र्‍हदयी वसंत फुलताना

0
0

खरे तर वसंत यायला अजून पुष्कळ अवकाश आहे.
त्यावेळे असते तशी फळांची रेलचेल इतर कोणत्याच काळात नसते
हिरव्या पट्ट्याची पण आतून लालभडक असणी कलिंगडे.
मस्त मखमली बसंती/अबोली रंगाची खरबूजे
फिक्कट पिवळ्या रंगाचे अननसाचे काप
हिरव्या गार कैर्‍या
काल एके ठीकाणी फळांची रास पाहिली.
नीट रचून ठेवलेली. रंगीत फळे होते.
धम्मक केशरी रंगाची संत्री
पिवळी जर्द केळी
फिकट गुलाबी लालसर सफरचंदे
लालभडक सफरचंदे
हिरवी टप्पोरी द्राक्षे
फिक्के पोपटी आवळे
मातकट चिक्कू
लालभडक डाळिंबे
जणू काही जमिनीवर असलेले इंद्रधनुष्यच होते.
फळांचा आस्वाद जीव्हेने घेण्यागोदर तो डोळ्यानी घेतला जातो.
तो आस्वाद घेताना डोळे निवत नाहीत तर तोंडाला पाणी आणतात. पोटातला वडवानल पेटवतात.पंचेंद्रीये जागवतात
ही न्यारी किमया आपोआप घडते. कोणी ठरवून करायची म्हंटली तरी करता येणार नाही.

एखाद्या रमणीची बोटे चवळी सारखी नाजूक असतात.
हात काकडी सारखे नितळ असतात.
ओठ संत्र्याच्या फोडी सारखे असतात
गाल सफरचंदासारखे गुलाबी असतात
डोळे बदामासारखे असतात.
स्वभाव तेज तर्रार मिर्ची सारखा असतो.
कुंदकळ्या सारख्या दंतपंक्ती असतात.

त्या रमणीचे हे सारे गुण प्रेमात पडल्यावर जास्त जाणवतात.
म्हणूनच की काय कोण जाणे प्रेमात पडण्याला र्‍हदयी वसंत फुलणे म्हणत असावेत.

विजुभौ, एकदम मस्त ललित

विजुभौ, एकदम मस्त ललित बरका.

शेवटचा परिच्छेद तर मस्तच.

>>>"म्हणूनच की काय कोण जाणे प्रेमात पडण्याला र्‍हदयी वसंत फुलणे म्हणत असावेत."

माणूस म्हणजे काय हो, निसर्गातील एक फळच ना. मग तो ही योग्य वेळ आल्यावरच फुलतो. आपण त्याला प्रेम म्हणतो इतकेच.

अवांतर: आजकाल फळे घेणेही परवडणारे नाहीत. बघूनच आनंद घ्यायचा.




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

छान

छान

खरोखर सुंदर विजुभाऊ !

खरोखर सुंदर विजुभाऊ !



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

+१ सहमत

+१ सहमत



-निखिल

र‍हदयी वसंत फुलताना >> बोंबला

र‍हदयी वसंत फुलताना >>

बोंबला ! चुकुन " रहदारी वसंत फुलताना " वाचले आणि ठ्या करुन फुटलो ना वसंतभाऊ Laughing out loud ..आपल हे विजु भौ Laughing out loud ..आणि वाचल्या आज सकाळीच रस्त्यावर टेरिफिक रुपी फुललेला वसंत आठवला की wink

आवडलं.

आवडलं.

ओ विजुभाऊ! आंब्याचा मोसम

ओ विजुभाऊ! आंब्याचा मोसम येतोय हां!!!!
जरा धीर धरा!!!!
हास्य

घ्या केळी

वाचताना माझा मुंगेरीलाला झाला. सगळी फळ अ‍ॅनिमेशन केल्या प्रमाणे डोळ्यापुढे तरळत होती. आगदी चित्रमय लिखाण. लै झ्याक ;-)
फलाहार प्रेमी
जयफळ
आवडती फळे= अंजिर केळे

__________________________________________________________________
मु.पो.बेडग,ता.मिरज्,जि.सांगली. सध्या वास्तव्य ठाणे



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

आवडलं.

मस्त.... लेखन!

वाह!! विजुभौ लैझ्याक

वाह!! विजुभौ लैझ्याक लिव्हलय..



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

लेख आत्ता बारकाईने वाचला.

लेख आत्ता बारकाईने वाचला. बरीच कमतरता आहे यात.
विचारा. सांगतो.




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

व्वा !!

व्वा !! wink

फळांचा ष्टाल इकडे लावला वाटतं ह्या वर्षी?

(बेदाणेप्रेमी)चतुरंग

विमान मिल्की-वेच्या बाहेरुन

विमान मिल्की-वेच्या बाहेरुन गेले !!!

र्‍हदयी की हृदयी ?

र्‍हदयी की हृदयी ?

हा हा हा राम राम काय आणि मरा

हा हा हा

राम राम काय आणि मरा मरा काय..... तसेच आहे हे wink

छान...

छान...