`पुण्याचे पक्षीवैभव’ फील्ड गाईडचे प्रकाशन संपन्न
नॅचरल रिसोर्सेस कॉन्झर्वेटर्स ऑर्गनायझेशन (एनआरसीओ) या पुण्यातील संस्थेच्या वतीने वनाधिकारी व वन्यजीव तज्ञ श्री. प्रभाकर कुकडोलकर यांनी लिहिलेल्या `पुण्याचे पक्षीवैभव’ या पक्षीनिरीक्षकांसाठीच्या फील्ड गाईडचे प्रकाशन प्रख्यात पक्षितज्ञ प्रकाश गोळे यांच्या हस्ते आज जागतिक वनदिनाचे औचित्य साधून करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना श्री. गोळे म्हणाले, “पर्यावरणाचा सतत ढासळत असलेला समतोल पहाता पक्षिनिरीक्षकांनी शहरातील पर्यावरणाची काळजी घेण्यास सक्रिय होण्याची गरज आहे. पक्षांची अनेक वसतीस्थाने गेल्या दहा पंधरा वर्षात नष्ट झालेली आहेत. ही बाब पर्यावरणाची निर्देशक आहे कारण पक्ष्यांचे अस्तित्व पर्यावरण स्थिती दर्शक मानक आहे. अश्या परिस्थितीत श्री. कुकडोलकर यांच्या या पुस्तकामुळे पक्षीनिरिक्षकांची संख्या नक्कीच वाढेल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडुनचे माजी संचालक व वन्यप्राणी तज्ञ श्री. विश्वास सावरकर होते. आपल्या अध्यक्षिय भाषणात ते म्हणाले, “पुर्वी वनखात्याचा भर लाकुड निर्मितीवर असे परंतु आता वन्यजीव रक्षणाकडेही लक्ष दिले जात आहे. वनाधिका-यांना वन्यजीव रक्षणाबाबत खास प्रशिक्षण दिले जात आहे. लोकांमधेही याबाबत जागृती होत असल्याने चित्र आशादायक आहे. कुकडोलकर यांच्या पुस्तकाने लोकांचा पक्षिनिरीक्षण व वन्यजीवांमधील रस वाढेल”.
प्रास्ताविक भाषण करताना एनआरसीओचे अध्यक्ष श्री किरण नाईक यांनी सांगीतले, “उच्चशिक्षित तरुणांनी स्थापन केलेल्या एनआरसीओचा भर सतत लोकसहभागातुन निसर्ग व नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन करण्यावर राहिला आहे. याच उद्देषाने एनआरसीओने हे पुस्तक रु. २५० एव्हढ्या नाममात्र किंमतीत उपलब्ध करुन दिलेले आहे. श्री. कुकडोलकरांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले.
ते पुढे म्हणाले, “लोकसहभागातुन निसर्ग व नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्याचे एनआरसीओतर्फे भविष्यातही सुरु रहाणार असुन पुण्याचे पर्यावरण राखणा-या टेकड्यांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करण्याचा संस्थेचा मानस आहे.” पृथ्वीदिनाचे औचित्य साधत दिनांक २२ ते २४ एप्रिल दरम्यान कुकडोलकर यांनी काढलेल्या जैववैविध्य या विषयावरील छायाचित्रांचे प्रदर्शन एनआरसीओतर्फे घोलेरोड वरील महापालिकेच्या नविन कलादालनात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा देखील नाईक यांनी केली.
पक्षांची छायाचित्रे घेताना आलेल्या अनुभवांचे कथन करुन श्री. कुकडोलकर पुढे म्हणाले, “पुणे जैवविविध्यतेने समृद्ध असुन ही जैववैविध्यता टिकवणे सर्वस्वी पुणेकरांच्याच हाती आहे. विविध क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिलेल्या पुण्याने याबाबत इतरांना पथदर्शी ठरेल अशी कामगिरी करावी. टेकड्या, त्यांच्या पायथ्याशी असलेली शेती व शहर तसेच परिसरातील पाणस्थळे यांचे जतन व संवर्धन करणे जैवविविधता टिकवण्यास अत्यावश्यक आहे. माझ्या पुस्तकामुळे लोकांना यासाठी आवश्यक ती प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. याचसाठी पुस्तक अल्प किंमतीत उपलब्ध करुन दिलेले आहे. एनआरसीओच्या सहकार्याखेरीज हे शक्य झाले नसते.”
पुस्तक प्रकाशनास आर्थिक मदत करुन पुस्तकाची किंमत कमी ठेवण्यासाठी हातभार लावणा-या अॅप्लाईड मायक्रो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रदिप धारणे तसेच द पुणे टिंबर मर्चंटस अँड सॉ मिल्स असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. रतन किराड यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. पुस्तकाच्या मजकुराचे मराठीतुन इंग्रजीत भाषांतर करणारे डॉ. प्रमोद जोगळेकर, पुस्तकाचे डिझाईन बनवणारे श्री. श्रीकांत गंगापुरकर व त्यांचे चिरंजीव व्यंकटेश गंगापुरकर तसेच मुद्रणव्यवस्था करुन देणारे संस्कृती प्रकाशनचे श्री. चंद्रकांत भुजबळ यांचाही सत्कार करण्यात आला. मुक्ता गरसोळे यांनी सूत्रसंचालन केले.
.jpg)
{अभिनंदन!!!}
अभिनंदन!!!
Hope is a good thing...
{पक्षी चित्रांचे पुस्तक म्हणजे}
पक्षी चित्रांचे पुस्तक म्हणजे दृष्टीला एक खाद्यच आहे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{+१}
+१
{अभिनंदन.....!!}
अभिनंदन.....!!
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
{अभिनंदन.....!!}
अभिनंदन.....!!
वृत्तांत वाचताना एक गोष्ट मात्र जाणवली ...........हा पत्रकाराने लिहीलेला वृत्तांत आहे