राजपुत्र बिहारात बहु बडबडला ....

0
0

राहुल गांधी हे एका फार फार मोठ्ठ्या घराण्याचे ( म्हणजे इतक्या मोठ्ठ्या की एका महान काँग्रेसी नेत्याने ह्या घराण्यातील एका महान पंतप्रधानांना "देशापेक्षा मोठ्ठे'" ठरवले होते। असो. ) वारस आहेत. मान्य !
सध्या ते काँग्रेस पक्षाचे युवराज असुन त्यांच्यापुढे आलेल्या कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर नाकारुन ( ह्या बातमीची काही चरणभाटांमार्फत लै पब्लिशिटी करण्यात त्यांचा वैयक्तिक काही स्वार्थ नव्हता हे उगाच जाताजाता नमुद करतो ) त्यांनी साधी "खासदारकी" स्विकारली. काँग्रेसी भाषेत ह्याला "अंतरात्म्याचा आवाज" की "आत्मसन्मानार्थ त्याग" असे काही तरी म्हणतात बॉ, आपल्याला त्यातले जास्त काही कळत नसल्याने तुर्तास मान्य एवढेच म्हणतो.
झालच तर लै शिकले वगैरे आहेत, शिक्षण फॉरीनात झाले ही हे आपल्यासारख्या अडाणी/अल्पशिक्षित मंत्री आणि खासदार निवडुन देणार्‍या देशात व्हॅल्यु अ‍ॅडिशन मानायला हरकत नसावी.

असो, आजकाल म्हणे ते ग्रामिण भारत पाहण्यासाठी आणि जनसामान्यांच्या हालअपेष्टा पाहण्यासाठी ( त्या दुर करणे ही कुठल्याच राजकारण्याची जबाबदारी नाही ) दौर्‍यावर निघाले आहेत म्हणे. ठिकठिकाणची गरिब, बेरोजगारी, रोज जिवंत राहण्यासाठी रोज संघर्ष करायला लागणारी उघडी-नागडी जनता आपला "राजपुत्र" पहायला हातातली कामे बाजुला सारुन अगदी उत्साहात येत आहे, अर्थात ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही कारण आपल्या जनतेला "नेता" हा जोवर आपला "मालक" वाटत राहणार तोवर हे असेच घडणार।
असो, इथे म्हणे युवराज राहुल मोठ्ठीमोठ्ठी भाषणे वगैरे देऊन काहीकाही वायदे वगैरे करत आहेत ( व त्यांचे चमचे त्यावर "लेका लेका पंतप्रधान का नाही झालास?" असा चेहरा करत टाळ्या वाजवत आहेत ). जोवर हे रुटिन ( म्हणजे ह्यांना दौरा केल्याचा आनंद व जनतेला राजपुत्र प्रत्येक्ष डोळ्यांनी पाहिल्याचा आनंद ) चालु आहे तोवर आमची काही तक्रार असण्याचे कारण नाही।

मात्र परवा युवराजांनी एक गंमतच केली बघा। हो, गंमतच.
ते बिहारातल्या कुठलाश्या गावी गेले होते आपले टोळके घेऊन, मस्त गावगन्ना गर्दी अणि मिडियाचा फौजफाटा वगैरे जमला होती त्यांना बघायला. ह्यासर्व वातावरणामुळे उत्साहित झालेले युवराज उत्साहाच्या भारात जे बोलु नये ते बोलुन बसले. आता युवराजच ते, मनात आले बोलुन टाकले, मॅटर खतम, ते काय महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे नेते किंवा मंत्री आहेत काय शब्दाशब्दाला हायकमांडची परवानगी मागायला ? सध्या ते काय करतात तर विवीध भागांचा दौरा करतात व तिथले प्रश्न असे चुटकीसरशी फटाफट सोडवुन टाकतात, नुकताच त्यांनी "मुंबई आणि युपी/बिहारी जनांच्या नविन लोढ्यांचा प्रश्न" असाच बसल्या बैठकीत सोडवला, ह्याला म्हणतात युवराज. आता ह्याच हिशोबाने नॉर्थ -ईस्टचे प्रश्न, कर्नाटक्-तामिळनाडु ह्यांच्यातला कावेरी वाद, आंध्रातला तेलंगाणाप्रश्न, कर्नाटक-महाराष्ट्रातला सिमाप्रश्न , गुजराथेतला सरदारसरोवर प्रकल्पाचा वाद, काश्मिर प्रश्न वगैरे दिर्घकाळ भिजत घोंगड्यासारखे पडुन असणारे प्रश्न आता युवराज एका बैठकीत सोडवणार ह्याबाबत आमच्या मनात अजिबात संदेह नाही, देरी आहे ती फक्त त्यांनी त्या त्या भागाचा दौरा करायची. दौर्‍यावर जायचे, गर्दी आणि मिडिया जमवायचा, बैठक घ्यायची की सोडवायचा प्रश्न अशी एकदम शिंपल प्रोसिजर आहे, तुम्ही पहात रहा आता अनेक प्रलंबित वाद आता कसे फटाफट सुटतात ते.
असो, फारच विषयांतर झाले.

