि हो लिहितांना धर्मनिरपेक्षता नाही सांभाळली तरी चालेल आपल्याला कुठे मते मागायची आहेत?
.jpg)
{कौन रोता है इनके लिये?...}
कौन रोता है इनके लिये?...
हे ही वाचा
http://4.bp.blogspot.com/_-V4Y7uue7mw/S11KJjP2yCI/AAAAAAAABJY/aNsIPzxs9A...
{खरंय! अगदी खरंय!!}
कोण काश्मीरी पंडीत?
त्यांची एकजुट आहे का?
त्यांच्यात प्रत्येकाकडे पोरांचं लेंढार आहे का?
त्यांना मदत केली/त्यांचा मुद्दा मांडला तर राजकीयदृष्ट्या काय फायदा?
बरं चित्रपटसृष्टीबद्दल बोलावं तर त्यातला बहुतांश येणारा पैसा कुठला हे आजकालचं पोरही सांगेल..मग बोलवित्या धन्याला दुखावणार कोण?
आमचा एक काश्मिरी पंडीत असा मित्र आहे, (जाताजाता:तो अस्खलीत मराठी बोलतो! ४ वर्षंच झाली, पुण्यात राहतोय.) त्यानं सांगितलेल्या एकेक गोष्टी ऐकुन शब्दशः शहारा येतो..रागारागानं डोकं फुटायची वेळ येते!
त्याचे वडील अत्याचारांचा विषय निघाला की एकच शेर ऐकवतात आणि उठुन निघुन जातात..
"..अपनों ने ही लुटा हमें, गैरों मे कहां दम था... "
*आपण दिलेला दुवा अजुन वाचला नाही. इथुन उघडत नाहीये.
{गुगल सर्च करा}
तरूण विजय नाव गुगल सर्च करा अन्यत्र ही सापडेल.
{गंमत पहा,}
वेगळ्या सर्व्हरवर जाऊन दुवा उघडण्याचा प्रयत्न केला तर एरर येत्येय.
घ्या!!! ताबडतोब सहिष्णुतेचे त्वरित दर्शन!
{मला सुद्धा हिच एरर येतेय.}
मला सुद्धा हिच एरर येतेय.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{मला पण घडले सहिष्णुतेचे}
मला पण घडले सहिष्णुतेचे दर्शन.
बाकी, बर्याच लोकांना अपराधीपणा जाणवतो एका विशिष्ट गटाची बाजू घ्यायला मग तो घालवायला असे उद्योग चालतात. 'कॉलिंग अ स्पेड अ स्पेड' ला प्रामाणिकपणा लागतो.
धम्याने उद्धृत केलेल्या शेराची ओळ आवडली.
{मला पण एरर येत आहे....}
मला पण एरर येत आहे....
-निखिल
{हा शाहरुख एक तर मुर्ख आहे }
हा शाहरुख एक तर मुर्ख आहे किंवा अती हुषार आहे...
हा एका टिमचा मालक असताना त्याने पाकी खेळाडूंना का नाही विकत घेतले ????
व नाही घेतले तर त्यांनतर असले फडतुस मत व्यक्त करण्याची काय गरज ???
तर गरज ही होती की विनाकारण त्याच्या माय नेम ईज खान ला फुकटची प्रसिध्दी मिळाली !
मला तर शंका येत आहे काही साठगाठ तर नाही आहे ना ह्या सर्वांमध्ये
असेल ही !
शक्यता जास्त आहे... !
Hope is a good thing...
{साठगाठ हा मराठी शब्द आहे का?}
साठगाठ हा मराठी शब्द आहे का? असेल तर असो माझ्या ज्ञानात भर पडली. आणि नसेल तर त्यासाठी मराठी शब्द साटंलोटं असा वापरता येईल.
आता मूळ दुवा चालत नसल्याने मतप्रदर्शन करीत नाही. असो. धम्याशी बाडिस.
-पुण्याचे पेशवे
{तुम्हाला हा दुवा द्याचा}
तुम्हाला हा दुवा द्याचा होता का ????
Hope is a good thing...
{इंडस कॉलींग..}
हो बरोबर हाच लेख होता तो. धन्यवाद!! मीमवर दुरुस्ती केली, आता दुवा उघडतोय. आधी काय गडबड झाली होती माझ्या कडून काय माहीत पण आता ठीक झालेय.
{खान}
या सर्वापुढे जाउन मी म्हणतो की या खानाला डोक्यावर घेणारे आपण लोक वाय झेड नाही का?
हे थोडं जनरल विधान आहे हे मान्य.
पण व्हाय कॅन वी नॉट जस्ट इग्नोअर हिम??? त्याला आणी बाकी राजकारण्यांना जे काही ओकायचं ते ओकूदे!!
{खान}
या सर्वापुढे जाउन मी म्हणतो की या खानाला डोक्यावर घेणारे आपण लोक वाय झेड नाही का?
हे थोडं जनरल विधान आहे हे मान्य.
पण व्हाय कॅन वी नॉट जस्ट इग्नोअर हिम??? त्याला आणी बाकी राजकारण्यांना जे काही ओकायचं ते ओकूदे!!
{+ १ सहमत आहे.... इग्नोर}
+ १
सहमत आहे.... इग्नोर करा.. त्याला.
Hope is a good thing...
{काय राव अजून लफडे संपले नाही}
काय राव अजून लफडे संपले नाही वाटतं !
आज परत शिवसैनिकांनी काहीतरी लफड केलंच... जेव्हा रिमोट ने ऑफ बटन दाबले आहे तरी पण ??
ह्याचा अर्थ रिमोटचा कंट्रोल कमी झाली काय ???
Hope is a good thing...