[प्रथमचं लिहितोय.... चूकांबद्दल क्षमस्व... फ्लो असा जमलं नाही ..सांभळून घ्या]
झूम चॅनेल , व्होडाफोन आणि टाइम्स ऑफ इंडिया यांनी "फिर मिले सुर" च्या माध्यमातून "मिले सुर मेरा तुम्हारा" ची जादू पुन्हा एकदा आणण्याचा प्रयत्न केला ... यंदाच्या २६ जानेवारी पासून "फिर मिले सुर" हे गाणे टी.व्ही. वर दाखवत आहेत ....
जवळपास २० वर्षापूर्वीचे गाणे नव्या स्वरूपात सादर केले आहे .... पण जुन्या गाण्याची सर नवीन गाण्याला अजिबात नाही.. "जुने ते सोने" हेच खरं !!!
लोक सेवा संचार परिषदेची कल्पना - "विविधतेत एकता [Unity in Diversity]",पीयूष पांडेंचे लेखन आणि अशोक पत्कींचे संगीत .... या आणि अशा अनेकांचे चे प्रयत्न म्हणजे "मिले सुर मेरा तुम्हारा" !!!
As per WikiPedia - The national integration video was intended to instill a sense of pride and promote unity amongst Indians, highlighting the different linguistic communities and societies that live in India -- India's unity in diversity, so to speak.
आणि आता २० वर्षानंतर "फिर मिले सुर", हे नक्की काय प्रकरण आहे ? बॉलीवूड उदात्तीकरण की बॉलीवूड्ची जाहिरात ?
नवीन असं काय केले आहे ?
ढीगभर सिनेस्टार्स, एकाला घेतलं तर दुसर्याला वाईट वाटू नये म्हणून सगळ्यांना घेतलं [खान ट्रायो...], सुर्-चाल बदलली, गायकांना सांगितल की तुमच्या पद्ध्तीने Improvise करा आणि म्हणा ..
नाही म्हणायला ऑलिंपिक पदक विजेते , साइना नेहवाल, गोपीचन्द, भुतिया, मेरी कोम[? चूकभूल देणे घेणे] यांना स्पोर्ट्स कोटा दिला आहे ...
मराठीतल्या २ ओळीपण जीवावरं आल्यासारखे गातात - अतुल आणि सोनली कुलकर्णी ...
एक पण क्रिकेटवाला नाही, शास्त्रज्ञ नाही, आय्.टी वाले नाहीत ... सर्वसामान्य लोक [Common Man] नाहीत ..
असं असलं तरीही ... काही piece खूपच छान जमले आहेत ...
- अमिताभचं कवितावाचन .. [पद्य इन गद्य]
- सलमान आणि मूक बधिर मुले
- महेश बाबू
- एअर फोर्स Convocation आणि आण्खी काही
Making of "फिर मिले सुर" मध्ये कैलाश सुरेन्द्रनाथ सांगत होता की आमिर चा piece असा का किंवा शाहरूख चा असा का .... ?
नवीन गाण्याचा व्हीडीओ पाहू शकतो पण फक्त ऐकू शकत नाही ... जुन्याइतका feel नाही
दुवे ...
मिले सुर मेरा तुम्हारा
फिर मिले सुर -
१
२
जुन्या गाण्याची सर अज्जिबात नाही...
लेखकाशी सहमत!!!
जुन्या गाण्याची सर अज्जिबात नाही... व्हिडिओ पूर्ण पाहाण्याची इच्छा झाली नाही.. जुने गाणे अजूनही आवडते.... नि त्यातल्या इतर भाषांतल्या तोडक्यामोडक्या ओळी गाण्याची जी खुमारी आहे.. ती कुणालाही घेऊन हा व्हिडिओ बनवली ती येणं शक्यच नाही...
नवीन वाईट का चांगलं या चर्चेत
नवीन वाईट का चांगलं या चर्चेत मला रस नाही, पण मूक मुलांच्या बरोबर हातवारे करण्याचा स्टान्स, हा नवीन विचार मला खूपच आवडला. तसंच लहान मुलांबरोबर आमिर खान गातो ते ही आवडलं. वाईट असेल ते मी या सीन्ससाठी सोडून दिलं आहे.
मला नवीन गाणंही अतिशय आवडलं!
