प्राँस् पालक

0
0

पालक पनीर हा प्रत्येक हॉटेलमध्ये मिळणारा आणि सर्वत्र आवडीने खल्ला जाणार पदार्थ.
पण मला स्वत:ला पनीर जास्त आवडत नाही त्यामुळे आज यात थोडा फेरफार करुन याची नॉनव्हेज आवृत्ती केलेली.

साहित्य :
१ जुडी पालक
१५ - २० मोठ्या कोलंब्या
२ चमचे आल+लसुण पेस्ट
१ चमचा मालवणी मसाला
१ मोठा कांदा बारीक चौकोनी चिरलेला
२ चमचे गरम मसाला
मीठ चवी नुसार
२-३ चमचे तेल
लिंबाचा रस

कृती :


पालक नीट धुऊन घ्यावी. एका मोठ्या भांड्यात पाणी घालून त्यात २-३ चम्चे लिंबाचा रस टाकुन पालक शिजवून घ्या.
(शिजताना वर झाकण ठेवु नये. पालकचा हिरवा रंग काळपट होतो.)
पालक ७-८ मिनीटात शीजते. थोडया वेळाने गार झालेली पालक मीक्सर मध्ये घालून पेस्ट करा.


पालक शिजतेय तोवर कोळंबिला आल+लसुण पेस्ट, मालवणी मसाला, मीठ, लिंबाचा रस लावुन मुरत ठेवा.

एका भांड्यात २-३ चम्चे तेल घेउन त्यात कोळंबी २-३ मिनिटे परतवुन अर्धवट शिजवुन घ्यावी. आणि वेगळी काढुन ठेवावी.


त्याच भांड्यात नंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतवावा.
कांदा गुलाबी झाला की त्यात २ चमचे गरम मसाला टकुन चांगला परतुन घ्यावा.
खाली लागत आसल्यास किंचीत पाणी घालाव.


बाजुने तेल सुटुलागल्या वर पालकची पेस्ट त्यात टाकावी.
मध्यम आचेवर २-३ मिनिटे शिजवल्यावर त्यात कोळंबी टाकावी.
मीठ चवी नुसार घालाव . ( मीठ जरा बेताने घालाव कारण पालक मध्ये क्षारांच प्रमाण बरच असत. )
मंद आचेवर ४-५ मिनीट शिजू द्या. शीजताना झाकण ठेउ नये.


गरमा गरम भाता बरोबर किंवा चपाती, भाकरी बरोबर हा प्रकार भन्नाट लागतो.

{...}

1

{....}

2

....

{आता दिसत}

3

आता दिसत आहेत फोटो

{अग्दी}

4

अग्दी हार्ट शेप न ऑल ....वावा गणपा रोमान्तिक दिस्तोय wink

{एकतर गणपा}

5

एकतर गणपा किंवा प्रॉन्स wink

{आब्बाब्बाबाबाबा....}

6

पालक आणि प्रॉन्स?

च्छ्या:! ह्या राजेनं 'Drooling'चं स्मायलीच दिलेलं नाही राव Sad

बोला..गणपाच्या नावान्नं...चांऽऽगभलं!!!!!!!

{हा हा हा!}

7

काय गंमत आहे बघ. तुला पनीर फारसा आवडत नाही तर मला प्राँन्स फारसे आवडत नाहीत. त्यामुळे पालकपनीरचे नाव घेउन केलेल्या ह्या पाकृबद्दल विशेष ममत्व वाटत नाही आहे हास्य

बाकी तु केली आहेस म्हणजे खास असणारच हास्य

{अ‍ॅडजेस्ट माडी स्साऽऽर!!}

8

त्याला प्रॉन्सवालं खाऊद्या, तुम्ही पनीर घाला त्यात हास्य
शिंपल!

{आम्हाला}

9

जळवणा-या मित्रांच्या धाग्यावर आम्ही प्रतीसाद का द्यावा.
आता कंपु बनवुन तुझ्या प्रत्येक पा.कृ. वर "चुकिचे असे टाचण देणार" आहे.

फोटो टाकुन आमी बी जळीवणार

गणा पालक चिकन/मटण खाल्ल आहे. हा प्रकार कधी सुचालाच नाही. लवकरच करुन खाईन. एका सहज आणि सुंदर पा.कृ.ची माहीती करुन दिल्या बद्दल धन्यवाद.
जयपाल झिंगाडा


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{भयानक !}

10

भयानक !


Hope is a good thing...

{एक नंबर रे}

11

एक नंबर रे गणपा !!

बाकी प्रॉन्स खात रहावे मध्ये-मध्ये ..बी-१२ प्रमाणात रहाते त्याच्याने !!

{अरेरे...}

12

अरेरे... त्या १५-२० कोलंब्यांच्या आत्म्याला शांती मिळो. असो.

{+१ सहमत}

13

सहमत


-निखिल

{छान....कधी पाठवताय इकडे??}

14

छान....कधी पाठवताय इकडे??

{१स्ट क्लास}

15

मी करुन पाहिलीपण... फस्टक्लास झालेली..

जयपालजी तुमच्या फोटोतल्या कोलंब्यापण डेडली दिसताहेत हास्य

{ह्म्म्म ! ह्म्म्म्म्म !}

16

ह्म्म्म !

ह्म्म्म्म्म !

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म !

चांगले चालू आहे हां ... हा गणपा येथे चिटकवणार... आम्ही लाळ गाळणार... दुसरेच कोणीतरी करुन खाणार करणार .... आम्ही उपाशी..


Hope is a good thing...

{तुम्ही उपाशी.. सहमत}

17

तुम्ही उपाशी..
सहमत

{वाह वाह!!!}

18

गणपा तुस्सी ग्रेट हो!!! Grade


--------------------
सिद्धार्थ
माझ्या गजाल्या

{तोंडाला पाणी सुटलय}

19

तोंडाला पाणी सुटलय हास्य

{छान...}

20

छान...