रंगकर्मीच्या धोरणात्मक निर्णयानुसार रंगकर्मीवरील काही लेख विविध मराठी संस्थळांवर प्रकाशित कराय्चे ठरले होते ,त्याचाच एक भाग म्हणून हा पहिला लेख आज येथे प्रकाशित करत आहोत.
पॅरामत्ता गर्ल्स -अत्याचारांचा नॉस्टेल्जिया
पॅरामत्ता गर्ल्स’ या नाटकाच्या संदर्भात मी हे लिहतोय. पॅरामत्ता’ नावांच सिडनीमध्ये उपनगर आहे. इंग्रजीत त्याचा उच्चार पॅरामाट्टा’ असा करतात. मराठीत पॅरामत्ता’ मराठीतल्या गोळे’ च इंग्रजीत गोले’ होतं आणि भारत’ इंग्रजीत इंडिया’ होतो मग पॅरामाट्टा’ मराठीत पॅरामत्ता’ का नाही होतं ?
नाटकांचा खेळ संध्याकाळी होता. मी दुपारीच बाहेर पडलो. मी त्यावेळी डंडास या उपनगरात रहायचो. बस पकडून इस्टवूड रेल्वे स्टेशनवर आलो. आता सेंट्रल स्टेशनला जाणारी ट्रेन पकडायची होती. तिकीट काढुन वाट पहात उभा राहिलो. नकाशा काढला. म्हणजे गुगल’ वरून काढलेली सेंट्रल स्टेशनच्या आसपासचा भाग दाखवणारी प्रिंट कामलने दिली होती. कामल : वर्गसखी : प्रेमळ : वयांन बरीच मोठी माझं लिखाण जाम आवडायंच तिला. इस्टवुड स्टेशनवर दुपारचा शुकशुकाट होता. शुकशुकाटात कुठंल होतंय नकाशाचं वाचन. ट्रेन आली.
सेंट्रल स्टेशनला दुपारचा शुकशुकाट नव्हता. पण खुप गर्दीही नव्हती. झुंबड, रेटारेटी वगैरे तर सोडाच.
तिकिट स्वाईप करून स्टेशनबाहेर पडलो. रस्त्यावर येऊस्तोवर दोन भिक न मागणारे भिकारी लागले. एक गिटार वाजवत होता, दुसरा नुसतीच गिटार. इथले भिकारर केविलवाणे नाहीत. त्यांच्याकडे भिकविश्वास आहे. मग काही कपडयांची, बुटांची दुकांन, एक-दोन केक – सॅडविच विकणारे स्टॉल लागले. तेथील विक्रतेपण विश्वासानं वावरत होते. मुख्य रस्त्यावर आलो. वाहंन सुसाट. पण तो वेग विश्वास पुर्ण होता इथं तिथं लोक थोडी गर्दी सगळयांना सिस्टीमविश्वास होता.
तासभर भटकलो समोर माइक : वर्गसखा : वयानं मोठा पण कामलापेक्षा लहान आणि कामलच्याउलट त्याला माझं लिखाण आवडायचं नाही
” हाय माइट, हाव्वा यु ?” म्हणाला
” गुड जस्ट हॅगींग अराऊंड हिअर व्हेअर इज एकसाटली द थियेटर फॉर द टुनाटस शो ऑफ ‘पॅरामाट्टा’?”
मी गोंधळात विचारलं.
” ओह ! डोंनो एकझॅ सॉरी बट स्टील देअ इज टाइम फॉ द शो गो ऍन हॅव सम ड्रीक्सं गॉट टू गो,सि.थँक्स ”
मी पीत नाही हे त्याला खुप दिवसांनी कळंल धक्का बसला होता त्याला.
थिएटर शोधण्यासाठी मी नकाशा काढला नकाशा वाचायचा मला जाम कंटाळा मी एकाला थांबवला त्याला नक्की माहिती नव्हतं पण साधारण कल्पना झाली.
