गुढ सिहंगडावरचे...........२/२

0
0

http://mimarathi.net/node/562

कार सिहंगडच्या दिशेने निघाली..

जाताना आम्ही पेट्रोल भरायला थांबलो. सिगरेटची तल्लफ भागवायचे कारण दाखवून मी सुन्याला जरा बाजुला नेले. त्या अनायासेच लाभलेल्या एकांतात त्याला "तू काही धतिंग-शुटिंग तर केली नाही ना?" असे विचारुन घेतले. त्याच्यावर अविश्वास दाखविण्याचे कारण नव्हते; पण विचारणा करणे मला आवश्यक वाटले. सुन्या हा एक पुरुष होता आणि पुरुषाच्या कधी ना कधी भावना उचंबळून येतात हे धडधडीत सत्य आहे. त्यावर कोणी ताबा ठेवू शकतो तर कोणी ठेवू शकत नाही. पण सुन्याच्या उत्तराने माझे समाधान झाले.
"मला घाई करायची काहीच गरज नाही." हे खरे होते. दोघांच्या घरी त्यांच्या संबधाबाबत सहमती होती.
पायथ्यापासून थोडेसे वर गेल्यावर, डाव्या बाजूला, कारने पुढचा प्रवास अशक्य असल्याने, कार पार्क करावी लागली. हातात टॉर्च घेउन सर्वात पुढे सुन्या, त्याच्यामागे तिचे पप्पा, सर्वात मागे मी असे आम्ही त्या पायवाटेने निघालो. अगदीच काळोख नव्हता. पण एखाद्या नवीन माणसाची तंतरावी इतपत अंधार मात्र नक्की होता. ती लहानशी पायवाट, आजूबाजूला वाढलेली झुडपे, रातकिड्यांची किरकिर, त्या वातावरणाच्या भयानकेत भर टाकीत होती. त्या गूढ वातावरणाचा परिणाम अनघाच्या पपांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. पण मुलीच्या काळजीने जीव मुठीत घेउन ते चालत होते. त्यात ती सापडते की नाही ह्याची चिंता जास्त.
वीस-पंचवीस मिनिटे चालल्यावर, झाडाखाली बसलेली तिची आकृती स्पष्ट होऊ लागली. होय, ती तिच होती. शांतपणे बसलेली. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून, समोरच्या कातळाकडे एकटक बघत होती. ज्या झाडाखाली ती बसली होती ते झाड विचित्र होते. साधे कडुनिंबाचे झाड, साधारण वीस एक फूट वाढलेले असावे, हाताचा पंजा सरळ उभ्या रेषेत जमीनीवर ठेवावा आणी हाताची बोटे डाव्या बाजूला आकड्यासारखी जमिनीकडे वळलेली असावी असा त्या झाडाचा आकार होता. आम्ही तिच्या एकदम नजिक पोचलो. पण तिची नजर मात्र ढळली नाही. टॉर्चचा प्रकाश तिच्या डोळ्यांवर चमकला, मात्र तिची पापणी देखील लवली नाही. मी त्या काळ्याशार कातळाकडे पाहिले. मला क्षणभर भांबावल्यासारखे झाले.
"अनघा... अनघा" तिच्या पप्पांनी तिला हाक मारल्याने मी भानावर आलो. पण ती मात्र जागची हलली नाही. शेवटी तिच्या पप्पांनी तिला हाक मारत-मारत गदागदा हलविले. झटका बसल्यासारखी तिने मान आणि नजर फिरविली, सर्वांकडे कटाक्ष टाकला. तिने तिच्या पप्पांना ओळखले असावे. "पप्पा... पप्पा" म्हणत लहान मुलासारखी त्यांच्या कुशीत शिरुन रडायला लागली. तिचे पप्पा तिची समजूत घालत होते. "नाही ग बेटा. रडायचं नाही, चल आपण घरी जाउ." पण ती रडतच होती, आणि रडता-रडता ती अचानकच शांत झाली. डोळे बंद केले. तिच्या पप्पांनी घाबरत तिची नस चेक केली. तिचा श्वास चालू होता.
"शी ईज ब्रेदीग, आपण लवकरात लवकर हॉस्पिटलला जायला हवे." त्यांनी तिला उचलले. आम्ही धपाधप पावले उचलत कारच्या दिशेने निघालो.