सर्व नव्या पिढीचा समावेश आहे. जुन्या गाण्याची ओळख मनात पक्की बसल्याने नवीन गाणे आवडायला जरा अवघड जाते पण जरा पूर्वग्रह बाजूला ठेवून ऐकले तर आवडेल असे आहे.
आमीरचा आणि सलमानचा लहानग्यांबरोबरचा सीक्वेन्स उत्तम आहे, येसुदासचा आवाजकिती दिवसांनी ऐकला, अनुष्का शंकरही सुरेख वाजवते सतार, रशीद खानचे गाणे मस्तच आहे, आयान अली आणि अमन अली बंगश सरोदवर मस्त वाटतात, राहुल शर्मा हा शिवकुमारांचा चार्म घेऊन आलाय. मस्त मजा वाटली ऐकताना!
काही तृटी आहेत जसे की शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, चित्रकार, मूर्तिकार, नारायणमूर्तींसारखे प्रोफेशन्ल्स, सर्वसामान्य नोकरदार आणि कष्टकरी वर्गाचा समावेश जरुर हवा होता. बॅकग्राउंडला गेल्या पिढीतले लोक कल्पकतेने मिसळून दाखवता आले असते तर अजून बहार आली असती.
सहमत!
खरंय! त्यातही जुने गाणे जर उत्कृष्ट असेल तर त्याची पुनरावृत्ती करणे अवघडच!
काही दिवसांपुर्वी नवे गाणे लावले होते पण पदुकोण आण चोप्रा बाईंनी मला टर्न ऑफ केलं! चतुरंग आणि अदितीचा प्रतिसाद वाचुन व्हिडीओ पुन्हा पाहिला. त्या दोघी, सोनु निगम वगैरे सोडले तर एकंदरीत चांगला प्रयोग.
-Nile
खरं म्हणजे मला इथेही
खरं म्हणजे मला इथेही शर्टाशिवायचा सलमान खान पाहून तिडीक आलेली.. पण नंतर लक्षात आलं, त्यालाच बेस्ट सिक्वेन्स मिळालाय!! सगळ्यात बेस्ट!
तेव्हढ्यासाठी सोडून द्यायला मला आवडले असते. पण पाऊण बच्चन फॅमिली ( थँक गॉड जया बच्चन येऊन तिचे स्क्रिप्ट वाचन नाही ठेवले!!) , तोंड वेंगाडणारा व नेहेमीसारखे हात पसरणारा कल हो ना हो शाहरूख खान, रँपवर उभी आहे की काय अशा आविर्भावातली दिपीका, तिला आवाज दिलेल्या बाईने काढलेला आयटेम साँगसारखा एरॉटीक आवाज, शिल्पा शेट्टी बळचंच - 'सिरियसली' सोलर कुकर करणार्या बायकांबरोबर उभे राहणे इत्यादी पाहून वैताग्ग आला !! शेवटी करण जोहर म्हटल्यावर तर मी बेशुद्ध पडणार होते. अरे कोण तो? काय त्याचे योगदान भारताला की त्याने या व्हीडीओत यावे? फाल्तू !
अभिनव बिंद्राला इतके कॉमेडी खाली बसून उभे राहायला व कमरेवर हात ठेवायला कोणी सांगितले? कोणाची ही दिव्य कोरिओग्राफी? शाहीद कपूरला पॉप स्टार असल्यासारखे माईकसमोर किंचाळायला का लाव्लंय? रणबीर कपूर का झोपेत आलाय? अभिशेक बच्चनला इतका ग्गोड्ड आवाज का दिलाय? दिपिकाला 'या गाण्यात' 'असा' ड्रेस द्यावा हे कोणत्या कॉस्चुम डिझायनरला आणि का वाटावं? व तिने तरी का घालावा हा ड्रेस? भारतात अजुनतरी मुली अशी कापडं घालून समरमध्ये फिरत नाहीत! ड्रेसचा विषय निघालाय तर, बच्चनांच्या सुनेला इतकी सिंथेटीक चकाकणारी साडी का दिलीय?
अनुष्का शंकरचे वाजवणे इन सिंक नाही, जे नंतर एडीटींग मध्ये करता आले असते.. शंकर महादेवन उठ सुठ चाली का बदलतो?
जाऊदेत..
फार प्रश्न पडलेत.
हे बनवणार्यांना नाही पडत का?
आम्ही प्रेक्षक बिन्डोक वाटलो का काहीही पाहून घ्यायला!
मला नाही आवडलं हे नवीन प्रकरण. अतिशय डोक्यात जाते.