हुडकत, चुकत, विचारत आणि नकाशा न वापरत संध्याकाळ झाली दोन टॅक्सी ड्रायव्हर (त्यांच्या कपडयावरून) दिसले एक कटयावर बसलेले जवळ गेलो वास आला भरपूर ढोसली होती पण बऱ्यापैकी शुदिधत वाटलो पत्ता विचारला. दोघांनी जवळच्या मार्गावर वाद घातला मी घाबरला होतो.जस त्यांनी मला असं जा म्हंटल तसा मी सटकलो चालत चालत राहिलो शेवटच्या वळणाला अरूद रस्ता लागला दोन्ही बाजुला घरं होती जुनी कौलारू दगडी वाडयागत भासणारी बारकी होती एका मागोमाग काही घर गेल्यानतर एक थोडेसेच बारके घर लागले त्यावर होत : वेलव्हर थियेटर
दबकत आत शिरलो मागे पुढे ऑस्ट्रेलिय होते. कॉलमधली ही गर्दी बघुन जरा धीर आल एका कोपऱ्यातल्या बारवर दोन चटपटीत तरूण दारू सर्व्ह करत होते एवढयात टयुटर जेन मेसर ने हाक मारली शिरीष वुइ आ हिअ जरा आणखीन धीर आला. वर्गातले आणखीन काही जण दिसले.
बेन (बेंजामिन) म्हणाला ‘हाय’ ‘पॅरामत्ता गर्ल्स’ पहाणं हे आमच्या क्रीयेटीव्ह रायटींग कोर्सच्या अभ्यासक्रमाचा एक भाग होतं.
‘बेलव्हर थियेटर’ ने हे नाटक निर्माण केलं होतं ऍलाना व्हॅलेनटाइन ही नाटकाची लेखिका नाटक सुरू व्हायची वेळ झाली. जिन्यातुन वर आलो बरोबर बेन होता मागे बाकीच.
तिकिट डोअरकीपरला दाखवुन आत शिरलो प्रवेशदारापासुन थोडया अंतरावर खर्ुच्यांची पहिली रांग तिथुन उतार उतारावर पायऱ्या प्रत्येक पायरीवर खर्ुच्यां आणि मग आली. नाटक करण्याची प्रत्यक्ष जागा (लाकडी) मला व बेनला पुढुन दुसऱ्या रांगेत जागा मिळाली
बेनन यापुर्वी असं थिऐटर पाहिल नव्हंत त्यानं पाथहलं होतं ते ऑपेरा हाऊस ऑपेरा त्यांन केला होता असं त्यानं मला सांगितल उच्चार नीट कळत नसल्यामुळे त्याला कान देऊन ऐकलं या किंवा अशा इतर बाबीमध्ये आपण परदेशी इंग्लिश लोकांबरोबर असं काळजीपुर्वक खरंतर दबकुनच वागतो.
साणारण 14 -15 वयाची मुलगी गणवेशात व कागद इत्यादी गोष्टीच्या ढिगात बसलेली रंगमंचावर दिसु लागली प्रेक्षकातला अंधार वाढला नाटक सुरू झालं
नाटकांची थोडी माहिती उपगोदरच करून घेतली होती हे नाटक ‘पॅरामत्ता गर्ल्स’ होम या साधारण 50 ङ्ढ 55 वर्षापुर्वीच्या सिडनीतील लहान मुलींच्या हॉस्टेल मध्ये मुलींवर झालेल्या कु्रर अत्याचारांवर आधारीत आहे. बिघडलेल्या किंवा वाममार्गाला लागु शकतील अशा मुलींना इथं बदीवान बनवुन त्याच्यांत सुधारणा घडवण्याचे प्रयत्न व्हायचे
त्या मुली आता साडीतल्या बायका झाल्यात त्या एकत्र येऊन या हॉस्टेलला भेट देतात.या रियुनियन च्या प्रसंगा पासुन नाटक सुरू होतं
अशा 5-6 बायकांनी एकमेंकाना हाय करीत मिठी मारत रंगमंचावर प्रवेश घेतला विशेष नेपथ्य नव्हतंच हॉस्टेलच्या गेटची सावली रंगमंच्यावर पडलेली दाखवली आणि हॉस्टेल उभं झालं.
रूदार्थाने बिल्कुल सुदंर नसलेली म्हणजे साठ वय स्पष्ट दिसत होती रंगानी गोरी नसलेली बाई संवाद होता थेट प्रेक्षकांना उद्देशुन मी कानात प्राण ओतले.
या बायका आपल्या क्रुर आठवणींना आठवतात व्यथा मांडत नाहीत त्या भिकाऱ्यासारखंच केविलवाण्य किंवा दयनीच होणं टाळतात एकमागोमाग अत्याचारांचा पट उलगडतो कधी अशा प्रसंगातुन
एक बाई हॉस्टेलमधल्या मुलीच्या भुमिकेत शिरते म्हणजे नाटकात नाटक. दुसरी बाई डॉक्टरची भुमिका करते मुलगी कपडे न काढता नागडी होते म्हणजे स्कर्टखाली हात घालुन अंडरपँट काढते आणि पाय फाकवुन झोपेत डॉक्टर तिच्या फाकवेलेल्या पायांवर पांढरे कापड घालतात बाकीच्या मुली सभोवताली उभ्या राहिलेल्या असताना डॉक्टर पांढऱ्या कपडयामध्ये हात घालुन मुलीची तपासणी करतात मग रिपोर्ट सांगतात डॉक्टरांचा कोणत्याही मुलीचा रिपोर्ट सारखाच असतो : या मुलींची वारंवार ठोकाठोकी झाली आहे ती मुलगी नाही नाही ओरडते काही उपयोग नसतो. मुलगी बिघडलेली ठरते आणि तिच्यावर आणखी सुधारणा होतात
पट उलगडतो कधी अशा गाण्यातुन :-
मला झवलंय जर्मन रशियन माणसांनी आणि चिनी व जपान्यांनी सुद्धा आलिये मी परत ऑस्ट्रेलियाला तुमच्यासारख्या भडल्याकडुन झवुन घ्यायला तर कधी अशा संवादातून : -
” लहान मुलांना ” जनावंर म्हणा. जनावरांसारखं वागवा ती बनतील यातील नाटकातील उपरोध छान बोचराय .या बायका आपल्या अघोरी भूतकाळाकडे भावनाशून्य होऊन बघतात. चिड, दु:ख, वेदना आहे. पण कोरडेपणा जास्त आहे. आणि तोही उपरोधाचे अंग घेऊन.
ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील प्रत्येक वाईट मुलगी कधी ना कधी यातून गेलीय नाटकातल्या या वाक्यातनं या अत्याचाराची व्याप्ती व गांभीर्य कळंत पण यावर कोणी फारसं लिहिलं वा बोललं गेलं नाही व जात नाही कामल नंतर एकदा म्हणाली होती शिरीष’ ऑस्ट्रेलियामध्ये असं काही झालं असेल असं तुला स्वप्नातपण वाटलं नसेल ऑस्ट्रेलिया असा बराच काळा इतिहास आहे. पण तो जगासमोर आणला जात नाही. दबवला जातो ऍलाना व्हॅलेनटाइन या लेखिकेन ‘पॅरामत्ता गर्ल्स’ प्रकाशात आणंल आणि ऑस्ट्रेलिय लोकांचा दाभिंकपणाही
- शिरीष
नाटकाचा विषय अजून उत्तम
नाटकाचा विषय अजून उत्तम मांडता आला असता असे वाटते. खूपच त्रोटक आणि विस्कळित वाटले. पण तरीही वाचताना फ्लो जाणवतो आणि नाटकाच्या विषयाबद्दलही उत्सुकता वाटली. नाटकात मांडलेल्या घटना खर्या असतील तर फारच भयानक असेल हे सगळं.
अवांतरः "रंगकर्मीच्या धोरणात्मक निर्णयानुसार तेथील पहिला लेख आज येथे प्रकाशित करत आहोत" या विधानाचा काहीच अर्थ लागला नाही. पाऽऽर गंडलो. कोणी नीट सांगेल का? असो.
असेच म्हणतो... विषय अजून
असेच म्हणतो...
विषय अजून खुलवला गेला असता असे वाटत आहे...
* अवांतराशी सहमत.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+२
शिवाय नाटकाचं परीक्षण आहे का 'सिडनीच्या उपनगरातली माझी सफर' असं सुरूवातीला वाटत आहे.