ओळखीचे डॉक्टर असल्याने रुबी हॉलला जायचे ठरलं. त्या साधारण तासाभराच्या प्रवासात, मागच्या सीटवर, सुन्याच्या मांडीवर डोके ठेऊन पडलेल्या अनघाच्या तोंडून, क्षीण आवाजात "पप्पा.. पप्पा... मला... झोपायचंय" इतकेच शब्द तुटकपणे दोन-तीनदा बाहेर पडले. कार रुबी हॉलच्या मेन-गेटवर आल्यावर मी पटकन आत शिरलो. स्ट्रेचर मागविले. त्यावेळेस मला अनघाला नीटसे पहाता आले. तिची परिस्थिती खराब होती. ताप आलेला होता. सदोदित टवटवीत् असणारा चेहरा निस्तेज पडला होता. स्वप्नाळू डोळ्यांभोवती, जराशी फिक्कटच, पण काळी वर्तुळे आली होती. केस बर्‍याच दिवसापासून सावरले नाहीत असे दिसत होते.
पेशंटच्या सर्व टेस्ट होईपर्यंत पहाट झाली. अनघाला आय. सी. यू. त हलविण्यात आले. त्या दरम्यान अनघाची बहीण व मम्मी इस्पितळात आल्या. साधारण आठ वाजता डॉक्टरांनी तिच्या पप्पांना बोलविले. सुन्या आणि मीही आत शिरलो.
"तिच्या रक्तात **** सापडले."
"म्हणजे?"
"ते एक प्रकारचे ड्रग आहे, ती काही ड्रग्ज वगैरै घेत होती का?"
"व्हॉट द हेल?" मी एकदम चिडलो.
"आता हे ड्रग ती घेत होती की कोणी तिला देत होते हे सांगता येत नाही, तिच्या हातावर इंजेक्शनच्या खुणा आहेत, हे घेतल्यावर माणूस काय करतोय हे त्याला स्वतःलाही कळत नाही. मला वाटते आपण पोलिसांना बोलावून घ्या."
आम्ही तिघेही चाटच पडलो. काय बोलावे, काय करावे ते सुचेना. शेवटी डॉक्टरांच्या सूचनेनुसार मी बंडगार्डन पोलीस चौकीतून ओळखीच्या हवालदाराला बोलावून घेतले. दरम्यानच्या काळात अनघाची मम्मी, पप्पा आणी बहिण थोड्याश्या शुद्धीवर असलेल्या अनघाला भेटून आले. बहीण तिथेच थांबली. सुन्याने आणि मी तिच्या पप्पांशी ड्रग्जबाबत चर्चा केली. कोणालाही त्याबद्दल अजिबात कल्पना नव्हती. मग चौकीतून शेखर आला.
शेखरने सर्व माहिती घेतली. केस केल्यावरचे फायदे-तोटे समजावून सांगितले. मुलीची कशाप्रकारे बदनामी होउ शकते, व्यसनमुक्तीसाठी काय करावे अशा बाबींवर चर्चा झाली. सरतेशेवटी तिला डिस्चार्ज मिळाल्यावर तिच्या आजीकडे, सोलापूरला हलविण्याचा निर्णय तिच्या पप्पांनी घेतला. सुन्याचे हाल मला बघविले गेले नाहीत. त्याच्या चेहर्‍यावर अपराधीपणाचे भाव होते. "एक चूक... फक्त एक चूक... सिंहगडाला गेलो नसतो तर इतके सगळे नसते झाले..." आमच्यापैंकी कुणीही त्याला समजावून सांगू शकत नव्हते.
पाच-एक दिवसांत अनघाबरोबर, सोलापूरला, तिच्या घरचेही गेले. सुन्या तिला दर आठवड्याला भेटायचा. ती आता थोडसं नॉर्मल वागतीये म्हणून सांगायचा. दोन महिने होत आले होते. सुन्याच्या मनालाही आता जरा शांतता होती. आणि एक दिवस अनघा सोलापूरच्या घरातून गायब झाली. थोडीशी अन-ऑफिशियल पोलीस चौकशी केल्यावर कळले की तिला सिंहगड परिसरातच शेवटचे बघण्यात आले होते. आख्ख्या ग्रुपने तो सर्व परिसर पिंजून काढला; पण ती सापडली नाही. आज सहा वर्षे झाली, अनघा बेपत्ता आहे.
भेटल्या-भेटल्या डोक्यावर टप्पू मारणारी, हातवारे करत, मान डोलावत, अंताक्षरीत "मेरे नसीबमें तू है के नही, तेरे नसीबमें मैं हूं के नही" गाणे म्हणणारी, हसता-हसता हसवणारी अनघा कुठे गेली असावी? मध्यंतरी ग्रुपमधला एकजण म्हणाला की तिच्या चेहर्‍याशी साम्य असलेल्या एका मुलीला "तसल्या" टाईपच्या क्लिपमध्ये पाहिल्यासारख झाल. मला ते किळसवाणे वाटले. मी ती क्लिप बघितली नाही. ह्या प्रकरणात नेमके काय झाले ते आजही मला माहिती नाही. तीन-चार महिन्यापूर्वी आणखी एक मुलगी सिहंगडावरुन गायब झाली आहे. ती अजूनही सापडली नाही. त्याही प्रकरणात काय गूढ आहे ते समजत नाही. आज नाही तर उद्या सत्य बाहेर येणारच...
पण एक सत्य, मला जर अनघा भेटली तर, सांगायचेय की एरवी, कंजारभाटात, दारुच्या गुत्यावर, सहजासहजी सापडणारा सुन्या सहा महिन्यापूर्वीच वारला.....