नव्या सुर बने हमारा तयार
नव्या सुर बने हमारा तयार करणार्यांचा जाहिर निषेध.
मराठी ओळी कुठे आहेत?
यात
"माझ्या तुमच्या जुळता तारा, मधूर सुरांच्या बरसती धारा "
नाहीए.
मला नवीन रचना अजीबात आवडलेली नाही. कोणी काही म्हणो नव्याचा हव्यास धरा, जुने जावू द्या मरणालागूनी वैगेरे वैगेरे. पण नवीन रचना एकदम फालतू आहे. फक्त दिसणे आहे त्यात. नाक्यावर तोंड रंगवून उभी असलेल्यापैकी आहे ते.
अन भरीस भर त्यात मराठी ओळी नाही. मराठी नसल्याचा न्याय इतर भाषांनाही लावा ना मग.
जुने तेच सोने.
अगदी बटाट्याची चाळ ते आताचा फार्स ईतका फरक आहे त्यात.
जय मराठी!
जय महाराष्ट्र!!
नविन लेखकास शुभेच्छा. लिहीत रहा. बोळा निघेल.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
अरे फोड्या, २ भाग आहेत दुसरा
अरे फोड्या, २ भाग आहेत दुसरा भाग बघ की...
बर मग ठिक आहे. तरी असे दोन
बर मग ठिक आहे.
तरी असे दोन भाग का? अन मग पहिल्या भागात का नाही. आपण का मागे ठेवलो जातो.
(जिथे तिथे आपला आग्रह कायम ठेवला पाहिजे, काय?)
तरीही हा भाग आवडलेला नाहीच. कोणी काही म्हणो.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
बिलकुल आवडले नाही. मराठी २
बिलकुल आवडले नाही. मराठी २ ओळी केवळ आणि त्या कधी चालू झाल्या कधी संपल्या कळत पण नाही. बाकी पूर्वी कमी वेळ दिलेल्या सर्व भाषांतली गाणी थोडे अधिक शब्द देऊन वाढवली आहेत. या नवीन गाण्याच्या निर्मात्याना राजस्थानातले किल्ले बिल्ले दिसले महाराष्ट्रातले दिसले नाहीत काय? असो, म्हणून पुन्हा न बघण्यासाठी फाट्यावर मारले.
-पुण्याचे पेशवे
कुछ जम्या नही
नवीन प्रयत्नाला बॉलिवूड-परेडचं स्वरूप आलं आहे. (अभिषेक आणि ऐश्वर्यासाठी अमिताभ बच्चन रोजगार हमी योजनेसारखा आहे बहुतेक
.) मूकबधीर मुलांच्या दृश्याचा समावेश ही एकच काय ती मोठी जमेची बाजू. नवीन व्हिडिओची विनोदी अंगाने चिरफाड करणारा एक लेख इथे वाचता येईल.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
तद्दन बकवास आहे. उगाच चांगल
तद्दन बकवास आहे.
उगाच चांगल म्हणुन विचारवंत का व्हायचे?
१००% सहमत
अवलियाशेठशी १००% सहमत.
बॉलीवुड आपल्या टिमकीसाठी इथपर्यंत उतरेल असे वाटले नव्ह्ते.
असो भाग्यश्रीच्या प्रतिसादातल्या सगळ्या गोष्टींशी सहमत.
जाता आता आम्हाला तो मुकबधिर मुलांबरचा सलमान उगाच आवडला खरा हे सांगतो
काही तुकडे..
काही तुकडे छान जमलेत. काही ठिकाणी चक्क बेसूर झालेत.
एकूण विचार केला तर सूर..बेसूर झालाय. सूर एकमेकात मिसळलेला नाहीये आणि सूर ऐवजी कित्येक ठिकाणी सुर्रर्रर्र...... असा उच्चार झालाय.
ह्या गाण्याचा मूळ उद्देशच साधला गेलेला नाहीये....एकच सूर!
जुन्या गाण्याच्या जवळपासही नाही पोचत हे गाणं!
१ल्या आणि दुसर्या अशा दोन्ही भागात बंगाली का घेतलंय...अजिबात नाही पचलं.
भूपेन हजारिका तर का रडतोय...तेही कळलं नाही...ते रडणंही अगदी
बेसूर की भेसूर म्हणण्याइतपत आहे.
तात्पर्य: खास आवडलं नाही.
