प्रतापगड - एक सुरेख सफर
महाबळेश्वर फिरुन झाले होते व एका जागी पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबलो, व थोडे स्नॆक घेतले खाण्यासाठी. दुपारचे दिड-पाऊणे दोन वाजले होते समोर मार्गदर्शक फलक लागला होता, व एका छानश्या रस्त्याकडे बाण दाखवून खाली लिहले होते प्रतापगड ! अरे वाह ! प्रतापगड... चलो प्रतापगड ! ह्या विचार मनात येऊ पर्यंत मी स्नॅक माझ्या सॅकमध्ये टाकले पाण्याच्या बाटलीच्या पिशवीत पाण्याची बाटली ठेवली व सॅक पाठीला बांधून बाइक चालू पण केली. रस्ते एवढे सुरेख आहेत की राहून राहून वाटत होते आपण महाराष्ट्रातच आहोत ना
महाबळेश्वर सोडून खाली घाटाला लागलो. खुप वर्षापुर्वी म्हणजे जवळ जवळ मी सहावी-सातवीत असताना शाळेच्या सहलीबरोबर कधी प्रतापगड पाहिला होता व त्यानंतर आता योग आला होता. थंडीचे दिवस हलकी हलकी थंडी वाजत होती पण नेहमी प्रमाणेच आम्ही गोवा फिरायला आलो आहोत अश्या ड्रेस मध्ये भटकत होतो. पण घाट उतरताना खुपच थंडी वाजण्याची लक्षणे दिसू लागली म्हणून बाइक कुठेतरी थांबवून दुसरा टिशर्ट व शर्ट अंगावर घालण्याचा विचार करत गाडी थांबवण्यासाठी स्पॉट शोधत हळू हळू चालू बाइक चालवू लागतो. काही किमी पुढे आल्यावर उजव्या बाजूला एक मस्तपैकी धबधबा दिसला धबधबा म्हणावे असा मोठा नाही व झरा म्हणावा एवढा लहानपण नाही. मस्त पैकी बाइक तेथे पार्क केली. सॅक मधील कपडे काढले तोच बाइकच्या आरश्यात थोबाड (पक्षी: मुखकमल) दिसले. बाइकवर उघड्या चेहयाने फिरुन चेह-याचा हाल एकदम कालियातल्या बच्चन सारखा झाला होता विचार केला आता थांबलोच आहोत अंघोळ करुन घ्यावी चांगला स्पॊट पण आहेच. लगेच विचार आल्या आल्या कृती करण्यावर भर असल्यामुळे जीन्स काढून लगेच बरमुडा घालून बनियनवर मी अंघोळीसाठी सज्ज झालो. बुट इत्यादी आयटम सॆकमध्ये कोंबून बाइकवर ठेवली झपाझपा पाण्याकडे गेलो. तो पर्यंत थंडी हा विषय डोक्यातून बाहेर पडला होता व पाण्याचा काहीच अंदाज न घेता पाण्याखाली जाऊन उभा राहिलो. आई गं !! च्यामायला वर कोणी बर्फाच्या लाद्या ठेवल्या आहेत काय रे असे जवळ जवळ ओरडूनच पाण्यापासून बाहेर आलो. अर्धा भिजलो होतो व आता चळाचळा कापत होतो
तोच महाबळेश्वर कडून एक सोमो गाडी आली व ती पण धबधब्याजवळ फोटो काढण्यासाठी थांबली.. त्याच्या मागे एक त्याच्या मागे अजून एक अश्या तीन चार गाड्यांची रांगच लागली
व त्यातून पटापटा सुंदर कन्या बाहेर पड्ल्या. हॆ हॆ हॆ अंगाची थरथराट कमी झाली व दाखवण्याची मर्दानकी जागृत झाली व सरळ जसे मी गरम पाण्याच्या शॊवर खाली उभा आहे तसा मस्त पैक्की त्या थंडपाण्याच्या झ-याखाली उभा राहीलो. थोडावेळ मस्ती करुन पाण्यातून बाहेर आलो व बाईकवर थॊडे पाणी घालून तीला देखील अंघोळ घातली. त्यामुलींना काही फोटो काढण्यासाठी मदत केली व टाटा बाय बाय करुन आपल्या बाइकला किक मारली.

जवळ जवळ घाट मोकळाच होता त्यामुळे बाइकच्या स्पिडचे टेस्टिंग पण येथेच पार पाडले. हे यामाहाचे धुड किती वेगाने जाऊ शकते व कुठे व कसा ब्रेक मारल्यावर बाइक घसरु अथवा पडू शकते ह्याची ट्रायल घेऊन झाली व तो १८-२० किमीचा घाट पुर्ण करुन मी खाली एका धाब्याबर मस्तपैकी जेवण केले व गाडी परत सुसाट प्रतापगडाकडे वळवली. प्रतापगडचा घाट व जो उतरलो होतो तो घाट ह्यावर निसर्गाने असिम कृपा केली आहे हे जागोजागी जाणवत होते व मी एका चांगल्या सिझन मध्ये इकडे आलो आहे ह्याबदल मी नशीबाचे देखील आभार मानत घाट चढायला सुरवात केली. गडाच्या तोंडावरच बाइक पार्क केली वर जय शिवाजी महाराज अशी आरोळी देऊन खालची लाल मातीचा टिळा कप्पाळाला लावला !


गडाच्या पुर्नबांधणीचे काम जोरात चालू आहे ढासळलेले बुरुज, भिंती, वाटा ह्यांचे काम जागो जागी चालू आहे ह्याच्या खाणाखुणा सर्वत्र दिसत होत्या. गडावर एक भलामोठा भगवा जोमात फडकत होता त्याला मस्त पैकी वाकून मुजरा केला तोच पाठीवर कोणी तरी थपका मारला वळून पाहिले तर एक ६०-६५ वर्षाचे आजोबा माझ्या मागे उभे होते व म्हणाले शब्बास बच्चा ! व पुढे निघून केले.. मी त्यांच्या पाठमो-या आकृतीकडे पाहतच राहिलो का व कश्यासाठी शब्बास हे विचारायचे सुध्दा विसरलो. गडावर गर्दी दिसत होती, शाळेच्या ट्रिप आलेल्या होत्या एक दोन मुलांना विचारले कुठून रे तर आमरावती, लातूर, विटा अशी नावे समोर आली.

मंदिरात जाऊन दर्शन घेतले बाहेरुन मंदिराची रुपरेखा व बांधणी थोडावेळ निरखून पाहिली व त्या काळ्या दगडात बांधलेल्या मंदिराला एक नमस्कार करुन पुढे चालू लागलो. वर गडावर महाराजांचा अश्वारुढ पुर्णाकृती पुतळा मधोमध उभा केला आहे अत्यंत सुरेख व सुबक अशी मुर्ती. बुट काढून वर चबुत-यावर चढून महाराजांचे दर्शन घेतले व थोडा वेळ महाराजांच्या चेह-याकडे पाहत तेथेच बसलो.

तसे गडावर पाहण्यासारखं खुपकाही नाही पण एका बाजूला माझे लक्ष गेले तिकडे गर्दी कमी होती जवळ जवळ एखाद दुसरा सोडला तर कोणीच नव्हते.. गडाची तटबंदी. दिड-दिड फुटी सात-आठ पाय-या चढल्यावर मी तटबंदीवर उभा झालो आह ! प्रचंड सुंदर असे दृष्य समोर दिसत होते व मी थिजल्यासारखा समोर तोंड आ करुन पाहत होतो.. कोकणदरा !!!




मग मी झपाटल्यासारखा पुर्ण गडाची तटबंदी फिरलो. एकेजागी आत कोणी जाउ नये म्हणून जाळी लावली होती पण पुर्ण तटबंदी पाहण्याचा एक जुनून माझ्या अंगात संचारला होता त्यामुळे मी तटबंदीच्या उलट बाजूने (दरीकडून) तो अडथळा दुर केला वर एका नितांत सुदर जागी पोहचलो. आता ह्यापुढे काही शब्दांची गरज नसावीच. सर्वकाही हे फोटोच बोलतील.





* नेट स्पीड कमी आहे त्यामुळे फोटो थोडे छोटे करुन अपलोड केले आहे परत उद्या सगळे फोटो अपलोड करतो.

.jpg)
लढ बाप्पू!!! लय
लढ बाप्पू!!!
लय भारी!!!
प्रतापगडाची बातच काही और
अवांतरः बरं झालं, एक फोटो वगळलास ते! हिंदवी स्वराज्याच्या छाताडावर थयथया नाचणारा...... असो!
हो रे... साले देशद्रोही /
हो रे... साले देशद्रोही / स्वातंत्र्याचे मारेकरी.. / स्वराज्याचे दुश्मन... संत आपल्याच देशात होऊ शकतात बाबा.......
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
कोणता फोटो??
बाकी वर्णन, फोटो सारेच सुरेख.. खरच भाग्यवान आहेस
महराजांनी याच गडाखाली गाडला याला.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
ह्म्म
लोकजागर अंमळ भैय्याप्रेमी दिसतेय. "फिनिस"
सहजराव अंमळ आंग्लांचे मानसिक
सहजराव अंमळ आंग्लांचे मानसिक गुलाम असल्याची शंका होतीच.. खात्री पटली
हॅ हॅ हॅ
तुम्ही लोकजागरचे संपादक असल्याची शंका होतीच.. खात्री पटली.
हॅ हॅ हॅ दुस-याच्या (फक्त)
हॅ हॅ हॅ
दुस-याच्या (फक्त) चुका काढत बसण्यापेक्षा लोक जागर(ण) काय वाईट?
सह्जराव
आप्ला रोख कळला न्हाई. जरा इस्कटुन सांगा की.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
अरे जयपाला... त्या चित्रात
अरे जयपाला...
त्या चित्रात finished च्या ऐवजी finised आले ना म्हणुन सहज मास्तर चिडले. दुसरे काही नाही.. जावु दे लक्ष देवु नको..
आवो त्या भैय्या बामनानच
इकडच कुनीबी तयार न्हवत म्हनून आप्ल्या महाराजान्ला अभिषेक घातल व्हता.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
का ह्या सत्यापासुन का आम्हाला
का ह्या सत्यापासुन का आम्हाला वचिंत ठेवताय...
दाखवा ना तो फोटो... अरे काही महान संताची ओळ्ख आम्हालाही होईल हो!!!
एककीकडे ज्यांना संत समजतो त्यांना शत्रुचा गुप्तहेर ठरवायचे आणी शत्रुलाच संत!!!
ह्यालाच लोकशाही म्हणत असावे..
-निखिल
चालायचेच रे निख्या...
चालायचेच रे निख्या...
नर्मदेच्या खालच्या बाजुचे शालिवाहन शकानुसार चैत्र पक्षापासुन वर्षाची सुरवात मानणारे गुढी का उभारतात याचे विचारवंती कारण कळल्यापासुन तर कशाचेच आश्चर्य वाटत नाही. जास्त यावर बोलण्यात काय अर्थ? उगाच अस्मितेवर चर्चा सुरु झाली तर ... विचारवंतांना उगाचच त्रास. नाही का ? असो.
भाग्यवान आहात.
भाग्यवान आहात.
नेहमीप्रमाणेच...
नेहमीप्रमाणेच सुंदर वर्णन आणि तितकेच सुंदर फोटो ...
मी सुद्धा शाळेच्या सहलीबरोबर प्रतापगड पाहिला होता ..आज पुन्हा तुम्ही दाखवलात ..
अवांतरः इतके बाइक वर कसे काय फिरू शकता बॉ
प्रतापगडाची बातच और...
मलाही माझ्या शाळेची सहल आठवली... प्रतापगड इतर गडांच्या मानाने चांगल्या स्थितीत आहे.. बहुधा तो सातारा/कोल्हापूरच्या वंशजांकडे होता त्यामुळेही असेल... बाकी, फोटो वगळण्याच्या बाबतीत द्मु शी सहमत..
अवांतरः: थोडे स्नॆक घेतले खाण्यासाठी. नको रे असले काही अरबट चरबट खाऊस.. आईला(तुझ्या) हवेतर तुला आणखी लाडू बनवून द्यायला सांगते हो..!!!
राजे मस्त भ्रमंती. शाळेत
राजे मस्त भ्रमंती. शाळेत असल्या पासुन प्रतापगड सगळात आवडता गड.
तेव्हा कोणताच गड पहिला नव्हता पण चौथ्या फोटोत दिसणारा तो कडा शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात पहिला होता. पुढे-मागे कधी योग आलाच तर सर्वात आधी याच गडाच दर्षन घ्यायच हे तेव्हाच ठरवल होत.
माझ्या या लाडक्या गडाची पुन्हा एकदा सचित्र सफर घडवल्या बद्दल धन्यु.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
कधी रे?
रॉडकुमार भटकंती कधी पासुन सुरु केली? जुनी गोष्ट आहे का? याददाश वापिस आयी क्या?
डिसेंबर मध्ये केला होता हा
डिसेंबर मध्ये केला होता हा प्रवास.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्त रे ....... राजे चोच्या,
मस्त रे .......
राजे चोच्या, पाय बरा झाला की लाग परत भ्रमंतीला...
शाब्बास बच्चा !
शाब्बास बच्चा !
मस्तच रे राजा. जिंकलंस गड्या.
मस्तच रे राजा. जिंकलंस गड्या.
-पुण्याचे पेशवे
चालु झाले का परत !! डॉक्टरनी
चालु झाले का परत !! डॉक्टरनी पाच महिने आराम सांगीतला होता ना !!
अरे डिसेंबर मध्ये ट्रिप केली
अरे डिसेंबर मध्ये ट्रिप केली होती रे... अपघातामुळे लिहणे शक्य झाले नव्हते ते आता लिहीले एवढेच...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सुरेख वर्णन आणि फोटो तर
सुरेख वर्णन आणि फोटो तर अप्रतिम