महिला दिन???

0
0

कधी पुरूष दिन ऐकलाय का??? महिला दिन... का बरे? पुरूष दिन का नाही साजरा केला जात? की ज्यांची दुर्मिळतेने दखल घेतली जाते, त्यांचा एखादा दिन पाळून दखल घेतल्यासारखे दाखवायचे... खरच काय होणार आहे ह्याने? स्त्री पुरूष असे वेगळेपण जपण्याची खरंच गरज आहे का? फक्त एक स्वतंत्र व्यक्ति म्हणून का पाहता येऊ नये?

आता नैसर्गिकदृष्ट्या काही विशेष गुणधर्म स्त्री-पुरूष अशी वर्गवारी करतही असेल, जे नैसर्गिक गोष्टीबाबत जरूरी आहे. जसे स्त्रीला 'माता' होण्याचा हक्क, पुरूषाला शारीरीक दृष्ट्या कणखरता, धडाडी.. कुटुंबाचे रक्षण करण्यास... पण जेंव्हा मानव नैसर्गिकरीत्या निसर्गावर अवलंबून जगत होता तोवर ठिक... पण अता २१ व्या शतकात, जगण्यासाठी स्त्री-पुरूष अशी वर्गवारी करण्याची गरज उरलेली नसताना, प्रत्येक कार्य स्त्री/पुरूष हा भेदभाव न करता कोणतीही व्यक्ति करू शकत असताना, प्रत्येकाकडे फक्त एक व्यक्ति म्हणून पाहिले जावे... आणि खरच बाकीच्या जगात तरी हा भेद खरच उरलेला नाहीये... करीयरही बुद्धीमत्तेवर ठरत असताना अन स्वातंत्र्य मिळून सहा दशके उलटूनही खरे म्हणजे स्त्री आरक्षण वगैरे बंद करण्यात स्त्रियांनीच पुढाकार घ्यायला हवा... आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर जगाला दाखवून द्यायला हवे की जन्मतः काहीही असो पण बुद्धीत फरक निसर्गानेही त्यानुसार केलेला नाहीये.

सामाजिक मानसिकतेमुळे स्त्री वर्गाला आजवर खूप सहन करावे लागले. हुंड्यावर तिचे सांसारीक भविष्य अवलंबून असायचे अन पुरूषी मान अपमानाच्या... जसे की मुलीचा बाप हा लाचार मानला जायचा, झुकावे लागायचे... तसेच स्त्रीवर बलात्कार झाला किंवा तिने समाज नियमाविरूद्ध स्वमर्जीने वागण्याचा प्रयत्न केला तर तिच्याशी संबधित पुरुषांचा (वडिल, भाऊ, नवरा अन मुलगा) अपमाने करणे वा या कारणांमुळे काही मागास समाजात मुलीना जन्मतः मारून टाकण्याचीसुद्धा प्रथा होती.. तर तथाकथित सुशिक्षित समाजातरही गर्भपात हा उपाय सर्रास वापरला जाई. अश्या पद्धतीने स्त्रियाचे अस्तित्वच नाकारण्यात येई. अर्थात जोवर स्त्री अशिक्षीत आणि पुरूषावर अवलंबून जगत होती तोवरच, पण अता हे चित्र बदलंलय. स्त्रिया शिक्षण घेऊन हिमतीने सर्व क्षेत्रात चमकताहेत. आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत अन म्हणूनच त्या स्वतःच्या अस्तित्व रक्षणासाठी अता झगडू शकतात. मुलींचा जन्म नाकरणार्‍या अने कुटुंबांचा नवर्‍यांचा प्रसंगी त्याग करून स्त्रीया स्वतंत्रपणे आपल्या मुलींना वाढवत आहेत. अशा उदाहरणांनी समाजाला एक ईशाराच दिलाय स्त्रीने. समाजाला अता स्त्रीयांकडे बघण्याचा पुर्वग्रहदुषित दृष्टीकोन बदलावाच लागणार आहे अन मानाने तिला कुटुंब वृद्धिसाठी फक्त नाही तर सहचारीणी म्हणूनही सामिल करून घ्यावे लागणार आहें. निसर्गाने तसेही तिला 'मातृत्व' बहाल करून दाखवून दिलेच आहे तेंव्हा पुरूषी स्वभावाच्या समाजाने अता तरी हे स्विकारावे तरच स्त्री-पुरूष दोघे मिळून नंदनवन फुलवू शकतील... नाहीतर 'पुरूष दिन' साजरा करण्याची वेळ अता दूर नाही...

अन राहिला प्रश्न 'स्त्रीत्व' अन 'पुरूषत्व' यांचा तर मुलांना जन्म तर जन्माने स्त्रीच देवू शकते (अजून तरी) निसर्गनियमानुसार. मात्र मुलांचे संगोपन कोण अधिक चांगले करणार हे मात्र ठरतं त्या दांपत्यातील कोणात जास्त स्त्रीत्व आहे त्यावर. कारण स्त्री असो वा पुरूष दोघांमध्ये काही प्रमाणात स्त्रीत्व व पुरूषत्व असतंच. खरंतर या स्त्रीत्वाचा विचार केला जायला हवा.