बोलता बोलता युवराज राहुल म्हणाले की "२६/११ रोजी मुंबईवर भीषण हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान कुणी घातले? बिहार, उत्तर प्रदेशच्या एनएसजी कमांडोंनी. त्यामुळे दहशतवाद्यांशी लढायचे तर बिहारींना मुंबईतच राहू दे".
हम्म्, अशा बोलण्याला बालीश म्हणतात का हो ?
असो.
एनएसजीचे कमांडो हे राज्याच्या कोट्यानुसार निवडतात व त्यानुसारच त्यांच्या पलटणी तयार केल्या जातात ही नवी माहिती मिळाली.
तदनुसार मुंबई वाचवायला आलेल्या टीममध्ये युपी आणि बिहारी ह्या "कोट्यातल्याच तुकड्या" पाठवल्या गेल्याचेही नविनच समजले।
ह्याच युद्धात वीरमरण आलेला एनएसजीचा कमांडो शहिद संदीप उन्नीकृष्णन हा युपी/बिहारी होता ही बातमी कोणत्या उल्लुच्या पठ्याने युवराजांना सांगितली हो ?
तसेच ह्याच तुंबळ युद्धात ज्यांनी देश आणि मुंबई वाचवण्यासाठी आपल्या प्राण दिले ते हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे असे अधिकारी व इतर अनेक पोलीस तसेच कसाबच्या हातातली स्टेनगन आपल्या पोटावर धरुन त्याला जिवंत पकडवण्यात फार मोठ्ठी भुमिका बजावणारे तुकाराम ओंबाळे हे काय खास युपी/बिहारातुन मुंबई वाचवायला आले होते काय ?
शिवाय हे युद्ध लढत असताना देश आणि मुंबई वाचवायच्या प्रामाणिक भावनेतुन मैदानात उतरलेल्या "एनएसजी कमांडों"चा "युपी/बिहार" असा विशिष्ठ प्रदेश ठरवुन राहुलजींनी नक्की काय साधले ? म्हणजे ह्याच हिशोबाने देशाच्या सिमेवर लढणारा प्रत्येक जवान हा आपल्या देशाचे नसुन आपापल्या राज्याचे नेतॄत्व करतो की काय ?
रोज उठुन मनसे / शिवसेनेला झोडपण्याच्य निमित्ताने तमाम मराठी माणसाला "देश तोडणारे , विघटनवादी, प्रांतिक अस्मिता बाळगणारे" अशी शेलकी विशेषणे देणारे सो कॉल्ड देशप्रेमी मात्र राहुलजींच्या ह्या 'कमांडोंचा प्रदेश ठरवुन सैन्याचा अपमान करणार्‍या' विधानावर मात्र मुग गिळुन शांत आहेत.