अवांतर
ह्यात न समजण्या सारखे काय आहे? त्यांच्या साईटीवरील लेख त्यांना इतर मराठी साईट्सवर पण द्यायचे आहेत, त्याची सुरुवात ह्या लेखाने केली. ह्यातले नक्की काय समजले नाही?
बंडोपंत, नमस्कार. हा लेख
बंडोपंत, नमस्कार. हा लेख जेव्हा टाकला आणि मी वाचला... तेव्हा सुरूवातीला "रंगकर्मीच्या धोरणात्मक निर्णयानुसार तेथील पहिला लेख आज येथे प्रकाशित करत आहोत" फक्त एवढेच होते. सध्या असलेले वाक्य हे माझा प्रतिसाद आल्यानंतर आलेले आहे. त्यामुळे माझा खरंच गोंधळ झाला होता.
बाकी त्या लेखाबद्दल मला जे वाटले ते प्रामाणिकपणे लिहिले आहे.
बाकी काय म्हणताय?
लिहिलय चांगल....
पण त्रोटक अन विस्कळीत वाटते असेच म्हणतो.
पण नाटकाचा विषय संवेदनाक्षम आहे अन सार्वत्रिक देखिल. नाटकाचे कथानक वाचताना नकळत इथे भारतात पाहिलेल्या अनेक घटना, प्रसंग डोळ्यासमोर आले. तिथल्या अश्या संस्थांमधे अन भारतातल्या रिमांड होम, स्पेशल होम्समधे फारसा फरक दिसत नाही.
या बायका आपल्या अघोरी भूतकाळाकडे भावनाशून्य होऊन बघतात हे देखिल सार्वत्रिकच. एका विशिष्ठ मर्यादेपलिकडे दु:ख गेले की अशी भावनाशुन्यता येते, स्वतःच्या आणि अनेकदा इतरांच्या दु:खाबाबतही.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
एका विशिष्ठ मर्यादेपलिकडे
एका विशिष्ठ मर्यादेपलिकडे दु:ख गेले की अशी भावनाशुन्यता येते, स्वतःच्या आणि अनेकदा इतरांच्या दु:खाबाबतही.
+१
लेख नावडला.
जर लेखाचा मुख्य विषय पॅरामत्ता गर्ल्स असेल तर ६० ते ६५% लेखाचा भाग विनाकारण मुख्य विषयापेक्षा वाया घालावला आहे. जवळजवळ सगळा टाळता आला असता.
>दोन भिक न मागणारे भिकारी लागले. एक गिटार वाजवत होता, दुसरा नुसतीच गिटार. इथले भिकारर केविलवाणे नाहीत. त्यांच्याकडे भिकविश्वास आहे.
अर्थ स्पष्ट नाही ते सोडा पण अरेरे! एका रंगकर्मीकडून बस्करची अशी बोळवण..
जर ऑस्ट्रेलीयामधील एका कालखंडातल्या अत्याचारीत मुलींबद्दल आहे तर "त्या मुली आता साडीतल्या बायका झाल्यात " असा शब्दप्रयोग ?
रूदार्थाने बिल्कुल सुदंर नसलेली म्हणजे साठ वय स्पष्ट दिसत होती रंगानी गोरी नसलेली बाई संवाद होता थेट प्रेक्षकांना उद्देशुन मी कानात प्राण ओतले.
तुम्हाला एक वयस्क स्थानीक/ मुळ निवासी / अबोरीजनी महीला म्हणायचे आहे का? "रंगाने गोरी नसलेली बाई" हे एका अबोरीजनी व्यक्तिला उद्देशुन त्रोटक वर्णन वाटत आहे.
>भिकारर, साणारण, गांभीर्य कळंत, ऑस्ट्रेलिय, दाभिंक, पाथहलं होतं, शुदिधत.
लेखावर पुन्हा एकदा नजर टाकली असती तर अश्या चुका टाळणे शक्य होते.
