'दिल से' फ्रेंच टोस्ट
आजच्या ह्या खास दिवशी आपल्या बायको/मैत्रीणीला खुश करण्यासाठी सोपी पाक्रु..
अंडे एका वाटीत फोडून घ्या. थोडं तिखट मीठ घाला. नीट मिसळून घ्या.
ब्रेडचा स्लाईस heart च्या आकारात कापून घ्या. आधी हळूच हलक्या हाताने सुरी फिरवून आकार काढायचा ब्रेडवर अन मग जोरात फिरवुन कापायचं. (म्हणजे चुकत नाही..
)
आधी ब्रेड तव्यावर थोडासा भाजून घ्या. म्हणजे त्याला जरा घट्टपणा येऊन तो तुटत नाही.
तव्यावर थोडं तेल सोडा. मग ब्रेड अंड्यात अलगद अन पटकन बुडवुन (दोन्ही बाजूनी) त्यावर ठेवा. अन दोन्ही बाजूनी खरपूस भाजा.. !
केचप बरोबर सर्व्ह करा..
'दिल से' फ्रेंच टोस्ट खायला तयार..!!!
माझ्या नवर्याच्या डोक्यातून निघालेली idea आहे ही. 'मी एकदम खुश..!!!' हे सांगायची काही गरज आहे का?? ;-)
.jpg)
{खूप सोपी कृती व शेवटचा फोटो}
खूप सोपी कृती व शेवटचा फोटो लाजबाब.
करतो. करेन. व करेगें
{जब्बाराssssssssssssss !}
जब्बाराssssssssssssss !
Hope is a good thing...
{मस्तच...}
मस्तच...
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{आयडियेची कल्पना लै भारी}
आयडियेची कल्पना लै भारी
सकाळच्याला हे आणि दुपारच्या नाश्त्याला (कापुन) उरलेल्या ब्रेड पासुन केलेला उपमा झकास बेत होईल
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{अरे वा.. छान कल्पना आहे..}
हे काही मला सुचलं नाही.. नवर्याचं सगळं करुन झाल्यावर मी अगदी ग्रुहिणीचा आव आणत 'ते तुकडे वाया काय घालवायचे' म्हणत ते ही अंड्यात बुडवुन भाजून घेतले..
{गणपा आहे तो}
गणपा आहे तो
Hope is a good thing...
{हो ना..}
एखाद्या खर्या ग्रुहिणीला ही (फक्त माझ्यासारख्या आव आणणार्याच नाही) लाजवेल अशी skills आहेत.. काय एकेक पाकक्रुती असते..(व्हेज बिर्याणी डोळ्यासमोर येतेय..) खल्लास होतो जीव..!!!
{लाजला बेचारा}
लाजला बेचारा
Hope is a good thing...
{धन्यवाद..}
धन्यवाद..
{वर्ल्डकप चालू होत आहे,}
वर्ल्डकप चालू होत आहे, त्यासाठी खास अशी एखादी रेसेपी येऊ द्या
Hope is a good thing...
{अहो काहीही काय..}
वर्ल्डकप साठी मी कसली खास रेसिपी देतेय... मी आपली प्रयोग करत असते.. ते काम बाकीच्या एक्स्पर्टस चं आहे..
{>>एक्स्पर्टस चं माझ्या मते}
>>एक्स्पर्टस चं
माझ्या मते ज्याला किचन मध्ये चहा करता येतो त्याच्या पासून निरनिराळे प्रयोग करणारे एक्स्पर्टस !!!
नाही तर, आमच्या सारखे... फक्त खाऊ एक्स्पर्टस
Hope is a good thing...
{एकदम झकास पाकृ}
एकदम झकास पाकृ
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{व्वा}
मी करनार हे
{छान}
छान
{नवीन काही प्रयोग केले नाहीत}
नवीन काही प्रयोग केले नाहीत का
Hope is a good thing...
{केले ना..}
लवकरच टाकेन पाक्रु.. टंकायचा कंटाळा येतो एकदम सगळं.. आता थोडं थोडं वेळ मिळेल तसं लिहून ठेवलं पाहिजे..
{छान}
खरा फ्रेंच टोस्ट हा गोडसर असतो. पण कधी-मधी असा तिखटमिठाचा करायलाही बरे वाटते.
{राजेंना माझ्या घरी आल्यावर }
राजेंना माझ्या घरी आल्यावर त्यांना माझ्या हातचा फ़्रेंच टोस्ट खावा लागला होता...
तेंव्हापासून.....
.... ते मला बरेच वचकून असतात.....
..............................................................
क्या फर्क पडता है?