{ह्म्म्म काय लिहाव सुचत नाहीए}

1

Sad ह्म्म्म
काय लिहाव सुचत नाहीए

{WTF??????????}

2

Sad
तू नको लिहत जाऊस रे!
डोकं भैताड होऊन बसतं तुझे सत्यपरिस्थितीचं नागडं वास्तव समोर आणणारे लेख वाचले की. Sad

च्यायला!! काय काय दुनियादारी चाललेली असते. आपण मारे मोठ्यामोठ्या गप्पा झोडतो. एकातरी अतिशहाण्याला अक्कल असु शकते का, की हे असं भयाण कायकाय घडतं अतिशय सर्वसामान्य पातळीवर?

जाऊदे! मीच येडा. उगाच वाचलं!

{सहमत}

3

धमुशी सहमत...
लै जबरा झालिय राव कथा

आंबोळी

{मस्त !!!}

4

+१

{बाप रे... सुहास... काय रे हे}

5

बाप रे... सुहास... काय रे हे भलतंच. खूप लागलं मनाला. Sad

काही प्रश्न...

०१. हातावरच्या इंजेक्शनच्या खुणा कोणालाच कधीच कशा दिसल्या नाहीत?
०२. 'फक्त एक चूक, सिंहगडावर गेलो नसतो तर...' असं म्हणताना सुन्याचा अजून काही संदर्भ होता का?

{बराच वेळ काही लिहीताच आलं}

6

Sad बराच वेळ काही लिहीताच आलं नाही.

बिकाला पडलेला दुसरा प्रश्न मलाही पडला. एकदाच ड्रग्ज घेऊन तिला सवय लागली?

{सुन्न}

7

करणारं लेखन!

०१. हातावरच्या इंजेक्शनच्या खुणा कोणालाच कधीच कशा दिसल्या नाहीत?
०२. 'फक्त एक चूक, सिंहगडावर गेलो नसतो तर...' असं म्हणताना सुन्याचा अजून काही संदर्भ होता का?

