अशीही उत्तरे - भाग -१

0
0

अशीही उत्तरे - भाग -१

…. थोडक्यात उत्तरे लिहा ….

प्रश्न – भारतीय पुरुष कोणत्या क्षेत्रात पारंगत आहे ?
उत्तर – लोकसंख्या वाढविण्यात.

प्रश्न – पोलीस यंत्रणेचे मुख्य कार्य ?
उत्तर – हप्तावसूली.

प्रश्न – हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
उत्तर – ओला होईल.

प्रश्न – अमिताभ आणि जया मंदिरात काय करतात ?
उत्तर – अभिषेक.

प्रश्न – एका डोळ्याने दोन पक्षी दिसत असेल तर दोन डोळ्याने ?
उत्तर – चार.
………………………………………………….

प्रश्न – अनुप्रास अलंकाराचे उदाहरण सांगा ?

उत्तर – जो मूर्ख मूर्ख आहे तो मूर्ख, मूर्ख नसेल तर,
एका मूर्ख असलेल्या मुर्खाने, दुसऱ्या मूर्ख नसलेल्या
मुर्खाला, जर मूर्ख म्हटले ; तर त्या दोघाही मूर्खांना
मूर्ख ठरवणे, मूर्खपणाचे ठरते.

. …. अपूर्ण वाक्ये पूर्ण करा. ….

प्रश्न – पुरुष मोर्च्याचा नारा – हम सब ……………
उत्तर – नालायक है.

प्रश्न – महिला मोर्च्याचा नारा – हमारी मांगे …………
उत्तर – भरा करो.

१) महागाईची व्याख्या करा ….

उत्तर – ज्या गायी शरीराने महाकाय असून जास्त
चारा खावून कमी दुध देतात त्यांना
महागाई म्हणतात.

२) इंग्रजी अनुवाद करा.. वीज गेली तर गेलीच गेली.
उत्तर – इलेक्ट्रिक वेंट तर वेंटच वेंट.

.. गंगाधर मुटे

.. ( प्रकाशित दैनिक “सकाळ” ४ मार्च २००५)
…………………………………………………

{इंग्रजी अनुवाद करा.. वीज गेली}

1

इंग्रजी अनुवाद करा.. वीज गेली तर गेलीच गेली.
उत्तर – इलेक्ट्रिक वेंट तर वेंटच वेंट.

हास्य

{बरीच मंडळी वाचायची राहिली}

2

बरीच मंडळी वाचायची राहिली असेल, असे गृहित धरून परोपकाराच्या स्वच्छ हेतूने हा धागा वर आणतोय. हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

{काय पण}

3

काय पण परोपकार आहेत... Evil

{(विषय दिलेला नाही)}

4

Evil Evil हास्य Big smile


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

{लोकसंख्या वाढविण्यात. हा हा}

5

लोकसंख्या वाढविण्यात.

Laughing out loud
हा हा हा !!


Hope is a good thing...

{अत्यंत पकाऊ}

6

अत्यंत पकाऊ


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते