एक राज्य चार मुख्यमंत्री

0
0

आज सकाळी वाचण्यात आलेल्या एका बातमी नुसार मेघालयात आता चार मुख्यमंत्री असणार आहेत.

बातमीचा दुवा

ह्या बातमी नुसार मेघालयात एक राज्यपालांनी शपथ दिलेले मुख्यमंत्री आहेत. ईतर दोन उपमुख्यमंत्र्यांना आधी पासुनच मुख्यमंत्र्याचा दर्जा आहे, व आत एका सरकारी आध्यादेशानुसार अजुन एकाला मुख्यमंत्र्याचा दर्जा बहाल करण्यात आला आहे!!! हे करण्यामागचा उद्देश अल्पमतात आलेले सरकार वाचवणे...

हे वाचुन मुख्यत्वे काही प्रश्न मनात आले... ह्या चार मुख्यमंत्र्याचा पदाचा कायद्याचा दृष्टीने काय अर्थ आहे, तसेच घटने नुसार कोणास काय अधिकार आहेत??? राज्यकारभार करताना चारपैकी कोणता मुख्यमंत्री सर्वाधिक महत्वाचा ठरतो. एका मुख्यमंत्र्याला दुसरा मुख्यमंत्री निवडण्याचे घटनेने अधिकार दिलेले आहेत का???

एकुणच अजब हे सरकार म्हणावेसे वाटते
जाता जाता भारतीय राज्यघटनेतील मुख्यमंत्र्या संदर्भातले काही उतारे,
163. Council of Ministers to aid and advise Governor.—(1) There shall be a Council of Ministers with the Chief Minister at the head to aid and advise the Governor in the exercise of his functions, except in so far as he is by or under this Constitution required to exercise his functions or any of them in his discretion.

164. Other provisions as to Ministers.—(1) The Chief Minister shall be appointed by the Governor and the other Ministers shall be appointed by the Governor on the advice of the Chief Minister, and the Ministers shall hold office during the pleasure of the Governor:

नक्की मुख्यमंत्री दर्जा म्हणजे काय???

काय साले लोकं, घटनेला

काय साले लोकं, घटनेला फाट्यावर मारतात. अन आपण सामान्य माणूस फक्त नियम पाळतो.
सदर घटना पाहून द्रौपदीची आठवण झाली.




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

अरे वा मस्तच .. ओ राजे मला

अरे वा मस्तच ..

ओ राजे मला मी मराठीचा मालक म्हणुन दर्जा देता का ?

माला प्पण

माला प्पण

देशाचे वाटोळे कसे करता येईल

देशाचे वाटोळे कसे करता येईल हे पाहत असतात हे हरामखोर नेता / राजकारणी



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अजुन समजले नाही

पुणेरी, श्रा मो समजवुन सांगतीलच.

हो ना ते किंवा अजुन कोणीतरी

हो ना ते किंवा अजुन कोणीतरी समजावुन सांगायचीच वाट बघत आहे....



-निखिल

मला कळले

मला कळले आहे ते इतकेच - या इतर तिघांची श्रेणी आणि मानमरातब मुख्यमंत्र्यांसारखाच असेल. त्यांच्यासाठीचा राजशिष्टाचार मुख्यमंत्र्यांच्या श्रेणीला जो असतो तोच असेल. मात्र कार्यकारी अधिकार फक्त मूळ मुख्यमंत्र्यांनाच आहेत आणि ते त्यांच्याकडेच राहतील. तशा किंवा त्यासदृष्य अधिकारातील कोणताही निर्णय या इतर तिघांना घेता येत नाही. येणारही नाही. त्यांनी तसा प्रयत्न केला तर तो बेकायदा आणि म्हणून बिनबुडाचा ठरेल.
अर्थात एक आहे - राजकारण्यांनी घटनेला धाब्यावर बसवतच हा उद्योग केला आहे हे नक्की!