असो, आता उगाच आपली राहुलजींना माहिती असावी म्हणुन देशासाठी लढलेल्या व योगदान दिलेल्या काही "मराठी" भाषिक जनांची आणि त्यांच्या कार्याची माहिती देतो, यादी अगदी संपुर्ण नाही पण जशी आठवेल तशी आहे, बहुदा तेवढी पुरेशी असावी.
१. जनरल अरुणकुमार वैद्य :
जेव्हा खलिस्तानवाद्यांनी पंजाबमध्ये रस्त्यांवर नंग्या तलवारी नाचवत सरकारविरुद्ध मोर्चे काढलेले आणि रक्तपातानी आख्खा पंजाब वेढीला धरुन अमॄतसरमधल्या 'सुवर्णमंदिरा'ला आपला लढाऊ गड बनवुन ठेवले होते तेव्हा जनरल वैद्यांच्या नेतॄत्वाखाली 'भारतीय सैन्य' तिकडे घुसले होते व 'ऑपरेशन ब्ल्यु स्टार' करुन देशाची वेशीवर टांगलेली लाग वाचवली होती.
ह्यामागे वैद्यांचा हेतु पुढेमागे मराठी माणसाला पंजाबात आरामात राहता यावे असा मुळीच नव्हता.
नंतर त्यांना ह्या प्रकरणाची किंमत सेवानिवॄत्तीनंतर एका हल्ल्यात आपले प्राण गमावुन द्यावी लागली होती.

२. एअर चिफ मार्शल प्रदिप नाईक :
त्यांनी २००९ मध्ये हवाईदळाचे नेतृत्व स्विकारले व समस्त देशाच्या हवाई संरक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली.१९७१ च्या युद्धात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता, मराठी असल्या कारणाने आपले विमान घेऊन मुंबईवर घिरट्या घालत केवळ मुंबईचे संरक्षण करण्याच्या फंदात ते पडले नाहीत.

३. राम रघोबा राणे :
हे कोकण मराठा रेजिमेंटचे एक लेफ्टनंट ऑफिसर होते. १९४८ च्या पाकीस्तानी घुसखोरीला उत्तर देण्यासाठी जाणार्‍या सैन्यात ह्यांच्या तुकडीचे नेतृत्व राणे ह्यांनी केले. घुसखोरांनी ठिकठिकाणी सुरुंग पेरुन आणि अडथळे उभारुन भरतीय सैन्याच्या हालचालीवर बंधने आणली तेव्हा राणे ह्यांच्या तुकडीनी अनेक भु-सुरुंग निकामी करण्यात महत्वाची भुमिका बजावली होती. त्यामध्ये त्यांच्या सहकार्यांना प्राण गमवावे लागले तर ते स्वतः जबर जखमी झाले होते.त्यांच्या ह्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना "परमवीर चक्र" देऊन सन्मानीत करण्यात आले होते.

४. अ‍ॅडमिरल विष्णु भागवत :ह्यांनी भारतीय नौसेनेचे नेतृत्व केले.

५. अनिल टिपणीस :भारतीय वायुसेनेचे माजी चीफ ऑफ एअर स्टाफ.

ह्याशिवाय इतर काही सामाजिक आणि राजकीय योगदाने,
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर :
ह्यांनी संपुर्ण स्वतंत्र भारताच्या घटना समितीचे 'अध्यक्षपद' भुषवले. स्वातंत्र्यानंतर अनेक नेत्यांमध्ये पदासाठी आणि सन्मानाच्या खुर्च्यांसाठी चढाओढ चालु असताना मात्र ह्यांचे निस्वार्थी योगदान लक्षात घेण्यासारखे आहे.

२. स्वातंत्रपुर्व काळात इंग्रजांविरुद्धच्या असंतोषाची मुहुर्तमेढ इथे महाराष्ट्रातच रोवली गेली. तेल्यातांबोळ्यांचे पुढारी म्हणवले जाणार्‍या लोकमान्य टिळकांना आख्खा भारत हा "भारतीय असंतोषाचे जनक" म्हणुन ओळखतो. त्यांच्याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर, फडके बंधु, राजगुरु, आगरकर ह्यांच्यासारख्या अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान बजावले आहे.

३. स्वांतंत्र्यानंतर अधुनिक भारताच्या उभारणीत मोलाची भुमिका बजावल्याबद्दल "महर्षी धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संस्कॄतपंडित काणे" ह्यांचा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान "भारतरत्न" देऊन सन्मान करण्यात आला आहे.शिवाय ह्या यादीत आपल्या "लतादिदी आणि स्वरभास्कर भीमसेन जोशी" हे सुद्धा आहेत.

४. भारतात सिनेयुग आणि चलतचित्रपटाची सुरवात "दादासाहेब फाळक्यांनी" केली.

अशी उदाहरणे हजारो आहेत पण सगळीच यादी देण्यात मतलब काय ?
थोडक्यात सांगतो, ह्यातल्या एकानेही आपले कार्य पुढे न्हेताना ते फक्त महाराष्ट्र किंवा मराठी जनांपुरते मर्यादित ठेवण्याचा आपमतलबी करणे सोडा पण त्याचा कधी विचारही केला नाही, इतकेच काय पण नंतर कधी त्याचा साधा उल्लेखही केला नाही.

देशाच्या कल्याणासाठी आणि हिमायलाच्या संरक्षणासाठी नेहमीच धाऊन जाणार्‍या ह्या सह्याद्रीच्या मराठीच्या महाराष्ट्रादिकांना कुणी "देशप्रेम" शिकवायच्या आणि "राष्ट्रीय एकात्मतेचे धडे" शिकवायच्या भानगडीत पडु नये हेच खरे, ते आमच्या रक्तातच आहे....
अवांतर : युवराजांना कोणी महाभारतातल्या विराटपुत्र युवराज उत्तर ह्याची गोष्ट नाही का सांगितली ?

{हा मुद्दा घेऊन कदाचित तो कमाल}

1

हा मुद्दा घेऊन कदाचित तो कमाल खान मदाचित एखादा नवा चित्रपट काढेल.
राजपुत्राला बीहार राज्यात पाय रुतवायचे आहेत. त्यासाठी तो हे लांगुलचालन करत आहे


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

{वा !! शिवधनुष्याचा टणात्कार}

2

वा !! शिवधनुष्याचा टणात्कार झाल्यासारखे वाटले !! हिंदी/इंग्रजी न्युज चॅनल पाहुन हसावं की रडावं तेच कळत नाही हास्य इतके वाक्य तोडून जोडून लावतात. आपल्या मुख्यमंत्र्यांबद्दल नाही लिहीलंस बे ? ते म्हणतात की राहुल म्हणतो ते बरोबरंच हा हा हा !! काय बोलावं आता ?
आपल्या आधीचेही मुख्यमंत्री हायकमांडच्या पायी घुटमळणारे होते .. पण आताचे शियेम पाहिले की त्यांच्यात कणा आणि बाणा दोघांचीही कमतरता जाणवते. व्हेरी डिसपॉइंटिंग !

-- टारझन

{सही}

3

सडेतोड लेख!

पण हे राजकारणी लोक असेच बोलत आले आहेत, बोलत आहेत व यापुढेही बोलणार! पुढल्या स्पर्धेत त्यांच्या हातून पारितोषीक घ्याल अश्या शुभेच्छा दिल्या तर रागवणार नाहीत ना आमच्यावर? हास्य

{मुळात एस.एन.जी. कमांडो मुंबई}

4

मुळात एस.एन.जी. कमांडो मुंबई वाचवायला आले होते, का देश वाचवायला? काँग्रेसच्याच पंतप्रधानांचं वक्तव्य होतं की हा देशावर झालेला हल्ला आहे. पाकीस्तानने युद्ध कोणाशी केलं, काश्मीरशी का भारताशी? हा देशावर झालेला हल्ला होता आणि भारतीयांनी तो परतवून लावला.
युवराजांनी महाभारत वाचलं आहे का नाही माहित नाही, किमान चोप्रांचं महाभारत पाहिलं तरी एक गोष्ट शिका. बाहेरून हल्ला होतो तेव्हा आम्ही सगळे एकशेपाच आहोत. बाकी आपल्या आपल्यात भांडणं झाली तर त्यात हे संदर्भ देण्याची काही गरज नाही.

{>>मुळात एस.एन.जी. कमांडो}

5

>>मुळात एस.एन.जी. कमांडो मुंबई वाचवायला आले होते, का देश वाचवायला?
== ह्यावर जर युवराज्यांचा सारखेच बोलायचे झाले तर " एन. एस. जी कमांडो फक्त ताज आणी ईतर उच्चभ्रु ठीकाणे वाचवायला आले होते... कारण काय तिकडे फोरेनर होते ना... किती सामान्य मराठी माणसाला एन एस जी ने वाचवले???" सि एस टि चा साधी एक क्लिप किंवा त्या घटनेचा उल्लेख विसरुन फक्त ताज करत बसणारे चॅनलवाले आणी त्यांचे युवराज...
असो आमचे तर मत एन एस जी ने देशाला वाचवले


-निखिल

{डॉनराव हा लेख लिहुन तुम्ही}

6

डॉनराव हा लेख लिहुन तुम्ही देश तोडायला निघाला आहे हो....
देशद्रोही ठरलात तर घाबरु नका!!!!
असो लेख छान जमला आहे..
आता युवराजाने ते विधान केले आधी २६/११ च्या वेळेस असा एक एस एम एस महान चॅनल्स नी वाचुन दाखवला होता.... चालायचेच


-निखिल

{यादी}

7

या यादीत विष्णू भागवतांचे नाव वाचून गंमत वाटली. त्यांचे आडनाव भागवत हे नंतर स्वीकारलेले आहे अशी माझी माहिती आहे. ते त्या अर्थाने मराठी नव्हेत, असेही वाचल्याचे आठवते.
डान्राव, त्यांच्या नावाचा इतिहास एकदा तपासून घ्या हो! लय रोचक (हाच शब्द बरोबर आहे इथं, इण्टरेस्टिंग म्हणवत नाही) आहे!
माझे चुकीचे असेल तर उत्तमच!

{थॉडे शोधले हे मिळाले}

8

थॉडे शोधले हे मिळाले !

अॅडमिरल विष्णू भागवत यांची कथा आणखी वेगळीच. ते ज्या सवोर्च्च पदावर होते, त्या पदाचा आब विसरून त्यांनी पदावर राहूनच राजकारण्यांशी जाहीर भांडण करण्यास सुरूवात केली. त्यांचे म्हणणे खरे की खोटे, योग्य की अयोग्य हा वाद थोडावेळ बाजूला ठेवू व त्यांचे म्हणणे सर्वस्वी खरे असे गृहित धरू. असे असले तरी त्याबद्दल त्यांना जाहीरपणे बोलायचे असेल तर त्यांनी आधी पदाचा राजीनामा देणे आवश्यक होते. लष्करातला साधा नियम आहे तो म्हणजे वरिष्ठांविषयी अनादरयुक्त उद्गार काढू नयेत. वरिष्ठांशी मतभेद कसे व केव्हा व्यक्त करायचे याची एक पध्दत तेथे ठरलेली असते. पण एकदा अंतिम निर्णय झाला की तो मान्य नसला तरी पाळायचा असतो, हा साधा नियम अॅडमिरल भागवत यांना माहीत नसेल असे वाटत नाही. पण ते स्वत: राजकारणात पडले होते. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. त्यांना अपमानित होऊन पद सोडावे लागले

पुर्ण लेख वाचण्यासारखा आहे म्हणून हा दुवा


Hope is a good thing...

{बरोबर आहे मोडक.. विष्णू शर्मा}

9

बरोबर आहे मोडक.. विष्णू शर्मा नाव त्यांचे.
या यादित ले.जनरल थोरात यांचे नाव यायला हरकत नव्हती.


-पुण्याचे पेशवे

{सहमत ...}

10

मोडक, निख्या आणि पेशवे यांचे बरोबर आहे.
माझी चुक झाली, भागवत हे मुळचे मराठी नव्हेत.
विकीपेडियाच्या एका लिंकवर त्यांचा समावेश 'मराठी जनां'मध्ये असल्याने व इतर काही कारणाने मला ते मराठीच वाटले व माझ्या हातुन सदर चुक घडली ...

असो, बाकी त्यांच्या कारकिर्दीविषयी थोडेफार वाचले आहे पण तो आपला विषय नाही.
धन्यवाद योग्य माहितीबद्दल ...

अवांतर : इतर अनेक नावे राहुन गेली आहेत ह्याची कल्पना आहे पण नावांची यादी कुठवर देत बसणार ? असंख्य उदाहरणे आहेत. इथे दिलेली नावे ही कॄपया प्रातिनिधीक समजावीत ...

{सडेतोड लेख डान्राव.... पण}

11

सडेतोड लेख डान्राव....

पण ह्या युवराजाला सांगून काय फरक पडणार नाहीये...

{+१}

12

पण ह्या युवराजाला सांगून काय फरक पडणार नाहीये...

{खरोखर रे.. त्या राजपुत्राची}

13

खरोखर रे..