--- हेच प्रश्न डोक्यात आले होते वाचताना. सिंहगडाच्या पायथ्याशी चालणार्‍या रेव्ह पार्ट्यांच्या बातम्या आठवल्या दुसर्‍या प्रश्नाच्या संदर्भात.
(सिंहगड म्हटल्यावर असले संदर्भ आता आठवावेत, हे आमचं दुर्दैव!)

{ड्रग्ज घेणारा}

8

अट्टल एडीक्ट ओळखू येणे फारच अवघड दिसतेय.

(सिंहगड म्हटल्यावर असले संदर्भ आता आठवावेत, हे आमचं दुर्दैव!)
काय बोलू!

{हेच प्रश्न ...}

9

०१. हातावरच्या इंजेक्शनच्या खुणा कोणालाच कधीच कशा दिसल्या नाहीत?
०२. 'फक्त एक चूक, सिंहगडावर गेलो नसतो तर...' असं म्हणताना सुन्याचा अजून काही संदर्भ होता का?
आणि एक
>> आज ती पांढरी साडी,गजरा वगैरै लावुन गेली आहे ...
हे पण नाही समजलं ..

{वाचता वाचता सुन्न झाले..}

10

पण बिका नि अदितीला पडलेले प्रश्न मलाही पडले आहेत... Quest

{काय बोलु ? दाहक वास्तव.}

11

काय बोलु ? दाहक वास्तव.

{बापरे!!! एकुणच कठीण परिस्थीती}

12

बापरे!!!
एकुणच कठीण परिस्थीती आहे...

डोकं भैताड होऊन बसतं तुझे सत्यपरिस्थितीचं नागडं वास्तव समोर आणणारे लेख वाचले की.
हे खरे आहे... पण सुहास ती लिहित नको जाउ असे मी म्हणणार नाही...


-निखिल

{सहमत आहे. पण मी बोललो ते त्या}

13

सहमत आहे.
पण मी बोललो ते त्या परिणामाखाली आलेल्या उद्वेगापोटी.
त्याने लिहावंच. नक्की लिहावं आणि सर्वकाही आलबेल चालु आहे अशी समजुत करुन घेऊन जगणार्‍यांना त्यांच्याच पाठीमागच्या पडद्याआड कसं काय चालतं आहे त्याची झलक दाखवावी!

{सर्वकाही आलबेल चालु आहे अशी}

14

सर्वकाही आलबेल चालु आहे अशी समजुत करुन घेऊन जगणार्‍यांना त्यांच्याच पाठीमागच्या पडद्याआड कसं काय चालतं आहे त्याची झलक दाखवावी!

एगजॅक्टली....


-निखिल

{माफ करा मित्रहो... बहुतेक मला}

15

माफ करा मित्रहो... बहुतेक मला या घटनेचे सगळे पदर / पैलू उलगडलेलेल नाहीयेत म्हणून या घटनेचे एवढे व्यापक पडसाद कळले नाहीत. कोणी समजवून सांगेल का?

{ही घटना/कथा}

16

ही घटना/कथा प्रातिनिधीक!
एकुणच, सुहास जे काही दाखवतो त्यासंदर्भात बोलत होतो आम्ही. अ डिफरंट वर्ल्ड अंडर अवर नोज!

{+१}

17

सहमत रे...

{हे कथन}

18

हे कथन फक्त ज्ञात असलेल्या (किंवा जे मांडावे इतक्याच) वास्तवाला चिकटून जाणारे दिसते. त्यात दमदार कथेचे बीज आहे. बिका वगैरेना पडलेले प्रश्न अधिक - सुनीलचे नेमके काय झाले? अनघाचा पुढचा माग काय आहे? - इतर प्रश्न घेऊन ही कथा विस्तारली जाऊ शकते. आहे त्या मूळ सुराला धरूनच. त्यापलीकडे स्पेक्युलेशन न करता, म्हणजेच कल्पनाविस्तार (लेखक सुहास असल्यानं हा शब्द धाडसानंच वापरतोय, त्याच्याकडं असणारं वास्तव त्या कल्पनाविस्तारालाही झक मारायला लावेल) एका मर्यादित चौकटीत ठेवत.
लिही.
या लेखनाबद्दल बोलायचं तर... एकदा हाणावंच लागेल तुला.