मुख्य म्हणजे पॅरामत्ता गर्ल्स हे नाटक पॅरामत्ता वसतीगृहातील/ सुधारकेंद्रातील (स्थानीक्/अबोरीजनी) मुलींवरील अत्याचारांवर प्रकाश टाकणारी, त्यांच्या संघर्षाची कहाणी आहे व त्याची बलस्थाने काय आहेत हे पुरेसे स्पष्ट झाले नाही असे वाटते.
असो. पु.ले.शु.
जर लेखाचा मुख्य विषय
जर लेखाचा मुख्य विषय पॅरामत्ता गर्ल्स असेल तर ६० ते ६५% लेखाचा भाग विनाकारण मुख्य विषयापेक्षा वाया घालावला आहे. जवळजवळ सगळा टाळता आला असता.
+१ सहमत
तसेच ते भिक्विश्वास... सिस्टिमविश्वास शब्द काही कळले नाहीत...
असो नाटकाच्या विषयाची व्याप्ती अजुन चांगल्या प्रकारे सांगता आली असती असे वाटते... काही शब्दाचा प्रयोग वेगळ्या पद्धतीने केला असता तर लेख आणखीण प्रभावी ठरली असता
-निखिल
सहजरावांचे आभार... मी टंकाळा
सहजरावांचे आभार... मी टंकाळा केला... त्यांनी सविस्तर लिहिले.
सहजरावांशी सहमत
अतिशय योग्य शब्दात "सहज"पणे केलेले लेखनाचे मुल्यमापन.
महत्वाचे :-
रंगकर्मीच्या धोरणात्मक निर्णयानुसार रंगकर्मीवरील काही लेख विविध मराठी संस्थळांवर प्रकाशित कराय्चे ठरले होते ,त्याचाच एक भाग म्हणून हा पहिला लेख आज येथे प्रकाशित करत आहोत.
कसले धोरण ? कोणी आधी कधी ठरवले ? त्यासाठी ह्या संस्थळाच्या मालकांची परवानगी आपण घेतलीत का? निदान तसा काही पत्रव्यवहार ?
हा लेख आपण स्वतः लिहिला आहेत , का कोणा महाभागाने आपल्या संस्थळावर लिहिलेला लेख इथे आणुन डकवला आहेत ? ह्या शुद्ध लेखनाच्या चुका आणी भयाण मराठी मुळ लेखकाचे आहे, का त्याच्या मुळ लेखनाला आपल्या व्याकरणाची "चंदेरी किनार" लाभली आहे ? हा लेख बाहेरुन टंकुन आणुन इकडे युनिकोदात परिवर्तीत केला आहे का ?
लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे ते काहिही कळाले नाही, हा लेख काय निकष लावुन इथे डकवला तेही कळाले नाही.
घाववर्मी
आरारारारारा , का त्याच्या मुळ
आरारारारारा
सिरियसली लेख वाचून प्रतिक्रिया द्यावी म्हणून लेख वाचायला घेतला .. पण पहिलेच वाक्य वाचून लेखंच मल चावायला लागला
- डंखवर्मी
पॅरामत्ता’ नावांच सिडनीमध्ये
पॅरामत्ता’ नावांच सिडनीमध्ये उपनगर आहे. इंग्रजीत त्याचा उच्चार पॅरामाट्टा’ असा करतात. मराठीत पॅरामत्ता’ मराठीतल्या गोळे’ च इंग्रजीत गोले’ होतं आणि भारत’ इंग्रजीत इंडिया’ होतो मग पॅरामाट्टा’ मराठीत पॅरामत्ता’ का नाही होतं ?
मला उगीचच "प्यारेंन्थेसिस" (paranthesis) ला "प्यारासेंटेंसिस" (paracentesis) म्हणणारा माझा एक दक्षिण भारतीय डॉक्टर क्लायंट आठवला...
बाकी सहजरावांशी सहमत..
प्यारेलाल
प्यारेलाल (parallel) पण त्याच पठडितले की....
आजकाल जाहीरातबाजी सगळीकडेच
आजकाल जाहीरातबाजी सगळीकडेच आहे...केवळ ज्ञान असुन चालत नाही....तर त्याच "प्रेंजेन्टेशन" आवश्यक आहे हे मीच काय पण कोणीही मानेल.
पण,
स्वताच्या संकेतस्थळाची लाल करण्यापोटी,ईतकी निर्लज्ज आणी किळसवाणी जाहीरातबाजी,उण्यापुर्या वर्षभराच्या आंतरजालीय आयुष्यात कधीच पाहिली नाही.
@ राजे......आपल्या संस्थळावर ईतर संस्थळाबद्दल बदनामीकारक मजकुर लिहीण्यास मनाई आहे....त्याचप्रकारे दुसर्या संस्थळाचा "उदो उदो" करण्यासही मनाई असावी...मी हे नाही म्हणत आहे की संपुर्ण मनाई असावी...पण त्यात "ताळ-तंत्र" असावे....अन्यथा जो "तमाशा" ईतर संकेतस्थळावर झाला,त्याची ईथे सुरुवात तर झालेली आहेच...पण तोच "ईतिहास" ईथे पुन:प्रक्षेपित व्हायला वेळ लागणार नाही...
वरील माझे वैयक्तीक मत आहे....बाकी आपली मर्जी
सुहास, थोडीशी असहमती व्यक्त
सुहास, थोडीशी असहमती व्यक्त करतोय.
स्वताच्या संकेतस्थळाची लाल करण्यापोटी,ईतकी निर्लज्ज आणी किळसवाणी जाहीरातबाजी,उण्यापुर्या वर्षभराच्या आंतरजालीय आयुष्यात कधीच पाहिली नाही.
मला एवढ्या लेव्हल पर्यंत नाही वाटले. अर्थात... तुझ्या मताचा आदर आहेच.
आता, बंदी बद्दल वगैरे... असभ्य भाषा / अश्लिल भाषा / एका मर्यादेबाहेरचे व्यक्तिगत हल्ले / एका मर्यादेबाहेरची शिवराळ भाषा / लेखनकर्त्याने स्वत:च्या लेखनाबद्दल विनंती केली तर... या कॅटेगरीज सोडून बाकी कोणत्याही लेखनावर बंदी नसावी किंवा ते उडवले जाऊ नये. अर्थात... यातील काही प्रकार हे सापेक्ष आहेत पण तेव्हा मात्र सदस्यांनी मालक / संपादक वगैरे जे काही असतील त्यांचे मत ग्राह्य धरावे. अन्यथा दोन द्यावेत दोन घ्यावेत आणि चालू पडावे... इतकं साधं सोप्पं गणित आहे हे.
केवळ ज्ञान असुन चालत नाही....तर त्याच "प्रेंजेन्टेशन" आवश्यक आहे हे मीच काय पण कोणीही मानेल.
छान. कळतंय ना....
+ १
सहमत आहे.
लाईट गेली आहे परत आल्यावर पुर्ण विचार व्यक्त करतो.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मला एवढ्या लेव्हल पर्यंत नाही
मला एवढ्या लेव्हल पर्यंत नाही वाटले. अर्थात... तुझ्या मताचा आदर आहेच >.
माझे लेखाबद्दल मुळात काहीच मत नाही...
जरी ईतिहास वगळला....असला तरी मागील एक लेख ईथेच असाच अद्ययावत केला गेला...त्याचा उद्देश माझ्याच काय कोणाच्या ही नजरेतुन सुट्ण्यासारखा नाही...माझे केवळ ईतकेच म्हणणे आहे की जाहीरातबाजीवर नियंत्रण असावे..हा लेख ईथे स्वतंत्ररित्या टाकला गेला असता..
आपल्या मताचा आणी विचारांचाही आदर आहे ..हे वेगळे सांगण्याची गरज नाही.....पण आपला माझ्याविषयी गैरसमज होउ नये म्हणुन हे वाक्य.
सुहास, तुझ्या मताचा आदर राखून
सुहास, तुझ्या मताचा आदर राखून ...
कोणीही कितीही जाहिरातबाजी केली तरीही मूळ माल जर बोगस असेल तर आपोआप दुर्लक्षित होतोच ना? मूळ नाटकाच्या परीक्षणाची लोकांनी चिरफाड केलेली तू पाहिली आहेसच. तेव्हा मूळ माल चांगला नसेल तर जाहीरात करूनही काय होतं आहे हे तुझ्या डोळ्यांसमोर आहेच.