कारण बर्‍याचदा एखाद्या स्त्रीचं वागणं खूप पुरूषी असतं अन बर्‍याचदा अश्या स्त्रिया चांगली आई किंवा पत्रीही होऊ शकत नाहीत. सतत घरातील सर्वाना आपल्या अधिकारात ठेवू पाहतात. अश्या वेळी जर नवराही पुरूषीच असेल तर लग्नच टिकने कठिण होऊन बसते तर बाकिच्या गोष्टी लांबच. पण जर नवर्‍यामध्ये स्त्रित्व जास्त असेल तर त्याच्या हळवेपणाचा पुरूषी स्त्रिया फायदा घेऊन सुद्धा त्रास देण्याची उदाहरणेही कमी नाहीत. पण असे नवरे मात्र अगदी ममतेने मुलांचा संगोपन करतात फक्त लग्न टिकवण्यासाठी तडजोड करीत मन मारून जगत राहतात. त्यामुळे फक्त पुरूष स्त्रियांवर अन्याय करतात हे म्हणणे योग्य नाही किंवा ते एकतर्फी ठरेल. तर काही उदाहरणात स्त्रियाही पुरूषावर अन्याय करतात त्यामु़ळे फक्त शारीरीक बाबींनुसार स्त्री पुरूष वर्गीकरण न करता.. फक्त एक स्वतंत्र व्यक्ति म्हणून प्रत्येकाला समजले जायला हवे.

स्त्रीत्व अन पुरुषत्व याच्या प्रमाणानुसार त्या व्यक्तिला पाहिले जावे.. प्रत्येक व्यक्तिमधे कमी अधिक प्रमाणात स्त्रीत्व व पुरुषत्व असतं. त्याशिवाय व्यक्ती पुर्ण होऊच शकत नाही

हळवेपणा,ममता, सर्व कुटुंब जोडण्याची वृत्ती, सहनशिलता... हे गुण जर निसर्गनियमानुसार स्त्रीत्वाचे असतील.. तर सर्वच व्यक्तींमधे असे गुण अधिकाधिक विकसित होऊ दे. आणि मग स्त्रीत्वाची ममता अन पुरुषत्वाची धडाडी या गुणांच्या योग्य मिलापाने नवीन्,चांगल्या 'व्यक्तीं' ची निर्मिती होऊ दे.....

{सुंदर!}

1

फार सुंदर विचार मांडले आहेत तुम्ही, चेतना. मुख्य म्हणजे स्त्री म्हणजे चांगली नि बिचारी असा विचार न मांडता स्त्रियांच्या दुर्लक्षित झालेल्या स्वभावविशेषाकडेही तुम्ही लक्ष वेधलं आहेत. पुरूष असो वा स्त्री, कोणतीच व्यक्ती परिपूर्ण कधीच नसते, ती परिपूर्ण होते ती सहचराच्या साथीने. हेच तत्व पाळून जर प्रत्येक स्त्री-पुरूषाने एकमेकांना साथ-सहाय्य केलं तर निश्चितपणे चांगल्याच व्यक्ती घडतील, तेव्हा स्त्री-दिन वगैरेची गरज पडणार नाही.

{लेख आवडला....}

2

लेख आवडला.... हास्य

{लेख पटला. खूप छान व मुद्देसूद}

3

लेख पटला.
खूप छान व मुद्देसूद लिहलेले आहेस.
आवडले.

(स्त्री-विश्व धन्य पावले आज wink )


Hope is a good thing...

{आवड्या... भारीच लिहीलंय}

4

आवड्या... भारीच लिहीलंय हास्य

>>प्रत्येक व्यक्तिमधे कमी अधिक प्रमाणात स्त्रीत्व व पुरुषत्व असतं. त्याशिवाय व्यक्ती पुर्ण होऊच शकत नाही
+१

>>अर्थात जोवर स्त्री अशिक्षीत आणि पुरूषावर अवलंबून जगत होती तोवरच, पण अता हे चित्र बदलंलय
बदलतय म्हणा हवं तर, पण पुर्णपणे बदललेलं आजिबात नाहीये. माझे याबाबतचे अनुभव थोडे वेगळे आहेत. वेळ मिळाला तर नक्की लिहेन याबाबतीत कधीतरी.

{हेच तत्व पाळून जर प्रत्येक}

5

हेच तत्व पाळून जर प्रत्येक स्त्री-पुरूषाने एकमेकांना साथ-सहाय्य केलं तर निश्चितपणे चांगल्याच व्यक्ती घडतील, तेव्हा स्त्री-दिन वगैरेची गरज पडणार नाही.


{सुंदर लिहिले आहे}

6

सुंदर लिहिले आहे

{सुंदर! एव्हढे समतोल विचार जर}

7

सुंदर! एव्हढे समतोल विचार जर दोघांचेही असले तर आयुष्य स्वर्ग होईल. चेतना, ग्रेट!

{+१ पण हेच अवघड असते रे...}

8

+१

पण हेच अवघड असते रे...


Hope is a good thing...

{छानच लिहिलय ग !!!!!}

9

छानच लिहिलय ग !!!!!


----निवेदिता--------

{धन्यवाद सर्वांना..}

10

धन्यवाद सर्वांना.. हास्य

{फार सुंदर विचार मांडले आहेत.}

11

फार सुंदर विचार मांडले आहेत.


___________________________________
योगेश नाईक