त्या राजपुत्राची किव करावीशी वाटत आहे हे मुर्खासारखे स्वतः बोलत असतात की कोणी त्यांना लिहून दिलेले वाचत असतात ? आपल्या मातोश्री सारखे ???

असा जर सैन्यामध्ये देखील प्रांत भेद केला तर खरोखर भारताचे अवघड होऊन जाईल व हे साले शेखचील्ली ह्यांना काही कळत नाही की काय हेच कळत नाही आहे मला.

हे राजकारणी बोलताना विचार का करत नाहीत ???

* अजून एक राजकारणी बद्दल माहीती गेल्या पंधरा दिवसात जे मार्केट ७००-८०० पॉइन्ट खाली आले त्यासाठी आपले श्री श्री श्री पवार साहेब जबाबदार आहेत.. साखरेचा भाव वाढेल / महागाई वाढेल / तेलाचे भाव वाढतील ... हे वाढेल ते वाढेल.... अरे तुम्ही तुम्ही मंत्री आहात जनतेची की व्यापारांचे... मुर्खाचा बाझार आहे नुसता.

असो ,

राहूलबद्दलचे माझे मत तेव्हाच बदलले होते जेव्हा साहेब मिडिया घेऊन गरिबाघरची भाकर तोडायला जात होते व मुद्दाम दलिताच्या घरी राहत होते... !!!


Hope is a good thing...

{आपल्या जाणत्या (?) राजा च्या}

14

आपल्या जाणत्या (?) राजा च्या तोंडावर कोणीतरी जाउन चिकटपट्टी लावा हो, बोलले की धडकीच भरते की आता कशाचे भाव
वाढतात, आजच स्वैपाकाच्या गॅस च्या भाव वाढीची बातमी ऐकली मला नवल वाटले की अरे साहेब आधी कसे बोलले नाही या बद्द्ल?

{हॅहॅहॅ!}

15

खरी गोम नीट पाहिलीये का तुम्ही?

काका म्हणाले, "लवकरच भाववाढ कमी होईल.." की आम्ही ताबडतोब किराणामाल भरुन घेतो..कारण? सोप्पंय, मोजुन पंधरा दिवसाच्या आत भसाभस भाव वाढतात Big smile

{ह्म्म्म}

16

याला राजपुत्र कोण बनवतय? जनताच ना!! आपलेच दात नी आपलेच ओठ..
राजकारण वारसाहक्कासारखा वापरले जाते आपल्या देशात आणी आपण निवडून देतो अश्याच गाढवांना!!

{राजपुत्र}

17

हा राजपुत्र खरंच वाय झेड आहे. मला नवल वाटतं ते मराठी नेत्यांचं. आपले नेते इतके शेपुटघाले??? या विधानाला आक्षेप घेणारा एकही राजकारणी नसावा??

{श्री डॉन, लेख वाचुन नंतर}

18

श्री डॉन,
लेख वाचुन नंतर प्रतिक्रिया देईन

तोपर्यंत हे पहा
Rahul in party mood soon after Mumbai crisis

%TEXT%
http://74.125.153.132/search?q=cache:RLJX_IjX4PkJ:indiatoday.intoday.in/...

{हम्म... या विषयावर}

19

हम्म... या विषयावर विचारवंतांचे म्हणणे वाचायला आवडेल.

{पुन्हा राजपुत्र}

20

आपले लाडके राजपुत्र असे विधान काश्मीर मधे जाउन करु शकतील का?
काश्मीर फार लांब आहे, त्या आधी तमिळनाडू मधे असं बोलायची हिम्मत ते करु शकतील????

{सहमत आहे ! जाऊ दे कश्याला}

21

सहमत आहे !

जाऊ दे कश्याला डोके दुखवुन घ्या wink


Hope is a good thing...

{राजकारण....}

22

या विषयावर आम्ही तुम्हाला काही सांगणे नलगे डान्राव. आहे आत्ता तिकडे निवडणुका आल्यात म्हणुन अशी विधाने. महाराष्ट्रात आल्यावर मग वेगळी भाषा सुरु होईल बघा!


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{+१}

23

सहमत आहे. युवक काँग्रेसवर राजीव सातवांची नियुक्ती हा योगायोग मानावा काय?

{या सरळयाच किळसवाण्या}

24

या सरळयाच किळसवाण्या राजकारण्याचा वीट आलाय.
कितीवेळा सारख सारख तेच तेच उगाळत बसायच.
महाराष्ट्रातले एकजात सगळे काँगीजन कणाहीन गांडुळं आहेत याचा पुनःश्च प्रत्यत आला.
(खरेतर हा समस्त गांडुळांचा अपमान आहे कारण ते निदान खत तरी तयार करण्याच्या कामी येतात.)


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{विचार करतोय...}

25

इथं मुख्यमंत्र्यांनी स्वतःहुन टॅक्सी परमीटबाबतचं विधान करायचं, मग ते स्वतःच बदलायचं, त्यावरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्यावर धुमशान माजवणार, त्यात तिकडं राहुल गांधी अजुन काहीतरी बोलणार... या सगळ्यात काही परस्परसंबंध आहे का?


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{शक्य आहे}

26

राहुल गांधींबद्दल नक्की सांगता येणार नाही परंतु टॅक्सी परमीटबाबतचा सगळा घोळ हा मुद्दामून घातला गेला असावा, असे मानण्यास जागा आहे.

{असेच म्हणत आहे... !}

27

असेच म्हणत आहे... !


Hope is a good thing...

{फालतु माणसाच्या फालतु}

28

फालतु माणसाच्या फालतु वक्तव्यावर आपण येवढे अमुल्य टंकन का वाया घालवलेत डॉन्राव ??

{अरेरे..}

29

असे कसे हो टोचुन बोलता?
छे छे! भलाईचा जमानाच उरला नाही! इटालियन पत्रांना विरोध काय, अन काय काय! wink

अहो, निवडणुका हो निवडणुका...पाहताय ना?
आता मला सांगा,
जर असं काही डोकी भडकवणारं, सणसणीत, भांडवल करण्याजोगं तत्कालीन काही नसेल तर,
१.जनता भाववाढीच्या मुद्द्यावरुन 'गरीबों का हाथ' ला कुचलणार नाही?
२.सुरक्षेच्या कारणांवरुन 'अपनी सरकार'ला फाफलवणार नाही?
३. शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडलं म्हणुन गळफास नाही का लावणार?

बाकी,
डानराव, अगदी एकलव्य शोभता बरं! कणेकर गुर्जींना आज फार धन्य वाटलं असेल हास्य

{झेंडा}

30

इट्टला, कोनता झेंडा घेऊ हाती ?

- फुन्सुक

{राहुलबाबा, आता जरा मोठे}

31

राहुलबाबा, आता जरा मोठे व्हा!

(सौजन्यः श्रावण मोडक)

{डान्रावांच्या यादीत..}

32

डान्रावांच्या यादीत थोडीशी भर. सातारा जिल्ह्यात आमच्या गावाशेजारी एक गाव आहे अपशिंगे म्हणून, त्याला इथे मिलिट्री अपशिंगेच म्हणतात, कारण ह्या गावात घरटी किमान एक माणूस लष्करात आहे. कुठे कुठे तर घरातली सगळीच पुरूषमंडळी फौजेत आहेत. आता कधीही कोणाला साध नावही माहीत होणार नाही त्या लोकांच पण तरीही पिढ्यामागून पिढ्या फौजेत भरती होउन ते अखंड भारताचीच सेवा करत आहेत बहुतेक.
२००० उंबरा असलेल्या आमच्या गावातदेखील काही शे पोर - माणस फौजेत आहेत.

जाउदे हे सगळ माहीत करून घेउन युवराजांचा आणि त्यांच्या पित्त्यांचा हिरमोडच होइल बहुतेक.

{धन्यवाद सातारकर!}

33

असं एक गाव आहे हे ऐकुन वाचुन माहिती होतं, पण नाव मात्र विस्मरणात गेलं होतं.

{हा कसला राजपुत्र? ह्याना कधी}

34

हा कसला राजपुत्र?
ह्याना कधी मध्यमवर्गीय म्हणजे काय हे माहित नसाव मग खरी गरिबी तर दुरच.
आजच त्यानी मुंबईत एक स्टंट केलाय. आणि सगळे एकजात न्युजचॅनेलवाले तो स्टंट दाखवत आहेत.
घालीन लोटांगणचा अर्थ राज्यकर्त्यांकडे पाहुन कळतो.
डॉनराव आपली लेखणी अशीच परजु दे.
हा लेख द्या पाठवुन लोकसत्ता, सकाळ. जे छापतील ते छापतील.