टीकासुद्धा अतिप्रमाणात झाली की ती जाहिरातीचंच काम करते.
खर आहे अदिती ...तुझा मेसेज
खर आहे अदिती ...तुझा मेसेज कळतोय...ह्यापुढे नक्की लक्षात ठेवीन
मग सिंहगडाची गोष्ट पुढे कधी
मग सिंहगडाची गोष्ट पुढे कधी जाणार? नाहीतर अंमळ जास्त टीका करेन त्यावरही! ;-)
+ १
सिंहगडचे गुढ २४ तासात उकललेच पाहिजे. नाहीतर नेहमीच्या खंडपीठापुढे हजर करुन `पुनमवासात' गोष्ट पुर्ण करण्याची शिक्षा फर्मावली जाईल.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
बिपिन शी सहमत अन्यथा 'टाचण
बिपिन शी सहमत
अन्यथा 'टाचण द्या' वापरु शकता.
हा लेख वाचून मला जे कळलं ते.
हा लेख वाचून मला जे कळलं ते.
१.शिरीष नावाचा लेखक डंडास हे उपनगर ज्या देशात आहे तिथे रहातो.
२. तो गुगलून जेथे जायचे ते ठिकाण शोधतो.
३. तो काही तरी 'क्रिएटिव्ह रायटिंग' करणारा कोर्स त्या देशात करतोय.
४. त्या अंतर्गत त्याला नाटकाला जावे लागते.
५. त्याचे लेखन काहींना आवडते काहींना नाही आवडत.
६. तो मद्यपान करत नाही.
७. ऑस्ट्रेलियातील अत्याचारित महिलांच्या अनुभवावर झालेले 'पॅरामत्ता गर्ल्स' हे नाटक त्याने पाहिले.
लेखकाला सांगायवायच्या सर्व गोष्टी प्रतिसादात दिलेल्या प्रमाणात कळल्या. बाकी सहजरावांशी सहमत.
हा आमचा स्वभाव
अग्गायायायाया....
_/\_
संपलो!
बाकी श्री.रंगकर्मी,
रंगकर्मी.कॉम हे संस्थळ नाटक विषयाला वाहिलेले आहे असे आपल्या आधीच्या परिचयाच्या धाग्यामधुन कळाले होते.
इथे टाकलेल्या सदर लेखामध्ये त्या नाटकासंबंधी काही माहिती मिळाली आहे असं वाटत नाही.
सदर नाटक कोणी लिहिलं,
त्याचे दिग्दर्शक कोण,
कलाकार कोण,
लेखक कोण्,
नाटकाचा आकृतीबंध काय आणि कसा,
नेपथ्याबाबत काही माहिती?
नाटक एक अंकी/ दोन अंकी/तीन अंकी/ दिर्घांक/एकांकिका/पथनाट्य/वग-गण-गवळण नक्की काय आहे?
ह्या प्रश्नांची उत्तरं मिळत असतील आणि नाटक कशा अंगाने जाते, त्यामधले ढोबळ मानाने प्रसंग, उत्कृष्ट वठलेले काही प्रसंग ह्यांचं टिपण एकुणातच नाटकाचा वेग, कथेची जडणघडण ह्याबाबतच्या टिप्पण्या नाट्याविष्काराचा सर्वोच्च क्षण कोणता? की फक्त शिवीगाळ आणली की 'हट के' वगैरे वाटते आणि प्रसिध्दी पावते?
ह्यापैकी कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतील तर इतर संस्थळांवरच्या वाचकांनी रंगकर्मीवर येऊन पुढील (नाट्यविषयक) लेख का वाचावेत असा मला प्रांजळ प्रश्न पडतो.
सिडी
यातल्या गाण्यांची सिडी कुठे मिळेल?
गेला बझार जेष्ठ / कनिष्ठ सभासद याला चाल लाउन देतील काय? (स्वतःच्या आवाजात गाउन रेकॉर्ड केरुन दिले तर क्या कहने?)
