लहानपण देगा देवा|| मुंगी साखरेचा रवा||
ऐरावत रत्न थोर|| त्यासी अंकुशाचा मार||
कालपासून का कोणास ठाऊक शाळेतील, गल्लीतील, घरातील बालपणाच्या आठवणी येत होत्या. काल गल्लीतली मैत्रिण भेटली एस्.टी. तिथेसुध्दा लहानपणीच्या आठवणी निघाल्या.सकाळीच शाळेतील खास मैत्रिणीबरोबर सगळ्या आठवणीना उजाळा दिला, तो देखील एस्.टी मध्ये. किती खेळलोकिती तो दंगा, मस्ती सर्व काही आठवणी डोळ्यासमोरुन तरळून गेल्या, अगदी कालच घडून गेल्यासारख्या....
आज वाटतय किती सूंदर होतं माझं बालपण(कदाचित सगळ्यांचच असाव), कसली चिंता नव्हती ना कसली काळजी फक्त दंगा अन् अभ्यासपण(करत होते बर का अभ्यास लहानपणी, त्याशिवाय का वर्गात २ रा नंबर यायचा?
)
तर आज वर्गमैत्रिणी बरोबर बोलताना किती आठवणी जाग्या झाल्या तशी ती अन् मी दुसरीपासून एकत्रच ते दहावी पर्यंत, पुढे ती मेडिकलला गेली - आज डॉक्टर आहे (नि मी कळफलक बडवणारी) नेहमी तिचा पहिला अन् माझा दुसरा नंबर, मग हुशार विद्यार्थी कसे एकत्र असतात तसे ती अन् मी एकत्र! कितीतरी शाळेतील आठवणी जाग्या झाल्या. ती अन मी गेल्या दिवाळीपासून रोज भेटतो आहोत म्हणजे येताजाता..! खरच खूप हसायला मिळाल त्या आठवणी जागवून.... ते आठवणींच गाव इतकं सुरेख होतं की एस्.टी रंकाळ्याजवळ कधी आली ते समजलच नाही. आता पुढच्या एस्.टी चा प्रवास (एकटीनेच) दुसर्या एस.टी त बालपट मनातल्या मनात रिवाइंड होत होता..... अन् वाटलं खरच आताच्या आत्ता लहान होता आलं असतं तर....
माझ लहानपण अगदीच साधं जस खेड्यातल्या चार चौघी मुलींच असतं तसच. गावातच शाळा मग काय बाहेरच्या जगाशी कधी संपर्कच नसायचा. असाच पहिला प्रसंग आठवला (आईकडून ऐकलेला, मला पुसटसा आठवतोय) मी बालसुदृढ स्पर्धेत भाग घेतला होता, स्पर्धा दुसर्या गावी होती. गल्लीतलीच एक मुलगीसुध्दा आली होती.(माझी मैत्रिणच) स्पर्धा झाली. परिक्षकांनी निकाल जाहिर केला. तर तिचा पहिला नंबर अन् माझा दुसरा... मग काय विचारता स्वारी रडतच परत. तिथ जे रडं सुरु झालं ते मामाच्या घरात पोचेपर्यंत... घरी सुध्दा रडतच मग आण्णांनी (आईचे बाबा) समजूत काढली. मग स्वारी कशीबशी गप्प बसली (तसाही इतका वेळ रडून कंटाळाच आला होता म्हणा ना).पहिला नंबर बसला नाही म्हणून मी
फार मोठ्ठ गाणं गायलेलं हे आई सांगायला लागली की हसू येतं.
घरामध्ये हट्टी असायची, वर्गात हुशार मुलगी म्हणून गणली जायची, गल्लीत अरेरावीपणा करायची, भांडणसुध्दा करायची (मोडककाकाना माहितेय). गल्लीतल्या सगळ्यांनी मी सांगेल तोच खेळ खेळायचा थोडक्यात म्होरकेपण सुध्दा करत होते. शाळा सुटली की तडक घरात अन् चहा घेऊन गल्लीत हजर. सगल्या मुली जमायच्या मग चकायचं. जे कोण चकताना सुटत नाही त्याच्यावर डाव मग लपाछपी, दगडमाती, 'आपिटोपी टप हातकणंगले रंग कोणता?', विषअमृत् ,'मुंबई दिल्ली कलकत्ता', 'करंट्शॉक' विटीदांडू साखळी, जिबली असे नानातर्हाचे खेळ खेळायचे. खूप धम्माल यायची, कधी कधी एकाद्याला मुद्दाम डाव द्यायचा. अन शनिवारी, रविवारी जेवणापाण्याचा खेळ...! मग आमचे संसार थाट मांडायचे ते फूलांच्या झाडावर. घरासमोर मोठा पार त्याच्यावर दोन मंदिरे तिथे २-३ फूलांची झाडे - जास्वंदी, पांढर्या फूलाचं.... मग मज्जा यायची, घरून खायला घेऊन यायचं.
चपात्या म्हणून झाडांची पाने औषधाच्या टोपणांनी घासायचीत मग काय गोल हिरव्या चपात्या तयार! जेवायला बोलावायचं
मैत्रिणीला! मग कस बोलवायच? तर फोन करून मंदीर तिथच असल्याने नारळाच्या शेंड्या सहज मिळायच्या, त्याला काथ्या किंवा सुतळी एका कडेला बांधायची अन् तिच एक टोक झाडाच्या फांदीला बांधायचं. झाले आमचे फोन तय्यार....!
