खरडवही नवीन रुपात.

0
0

नमस्कार मंडळी
आज सकाळ पासून एकच प्रश्न सगळ्यांचा मनात आहेच खरडवही कुठे आहे?????
तर खरडवही एका नव्या रूपात येत आहे.... नवे रूप हे फेसबुक मधल्या वॉल सारखे आहे म्हणून खरडवहीचे नावच भिंत करण्याचा विचार आहे. अजून नाव काय असावे ह्या बद्दल सूचनांचे स्वागतच. आपल्यापैकी बरेच जण फेसबुक वापरतात त्यात वॉल कसे वापरायचे आपल्याला माहीत आहे. थोडाफार फरकाने आपली भिंत पण तशीच..
तर ह्या भीतीवर पोहचायचा पाथ आहे http://mimarathi.net/user/%/status इथे % म्हणजे तुमचा सदस्य क्रमांक.
आता आपण ही भिंत कशी वापरायची थोडक्यात बघूयात.
१) तुमच्या स्वतः:च्या भिंतीवर खरडण्यासाठी "माझी भिंत" ह्या दुव्याचा वापर करा किंवा "माझे खाते" ह्या दुव्या वर जाऊन status नावाच्या टॅब वर क्लिक करा. इथे तुम्ही काय करताय हे लिहू शकता....
२) एखाद्या सदस्याचा भिंतीवर तुम्ही त्याचा खात्यातूनच पोहचू शकता... तिथे आपण्यास खरडण्यासाठी एक खिडकी दिसेल तिथे आपण खरडू शकता
३) एखाद्या सदस्याने आपल्या भिंतीवर खरडले असल्यास आपण तिथेच उत्तर द्या वर क्लिक करून त्याचा भिंतीतीवर लिहू शकता. तसेच हे सर्व संभाषण एकत्रितरीत्या पाहण्याची सोय पण आहे.
४)आपण कोण काय म्हणतंय??? हा दुवा पाहिला असेलच त्याठीकाणी आपल्याला दिवस भराच्या भिंतीवरच्या खरडी दाखवतो. तसेच प्रत्येक सदस्य आपले स्टॅटस मेसेज अपडेट करून ह्याचा वापर खरडफळ्यासारखा करू शकतो.
चला तर मग खरडूया.

<?php$account =

1

हे अस दिस्तय माझी भिंत वर क्लिक केल तर

आपण आता चेक करावे... आपल्या

2

आपण आता चेक करावे...
आपल्या खात्यात एक पण स्टॅट्स नव्हता म्हणुन काही तरी एरर होती...
असो वरच्या प्रतिसादातील कोड काढुन टाकत आहे


-निखिल

निख्याजर कुणी भिंतीवर पचकुन

3

निख्याजर कुणी भिंतीवर पचकुन गेलं तर त्याची खबर मिळूशकेल काय रे?


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

गणपा भाउ... फेसबुकात जसा एक

4

गणपा भाउ...
फेसबुकात जसा एक अ‍ॅप्लिकेशन बार दिसतो व तिथे जसे नोटीफिकेशन दिसतात.. तसाच एक अ‍ॅपबार लवकरच चालु करण्यात येईल... तिथे तुमच्या खात्यावर नवीन खरड आली तर एक सुचना दिसेल.


-निखिल

>>एखाद्या सदस्याचा भिंतीवर

5

>>एखाद्या सदस्याचा भिंतीवर तुम्ही त्याचा खात्यातूनच पोहचू शकता... <<

तुझ्या खात्यात कसं पोहोचायचं? तुझा बिल्ला नंबर कुठून कळणार?

अदिती सध्या तरी मुख्य पानावर

6

अदिती सध्या तरी मुख्य पानावर डाव्या हाताला असलेला सक्रिय सदस्य मेन्यु हाच आहे...
सध्या खुप स्क्रॉल करावे लागते पण त्याव्र उपाय म्हणुन उघडझाप होणारे मेन्युब्लॉक लवकरच चालु करण्यात येतील


-निखिल

लई भारी

7

लई भारी

सदर सुविधा

8

सदर सुविधा खरडफळा म्हणोन छान आहे. पण खव सुविधा निराळी पाहीजेच. ४ पैसे खर्च होणार असतील तर आम्ही वर्गणी भरायला तयार आहोत.


-पुण्याचे पेशवे

लय भारी रे! आयला, हा निख्या

9

लय भारी रे!
आयला, हा निख्या आणि राजे काय काय किडे करत असतात...कवतीक वाटतं रे!

एक सुचना: भिंत हा शब्द फारच 'सरकारी भाषांतर' वाटतं राव. जर ते नाव फळा असंच ठेवलं तर चालेल काय? किंवा 'गजाल्या' किंवा 'ऐसपैस कट्टा' वगैरे शब्द कसे वाटतात?

यादी करा

10

गजाल्या
ऐसपैस कट्टा
ओसरी
अंगण
वावर
आवार
उंबरठा
सनद
....

खरं तर...

11

स्टेटसमधली मजा या भिंतीत नाही.
खरवडवहीचा पर्याय म्हणून ठीक. पण हा खफला पर्यायही होत नाहीये. माझी भिंत ही माझीच भिंत असेल. खफ हा साऱ्यांचाच होता. एकाचवेळी साऱ्यांनाच लिहिण्याचा तो एक फळा होता.
(म्हणून, या भिंती मोडल्या पाहिजेत.)
या वॉलची आणखी काही मजा असेल तर मात्र मार्गदर्शन करा राव. तो 'लुत्फ' लुटूया...
मीमचं फेसबुक होऊ शकत नाही. फेसबुकवर लेखन नसतं. मीमवर मंडळी लेखन वाचण्यासाठी, करण्यासाठीही येतात.