(कंदीलधारी) आंबोळी
आभार
प्रथमतः आपल्या सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार व काही खुलासे
१. हा लेख हा कोणत्याही प्रकारे संकेतस्थळाच्या प्रसिद्धीसाठी इथे लिहिलेला नाही. रंगकर्मीवर जे लोक लिहितात त्यांचे लेख जास्त्तीत जास्त लोकांपर्यंत जावेत या एकमेव हेतुने हे लेख इथे देत आहोत. आणि असे करताना त्या लेखकाची पुर्वपरवानगी घेतलेली असते.
२. हा लेख रुढार्थाने परिक्षण यात येत नाही ,तसा लेखकाचा उद्देशही नव्हता. लेखकाने एक नाटक पाहिले, आणि त्याचे वर्णन त्याने केले इतकेच या लेखाचे प्रयोजन दिसते ,तरीही या लेखावरील आपली सर्व मते ही लेखकांपर्यंत पोहोचवलेली आहेत.
३.तसेच असे लेख प्रकाशित करण्यास व्यवस्थापकांचा विरोध असेल ,तर तसे कळवावे ,जेणेकरुन येथुन पुढे असे प्रकाशन बंद केले जाईल
नाटकाचे वर्णन? कुठेय?
जवळजवळ निम्मा लेख तर कुठल्या बसमध्ये चढलो अन कुठल्या भिकार्याला पहात रेल्वेतुन उतरलो ह्यातच जातो, मग नाटकाचं नाव तरी कशाला मध्ये घ्यावं साहेब?
ह्याच ठिकाणी नव्हे, तर इतर संस्थळांवरही नुकतंच प्रकाश घाटपांडे ह्यांनी 'दलपतसिंग येता गावा..' ह्या नाटकाची ओळख सांगणारा लेख लिहिला आहे, तो जरा चाळुन पाहिल्यास कळेल की परिक्षण्/समिक्षा वगैरे न करता ओळख्/नाटकाचे वर्णन कसे करतात.
असो.
आयला! हे नाय कळ्ळं!
असंच करायचंय तर मग सरळ त्या लेखकांना निरनिराळ्या मराठी संकेतस्थळांचे पत्ते द्यावेत, ते लेखक तिथे तिथे जाऊन लिहितील की.
आधी एका ठिकाणी सदस्यत्व घ्या, तिथे लिहा, मग तिथून सगळीकडे लेख फिरवा हा द्राविडी प्राणायाम का बरं केलाय?
असो, उत्सुकतेपोटी प्रश्न केला, तुमच्या व्यवस्थापनाच्या ध्येयधोरणांबद्दल विचारणा करण्याचा हक्क मुळीच नाही हे ठाऊक आहे.
असो...
व्यवस्थापकांचा निर्णय तेच घेतील. इथे असे लेख पुनर्प्रकाशित करायला माझी वैयक्तिक कसलीच हरकत नाही हे ही नमूद व्हावे. पण जेव्हा जालावर कोणतेही लेखन येते तेव्हा माझ्या काही किमान अपेक्षा असतात. लेख सुसंगत असावा. विस्कळित नसावा. त्यात भरपूर आणि सहज टाळता येण्यासारख्या शुद्धलेखनाच्या चुका नसाव्यात. नियमित लिहिणार्या लोकांनी सुरूवातीला ज्या चुका केल्या त्या सतत आणि वर्षानुवर्षे करू नयेत... प्रगति व्हायला पाहिजेच पाहिजे. आंतरजालावर नियमित वावरणार्या / वावरू इच्छिणार्यांनी केवळ स्वतःचेच लेखन न वाचता इतरांचे लेखन पण वाचावे आणि त्या वर प्रामाणिक (मग ते भले असोत बुरे असोत) प्रतिसाद द्यावेत. सगळेच हौशी आहेत. सगळ्यांनाच आपल्या लेखनावर कसे आणि किती प्रतिसाद येत आहेत याची खूपच उत्सुकता असते. त्याची कदर न करता केवळ स्वतःच्याच लेखनावर लिहू नये. विषयात आणि शैलीत वैविध्य पाहिजे. नाही तर मला तोच तोच पणा वाटून कंटाळा येतो. वगैरे वगैरे वगैरे...
असो.