अर्थात एक आहे - राजकारण्यांनी

अर्थात एक आहे - राजकारण्यांनी घटनेला धाब्यावर बसवतच हा उद्योग केला आहे हे नक्की!
एकदम कळीचे बोललात...
म्हणजे सरकार वाचवण्यासाठी कागदोपत्री चार मुख्यमंत्री...
त्यातला एकच कार्यकारी....
बाकी तीघे फकत मुख्यमंत्री पदाचे फायदे उचलणार...
मजा आहे... लोकशाही!!!!



-निखिल

+ १

वरील माहितीनुसार राज्याचा पदारुढ मुख्यमंत्री एकच दिसतो. इतर तिघांना मुख्यमंत्रीपदाचा दर्जा (मानमरातब मुख्यमंत्र्यांसारखाच) असावा. शेवटी जो मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेतो, किंवा जो हंगामी मुख्यमंत्री म्हणुन राज्यपालांकडुन नेमला जातो ते पदारुढ समजला जावा.

राजकारणात, व्यवस्थापनात अनेकदा अश्या कसरती केल्या जातात. अनेक राज्यात उपमुख्यमंत्री आहेत पण असे पद घटनेनुसार अस्तित्वातच नाही. किंवा अनेक महामंडळांच्या अध्यक्षांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला जातो. असा दर्जा म्हणजे पोकळगावची पाटीलकीच असते. पण अश्या प्रकारची पदे घटनात्मक असली तरी ती देणे बहुधा अवैध नसावे.



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

म्हणजेच

चीफ मिनिस्टर हे एकाच व्यक्तिला म्हणजे जाणार की त्या चारही जणांना? माझ्या समजुतीप्रमाणे मुख्यमंत्री हा एकच इतर तीन जणांचे अगदी मुख्यमंत्र्याच्या जितक्या समानतेचे पद दिले जाता येईल कायद्याने तशी तरतूद?

म्हणजेच "एकाच राज्याचे चार मुख्यमंत्री" या वाक्याला अर्थ नाही तर. जेव्हा एका देशाचे पंतप्रधान दुसर्‍या देशाच्या दौर्‍यावर जातात तेव्हा (एक्टिंग प्राइममिनिस्टर) हंगामी पंतप्रधान असतो तसे एका मुख्यमंत्र्याच्या अनुपस्थितीत हंगामी मुख्यमंत्री असु शकेलही पण घटनेत एका राज्याचे एकाचवेळी एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री असावेत अशी काही सोय नसावी असा मला अजुनतरी एक भाबडा आशावाद आहे.

+ १ एका राज्याचे एकाचवेळी

+ १

एका राज्याचे एकाचवेळी एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री असावेत अशी काही सोय नसावी असा मला अजुनतरी एक भाबडा आशावाद आहे.

सहमात.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

+ १ एका राज्याचे एकाचवेळी

+ १

एका राज्याचे एकाचवेळी एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री असावेत अशी काही सोय नसावी असा मला अजुनतरी एक भाबडा आशावाद आहे.

सहमात.

सरकारी सूत्रों ने बताया कि लपांग के अलावा बाकी तीनों लोगों को वही पे , पर्क्स और अन्य सुविधाएं मिलेंगी , जो चीफ मिनिस्टर को मिलती हैं। बाकी तीनों को संवैधानिक अधिकार नहीं हासिल होंगे। बीजेपी ने इस व्यवस्था की आलोचना की है , जबकि कांग्रेस ने कहा है कि संविधान में इससे रोका नहीं गया है।



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

" सत्ताकेंद्रांची उलाढाल "

" सत्ताकेंद्रांची उलाढाल "

आर्थिक !

आर्थिक !



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

म्हंजी एक

तेवढी लग्नाची अन बाकीच्या ........... असच न्हवं?



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

कुठे आलं हो हे मेघालय? आयला,

कुठे आलं हो हे मेघालय?हास्य
आयला, तुम्ही लोकांनी मेघालयाला भल्तंच सिरियसली घेतलेलं दिस्तंय!!!!

मेघालय?

अजुन भारतातच आहे ना? का गेलं चीन मध्ये? wink



-Nile