परी
कोण आहेस तु?
कुठे रहातेस ?
नाव काय तुझे?
बोलणार नाही ?
माझ्याशी पण नाही ?
मी तुला परी म्हणेल !
चालेल?
बोलणारच नाही ?
ठीक आहे... मीच बोलेन ... परी!
*
परी !
ये !
ये ना ! मी कधीपासुन वाट पहात आहे.
ये जवळ ये !
दाखव ना तुझा चेहरा !
अशी का करतेस?
का दुर जातेस?
ये !
ये !
परी ! ये!
*
परी!
बोल ना माझ्याशी !
आज किती छान दिसतेस तु!
कधी घेतलास हा ड्रेस ?
मला सांगितले पण नाही!
परी ! तु कायमची का नाही माझ्याकडे येत?
सारखी आलीस की जायचे म्हणतेस ?
कुठे रहातेस तु?
तिकडे ?
दुर ?
डोंगराच्या पलिकडे ?
मला घेवुन जा ना!
मी पण येतो !
नेशील मला?
कधी नेशील ?
परी?
बोल ना !
तु बोलत का नाहिस?
*
बोल काय म्हणतेस परी?
काल का नाही आलीस?
मी आलो होतो तुला भेटायला !
हो .. नदिच्या किनारी !
आपले ठरले होते ना?
घरी नाही भेटायचे.
मग इथे कशाला आलीस तु?
काम निघाले?
बर बर आलीस तर जरा वेळ बस !
बोलत बसु..
आज कुणीच नाहीये घरी...
फक्त तु आणि मी !
*
हो ग परी !
मी काल खुप कामात होतो!
तु वाट पाहिलीस?
अग खरेच ...
मी विसरलो नाही तुला !
माझ्या परीला कसा विसरेन मी !
खुप काम होते ना म्हणुन नाही आलो..
आपल्याला घर बांधायचे ना ? की बंगला?
तिथे फक्त तु आणि मी?
दोघेच राजाराणी !
हो ना?
मग काम नको करायला?
वेडी कुठली !
*
नको ना !
परी नको जावुस...
मी पण येतो ...
हो ...
मी पण येतो तुझ्याबरोबर ...
जावु आपण तिकडे डोंगराच्या पलिकडे असलेल्या स्वर्गात...
थांब !
परी ! थांब !!
मला येवु दे...
आलो मी ... परी... मी आलो...आलो ....आलो... थांब !
परीऽऽऽ !!!
परीऽऽ !!
परीऽ !
*
'डॉक्टर.ऽऽऽ'
'बोला सिस्टर !'
'तो ५ नंबरच्या खोलीतला पेशंट सिरियस झाला आहे..'
'आलोच ऽऽ'
.
.
.
'सिस्टर, सर्टिफिकेट तयार करा ! कार्डीऍक फेल्युअर.... हृदयावर अतिरिक्त ताण. '
'इथे नाही पण त्या जगात तरी त्याला त्याची परी मिळो !'

.jpg)
कडक
माल
णाण्या अंमळ हळवा झाला आहेस
णाण्या अंमळ हळवा झाला आहेस का?
-पुण्याचे पेशवे
हळवा?
भुतकालाच्या गळवा
अरे या मास्तरला पळवा
अरे या मास्तरला पळवा
डन
आपली इच्छा शिरसावंद्य.
पळतो.
'इथे नाही पण त्या जगात तरी त्याला त्याची परी मिळो !'
ह्म्म्म
-निखिल
अरे त्या परीचा विचार करा
अरे त्या परीचा विचार करा कोणीतरी! ;-)
कोणती??? पावसातली???
कोणती??? पावसातली???
-निखिल
पावसाची असेल नाहीतर धरणातली,
पावसाची असेल नाहीतर धरणातली, पण मुलींसाठीही काही चॉईस ठेवा रे! अधूनमधून पहावं तर या असल्या प्रेमभंग-ई कविता.
येवढा त्रास होतो तर
तुम्ही नका वाचत जावु ... शिंपल
मला त्रास झाला, पण त्या परीची
मला त्रास झाला, पण त्या परीची दु:खं वाचून! असो.
ज्याची त्याची जाण, समज, ... माझी आपली कमीच; नाही का?
+१
गपा आता !
(सौजन्य ०- त्याच त्या छ्डीवाल्या जाड भिंगाचा चष्मा घातलेल्या बै)
छ्डीवाल्या जाड भिंगाचा चष्मा
छ्डीवाल्या जाड भिंगाचा चष्मा
हा कसा अस्तो बॉ?
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
गपा आता. नाहीतर विडंबनाचे दोन
गपा आता. नाहीतर विडंबनाचे दोन दणके देईन!
ह्म्म्म्म्म्म्म
ह्म्म्म्म्म्म्म
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+१
सहमत
मराठी राजेला राजी
मराठी राजेला राजी
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
राजाचा अॅक्सिडेंट कसा झाला
राजाचा अॅक्सिडेंट कसा झाला ते आत्ता लक्षात आले.
ठ्यॉ..... माताय ( अरे त्या
ठ्यॉ.....
माताय ( अरे त्या संस्थळावरचा अपशब्द कोश इथे वापरला तर चालेल ना) जो तो त्या राजेवर घसरतोय
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
परी म्हणते पावसाळ्यात आले तर
परी म्हणते पावसाळ्यात आले तर चालेल का?
सध्या हिवाळा आहे
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
आवरा !!!
आवरा !!!
कुणाला
टारु भाऊ कुणाला आवरायच? ;-)
सगळेच पिसाटलेत.
असो लिखाण आवडल हे.वे.सा.न.ल.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
अरे ह्या अवलियाला काय झालंय?
पुन्हा हा पूर्वीसारखं करायला लागला, मध्यंतरी बरा होता म्हणे!
(खुद के साथ बातां : चौपाटीवर जाऊन पाध्यांचा मार खाऊन आला की काय हा पुन्हा?)
(करी)चतुरंग
(खुद के साथ बातां : चौपाटीवर
हे तुमचं "मी मारल्यासारखं करतो, तू लागल्यासारखं कर" आहे का काय?
(मस्-करी) अदिती
तसे नसावे तो प्रेम विव्हल
तसे नसावे तो प्रेम विव्हल होऊन गेला असेल तिकडे परि परि करत व बसला असेल मार काय
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सहमत. नवं सावज पाध्येच असतील.
सहमत. नवं सावज पाध्येच असतील. आणि जुनं सावज पाहून पाध्ये अंमळ चिडले असतील. कोरा चहा पिता पिता कपच उष्टा आहे कळल्यामुळे तर लाही लाही झाली असेल.
-(कुस्करी) पेशवे
-पुण्याचे पेशवे
ह्म्म्म चालू द्या
ह्म्म्म
चालू द्या
स्वानुभव छान आहे.
स्वानुभव छान आहे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
घ्या नाना.... हा घरचाच आहेर
घ्या नाना.... हा घरचाच आहेर http://mimarathi.net/node/614
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
व्वा.....क्लास रे नान्या !!!
व्वा.....क्लास रे नान्या !!!
छान आहे कविता.( कविताच
छान आहे कविता.( कविताच म्हणायचे ना याला?)
नान्या त्या कवितेसोबत ही
नान्या त्या कवितेसोबत ही कविता एकदम लयीत चालते रे
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
नाना परी नाना कळा
नाना परी
नाना कळा
भावूक कविता लेख.
भावूक कविता लेख.