{प्रच्चंड सहमत !!! शेवटच्या}

19

प्रच्चंड सहमत !!! शेवटच्या वाक्याशी तर खूपच.

{सुन्न करणारे आहे रे. पण ती}

20

सुन्न करणारे आहे रे.
पण ती मुलगी कधीच कोणाशी काही बोलली कशी नाही?
तिच्या वागण्याबाबत एखाद्या खाजगी गुप्तहेराची मदत होऊ शकली असती.
मानसोपचार तज्ञाकडून तिच्या वागण्याबाबत काही जाणून घेता आले असते.
सोडीयम पेन्टॅथॉल वगैरे वापरून खरे काय ते जाणून घेता आले असते.
या पैकी काहीच कोणी कसे केले नाही?


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

{सोडीयम पेन्टॅथॉल (ट्रुथ सेरम)}

21

अश्या परिस्थितीत कितपत उपयोगी पडेल याबाबत शंका वाटते. तोही एक अंमली पदार्थच आहे. मानसोपचार वगैरे सगळे डी-अ‍ॅडीक्शन प्रोग्रॅम मधे बहुतेकदा असतेच. पण त्यातही संमोहन वगैरे फारसे उपयोगी पडत नाही बहुतेक. ड्रग्जचे डी अ‍ॅडीक्शन म्हणजे फक्त ड्रग्ज न देणे नसते तर रक्तातली ड्रग्जची पातळी हळु हळु कमी करण्यासाठीचेही त्यात उपचार असतात. एकदम ड्रग्ज बंद करणे प्राणघातक देखिल ठरु शकते. सर्वप्रथम डी-अ‍ॅडिक्शन, मग कौंसेलिंग आणि त्यानंतर रिहॅब अशी स्टेप बाय स्टेप ट्रीटमेंट देणे श्रेयस्कर. पण ते करत असताना बहुतेकदा व्यसनीला स्वतःलाच बोलु द्यावे, जबरदस्तीने माहिती काढुन घेऊ नये असे वाटते.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{जबरा ! सुहास तुझ्या लेखनात एक}

22

जबरा !

सुहास तुझ्या लेखनात एक जबरदस्त खिळवून ठेवण्याचे सामर्थ आहे रे...

बाकी,

काही प्रश्नाची उत्तरे मिळाली असती तर चांगले झाले असते असे वाटत आहे... हास्य


Hope is a good thing...

{सर्रकन अंगावर काटा आला.....}

23

खरतर सिंहगडला जायला आवडत नाही मला. तिथे रस्त्यापासुन जवळच पण आडबाजुला असलेल्या अन जोडप्यांनी बांधलेल्या झोपड्यांमधे जे जे प्रकार चालताना पाहिलेत त्यामुळं सिंहगड म्हणलं की मला शिवराय, तानाजी वगैरे स्फूर्तीदायक आठवणी यायच्या ऐवजी आधी किळसच येते. मग तिथल्या पायगुडे वगैरे मंडळींनी चालवलेल्या सगळ्या मोहिमा समर्थनिय वाटायला लागतात्त, अगदी जोडप्यांना झालेली मारहाण पण.

एकदाच ड्रग्ज घेऊन तिला सवय लागली?