{चला झकासराव, आपली पैज}

35

चला झकासराव,
आपली पैज लागली...कोणता माईचा लाल छापेल त्याचं मी तो म्हणेल ते जन्मभर ऐकेन.
एकजात शेपुटघाले आहेत साले!

{+१}

36

>>...कोणता माईचा लाल छापेल त्याचं मी तो म्हणेल ते जन्मभर ऐकेन.

+१, असेच म्हणतो.
अहो ह्यांना "राहुल सेफ निसटला" ह्याचे कौतुक, आमचा लेख काय डोंबलाचा छापणार.
नाही म्हणता सामनावाले छापु शकतील पण ते आमचे नाव अंमळ डॉन्या नार्वेकर / साळवी / म्हापसेकर ठेऊन देतील व आम्हाला परस्पर "डाऊ कंपनीत काम करणरा परदेशस्थ मराठी तरुण" ठरवुन मोकळे होतील.
जुना अनुभव आहेच की हो !

{झांबिया वगैरे देशातला राहिलं}

37

झांबिया वगैरे देशातला राहिलं ना!

{बरुबर आहे डानराव तुमच. पण}

38

बरुबर आहे डानराव तुमच.
पण लोकसत्तामध्ये क्वचित वाचकांच्या पत्रव्यवहारात विरुद्ध मताची पत्र छापलेली वाचली आहेत.
(अर्थात त्या माणसाने त्याना कितीवेळी अशी पत्र पाठवली असतील ते आपल्याला माहित नसतच)

आता मराठी न्युजचॅनेलदेखील राहुलने केले शिवसेनेला चारीमुंड्या चीत अशी ब्रेकिंग न्युज दाखवत होते ते पाहुन हसु आल.

{इकडचे पण}

39

इकडचे पण खुश
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5536790.cms

तिकडचे पण खुश
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5538816.cms
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5539076.cms

पेपर चालवायचं म्हणजे करावंच लागतं भौ... क्काय?

{खरंय खरंय! धंदा करायचा ना! मग}

40

खरंय खरंय!

धंदा करायचा ना! मग 'गंदा है पर धंदा' असं म्हणायचं, आणि तोंडपुजेपणाची लाली फासुन, नीतीमत्तेचा पदर पाडुन नाक्यानाक्यावर उभं रहायचं!!!
अर्थात हे लोणही 'तिकडुनच' आलेलं बरं! खोटं वाटत असल्यास त्या त्या पेपरांच्या डिसिजन मेकिंग टिम्सचे पदाधिकारी कोण आहेत तपासा एकदा हास्य

{डोन्राव, तुमचे मुद्दे बरोबर}

41

डोन्राव, तुमचे मुद्दे बरोबर आहे. पण राहुलच्या या वक्तव्याचा फायदा शिवसेनेने/मनसेने घ्यायला हवा होता (असे झालेले दिसत नाही?)

काही वर्षांपुर्वी जसे उमदे, वकृत्त्वावर पकड असलेले हुशार नेते संपले की काय?अनेकांना हास्यास्पद मुलाखती देताना पाहुन हसावे का रडावे ते कळत नाही.

पक्षश्रेष्ठींच्या चपला चाटण्याची परंपरा असलेल्या कॉंग्रेसकडुन फासश्या अपे़क्षा कधीच नव्हत्या. पण भाजपा, शिवसेना, मनसे या पक्षांनी व्यवस्थीत धोरणे करुन यश मिळवले पाहिजे!

हा व्हीडीओ पहा , त्या 'editor in chief' ची परीस्थीती पाहुन त्याची दया आली, पण उद्धव ठाकरेंची उत्तरे ऐकुन मात्र 'काय बोलु' अशी परिस्थिती झाली!


-Nile

{पक्षश्रेष्ठींच्या चपला}

42

पक्षश्रेष्ठींच्या चपला चाटण्याची परंपरा असलेल्या कॉंग्रेसकडुन फासश्या अपे़क्षा कधीच नव्हत्या.

अहो, त्या पुणेकरांना मुख्यमंत्री व्हायचे असेल..! माणसाने महत्त्वाकांक्षा ठेवायला नको का? wink