प्रत्येकाची रिंगटोन वेगळी... कोनाची किलीलिक्..किलीलिक तर कोनाची ट्रींग ट्रींग.....मग मजा....मस्ती अन् भांडण सुध्दा
असायच.
कितीतरी वेळ खेळण, घरात आल्यावर प्रत्येकाच ओरडून घेणं हे बर्याचदा ठरलेलं असायचं.शाळेतसुध्दा दंगा सुरुच असायचा. तिसरी चौथीत असताना बाई दगडी झाडपाल्याची माहिती सांगत होत्या. इथ कुठे मिळले दगडी झाडपाला असे बाईनी विचारताच मी म्हणाले "मी आणीन" कारण बाई ज्यावेळी त्याच्या पानाफुलांचं वर्णन करत होत्या तेव्हा मला पारावरची छोटी रोपटी आठवत होती. दुपारची घंटा झाली जेवायला घरी पळतच आले. जेवले समोर पारावरून दोन पाने तोडली, छोट्या प्लास्टिकच्या पिशवीत घातलीत. एका हातात लाकडी पट्टी (शाळेत पट्ट्या चोरीला जायच्या म्हणून जेवायला येताना घेऊन यायची अन् परत न्यायची) आणि ती पिशवी अन् दुसरा हात फ्रॉकच्या खिशात खाऊ खायला....
अशीच स्वारी रमत गमत शाळेत हजर झाली. अन् ती पानं बाईच्याकडे दिली. बाई म्हणाल्या नव्हे ही... दुसरी असतात मग काय थोडा वेळ खट्टू झाले... शाळा सुटल्यानंतर घरी परत मग घरातल्या कोणीतरी सांगितलं ती पानं काँग्रेस गवताची.... आजही ही गोष्ट आठवली मराठीशाळेतला तो वर्ग आठवतो आज जिथं मी मतदान करायला जाते.........
(अशा बर्याच गमती जमती आहेत, लिहीन पुन्हा कधीतरी)
मस्त आठवणी
मस्त आठवणी !!!
१+
असेच म्हणतो.
अरे ! मस्त
अरे !
मस्त लिहले आहेस... एकदम ओघवती शैली... !
वाचून संपले कधी हे सुधा कळाले नाही... सुरेख !
लिहीत राहा.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+१
मस्त लिहले आहेस... एकदम ओघवती शैली... !
लहानपण
लहानपण किती सुंदर असतं ऐकायचय? ऐका तर मग.
http://www.in.com/music/track-lahanpan-dega-deva-197525.html
सुरेख आठवणी
छान लिहिले आहेस.. बरीच मजा केली आहेस लहान असताना.
लिहित रहा...
लिहित रहा... वाचतो आहे!
+१
मोडकांशी सहमत ...
तुम्ही लिहीत रहा, आम्ही वाचत राहु.
च्यायला ह्या विषयावर लिहायचं म्हणजे कठिणच आहे अणि शिवाय फार त्रासिक आहे.
त्यामुळे तुर्तास नुसताच वाचत राहण्याचा पर्याय निवडतो व तुम्हाला अजुन लिहा अस्से सुचवतो.
तू आमच्या
तू आमच्या बिल्डिंगीत रहायचीस का गं?
+१
बिकांशी सहमत ...
तुम्ही लिहीत रहा, आम्ही वाचत राहु.
च्यायला ह्या विषयावर हल्ली आजारी असल्याने चार लायनी टाकल्या होत्या..
आमच्याकडे वाचनमात्रचा पर्यात आहे पण तुम्हाला अजुन लिहा अष्षे षुचवतो.
- (आजारी) खोटा रुग्ण
छान...!
छान...!
ह्म्म्म....अ
ह्म्म्म....असय तर.
चांगला लेख.
मस्त.
मस्त.
बालपण जागं केलंस......
एकदम मस्त लिहिलय. माझ्यापण भूतकाळातल्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
सह्हीये!!
स्नेहाराणी,
मजा आली गं वाचायला
पुन्हा एकदा मागे जाऊन स्वतःचं बालपण पाहुन आलो बघ
बालपण
बालपण आवडले !!
सर्वच काळ सुखाचा ""
एक शेर आठवला ..
" बेघर हुवे तो यार भी, अगयार हो गये "
"दामनमे जितने फुल थे, खार हो गये "
"और क्या गिरायेगी,दुनिया अपनी निगाहसे "
"ईतने जलील हुवे के,खुद्दार हो गये "
छान लिहिले आहे
छान लिहिले आहे
-निखिल
मस्तच लिहिलंय!
मी ही अल्लद बालपणात पोचलो.
अतिशय छान लेखन.. आवडले.. असेच
अतिशय छान लेखन.. आवडले.. असेच लिहित जा !
लहन पण देगा देवा
लेख वाचता वाचता मी पण माझ्या भुतकाळात एक मस्त फेरफटका मारुन आलो. खुपच छान लिहल आहे वाचतान कस्स गप्पा मारल्या सारख वाटत होतं. आख्खा दिवस गावभर गाडा फिरवण आणि तोंडाने हार्न वाजवण आठवलं
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
छान लेख आहे.
छान लेख आहे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही