आज नेहमी प्रमाणे एक प्रश्न माझ्या मनात रेंगाळत आहेच... कुठे जायचे.... खरे तर ह्या प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाहिये कारण निरर्थक भटकायचे म्हणूनच मी घरातून निघालेए??? आता मला खरंच कळत नाहिए का घराबाहेर पडले आहे???.... असे काय घडले आहे आज??? "आज"... आताश्या तर हे रोजचेच झाले आहे, कंटाळा आला आहे ह्या जगाचा... वाटते सगळे संपवावे!!! पण त्यातून काय हशील होणार??? का मी हे जीवन संपवावे??? त्यातून मला काय मिळणार??? त्रासातून सुटका होईल... बरे ज्यांचा कडून त्रास दिला जातोय ते कोण आहेत तर माझे सगेसोयरे... का हे लोक मला समजावून घेऊ शकत नाहीत...
लग्नाचे वय ओलांडले तरी माझे लग्न जमत नाही ह्यात माझा खरे तर काय दोष???? पण हे कोणीही समजावून घेत नाही... समाजात लग्न न करिता राहणे हे स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या मुलीला एवढे अवघड आहे का??? आज मी नवऱ्या नावाच्या प्राण्याशिवाय जगू शकते हा विश्वास नक्कीच माझ्या मध्ये आहे. पण घरचे.. त्यांनी हे समजावून घ्यायला नको का??? आईने कष्ट करत सौंसाराचा डोलारा सांभाळला... तीच्या कष्टामुळेच आज मी शिकून मोठी झाले आहे... जे काही आहे ते फक्त आणि फक्त तीच्याच मुळे.... पण आजकाल तीही विचित्र वागायला लागलेली आहे.... दिवसातून ४ वेळा फोन करून विचारते त्या मंत्राचा जप केलास का??? मंत्र कोणी दिला तिला हा??? आणि का सांगितले की ह्या मंत्राच्या पठणाने माझे लग्न जमणार आहे???? सगळे सांगतात लग्न जमण्यासाठी पोरीच्या जातीने थोडे तरी ऍडजस्ट करायला पाहिजे!!!! आहो पण किती??? आणि काय काय म्हणून??? माझ्या पेक्षा वयाने मोठा असलेला मुलगा जेव्हा तोंड वर करून मला विचारतो माझे लग्न का झाले नाही अजून??? अरे तो तर माझ्या पेक्षा वयाने पाच दहा वर्ष मोठा आहे??? त्याचे का नाही जमले लग्न??? त्याचा का कोणी असे हात धुऊन मागत नाही???? कॉंम्प्रमाईज करायचे पण किती आपल्या पेक्षा अर्ध्या पगाराच्या माणसाशी मी का म्हणून लग्न करायचे??? हे असेच ह्या समोरून येणाऱ्या रहदारी मध्ये चालत जावे आणि सगळे संपवावे....
खरेच इतके कठीण आहे का मला समजावून घेणे... माझ्या अपेक्षा फार माफक होत्या... सुरवातीला ह्या सगळ्या प्रकाराला मी पण न कंटाळता पुढे जात होतेच... एक नवरा नावाचा हक्काचा खांदा मिळावा हे माझे पण स्वप्न होतेच ना... इतर मुलींसारखे मी पण ती कांदेपोह्यांची प्लेट थरथरत्या हाताने पाहुण्यांना दिलेली आहे.... पण जसे जसे आयुष्य पुढे सरकत गेले तसे माझे मन ह्या गोष्टीतून उठत गेले.... कशासाठी दरवेळेस एका नवीन मुलासमोर नटून थटून उभे राहावे???? बरे ते करायची तयारी ठेवली तरी समाज शांत बसू देतो का??? घरचे तर चिंते पोटी बोलतात..... पण ज्यांचा काही संमंध नाही असे लोक पण लग्न का होत नाही ह्याचा जाब मला विचारतात... ऑफिसात.. मैत्रिणीचा घरी... गल्लीत... नातेवाईकांमधे नेहमी एकच प्रश्न लग्न कधी करणार???? एकदाचे मोकळे व्हावे ह्यातून... कुणीच नाहिए का ह्या जगात माझे जे मला समजावून घेईल??? माझ्या मैत्रिणी सुद्धा मला ह्यांवरून छेडतात... काहींना खरी चिंता तर काहींचा ढोंगी पणा.... शेवटी आता चालताना लक्षात येत आहे ती एकच गोष्ट
"My shadow is the only thing that wals beside me
my shallo hearts is the only thing thats beating"
कुठवर चालत आलेली आहे मी..... किती वेळ झाला असेल??? का चालत आहोत आपण??? जीव देण्याची हिंमत आहे का आपल्यात??? खरे तर जीव देणे हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही हे मान्य पण ह्या संधिप्रकाशातून मी अंधकाराकडे जात आहे पण... हे काय होतंय... माझ्या आजूबाजूला एवढी गाड्यांची गर्दी का आहे??? अरे बापरे!!! मी रस्त्याच्या मधून चालतेय!!!! आणि हे लाइट्स कसले??? ती बस माझ्या कडे का झेपावत आहे... आईssss!!!!... हे काय होत आहे??? कोण मला खेचते आहे??? कोण हा मुलगा?? माझ्या डोळ्या पुढे अंधारी का येत आहे??? ....
(एकविसाव्या शतकात सुद्धा परिस्थिती फारशी बदललेली नाहिए.... अश्या घटना बरेच वेळा घडतात. )
हम्म!!! वाईट. लिहिलंय छान.
हम्म!!! वाईट. लिहिलंय छान.
छोटस प्रकटन लिहिलयस, पण लग्न
छोटस प्रकटन लिहिलयस, पण लग्न न जुळलेल्या मुलीच्या मनातला भावनांचा कल्लोळ समर्थपणे मांडलायस.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
परिस्थिती वाईट्च आहे...
काही दिवसांपूर्वी क्रॉसवर्डस मध्ये गेले होते.. तेव्हा एक पुस्तक दिसलं.. "Marrying Anita". परदेशात, बहुधा अमेरिकेत राहणारी एक मुलगी, अनिता. उच्चशिक्षित, उत्तम नोकरी. तिथल्या कुठल्या मुलाशी लग्न न ठरल्याने आईबाबा तिला २-३ महिन्यांसाठी भारतात घेऊन आले.. ते तिचे लग्न काहीही करून लावून द्यायचेच म्हणून.... तिने अमेरिकेतल्या डेटिंग कम पाहण्याचे कार्यक्रम नि भारतातले त्यापलीकडचे आलेले अनुभव या पार्श्वभूमीवर हे पुस्तक लिहिलेय.... एकूण काय... भारत असो वा काहीही.. परिस्थिती तितकीशी बदलेली नाही!!!! अजूनही लोकांना लग्न हीच आयुष्याची एकमेव इतिकर्तव्यता वाटते...
>>>>पण लग्न न जुळलेल्या मुलीच्या मनातला भावनांचा कल्लोळ समर्थपणे मांडलायस.
याबद्दल गणपाशी सहमत....
बरेच काही संदर्भ ह्या
बरेच काही संदर्भ ह्या स्फुटाच्या संदर्भाने घोळताहेत! तुर्त तरी त्यांना शब्दात उतरवता येत नाहीये...
निख्या, चांगलं लिहिलंयस रे...अंगावर येतंय अगदी!
छान लिहिलय.....
लग्न ठरत नाहीये म्हणुन घरच्यांकडुन चिंता व्यक्त होणं, त्यातुन येणारं दडपण, परक्यांच्या विचारणांमुळं होणारा मनस्ताप वगैरे सुंदर व्यक्त होतं. पण अजुन एक बाजु आहे विचार करण्याची - एकटेपणा. ओळखीचे, नातेवाईक सगळे लग्न करतात, संसारात गुंततात अन सिंगल रहाणार्या लोकांना सामाजिक, कौटुंबिक आयुष्यात चर्चाविषयांपासुन अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागत असाव. एका मर्यादेपर्यंत कौटुंबिक बाबी बोलण्यात रस रहातो अन नंतर सगळाच लोचा होत जातो. समोर माणुस असुनही काय बोलायचं असा प्रश्न पडतो. शाळा-कॉलेजमधला मित्र भेटतो अन थोडावेळ जुन्या आठवणी, थोडी काय चाललय अशी चौकशी केल्यावर मग बायको, मुलं वगैरे विषय अपरिहार्यपणे निघतात. तेव्हा सिंगल लोक एकदम ब्लँक होतात. अनेकदा त्यांना मित्राच्या सांसारिक आयुष्यात फारसा रस नसतो पण ऐकत बसावं लागतं.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
पण अजुन एक बाजु आहे विचार
पण अजुन एक बाजु आहे विचार करण्याची - एकटेपणा.
अगदी योग्य मुद्दा...
एकटेपणा जाणवण्याची शक्यता खुप जास्त असते...
आणी त्या नंतर येणारी परिस्थीती अधिक भयावह असु शकते...
पण कुणाच्या आयुष्यात कधी कुणाचा आधार मिळेल हे पण सांगता येवु शकत नाहि..
काही अविवाहीत स्त्रियांना दत्तक मुल घेउन वाढवताना पाहिलेले आहे.
साधारण एक वय असते तो पर्यंत लोक बोलतात... अगदी "लग्न नाही केलेस तर नरकात जाणार" किंवा " तुझे लग्न होत नसताना तुझ्या आई बाबांना झोप कशी लागते??" असे प्रश्न किंवा उलेख्ख जेव्हा जाहीरपणे वारंवार होतात तेव्हा मनात साहजीकच लग्नसंस्थे बद्दल एक अढी निर्माण होते आणी मग त्यातुनच लग्न न करण्याचा निर्णय घेतला/लादला जातो. वरच्या उदाहरणातुन मला समाजात आजही "लग्न नाही केलेस तर नरकात जाणार" ह्या विचारांचे लोक वावरतात हे अधोरेखीत करायचे आहे. हे उदाहरण मी माझ्या डोळ्यासमोर पाहिलेले आहे... प्रत्येक वेळेस लग्न जमणे त्या मुलीच्या हातात असते असे नक्कीच नाहिए...पण समाजातील ही प्रवृत्तीच बर्याचअंशी लोकांना ह्या एकटेपणा कडे ढकलते असे मला तरी वाटते.
-निखिल
!!!!
!!!!
चांगल लिहिलं आहेस.
चांगल लिहिलं आहेस.
ह्म्म्म्म्म निखोबा उत्तम
ह्म्म्म्म्म निखोबा उत्तम लिखाण हो !
छान लिहिलं आहेस रे..
घच्यांची चिंता, स्वतःला होणारा मनस्ताप व्यवस्थित मांडला आहेस ...
लेखाचा शेवट तर वाईट
शेवट वाईटच आहे असे नाही वाटत...
त्या मुलीकडे बस झेपावतेय.. पण त्याच वेळी त्या अपघातातून तिला कुणीतरी वाचवत आहे.. नि तो मुलगा आहे असे दिसतेय, तर नाहीतरी ही कथाच आहे, तो तिच्या परीकथेतला राजकुमारही असू शकतो... थिंक पॉझिटिव्ह हो!!!!!
+१
सहमत आहे.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
बाप रे... मस्त लिहले आहेस
बाप रे...
मस्त लिहले आहेस रे....
भावना एकदम व्यवस्थीत व्यक्त झाल्या आहेत...
चांगलं लिहिलंयस रे...........
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
..........................
..........................
गंभीर समस्या.
पूर्वापार चालत आलेली गंभीर समस्या नेमक्या शब्दात मांडलेय.
जिओ निखिलशेठ.
कॉंम्प्रमाईज करायचे पण किती
कॉंम्प्रमाईज करायचे पण किती आपल्या पेक्षा अर्ध्या पगाराच्या माणसाशी मी का म्हणून लग्न करायचे???
पगार येवढेच मोजमाप आहे का कर्तृत्वाचे? मग वसंतराव देशपांडेंसारखे गायक आयुष्य उपेक्षेत आणि गरीबित काढतात ते नालायक का? एखादा मुलगा मुलगी जास्त पगारवाली असेल आणि म्हणून पडती बाजू घेऊन लग्नाला तयार असेल तर तरी तो नालायक?
एकविसाव्या शतकात सुद्धा परिस्थिती फारशी बदललेली नाहिए.... अश्या घटना बरेच वेळा घडतात
लग्नं बिग्नं करणं हा समाजाचा एक अलिखीत नियम आहे. खरेतर या लग्नं न झालेल्या व्यक्ती स्वाभिमानाने राहणार असतील तर चांगलंच आहे. पण प्रश्ण येतो तो नंतरचा अशा लोकांच्या विक्षीप्त वागण्याचा. मग नंतर भावना कंट्रोल होत नाहीत म्हणून काहीबाही करण्यापेक्षा लग्नं करणे चांगले नाही का? एकविसावे शतक आले म्हणून नैसर्गिक भावना उत्तेजित होणे बंद झाले का? मग उगाच या वाक्याना काय अर्थ आहे. असो.
-पुण्याचे पेशवे
you got me completely wrong!!!
माझा लेख लिहिण्याचा उद्देश पूर्णतः असफल झाला... वरती चित्रित केलीली जी कुणी मुलगी आहे, ती लग्न न करण्याच्या निर्णयाप्रत स्वतः बाय चॉईस आलेली नसून हा निर्णय समाजातल्या एका विशिष्ट प्रकारच्या प्रवृतीमुळे लादला गेला आहे.... वय उलटून गेले तरी लग्न जमले नाही, यात पूर्णतः दोष मुलीचाच असतो का?
आणि जनसामान्यांसाठी आजतरी पगार/ मिळकत ही एखाद्याच्या कर्तुत्वाच्या मोजमापाची पट्टी समजली जाते.. असो.. मुद्दा पगाराचा/कर्तुत्वाचा नाही... पण लग्न जमत नाही म्हणून समोर उभ्या केलेल्या कुणाशीही लग्न कर ही अपेक्षा बाळगणार्या प्रवृत्तीचा आहे.... या मुलीवर ही अगतिकता का आली हे दाखवण्याचा माझा प्रयत्न फसला....
राहता राहिला दुसरा मुद्दा..
पण प्रश्ण येतो तो नंतरचा अशा लोकांच्या विक्षीप्त वागण्याचा.
लग्न न करता एकटे राहण्याचा प्रश्न वरती पुणेरींनी योग्य मांडला आहे.. आता एकटेपणातून विक्षिप्तपणा कदाचित उद्भवू शकतो, पण आजवर पाहाण्यात आलेल्या काही अविवाहित स्त्रिया पाहाता, त्याचे प्रमाण कमीच आहे... विकृत क्रियांबद्दल तुम्ही जे काही म्हणाला आहात.. त्यात मला असे म्हणायचे आहे... की सर्वसाधारणपणे स्त्रिया असे मार्ग चोखाळत नाहीत अथवा माड्याही चढायला जातात असे वाचल्याचे तरी स्मरत नाही.... फार फार तर स्वतःला त्रास करून घेतील नाहीतर एखाद्या माणसाबरोबर अफेअर करतील..
>>एकविसावे शतक आले म्हणून नैसर्गिक भावना उत्तेजित होणे बंद झाले का?
एकविसाव्या शतकात देखील लग्न हे फक्त नैसर्गिक भावना शमवण्याचे साधन आहे असा आपला समज आहे का???
जाता जाता परत एकदा.. वर म्हटल्याप्रमाणे, तुझे लग्न ठरले नाही/ ठरणार नाही म्हणून तू नरकात जाशील असे म्हणणे हे कितपत योग्य आहे?? (हे त्यातल्या त्यात दिलेले सभ्य उदाहरण आहे...) नि लग्न जमत नाही म्हणून अनुरूपता नसताना (यात पैसा, कर्तुत्व, रूप सगळे आले) केवळ बाह्यघटकांच्या दबावाला बळी पडून केलेल्या लग्नाचे भवितव्य काय???
-निखिल
माझा लेख लिहिण्याचा उद्देश
माझा लेख लिहिण्याचा उद्देश पूर्णतः असफल झाला... वरती चित्रित केलीली जी कुणी मुलगी आहे, ती लग्न न करण्याच्या निर्णयाप्रत स्वतः बाय चॉईस आलेली नसून हा निर्णय समाजातल्या एका विशिष्ट प्रकारच्या प्रवृतीमुळे लादला गेला आहे.... वय उलटून गेले तरी लग्न जमले नाही, यात पूर्णतः दोष मुलीचाच असतो का?
कांदे पोहे, नटणे थटणे का करायचे? हा प्रश्न आपल्या लिखाणातील मुलीचा स्वतःच्या निर्णयाने अविवाहीत राहणे दाखवत आहे. समाजातली एक विशिष्ठ प्रवृत्ती म्हणजे कुठली हे जरा खुलासेवार सांगाल तर बरे होईल.
म्हणजे जे मित्र-मैत्रिणी नातेवाईक लग्नं कर सांगत असतात ते सगळे त्या विशिष्ठ प्रवृत्तीत मोडतात का? बरं बरं.
माझ्या पेक्षा वयाने मोठा असलेला मुलगा जेव्हा तोंड वर करून मला विचारतो माझे लग्न का झाले नाही अजून??? अरे तो तर माझ्या पेक्षा वयाने पाच दहा वर्ष मोठा आहे??? मग तसे तिने विचारायचा अधिकार तिच्यापासून कोणी हिरावला आहे का? मला नाही असे वाटत. आणि जर सदर नायिका इतके आत्मभान असलेली आहे तर तिने असा प्रश्न त्या मुलाला जरुर विचारावा. हल्लीच्या मुलामुलींच्या व्यवहारात बर्यापैकी पारदर्शकता असते.
त्याचे का नाही जमले लग्न??? त्याचा का कोणी असे हात धुऊन मागत नाही????
त्याच्या पण मागे लागत असतील ना कोणी, म्हणूनच आला ना तो कांदेपोहे खायला?
माझ्या अपेक्षा फार माफक होत्या...
हे वाक्य तर दुसरा पॅरा वाचल्यानंतर पटतच नाही.
असो.
आणि हो राहीला प्रश्न माड्या चढण्याचा. तर हल्ली तसल्या सेवाही घरपोच मिळतात. हाताला लाल रुमाल बांधून विशिष्ठ सेवा पुरवणारी मुले म्हणजे 'मेल प्रॉस्टिट्यूटस', आणि असे लोक मुंबईत पुष्कळ असतात असे आमच्या एका मुंबईकर मित्राने सांगितले होते. पूर्वी म्हणजे १०-१२ वर्षांपूर्वीच तेव्हाच्या डीडी-१० वाहीनीवर 'वेश्याव्यवसाय' या विषयावर आयोजित एका चर्चेच एका पोलिस अधिकार्याने अशी गोष्ट असल्याचे मान्यही केले होते. असो.
-पुण्याचे पेशवे
पेशवेंशी बराचसा असहमत
पगार येवढेच मोजमाप आहे का कर्तृत्वाचे?
नाही. नक्कीच नाही. पण समाजातले बहुसंख्य लोक तसेच समजतात ना? माणसाचं ऐहिक यश संपत्तीतच मोजतो रे समाज. लग्नाला उभा रहा मग लक्षात येईल पहिला प्रश्न नोकरी, पगार वगैरे अन दुसरा प्रश्न व्यसन, सवयी वगैरे असतो. काही लोक करतात बंड पण असे लोक विरळेच असतात.
भावना कंट्रोल होत नाहीत म्हणून काहीबाही करण्यापेक्षा लग्नं करणे चांगले नाही का?
खरय. पण लग्न झालं म्हणजे माणुस `काहीबाही' करत नाही, करणार नाही असं थोडंच आहे? लग्न करण्यापुर्वी, लग्नानंतर, लग्न न करता कोणत्याही परिस्थितीत ते होऊ शकतं. वेश्यांकडे जाणारी सगळी माणसं, लफडी करणारी सगळी माणसं लग्न न झालेली असतात? माझ्याकडं विदा नाही पण मला वाटतं सर्वात जास्त अनैतिकता दिसते ती मध्यमवयीन माणसांमधे अन त्यातले बरेच जण लग्न झाल्याचा गैरफायदा पण घेतात. अविवाहित माणुस कुठेतरी, कुणाबरोबर दिसलं तर चर्चा होते विवाहित माणसांना त्यावर सहज पांघरुण घालता येतं. अन काही वेळा तर लग्न केल्यावर जोडीदाराबरोबरच इच्छेविरुद्ध काहीबाही करतात लोक - मॅरिटल रेप ही कन्सेप्ट ऐकलीये ना?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
आत्ता वाचलं. छान लिहिलं आहे!
आत्ता वाचलं.
छान लिहिलं आहे!
निख्या छान लिहीलं आहेस.
निख्या छान लिहीलं आहेस. माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्या या परिस्थितीतून 'लढून' आता आनंदात रहात आहेत.
उत्तम
लेख आणि मांडणी. एकंदरीत सगळ्या प्रश्नांचे एकमेव उत्तर म्हणजे लग्न, मग ते अनुरुप व्यक्तीशी असो वा नसो ही धारणा निव्वळ चुकीचीच नाही तर अहिताची म्हणता येईल - व्यक्तीच्या आणि समाजाच्याही.
'नातिचरामि'मधलं एक निरीक्षण आठवलं - अलीकडच्या इतिहासातल्या कितीतरी टॉपला गेलेल्या आणि आपापल्या क्षेत्रांत स्वयंपूर्ण कर्तृत्वाने गाजलेल्या बायका या सगळ्यांचं मॅरिटल स्टेटस लक्षात घेतलं तर एक गोष्ट जाणवते -- यातल्या बहुतेक बायका या अविवाहित, परित्यक्त्या, घटस्फोटित, विधवा वा पुनर्विवाहित आहेत. हा निव्वळ योगायोग वा अपघात नाही, तर लग्नसंस्थेवरची झणझणीत टिपणी म्हणून याकडे बघता येईल.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वावटळ छानच टिपलीय.
वावटळ छानच टिपलीय.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
अरेरे!
असे पण असते, नाही का! अरेरे!
पूर्वसंचिताचे फळ दुसरे काय? असो प्रत्येकाची वेळ यावी लागते जशी कथानायीकेची बहुदा आली असावी लेखाच्या शेवटात. मंत्र मनापासुन म्हणला नसेल. तिच्या आयुष्यातले सगळे, अगदी तिची जन्मदात्री देखील आक्षेप घेते म्हणजे तिचे चुकले असेल इ इ इ
असो. हेही बदलेल. बरे झाले आठवण केलीस वर्किंग वुमन्स हॉस्टेलच्या नविन इमारतीच्या कामाला सढळ हस्ते मदत करा हो.
जोक्स अपार्ट, अरेरे शिवाय पॉसीटिव्ह प्रतिसाद तूर्त सुचत नाही आहे.
छान
छान लिहलयं!
छान
प्रकटन छानच जमले आहे. सहानुभूतीचा उत्तम आविष्कार.
सुरुवातीला लग्न लवकर जमले नाही म्हणून नंतर मुलीने आलेला नवरा नाकारता कामा नये अशी अपेक्षा मुलीकडून आजूबाजूचे लोक ठेवत असतात.
यात थोडी दुसरी गोष्टही घडते. कधीकधी एखादा चांगला (म्हणजे लौकिकार्थाने) मुलगा नाकारलेला असते. त्यानंतर आलेला थोडा कमी मुलगा स्वीकारताना मनात त्या नाकारलेल्या मुलाचा विचार येतो. आणि मग तो नाकारला तर हा कसा चालवून घेणार अशी अजून एक अढी निर्माण होते. त्याने आणखीच पेच होतो. हे मुलगा मुलगी दोन्ही बाबतीत होते.