पोकळवाडीत चमत्कार (२)

0
0


"आरं बोल की मर्दा, काय आडचन हाय का?" मास्तरानं धायगुड्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं.
"आरं दोस्तांना सांगायचं न्हाई तर कुनाला रं? दोस्तच तर मदतीला येत्यात न्हवं का? क्काय?" आज्या सुतार शेवटचा क्काय भैर्‍याच्या मांडीवर थाप मारत म्हणाला..


-----------------------------------------------------------------------------------
मांडीवर थाप पडलेली पाहुन भैर्‍यानं टप्पू द्यायला हात उचलला तसं आज्या मास्तराकडं सरकुन सुरक्षित अंतरावर जाऊन बसला.
जन्या लव्हार पुन्हा धायगुड्याला ढोसत म्हणाला, "आरं आता बोल की मर्दा, का नव्या नवरीगत आढंयेढं घ्येतुयास.."
तसं बंड्यानं आधी एक उसासा टाकला आन घसा खाकरला. बोलु की नाही अशा विचारात जरा रेंगाळुन म्हणाला, "काय सांगायचं दोस्ताहो, आबाळच फाटलंया तितं कुटंकुटं शिवायचं ह्याचा इच्चार करत व्हतु"
आसं म्हणल्याबरोबर भैर्‍यानं बसल्याजागी जरा बुड सरकवुन, पाय पसरुन ऐसपैस बसुन घ्येतलं आन धोतराचा सोगा तोंडावर घेत म्हणाला, "हां..नटसम्राट, आता करा सुरु!"
"आपली शेवंता, परवाच्याला तिच्या सासुरवाडीस्नं सांगावा आला व्हता, तसं आज तिला बाळंतपनासाटी घरला घिऊन आलो. आता भैनीच्या सासुरवाडीला जायाचं म्हंजे काय रिकाम्या हातानं जाता येतं का? मंग सगळ्यांचा मानपान घ्यायला कालच तालुक्याला जाऊन आलो! काय म्हागाई तिच्यायला...ह्या मुख्यमंत्र्याच्या मायला.....हज्जारभराचा पार खुर्दा उडला गड्याहो." बंड्या तंबाखु मळत बोलता झाला.

"आरं बाबा, आता रीतभात कुनाला चुकलीय का? करावंच लागतं की त्येवडं." भुरकेमास्तरानं समजावलं.
"व्हय की जी, पर मास्तर, आपली परस्तिती काय, किती करायचं? तालुक्यास्नं येतायेता हैबत्याचा रस्त्यात पाय मुरगाळला, दारात जू उतरस्तवर बगतो तर हैबत्या-शिरमंत्या दोन्ही बैलांचं खांदं आल्यालं! आता उद्याच्याला गाडीची कायतर सोय बघाय पायजे म्हनुन फिरलो तवा धर्माप्पानं त्याची बैलं दिली आजच्यापावती, त्ये बी दिडशे रुप्पय भाडं लावुन.."
तान्याचा धर्माप्पावर जुना राग. ते करवदुन बोललं,"आयला ह्या धर्म्याच्या! सुक्कळीचं, कुनाच्या मयताला बी फुकटात चार पावलं टाकाया यायचं न्हाई!"
"तु गप रं तान्या, आरं बंड्या आता मुद्द्याव येतु का दिऊ दोन दनकं तुला?" भैर्‍या आता कावला!
"आन काय रं, तिकडं काय कोन वाकडंवंगाळ बोललं का तुला? सांग फकस्त, आपुन येकेकाला धोबीपछाडच टाकु बग."
"आरं नाय रं भैरुआन्ना, तसं काय न्हाय. मानसं चांगली हायती ती. मला काव आलाय त्यो दुसर्‍याच कारनान! मास्तर, पान बगु जरा." बंड्या समजावत म्हणाला.

"आज दुपारच्याला शेवंताला घरला घिऊन आल्याधरनं आमच्या म्हातारीचं डोस्कं पुन्यांदा भरमाटलंय. येताजाता शेवंतीचं कौतिक चालु है, आसु द्या, त्याचं न्हाई काय, पर आमच्या कारभारनीला टोमनं सुरु झाल्यात परत. सारकं आपलं शेवंताची आत्याबाय नशिबाची गं बाय! मांडीवर नातवंडं ख्येळवनार...आमी तसंच सरनावर चडनार का काय रं द्येवा.. आसलं कायबाय घालुनपाडुन बोलतीया.. कारभारीन आदीच निम्मी झालीया, त्यात म्हातारीची किरकीर सुरु! निस्ता काव आला पघा!"
"च्च..च्च.." मान हालवत रामा जाधवानं पाराखाली पिचकारी मारत सहानुभुती दाखवली.
मास्तर म्हणाला,"आरं पन तुला तालुक्याच्या डागदराचं नाव सांगिटलं व्हतं ना? येक डाव वैनीला दाखवुन घ्ये की त्याच्याकडं!"
"आवो मास्तर, जायाचं तर हैच्च की. पर हात कसं बांदलंयत पघताय न्हवं? सत्रा ठिकाणास्नं खर्चाला त्वांड फुटतंय, एक गिन्नी बी र्‍हाईना गाठीला!" धायगुडा करवदला.
"आता पघा, ह्ये मानपानातच हजारभर रुप्पय उडलं. आजुन शेवंतीच्या बाळंतपनाला दोन म्हैनं हैत, तवर तिचं आवशदपानी, फळफळावळ बघाया पायजे. कालच तालुक्याला सर्कारी दवाखान्यात तिचं नाव टाकुन आलो, तितंबी काय कमी दमड्या लागत्यात का? नाव सर्कारी आन थाट झागिरदारी!"
"आरारारा..व्हईल रं..कायतर जुळणी व्हईल..तु नगं चिंता करु." जन्या समजावणीच्या सुरात बोलला.

पुन्हा बंड्या थोडावेळ घुटमळला..परत एकदा कान खाजवत जरा विचार केला आन म्हणाला,
"शेवंताचं बाळंतपन हुईल..त्याची कायतरी तजवीज लागलच. नायतर दोन शेरडं इकुन टाकू ढेकुळगावच्या बाजारात. त्याचं न्हाई काय! कारभारनीलाच जरा डागदरकडं दाखवायचं म्हंतोय, कुटं पाश्शेची जुळणी व्हईल का मंडळी?"
पैशाचा विषय निघाला तशी मंडळी दचकली. जन्या खाली खेळणार्‍या पोरावर वसकला, "भाड्या, मला बलवायला आलास आन हितंच खेळतुयास व्हय? तिकडं भाकर गार आन तुजी म्हातारी पेटली आसंल की! चल उठ.. येतो मंडळी, भेटु निवांत!..चल रं बंड्या, येतो. हुईल हुईल..कायतरी जुळणी हुईलच.. घाबरु नगंस." असं म्हणुन पटकुरं झटकुन जन्या निघालाच.
तान्या म्हणाला, "आयला धायगुड्या, म्याच भावाच्या जीवाव टुकडं मोडतुया, नायतर दोस्तासाठी आपली जान बी हजर हाय बग. दुसरी काय मदत लागली तर सांग दादा, आपुन हाय."

एकेक करत सगळेचजण कारणं देत सटकले. शेवटी भुरकेमास्तर उरले. "कसंय धायगुड्या, पाचपन्नास आसलं तर काय न्हाई, पन शेपाश्शेची बात जरा आवघडच की रं! वाईट नगं वाटुन घिऊ, पन आपल्यात काय कोन सावकार न्हाई. बग काय कुटं जमतंय का ते. धर्माप्पाला इचारलास का?" मास्तरांनी सुचवणी केली.
"चॅक्क! त्यो न्हाई देत. शेतीचा टुकडा लिव्हुन मागतो चारचव्वल मागिटले तरी." धायगुडे हताशपणे म्हणाला.
"जाव द्या! हुईल काय व्हायचं त्ये. काडतो कायतरी युगत." असं म्हणुन तो परत कान खाजवत सुन्नपणे बसला.

-------------------------------------------
क्रमशः

हम्म्म!!!

1

हम्म्म!!!

मग? पुढे? धमोबा पोकळे, पुढचे

2

मग? पुढे?

धमोबा पोकळे, पुढचे भाग पटापट टाका.

पुढे ??????????????????

3

पुढे ??????????????????

ओक्के

4

ओक्के

हास्य

अजून क्रमशः आहेच का????

5

लिही पटापट पुढे...

जबरा लिहीलंय रे धम्या ... मजा

6

जबरा लिहीलंय रे धम्या ... मजा येते अशी भाषा वाचतांना हास्य

वाचतोय, मालक. येऊ द्या पुढचे

7

वाचतोय, मालक. येऊ द्या पुढचे भाग.

ह्येच म्हंतो म्या बी!

8

ह्येच म्हंतो म्या बी!


-Nile

भारी लिहितोयस रे. बाज जबरी

9

भारी लिहितोयस रे.
बाज जबरी पकडलाय. हास्य

वाचतोय...

10

वाचतोय...

हंग्ग्गाशी

11

धमाल राव लै भारी लिवतायसा की आं?
ही बी कला हाय म्हणायची अंगामदी. असु द्या,असु द्या. असच लिवत -हावा. खर कालच्यागत शेवटाला क्रमसा हाय की समाप्ती लिवाया इसरु नगासा.


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

पुढचा भाग लवकर लिही ना

12

पुढचा भाग लवकर लिही ना


-निखिल

छान लिहिलय....

