आजच्या व्याख्यानात काय सांगायचे हा मी विचारच केला नव्हता.
एका वर्तमानपत्राचा वर्धापनदिन. त्यानी काही पालकांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता.
निमन्त्रण खरेतर पंधरा दिवसाअगोदरच मिळाले होते. व्याख्यानाला नेहमी तयारीनिशी जातोच असे नाही. बरेचदा काही ठराविक विषयावर बोलायचे असे ठरवून जाऊनही उपस्थित गर्दीचे अॅव्हरेज वय पाहून विषय बदलावा लागतो असा अनुभव गाठीशी बरेचदा होता.
वर्तमानपत्राचा वर्धापनदिन ..न नक्की कोणकोण बोलावले आहेत याचा अंदाज लावणे कठीण असते. गर्दीत कधी जहिरातदारांची जंत्री असते तर कधी महीलांचीच्.महीला आल्या तर वयोगटनुसार त्यांचे विषय बदलतात.
त्यामुळे यावेळेस काही अगोदर न ठरवताच जायचे असे निश्चीत केले होते.
मी हॉलवर गेलो.उपस्थित गर्दी पाहून नक्की अंदाज येत नव्हता.
आयोजकानी सांगितले की ती सर्व बारावी सायन्स ची मुले आहेत. पालकाना घेऊन आली आहेत.
त्याना काही शंका आहेत. कॉलेज ने काहीदिवस अगोदर या वर्तमानपत्राला त्याबद्दल विचारणा केली होती.वर्धापनदिनानिमीत्त त्यानी हे व्याख्यान आयोजित केले होते.
मुलांनी अभ्यास / स्मरणशक्ती / एकाग्रता याबद्दल काही विचारले. पालकानी नेहमीप्रमाणेच मुले उद्धट वागतात रागीट आहेत वगैरे प्रश्न विचारले.
एक प्रश्न मात्र फारच वेगळा होता. तो त्या मुलाच्या पालकानी विचारला होता आणि मुलानेदेखील विचारला होता.
पालकांचा प्रश्न होता की मुलांचे करीयर काय असावे हे त्याना उमजत नाही
मुलाचा प्रश्न होता की मला काय करायचे आहे ते मला ठरवू देत नाहीत.
दोघांच्याही बाजू बरोबर होत्या.
मी मुलाला विचारले की त्याला जे काही व्ह्यायचे होते त्यातल्या धोक्याच्या/कष्टाच्या बाजूचा त्याने विचार केला होता का?
मुलाचे उत्तर फार मार्मीक होते. सर धोके आणि कष्ट तर प्रत्येक गोष्टीत आहेत्.त्याना कशासाठी घाबरायचे.
पालकाना ते उत्तर फार उद्धट वाटत होते.
पालकांचेसुद्ध एका अर्थाने बरोबर असावे. कारण त्याना स्वतःला जे कष्ट करावे लागले/ आयुष्यात जे निर्णय चुकले त्यामुळे जे भोगावे लागले ते मुलाच्या नशेबी येवू नये असे त्याना वाटत होते.
दोन्ही बाजू बरोबरच होत्या.
कोणाची बाजू बरोबर.
आपल्याला नेहमीच शिकवले जाते की एक बाजू बरोबर असेल तर दुसरी चूकच असते. दोन्ही बाजू बरोबर असू शकतात हे आपण ध्यानातच घेत नाही.
पण इथे प्रश्न एका वेगळ्यामुद्द्याला स्पर्श करत होता.
खलील जिब्रान म्हणतो त्याप्रमाणे मुले ही तुमच्या मार्फत या जगात आली म्हणुन ती तुमच्या मालकीची आहेत असे सम़जू नका. मुलाना तुम्ही तुमची स्वप्ने दाखवू शकता. स्वप्ने देऊ शकत नाही.
मुले ही धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे आहेत. सुटलेल्या बाणावर मालकी हक्क दाखवायचा नसतो.
मी ऐकली एक गोष्ट.
एका कोंबडीला उकीरड्यावर एक अंडे सापडले. ते एका गरूडाचे अंडे होते. कोंबडीने सवयीने सोबतच्या तीनचार अंड्याबरोबरच ते अंडेही उबवले. त्यातून गरुडाचे पिलु बाहेर आले.
ते इतर कोंबडीच्या इतर पिलांप्रमाणेच त्यांच्या सोबत खेळू लागले.
असेच उकीरड्यावर खेळताखेळता त्यांच्यावर एक मोठी सावली पडली. कोंबडीची पिली घाबरली. गरुडाच्या पिलाने वर पाहिले. एक मोठा गरूड पक्षी उडत होता. या पिल्लाला त्याचे फार अप्रूप वाटले. त्याच्या मनात आले . काय तो मोठा पक्षी...काय त्याची ती भरारी.....आपल्याला घेता येईल अशी भरारी....
