चार वेगवेगळे अभंग प्रस्तुत केले आहेत.
१. मराठीच्या सद्य स्थितीस उद्विग्न होवून
असे कोण पातक मायमराठीचिये भाळी, विंग्रजीचे कवतिक वर्णति पोरी बाळी ।
निल्या म्हणे ऐशा घातकी असाळी, हाणावि फोके काढूनियातें उंबळी॥
२. उद्बोधक
स्वयेचि साधावा आपणा उद्धारु
न येई दुजा कोणी येई न ज्या आकळु।
करी दिवा रंजने गुंजने जो स्वप्नाळु
जाणोनि यत्न न करि उपजे तो जरत्कारु
निल्याम्हणे उघडावी लोचने अळुमाळु
दृढमुष्टिने फिरवावा जीविताचा पाळु ||
३. उद्बोधक
वेंगाडती जग करी दुसवास, संबोधिती मूढ मूढांमाजी ।
शांतचित्ते नरे ठेवावा विसवास, ध्यान ध्येय ध्यास त्रिपुटीमाजी ।
निल्याम्हणे औक्षांतें करी जस वास, राखिता बळ मुष्टिमाजी ॥
४. ललित
निल्या म्हणे होता वाद जायेशी
घ्या नमते नका पडू तोंडघशी ।
असे सत्य तव वचनी फरक पडूते तेणे काही
वादें स्त्रियांते जिंकिला ऐसा नर होणे नाही ।।
{खल्लास !! शॊल्लेट रे भाऊ}
खल्लास !!
शॊल्लेट रे भाऊ
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{वाह वाह...मस्तच}
वाह वाह...मस्तच
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{जबरा रे..}
जबरा रे..
Hope is a good thing...
{धन्यवाद}
विशाल,
सुहास,
राजे
प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे.
{व्वा.}
व्वा.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.