+१

12

>>(म्हणून, या भिंती मोडल्या पाहिजेत.)
Big smile
ह्या वाक्याशी आणि त्याच्या गर्भितार्थाशी पुर्ण सहमत!

-कॉम्रेड धमाल.

झाली का सुरु तोडाफोडीची भाषा?

13

शेवटी सगळे राडेबाज, कंपुबाज!


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

अहो याला कंस्ट्रक्टिव

14

अहो याला कंस्ट्रक्टिव डिस्ट्रक्श्न म्हणतात.
-प्रोफेशनल डिमोलीशर


-पुण्याचे पेशवे

एक मिनीट......मोडकांनी आमच्या

15

एक मिनीट......मोडकांनी आमच्या जिव्हाळ्याचा विषय निस्पृहतेने मांडल्याबद्दल धन्यवाद....

तोडा त्या भिंती

तोडा त्या भिंती.....

16

उचला त्यातल्या विटा अन फोडा बसच्या काचा! Angry


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

फोडा तिच्यामायला

17

फक्त आमच्या धायरीला सोडा!

अहो तिकडंच तर फोडायला पाहिजे....

18

बजेट सेशन सुरु व्हायच्या आधी. नाहितर परत निवडणुका होतील, अन करदात्यांचे पैसे वाया जातील.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

>>मीमचं फेसबुक होऊ शकत नाही.

19

>>मीमचं फेसबुक होऊ शकत नाही. फेसबुकवर लेखन नसतं. मीमवर मंडळी लेखन वाचण्यासाठी, करण्यासाठीही येतात.
अगदी सहमत आहे...
लेखन हाच मीमचा आत्मा आहे. त्यासंदर्भातील बदल आपणास लवकरच पाहिला मिळतील
बाकी आपण डाव्या हातच्या मेन्यु मधली "कोण काय म्हणतयं ?" हा दुवा जर बघितलात तर ह्यात आपण खफ सारखा वापर करु शकतो हे लक्षात येईल.


-निखिल

वापर करायचाच झाला तर कशाचाही

20

वापर करायचाच झाला तर कशाचाही कसाही वापर करता येईल. धाग्याचा वापर खफप्रमाणे करायची पद्धत प्रचलित आहेच. असो.


-पुण्याचे पेशवे

गप्पांचा कप्पा!

21

मला मी मराठीवर सर्वात जास्त काही आवडले असेल तर ते म्हणजे गप्पांचा कप्पा(चॅट विंडो).
बाकी सोयी/गैरसोयींबद्दल आपला रवंथ चालू द्या. Big smile

खरडवही चालु झाली होऽऽऽ........

22

'माझे खाते' ह्या दुव्यावर क्लिक करा. येणार्‍या पानावर दिसणार्‍या टॅब्जमधली सर्वात शेवटची टॅब आहे 'खरडवही'!!!!!

मला वाटते, ड्रुपल-६वर असलेल्या मराठी संस्थळांमध्ये मीमराठी हे पहिलेच संस्थळ आहे जिथे खरडवही कार्यान्वित झाली आहे हास्य
(अजुन काही तृटी असतीलही, पण जे आहे तेही नसे थोडके. हास्य )
राजे, निख्या आणि लंबुटांग ह्यांचे अभिनंदन हास्य
चार चार रात्री जागजागुन दोस्तांच्या मागणीला पुर्ण करण्याच्या फेजपर्यंत आणलंत त्याबद्दल आभार हास्य

मला खरड करण्यासाठी http://www.mimarathi.net/user/15/guestbook इथे क्लिकवा हास्य

>चार चार रात्री जागजागुन

23

>चार चार रात्री जागजागुन दोस्तांच्या मागणीला पुर्ण करण्याच्या फेजपर्यंत आणलंत त्याबद्दल आभार

येस्स....थांकू राजे

हेच म्हणतो

24

राजे, निख्या आणि लंबुटांग ह्यांचे आभार आणि अभिनंदन
आल इज वेल, आल इज वेल ;-)


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

धन्यु राजे, निखिल....

25

Star Beer


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

खरडवही व खरडफळा सुविधा चालू

26

खरडवही व खरडफळा सुविधा चालू झाली आहे. खरडवही साठी तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन नवीन आलेल्या खरडी पाहू शकता, मार्गदर्शक वर नवीन आलेल्या खरडी संख्या दाखवण्याची सुविधा लवकर चालू करण्यात येईल.

लै भारी रे मावळ्यांनो! आता

27

लै भारी रे मावळ्यांनो! आता कसं वैयक्तीक गफ्फा (कोण म्हणतंय रे चिखलफेक?) हाणायला जमतील!
समस्त टेक टीमचे आभार.


-Nile

नाईल्याशी (कधी नव्हे ते)

28

नाईल्याशी (कधी नव्हे ते) सहमत!

+२

29

सहमत आहे. टेक-टीमचे मनःपूर्वक आभार.
(टेक टीमची स्लोगन पटता तो टेक.... ठेवायला हरकत नसावी.)