मी तज्ञ नाही पण कॉलेजमधे असताना फार्माकॉलॉजी आणि अ‍ॅनॉटॉमीची पुस्तकं वाचली होती. त्या मर्यादित ज्ञानाच्या आधारे या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक मादक द्रव्याची किंवा अंमली पदार्थाची हुकिंग कपॅसिटी (सेवन करणार्‍याला शारिरीक व मानसिक दृष्ट्या त्या द्रव्याच्या आधीन करण्याची क्षमता) वेगळी असते. अनकट रिफाईन्ड हेरॉईन (ब्राऊन शुगर नव्हे) सारख्या काही द्रव्यांची हुकिंग कपॅसिटी १ आहे. म्हणजे अशी द्रव्ये एकदाच घेतली तरी त्याचे व्यसन लागु शकते. त्या द्रव्याची रक्तातली पातळी कमी झाली की त्याचे शरीर आणी मन ओढ घेते आणि ते द्रव्य घेतले की बरे वाटते. असे करत करत मात्रा वाढत जाते. शिवाय अनेक मादक द्रव्ये किंवा अंमली पदार्थ सॉलिड, लिक्वीड, गॅस अश्या वेगवेगळ्या स्वरुपात असतात आणि त्यानुसार ती सेवन करण्याचे मार्ग वेगवेगळे असतात. हेरॉईन सारखी द्रव्ये हुंगुन किंवा टोचुन घेऊन घेतात तर एलएसडी सारखे पदार्थ हुंगणे, चाटणे या मार्गांनी सेवन करता येतात. अनेकदा सेवनाचे मार्ग व्यसनी वारंवार बदलतात, त्यामुळे कायमस्वरुपी खुणांची दृष्यता कमी होते.

सिंहगडावर गेलो नसतो तर...' असं म्हणताना सुन्याचा अजून काही संदर्भ होता का?

नसावा! बहुतेक त्याला सिंहगडला नेले अन हे सगळे झाले एव्हढेच म्हणायचे असावे. तो स्वतः व्यसनी नसावा. कथेत शेवटी कंजारभाटात, दारुच्या गुत्यावर, सहजासहजी सापडणारा सुन्या असा उल्लेख आहे. बहुतेकदा मादक द्रव्ये घेणारे लोक इतर नशा टाळतात. अंमली पदार्थ घेणारे मात्र काहीवेळा अनेक नशा करु शकतात. पण एव्हढी हुकिंग कपॅसिटी असलेला अंमली पदार्थ असेल तर ती शक्यता पण कमी वाटते.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{काळिज चिरणार वास्तव.}

24

सुहास तुझ्या लिखाणात खिळवुन ठेवायच जबरद्स्त सामर्थ्य आहे.
कथेचा(?) अंत भयंकर आहे.
पहिले काही प्रतिसादच वाचुन पुढे वाचु की नको अस झाल होत. पण रहावल नाही.
वाचुन सुन्न झालोय.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{हे प्रश्न तुम्हाला पडलेत,तेच}

25

जे प्रश्न तुम्हाला पडलेत,तेच प्रश्न मलाही गेल्या सहा वर्षांपासुन पडले आहेत्.माझ्यासमोर जे आले ते मी लिहीण्याचा यत्न केला...

..कदाचित...खाली लिहीलेला हा एक किस्सा....कदाचित तुम्हाला त्यात उत्तरे मिळतात का पहा...
सन २००८..पुण्यात एका आडबाजुला असलेल्या लॉजवर सहा वेश्या पकडल्या गेल्या...जो एजंट तिथे त्या पुरवायचा त्याच्याकडे स्कॉर्पिओ सापडली.....त्यातल्या तीन जणी खरोखरच वेश्या होत्या...ईतर तीन कुठल्या होत्या हे सांगत नाही ..पण त्यातली एक कॉलेज-गर्ल होती.....त्या तिघींना दोन दिवस स्वताविषयी धडपणे काही ही सांगत येत नव्ह्त....त्यातली एक आजही येरवड्याच्या मनोरुग्णालयात आहे......

कदाचित ...कदाचित....

मी आजही १००% शुयर नाहीये की काय झाल असावं...

{सुहास, तुझ्या}

26

सुहास, तुझ्या प्रामाणिकपणबद्दल संशय नव्हता. पण या सगळ्या घटनाक्रमात काही गोष्टी कोणाच्याच कशा लक्षात आल्या नव्हत्या हे कळत नाहीये. अजून एक प्रश्न म्हणजे, जर का त्या मुलीचा या गर्तेतील प्रवास एवढ्या पुढे गेला होता तर मग त्याला बराच कालावधीही लागला असेल. एक दोन दिवसात काही हे घडले नसेल. आणि सहसा अ‍ॅडिक्शनच्या खुणा दिसतात बर्‍यापैकी आणि लवकर. सगळंच चक्रावणारं आहे हे मात्र खरं.