चांगला सुर + बेसुर =
चांगला सुर + बेसुर = गाण्याचा बट्याबोळ.
काही नमुने त्यात का आहेत तेच कळत नाही आहे....
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आवडल नाही
बकवास आहे. पहिल्या गाण्याची सर नाही. एक सुद्धा यातली ट्युन लक्षात रहिली नाही. यात आलेले प्राणी खरच आवश्यक आहेत का प्रश्न येतो. देशप्रेम काय असते हे या मंडळीना खरच माहिती असेल का?
अनेक असे लोक आहेत की त्यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करायला हवे आहेत. पण आपले दुर्दैव की आपल्या देशात शक्य नाही. असो...थोडक्यात काय तर मला नाही आवडल हे..सध्यातरी..!!
राधा
||मी इ-मेल फॉरवर्ड करतो,याचा अर्थ असा नाही,मला काही काम नाही;
कामात फोन करुन व्यत्यय टाळण्यासाठी, इ-मेलसारखे दुसरे साधन नाही||
>>अनेक असे लोक आहेत की
>>अनेक असे लोक आहेत की त्यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करायला हवे आहेत
जसे की ?
>>नवीन गाण्याचा व्हीडीओ पाहू
>>नवीन गाण्याचा व्हीडीओ पाहू शकतो पण फक्त ऐकू शकत नाही
सहमत..
आमच्या दिपिकाला पहिल्यांदाच न बघायची इच्छा झाली.
युटुब वर एकाने छान शब्द
युटुब वर एकाने छान शब्द वापरला आहे नवीन गाण्यासाठी.
ईमोशनल बलात्कार
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
गडबडा लोळुन हसणारी स्माइली
गडबडा लोळुन हसणारी स्माइली देखील कमी पडेल त्या शब्दासाठी.
लै भरी शब्द .....
लै भरी शब्द .....
ओफिसमधे गडा गडा लोळुन हसावं वाटत आहे...
नवं भिक्कार आहे... जुनीच
नवं भिक्कार आहे...
जुनीच फिल्म चांगली आहे.....
जुनं गाणं
जुनं गाण कितीतरी पटीने परिणामकारक आहे.
नविन गाण्याविषयी काहीच बोलावस वाटत नाहिए.
सगळ्यांनी इतक लिहिलय मी अजुन
सगळ्यांनी इतक लिहिलय मी अजुन काही बोलायला हवय?
या नवीन गाण्याला "चुकीचे असे टाचण" दिलय बास.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
सगळ्यात प्रथम लिहिते झाल्या
सगळ्यात प्रथम लिहिते झाल्या बद्दल संग्राम ह्यांचे अभिनंदन
असो गाण्याबद्दल वर ईतके काही बोलुन झाले आहे की काही बोलण्यालायक उरलेच नाहीए..
कोण प्रॉड्युसर आहे पाहिला पाहिजे.... भारतबाला ब्रॉडक्शन ने तरी बनवायला पाहिजे होते.
असो नव्या गाण्यात दिपीका पडुकोन ला पाहुन चक्कर आली... बिएसएनएक ची जाहिरात पाहात आहे असे वाटले...
-निखिल
च्यायला.... काय रिमिक्स मारुन
च्यायला....
काय रिमिक्स मारुन कडबोळी करायला दुनियेतली सगळी गाणी संपली की काय?
इतकं छान असलेलं जुनं गाणं, त्याचा तो व्हिडिओ..सगळ्याचं मातेरं करुन टाकलं...
बरं,...ते केवळ एक गाणं आहे का?? नाही..ती आहे एक भावना..ती नव्या गाण्यात जाणवतेय कुठे?
भिकार आहे !!
भिकार आहे !!
वाईट
वाईट. दॅट्स इट.
मी जुनं गाणं जुनं म्हणून
मी जुनं गाणं जुनं म्हणून पाहीलं आणि नवीन गाणं नवीन म्हणून. जुना काळ वेगळा गाणं वेगळं; नवा काळ वेगळा गाणं वेगळं. नवीन गाण्यात मराठीला वाव दिला नाही, तसाही जुन्यातही तो कमी होता. आणि तसाही तो नाही म्हणून किती लोक हळहळले? असो. शेवटी आपल्याचं वाईट झालं तर दु:ख होतं , दुसर्याचं वाईट झालं तर तितके वाईट वाटत नाही.
-पुण्याचे पेशवे