13

जमलाय हा पण भाग. गाव कुणीकडचं आहे. सहसा गावातले लोक अश्या वेळी जेव्हढी शक्य आहे तेव्हढी मदत करतात. पश्चिम महाराष्ट्रात, जिथे नकदी पिके होतात, तिथे तर नक्कीच. पण कथेतल्याप्रमाणे परिस्थिती उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणात असणे शक्य वाटते.

एव्हढी विचारजंती वटवट बास! पण एकुणच धम्या छान लिहितो आहेस. असाच लिहित रहा. पुन्हा लिहिता झाल्याबद्दल वाटल्यास पार्टी देतो.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

लै भारी गड्या.... एकदम

14

लै भारी गड्या.... एकदम गावाकडच्या पार दिसत आहे... जसे सगळे माझ्या नजरे समोर घडत आहे असे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

कसलं भारी लिवलंस रे

15

ढम्या, कसलं भारी लिवलंस रे. ग्रामीण बाज पक्का आलाय. मिरासदार किंवा शंकर पाटील वाचतोय असं वाटतोय. (ही कॉम्प्लिमेंट समज.) बाकी पुढचे भाग कधी टाकतोयस बाबा.

मिरासदार किंवा शंकर पाटील

16

मिरासदार किंवा शंकर पाटील वाचतोय असं वाटतोय. (ही कॉम्प्लिमेंट समज.)
सहमत.
धम्या पटापटा टाक म्होरचे भाग... निसताच दाढंखाली तंबाखू ओलावत बसल्यावाणी उगी र्‍हाउ नगो.

लै भारी रे गड्या....म्होर्ला

17

लै भारी रे गड्या....म्होर्ला भाग कंदी??

लै भारी ...

18

लै भारी दोस्ता ....
पुढचा भाग लौकर टाक ... लै वाट बघायला लावू नगसं ..

मस्त लिहिलय रे

19

झकास..

हा हा हा. मस्तं लिहीलं आहेस

20

हा हा हा. मस्तं लिहीलं आहेस रे गड्या. आवडलं. आता शिकार करायला कधी जायचं बोला ?


-पुण्याचे पेशवे

आईशप्पथ !! मस्तच रे ! पुढचा

21

आईशप्पथ !! मस्तच रे !

पुढचा भाग ???????????????????????????????????????????????

पुढचा भाग कधी ???? का त्या ची

22

पुढचा भाग कधी ????

का त्या ची पण शिकार होऊन अंत झाला व शेवटी माती ???


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हा हा हा ध्मु जबरा. अरे इतक

23

हा हा हा ध्मु जबरा.
अरे इतक छान लिहितिस तर मग ब्रेक काहुन घेतो रे भावा.
साठाषण्मासी कधी तरी लिहितोस.
नेहमी लिहिता रहा.
आणि हो तो पुढचा भाग लवकर टाक. त्या भिकार*ट राजपुत्राने डोक्याला शॉट लवुन ठेवलेत.
तुझा खुसखुशीत लेखच त्यावर उतारा ठरेल मझ्यासाठी तरी.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?

24

पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?

पु ढ चा भा ग क धी ? ? ? ? पु

25

पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?
पु ढ चा भा ग क धी ? ? ? ?

पुढचा भाग लवकर लिहा ना

26

पुढचा भाग लवकर लिहा ना प्लिज.

तिजी भणं पडलं कड्यावनं.....

27

तिजी भणं पडलं कड्यावनं.....

ल्हि की बिगी बिगी......


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

च्या मारी..

28

आरं वर दिसल म्ह्नून शान बघिटलं तर जुनाच हाय की ...पुढचा भाग टाक की बिगी बिगी ...

व्हय जी! टाकतु की!! वाईच

29

व्हय जी! टाकतु की!!
वाईच गरीबाला जरा आजुन मुदत द्या सरकार. औंदाच्या टैमाला डेटाबेसची भांगलनी लै चाल्लीया...कामातनं डोस्कंच वर काडाय मिळंना मायबाप हो!!

हंग्ग्गाशी काय भो बोळा निघाला

30

हंग्ग्गाशी
काय भो बोळा निघाला म्हणायचा

हा प्रतिसाद ...जस्ट फॉर अ

31

हा प्रतिसाद ...जस्ट फॉर अ रिमाईंडर !! हास्य

चला मी पण शिकार करायला शिकलो तर

पुल्डा भाग कवा देनार रं?

32

पुल्डा भाग कवा देनार रं?



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मस्त

33

पुढचा भाग येऊदेत लवकर.

लिहायला ईतका विलंब का लागावा

34

लिहायला ईतका विलंब का लागावा ? प्रतिक्षेलाही सीमा असते

सध्या 'माऊस सिंड्रोम'ग्रस्त

35

सध्या 'माऊस सिंड्रोम'ग्रस्त आहोत. डावा हात गुंडाळुन ठेवलाय शेठ Sad

का? फार चुळबुळ करत होता का?

36

का? फार चुळबुळ करत होता का? ... माऊस?

गप्राऽऽव!!!

37

दोन दिवस झाले क्रेप बँडेजमध्ये हात नुसता आवळलाय! एका हातानं मराठीत टायपायला किती कष्ट पडतात, तुम्हाला नाय समजायचं Sad

तरी तुला नेहमी सांगतो, नको

38

तरी तुला नेहमी सांगतो, नको तिथे.... जाऊ दे... चार लोकात नको. आलो की भेट.

चार लोकांत नकोच! द्मु, तू

39

चार लोकांत नकोच! द्मु, तू चुचुवाणीत लिही ना मग!

वोक्के!

40

तुमी अनुभवी मान्सं...चार पावसाळे जास पाह्यल्याले...द्या कायतरी सल्ला

आधी ल्ह्यून मग उनिकोदात

41

आधी ल्ह्यून मग उनिकोदात परावर्तित करून घे. wink


-पुण्याचे पेशवे

धमु

42

धमु तू माऊस डाव्या हातानं वापरतोस? हास्य

माऊस नाय हो....टंकुन टंकुन

43

माऊस नाय हो....टंकुन टंकुन झालंय म्हणे तसं! मराठीत टंकायचं म्हणजे सारखं शिफ्ट्+अक्षर...हात उलटेसुलटे कसेही ठेवले जातात...डॉक्टर म्हणतो पंधरा दिवस काँप्युटरला हातच नको लाऊ...आता आमचं गरीबाचं पोटच त्याच्यावर तर ह्ये आसं कसं करुन चालंल?

ओक्के

44

ओक्के. काळजी घ्या...

छान गप्पा आवडला

45

छान गप्पा आवडला


-निखिल

धमु एक शंका, माउस उजव्या

46

धमु एक शंका, माउस उजव्या हाताने वापरतोस, मग माउस सिंड्रोम डाव्या हाताला कसा काय thinking

प्लि़ज ! तुम्ही नको त्या

47

प्लि़ज !

तुम्ही नको त्या कुशंका नका हो विचारु बिचार्‍या धमुला wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

शिफ्टींग पेन

48

असेल. (संदर्भः असित सेन 'आनंद' मध्ये). आज डावीकडे उद्या उजवीकडे. काय धमालसेन?

मस्त.

49

तुमच्या गप्पा टप्पा जाम आवडल्यात बघा.


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

पुढे ???

50

पुढे ???

पुढच्या भागाची शिकार झाली का?

51

पुढच्या भागाची शिकार झाली का?

हेच विचारतो

52

हेच विचारतो

जोवर पुढचा भाग लिहीत नाही

53

जोवर पुढचा भाग लिहीत नाही तोवर हा भाग दुसर्‍या पानावर जाणार नाही...

धमु,

54

तू याचे अर्धवट धागे वर काढ. मिपावर त्याचे अर्धे धागे आहेतच!!!

+ १ सहमत आहे.

55

+ १

सहमत आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सहमत आहे. >> कशाशी सहमत

56

सहमत आहे. >>

कशाशी सहमत आहे

लफडा अनलिमीटेडशी की नोंदीशी

तुम्हां दोघांशी पळा पळा....

57

तुम्हां दोघांशी wink

पळा पळा....


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

धागा वर रहावा म्हणून.

58

धागा वर रहावा म्हणून.

धागा वर रहावा म्हणून.

59

धागा वर रहावा म्हणून.

काय भारी लिहिले आहे

60

काय भारी लिहिले आहे ना!!!!
जाम आवडले... मी फॅन झालो तुमचा...

कॄपया २ मिनीटे शांत रहा. आपण

61

कॄपया २ मिनीटे शांत रहा. आपण या कथेसही श्रद्धांजलि वाहू.


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

धागा वर रहावा म्हणून.

62

धागा वर रहावा म्हणून.

धागा वर रहावा म्हणून.

63

धागा वर रहावा म्हणून.


-निखिल

हो ना

64

धागा वर रहावा म्हणून....

अर्रे

65

अर्रे होऽऽऽऽ................

लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...लिहितो...

जरा कामाच्या गडबडीतुन सवड तरी मिळु द्या!

अनिस

66

अनिसला बोलव रे राम्या. चमत्कार दावनार म्हनतोय हा बुवा, पन आजून काय दावीना रं. काय पाच लाकाचं बक्शीस झाईर केलंय त्ये पायजे असंल बुवाला तर अनिसला म्हनाव पैका दावा नि मंग बुवा चमत्कार दावंल.

चुकून हा नजरे आड होत होता

67

चुकून हा नजरे आड होत होता म्हणून.... बाकी काही नाही... चालू दे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."