"निवडक नवयुग" - आचार्य अत्रे
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अनन्यसाधारण योगदान असून त्यात आचार्य अत्रे यांचे नाव प्रामुख्याने येते. उत्तम वक्ता, हजरजबाबी माणूस, सिध्दहस्त लेखक, कवी, पत्रकार, टीकाकार, नाटककार असा बहुआयामी व्यक्तिमहत्त्वाने तो विडाच उचलला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील तसेच महाराष्ट्रातील साहित्य आणि सांस्कृतिक विश्वातील एक चौरस्त्र व्यक्तिमहत्त्व "आचार्य अत्रे" यांना महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गौरवांजली देण्यासाठी एक विषेश पुस्तक निर्माण केले गेले.
आचार्य अत्रे यांनी १९४० साली "साप्ताहिक नवयुक" सुरु केले व १९६२ सालापर्यंत चालवले. या २२ वर्षाच्या कालखंडात या साप्ताहिकातून त्यांनी कला, साहित्य, राजकिय, व्यक्तिविषयक इ. अनेक विषयांवर रोखठोक लेखन केले. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर त्यांनी आपली तोफ गर्जत ठेवली. १९४० ते १९६२ या कालखंडात 'नवयुग'चे विशेष योगदान होते, याच कालखंडात भारतदेश स्वतंत्र झाला व महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, अशा या कालखंडातील निवडक मजकूर संकलित करून "निवडक नवयुग" हा संग्राह्य ग्रथ तयार केला आहे.
अत्र्यांविषयी पु.ल. देशपांडे, प्रभाकर पाध्ये, वसंत बापट, सुधा अत्रे यांचे लेख आहेत, तर अत्रे उवाच, कला, साहित्य, व्यक्तिविषयक, द्विभाषा, सयुक्त महाराष्ट्र, लेख, भाषणे, व्यंगचित्रे अशा अनेक सदरात वाचनीय लेख एकत्र असलेला हा ग्रंथ म्हणजे अमुल्य अशी ठेव आहे.
संकल्पना / संकलन / संपादन : अनिल कोठावळे
किंमतः ७५०.०० रु.
पान संख्या: ५४०
आकार : ए४ साईज (पुर्ण)
कागद गुणवत्ता: उत्तम
पुस्तकाचे वजन: १.५ (+ / -)
उपलब्धता : काहीच प्रती
विक्री व्यवस्था : मी मराठी.नेट ( संपर्क : admin@mimarathi.net / राजे )
खरेदी नंतर पुस्तक हाती पडण्याचा कालावधी कार्यालयीन २-३ दिवस महाराष्ट्रात.

.jpg)
{पुस्तक मागवलय.. वाचल्यावर}
पुस्तक मागवलय.. वाचल्यावर परिक्षण लिहेनच...
{हॅ हॅ हॅ}
वाचल्यावर परिक्षण लिहेनच...
हॅ हॅ हॅ
This is imperfect universe
{भारताबाहेर पाठवू शकता का ?}
भारताबाहेर पाठवू शकता का ?
{भारताबाहेर पुस्तक पाठवण्यास}
भारताबाहेर पुस्तक पाठवण्यास अडचण काही नाही, परंतु पाठवणी खर्च खूप जास्त येतो म्हणून तो पर्याय दिलेला नाही आहे.
धन्यवाद.
Hope is a good thing...