कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?

0
0

कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?

किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे

कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?

"घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे

जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?

कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...!

....................................................... गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------
कविता ........................................ वृत्त - सुमंदारमाला
लगावली - लगागा लगागा लगागा लगागा, लगागा लगागा लगागा लगा
----------------------------------------------------------------------------

कुठेही पुर्वप्रकाशित नाही.

{कधी भाट होई सख्या}

1

कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालीत ही आरसे?

सुरेखच !!

{खूप छान लिहली आहे कविता. जरा}

2

खूप छान लिहली आहे कविता.

जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?

Sad

{प्रकाशजी आणि}

3

प्रकाशजी आणि पकाकजी,
प्रतिसादाबद्दल मनपुर्वक धन्यवाद. हास्य

बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

{अप्रतिम गजल !!}

4

अप्रतिम गजल !!

मी जाह्नवी. एका कल्पनेचं वास्तव

{मनपूर्वक धन्यवाद जान्हवी.}

5

मनपूर्वक धन्यवाद जान्हवी. हास्य

बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

{अप्रतिम}

6

अप्रतिम

{मुजरा सरकार !!}

7

मुजरा सरकार !!

"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{CHAN AHE.}

8

CHAN AHE.

{किती ज्येष्ठ आहे, किती}

9

किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे

हे सर्वात जास्त आवडले.

{आवडली गझल.}

10

किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे

हे सर्वात जास्त आवडले.

{मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो.}

11

मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो. हास्य

बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

{कधी भाट होई.......}

12

कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?

Grade

परेश भास्कर कुंटे

युद्ध आता सुरु होत आहे......

{बेस्ट कविता}

13

कविता आवडली. सत्य परिस्थिती छान मांडली आहे.

{सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.}

14

सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. हास्य

बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

{स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल}

15

स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन !!!

Hope is a good thing...

{धन्यवाद राजे, माझ्यासारख्या}

16

धन्यवाद राजे,

माझ्यासारख्या दुरवर ग्रामीण भागात अडगळीत पडलेल्या एका माणसाची कविता पुरस्कृत करून माझ्यामध्ये तुम्ही एक नवा आत्मविश्वास जागविला आहे.
त्याबद्दल
माझ्या कवितेला व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या या आंतरजालीय विश्वाच्या निर्मात्याला, संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मराठीचे मालक या नात्याने तुम्हाला, परीक्षक व ज्येष्ठ पत्रकार-लेखक श्री प्रदीप निफाडकर यांना

नमस्कार करतो. हास्य

बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

{नमस्कार }

17

अहो मुटे साहेब, वयाने व अनुभवाने तुम्ही माझ्यापेक्षा थोर. तुम्ही आर्शिर्वाद द्याचा नमस्कार मी करतो हास्य

Hope is a good thing...

{अभिनंदन मुटे साहेब}

18

अभिनंदन मुटे साहेब

{तुमचेही खूप खूप अभिनंदन सर!}

19

तुमचेही खूप खूप अभिनंदन सर!

{(विषय दिलेला नाही)}

20

{प्रथम क्रमांकापेक्षाही जास्त काही}

21

श्री.गंगाधर मुटे यांचे 'शेती आणि शेतकरी' या विषयावरील जालावर विविध ठिकाणी प्रकाशित होणारे लेखन मी सातत्याने वाचत असतो. त्यांचा त्या विषयातील गाढा अभ्यास आणि श्री.शरद जोशी यांच्या कार्यावर असणारी त्यांची नितांत भक्ती तिथून प्रकट होत असते. प्रथम क्रमांकाची वरील कविताही त्यांच्या सर्वदूर सामाजिक अभ्यासाचेच प्रतीक आहे यात संदेह नाही. केवळ आहे पेन, कागद आणि टेबल म्हणून प्रकटलेली ती कविता नसून त्यातून दाहक परिस्थितीचे जे प्रातिनिधिक रूप वाचकासमोर त्यानी अचूकपणे मांडले आहे; ते विलक्षण प्रभावी आहे.

मला खात्री आहे की खुद्द श्री.गंगाधर मुटे याना 'प्रथम' क्रमांकापेक्षाही समस्त वाचकांसमोर त्या कवितेतील भावना आणि त्यातून सद्यस्थितीच्या प्रखर ढाच्याचे एक अस्वस्थ करणारे चित्र या निमित्ताने समोर येईल, याचा जास्त आनंद होईल.

{अगदीच सहमत.}

22

<<< 'प्रथम' क्रमांकापेक्षाही समस्त वाचकांसमोर त्या कवितेतील भावना आणि त्यातून सद्यस्थितीच्या प्रखर ढाच्याचे एक अस्वस्थ करणारे चित्र या निमित्ताने समोर येईल, याचा जास्त आनंद होईल. >>>>

अगदीच सहमत. हास्य

बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

{स्पर्धेतल्या यशाबद्दल}

23

स्पर्धेतल्या यशाबद्दल अभिनंदन....

********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."

{धन्यवाद.}

24

धन्यवाद.

मी कालपर्यंत "सौ. राजे" ही डुप्लिकेट आयडीच असावी, असेच समजत होतो.
आता मात्र खरे काय ते कळले आहे. शुभेच्छा.. हास्य

बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

{सर्वांचा मनापासून आभारी आहे.}

25

सर्वांचा मनापासून आभारी आहे. हास्य

बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

{हार्दिक अभिनंदन दादा !}

26

हार्दिक अभिनंदन दादा !

"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{अभिनंदन...}

27

---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{स्पर्धेतल्या यशाबद्दल खूप खूप}

28

स्पर्धेतल्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन...

{कधी भाट होई सख्या}

29

कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालीत ही आरसे?

खुप छान आणि वास्तव आहे हे... !!