त्याने कोंबडीला हे बोलूनही दाखवले ती म्हणाली चला रे पिला नो आत चला.....ती सावली गरुडाची आहे. त्याची भरारी त्यालाच जमेल्... कोंबडीला तशी भरारी घेऊन काय उपयोग्...आणि एवढ्याउंचावर जायचे तर खाली पाहिल्यावर घेरीच येईल..... चला रे आत चला
कोंबडीची पिल्ले लपून बसली...गरुडाचे पिलु सुद्धा त्यांच्याबरोबर गेले.....
गरुडाचे पिल्लु असूनही आयुष्यभर कोंबडी म्हणून जगले.....
कधीकधी तरी त्याला त्या गरुडाची आठवण यायची....आणि तसे आपल्याला जमणारच नाही म्हणून ते तो विचार मनातून काढून टाकायचे
क्षमता असूनही गरूडाचे पिल्लु त्याच्या पालकानी सांगितले होते म्हणून कोंबडी म्हणूनच जगले वावरले. आणि कोंबडे म्हणूनच मेले.
सुरेख कथा.. आधी कुठे तरी
सुरेख कथा.. आधी कुठे तरी वाचली होती कथा.. !
खरोखर हे आपल्या पाहण्यात येतच की अंगी अनेक गुण असून पण जीवनाची माती करुन जगलेले व मेले आपल्या समाजात दिसतातच. मग ते आई वडिलांमुळे असो वा समाजामुळे ते मुल आपली स्वप्ने आपली ताकत सोडून रुटीनच्या जिवनात अडकला जातो...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
खलील जिब्रान म्हणतो
खलील जिब्रान म्हणतो त्याप्रमाणे मुले ही तुमच्या मार्फत या जगात आली म्हणुन ती तुमच्या मालकीची आहेत असे सम़जू नका. मुलाना तुम्ही तुमची स्वप्ने दाखवू शकता. स्वप्ने देऊ शकत नाही.
सही...
गरुडाची कथा आणी खलीलचे वरचे वाक्य छानच
-निखिल
+१
हेच म्हणतो. विजुभाऊंची कथा छानच.
-पुण्याचे पेशवे
+२
हेच म्हणतो. विजुभाऊंची कथा छानच.
विजुभाउ छान लिहिता तुम्ही.
विजुभाउ छान लिहिता तुम्ही. तुमच्या (काही काहि) कथा आणि प्रतिसाद फारच छान असतात.
उरलेले लेख आणि प्रतिसाद सुद्धा असेच छान व्हावे ही अपेक्षा फार गैर नसावी.
लेखन
आवडले
छान
छान
विजुभाय एकदम चोक्कस.
विजुभाय एकदम चोक्कस.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
+१
एटले चोक्कस!
अप्रतिमच हो विजुभौ !
अप्रतिमच हो विजुभौ !
धन्यवाद विजुभाऊ! फारच छान
धन्यवाद विजुभाऊ!
फारच छान !!
खलील जिब्रानची रुपककथा तर अतिशय आवडली.
विजुभौ एकदम सही कथा
"मुले ही धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे आहेत. सुटलेल्या बाणावर मालकी हक्क दाखवायचा नसतो."
खलिल जिब्रान विषयी अजुन वाचायला आवडेल, त्यांची नाते संबाधावरील भाष्ये दिखिल खुप सुरेख आहेत.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
हम्म!
"अंथरूण पाहून पाय पसरावे!!"

गेल्या पिढीचं एक पेटंट वाक्य!!!
आपल्या मुलांच्या मनावर तेच बिंबवत रहायचं....
अरे पण अपुर्या अंथरूणात पाय आखडून निजण्यापेक्षा अंथरूणच मोठं करण्याचे प्रयत्न का नाही करायचे?
मग भरपूर लोळता येईल की त्याच्यावर!!!!
असो. विजुभाऊ, छान लेख!!!
नॉट फेल्युअर, बट लो एम इज अ क्राईम!!!
आपली मुलं शाळेतून बाहेर पडतावेळी एव्हढं एकच शिकली तरी पुरे!
पुढला स्वतःचा रस्ता आपला आपण शोधून काढतील!!
+ १ सहमत
शंतनुराव किर्लोस्कर म्हणायचे "आपण अंथरुण पाहून पाय पसरण्यापेक्षा पाय किती पसरायचे आहेत हे ठरवून तसे अंथरुण तयार करणे जास्त गरजेचे आहे!"
खलील जिब्रानच्या "ऑन चिल्ड्रेन" ह्या मुक्तकाचा अनुवाद मी केला होता तो खाली दिलेल्या लिंकवर वाचता येईल.
http://www.misalpav.com/node/4025
चतुरंग
लेख आवडला. आपल्याच मुलांवर
लेख आवडला. आपल्याच मुलांवर विश्वास न ठेवता येणे हा पालकांचाच कमकुवतपणा आहे.
http://shilpasview.blogspot.com/