{प्रातिनिधीक नाही म्हणणार मी,}

27

प्रातिनिधीक नाही म्हणणार मी, पण, बर्‍याचदा लक्षात यायला आधी लक्ष असावं लागतं..आणि वचकही !

{गुड हेवन्स!!!! हे अतिजास्त}

28

गुड हेवन्स!!!!
हे अतिजास्त भयानक आहे! हरामी साले!!!!!
सरळ मनोरुग्णालयात ठेवायची वेळ यावी? काय काय भोगलं असेल त्या पोरीनं!!!! Sad

आता असा प्रश्न पडतो , की पुर्वी ज्या अनेकांना भावी नडगीफोड कॉर्पोरेटर म्हणून तथाकथीत विचारवंत समाजानं हिणवलं, त्यांना जर पाठिंबा दिला असता तर हेच चित्र दिसलं असतं का? 'हल्ली सिंहगड म्हणलं की असलेच संदर्भ आठवतात' असं घडलं असतं का?
सगळंच जर-तर वर अवलंबुन आहे म्हणा... हास्य
असो!

{आता असा प्रश्न पडतो , की}

29

आता असा प्रश्न पडतो , की पुर्वी ज्या अनेकांना भावी नडगीफोड कॉर्पोरेटर म्हणून तथाकथीत विचारवंत समाजानं हिणवलं, त्यांना जर पाठिंबा दिला असता तर हेच चित्र दिसलं असतं का? 'हल्ली सिंहगड म्हणलं की असलेच संदर्भ आठवतात' असं घडलं असतं का?

या प्रश्नाचं वरकरणी उत्तर तरी 'नाही' असंच द्यावं लागेल. पण इथेही 'जरतर' आहेच. 'नडगीफोड कॉर्पोरेटर'गिरी ने प्रश्न काही प्रमाणात नक्की सुटला असता, पूर्ण नाही. शिवाय मोठा धोका म्हणजे, 'नडगीफोड'गिरी कुठपर्यंत न्यायची आणि कुठे थांबायचे हे भान बरेच वेळा 'नडगीफोड'गिरीच्या नादात हरवते आणि मग परिस्थिती वेगळीच होते.

सगळंच जर-तर वर अवलंबुन आहे म्हणा...

दॅट्स लाईफ.

{अलबत!}

30

म्हणुनच "सगळंच जर-तर वर अवलंबुन आहे म्हणा..." हे वाक्य वापरले.

अर्थात पोरीबाळींची अब्रु आणि अमली पदार्थांचा सुळसुळाट, की काही प्रमाणात नडगीफोडगिरीचा धोका हा एक वेगळाच प्रश्न माझ्या मनात घुमायला लागलाय.
असो!

{छान. लिह मग काही तरी दमदार...}

31

छान. लिह मग काही तरी दमदार...

{लिहु??? नको रे बाबा...पुन्हा}

32

लिहु???
नको रे बाबा...पुन्हा विचारजंती मोहोळ रिकामटेकडेपणा घालवायला भिरभिरत येईल ते बोकांडी घेऊन प्रत्येक डोळ्यांवर बांधलेल्या पट्ट्या सोडवत बसायला आता मला अजिबात वेळ नाही!

{If you cant face the}

33

If you cant face the repercussions of your convictions then please leave them.

{My}

34

My convictions?
repercussions??

हा हा हा... बरं बरं!!! अहो, माणुस असेल तर ठिक असतं, आम्ही दगडांना समजावणं सोडलंय.

बाकी, अंमळ वैयक्तिक का म्हणे?

विषयांतर होतंय, पण तरीही,
मी विचारजंतांच्या कव्हिक्शन्सबद्दल बोलत होतो, Which is tried, tested & proven wink
सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं, वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मलातरी नाही बुवा जमत. मग त्याला कन्व्हिक्शन्स म्हणत असतील तर तसे असु शकेल. हास्य

Unfortunately, when I was working on that thing, seen hell of cases & damned huge number of people who in the morning use to argue & try to paint us as social criminals , same rascals coming to us in the evening to rescue their drunk kids, or more serous, their half nude daughters/relatives arrested by the cops right there at that place.
I need no introduction to the thinking process of these so-called social statused diplomatic selfish bullshitters!

I have been left with only one feeling towards such people- Sheer Disgust! nothing else.

असो!

{हे इंग्रजीतुन कुणी लिहिलय?}

35

अगदी सहमत आहे त्या मजकुराशी. मी स्वतः ते सगळं अनुभवलय म्हणुनच म्हणतोय. असो!

पण हे सगळं समाजात नेहमीच सुरु असतं. बर्‍याचदा समाज, त्यातले काही बुद्धीवंत मीडीऑकर असतातच आणि म्हणुनच तर वेगळे मत मांडणार्‍या लोकांची गरज असते. मीडीऑकर्स ना काय घाबरायचं? फक्त आपण स्वतःच्या मतांबद्दल ठाम असलं की झालं.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{हे इंग्रजीतुन कुणी लिहिलय?}

36

अगदी सहमत आहे त्या मजकुराशी. मी स्वतः ते सगळं अनुभवलय म्हणुनच म्हणतोय. असो!

पण हे सगळं समाजात नेहमीच सुरु असतं. बर्‍याचदा समाज, त्यातले काही बुद्धीवंत मीडीऑकर असतातच आणि म्हणुनच तर वेगळे मत मांडणार्‍या लोकांची गरज असते. मीडीऑकर्स ना काय घाबरायचं? फक्त आपण स्वतःच्या मतांबद्दल ठाम असलं की झालं.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{नि:शब्द}

37

करणारं लिखाण.
अ डिफरंट वर्ल्ड अंडर अवर नोज!
खरच.

{छ्या, ही चर्चा वाचून आणखी}

38

छ्या, ही चर्चा वाचून आणखी जास्त त्रास झाला!

{जो तो ज्याच्या कर्माने मरतो}

39

जो तो ज्याच्या कर्माने मरतो असे म्हणून हा लेख वाचून सोडून देण्यात आला आहे. असो.

सुहाशा,
लिहीत रहा रे चांगलं लिहीतोस.

-पेशवे


-पुण्याचे पेशवे

{बापरे!!!}

40

बापरे!!!
Sad

{हा प्रकार जेवढा चीड आणणारा}

41

हा प्रकार जेवढा चीड आणणारा तेवढाच धोकादायक आहे. सोलापूरातील वेश्यांच्या मुलांसाठी चालवलेले संस्कारवर्ग घेताना अशा खुप जणी भेटल्या होत्या आम्हाला. कुठल्यातरी व्यसनाच्या आहारी जावून त्यासाठी लागणारा पैसा कमावण्यासाठी त्या मार्गाला लागलेल्या.
Really It's a totally different world under our nose. Sad


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{केवळ अप्रतिम लिखान.. फक्त}

42

केवळ अप्रतिम लिखान..
फक्त एवढेच देवा कडे मागतो.. की हे लिखान सत्यामधे कधीच ऊतरू नये Sad

{एक सत्य घटना }

43

गोष्ट वाचून काही वर्षांपूर्वी सिंहगडावर ट्रेकिंगला गेलेली एक तरुणी बेपत्ता झाल्याची नी कित्येक दिवस ती सापडत नसल्याची बातमी वाचल्याचं आठवतं. या बातमीनी मला काही दिवस चांगलंच अस्वस्थ केलं होतं.

{नि:शब्द झालो}

44

सुहास हेलावून टाकणारे लेखन
अनुभव की काय म्हणायचे याला?
नि:शब्द झालो... Grade


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{अप्रतिम लिखान..}

45

अप्रतिम लिखान..

{काय लिहू ह्यावर .... }

46

हेलावून सोडलत साहेब तुम्ही!!!
Grade Grade Grade


मी इथेही असतो -- साधं-सरळ