महाभारत युद्ध (अंतिम भाग)
दिवस १६
अश्वत्थाम्याच्या विनंतीनुसार कर्णाला सेनापतीपद देण्यात आले. हताश दुर्योधनाला कर्णानी धिर देण्यास सुरुवात केली. कर्ण त्याला म्हणाला "हे मित्रश्रेष्ठा चिंता करु नकोस , मी नक्कीचा अर्जुनाल युद्धात वधुन तुला विजय मिळवुन देईन. मी धनुर्वीद्येत त्याच्याहुन श्रेष्ठ आहे, त्याच्या जवळ असलेली जवळहवळ सर्व अस्त्रे माझ्याही भात्यात जमा आहेत. माझे हे विजय धनुष्य हे विश्वकर्म्यानी इंद्रासाठी बनवले होते, ते इंद्रानी माझे गुरु परशुराम ह्यांना दिले आणी आता त्यांच्या आशिर्वादाने ते माझ्या हातात आहे. हे विजय धनुष्य गांडीवाहुनही श्रेष्ठ आहे."
"परंतु हे ही खरे आहे की रथावर स्वत: पवनपुत्र हनुमान पताकेवर आरुढ असताना आणी रथाचे सारथ्य स्वत: जगनियंत्रक भगवान श्रिकृष्ण करत असताना तो रथ आणी अर्जुन हे दोघेही अभेद्य बनले आहेत."
आज कर्णानी मकरव्युह रचले होते. खरेतर दोन्ही पक्षांकडे आता फारशी सेना अशी उरलीच न्हवती.
आजपासुन पुन्हा एकदा पितामहांनी घालुन दिलेल्या नियमांप्रमणेच युद्ध होईल असा आदेश कर्णानी दिला. भिम अश्वत्थाम्यावर, सात्यकी व्रिंदा अरविंदावर तर युधीष्ठीर आणी शिखंडी दुर्योधन आणी कृपाचार्यांवर चालुन गेले. सात्यकीने व्रिंदाचा आणी भिमाने अरविंदाचा वध केला.
नकुल तोवर कर्णाला आव्हान देउन त्याच्यावर चालुन गेला. "पांडवांच्या किर्तीत रुतलेल्या काट्या, आता तुला वधुनच मी युद्धभुमी सोडीन" असे गर्जन नकुल तुटुन पडला. चेहर्यावर मंद हास्य आणत काही वेळातच कर्णानी त्याच्या सर्व अस्त्रांना मोडीत काढले, शस्त्राचे तुकडे करुन त्याल्या शस्त्रविहिन आणी रथ उद्ध्वस्त करुन रथहीन करुन टाकले. नकुलाजवळ रथ घेउन कर्णानी आपले धनुष्य त्याच्या गळ्यात अडकवले. "काय झाले बाष्फळ बडबड करणार्या मुर्खा ? संपल्या तुझ्या वल्गना ? जा मी तुला जिवनदान देतो, ह्यापुढे आपल्याहुन सरस असणार्यांसमोर उभा राहायचे धाडस करु नकोस" असे गर्जत कर्णानी त्याल जिवनदान दिले.
काही वेळातच अर्जुन आणी कर्ण अचानक समोरासमोर आले आणी एका भिषण युद्धाला सुरुवात झाली. दोन्ही बाजुंचे अनेक सैनीक ह्यात मारले गेले. अर्जुनाच्या प्रत्येक दैवी अस्त्राचा कर्णानी बिमोड केला. सर्वात शेवटी तो युद्धात अर्जुनाच्या रथाची प्रत्यंचा तोडणारा पहिला विर ठरला. इकडे अर्जुन शस्त्रहीन झाला आणी तिकडे सुर्य मावळला. युद्ध नियमाप्रमाणे अर्जुनाला बंदी न बनवता सुर्यास्त झाल्याने कर्णाचा रथ आपल्या शिबीराकडे वळला.
दिवस १७
सकाळी सकाळी दुर्योधन शल्याच्या शिबिरात शिरुन त्याच्यापुढे हात जोडुन उभा राहिला.
"हे पराक्रमी राजा, कर्णानी आज तो अर्जुनाला वधेल असे मला वचन दिले आहे. ह्या मार्गात सगळ्यात मोठा अडथला आहे तो म्हणजे कर्णाकडे कृष्णाच्या तोडीचा सारथी नाहीये. तेंव्हा तुम्ही आज कर्णाचे सारथ्य कराल काय ?" दुर्योधन नम्रपणे विचारता झाला.
त्याचे शब्द ऐकुन शल्य रागाने लालेलाल झाला. "दुर्योधना तु काय बोलतोयस तुला शुद्ध आहे का ? मी एक क्षत्रीय आहे, मी महान राजा आहे आहे. मी एका सुतपुत्राचे सारथ्य करु? त्या पेक्षा मी माझ्या राज्यात परत निघुन जाणे पसंत करीन" शल्य म्हणाला.
"हे महाबाहो, ह्या अखील आर्यावर्तात कृष्णाच्या बरोबरीचे अथवा त्याहुन श्रेष्ठ असे सारथ्य कोणी करु शकत असेल तर ते फक्त तुम्ही. जेंव्हा शंकराने त्रिपुरासुराचा वध केला तेंव्हा ब्रम्हदेवाने नाही त्यांचे सारथ्य केले ? दुर्योधन विनयाने म्हणाला.
नाही म्हणले तरी ह्या स्तुतीने शल्य थोडा फसला आणी खुशीतच सारथ्य करायला तयार झाला.
त्याच्या ह्या निर्णयाने कर्ण अत्यंत आनंदीत झाला. रथाला एक प्रदक्षीणा घालुन त्यानी आधी शल्याला रथस्थ होण्याची विनंती केली. दुर्योधनाला गाढ अलिंगन देउन तो महायोद्धा रणक्षेत्राकडे वळला.
आज कर्ण आणी दुर्योधन वधलेच गेले पाहिजेत ह्या कृष्णाज्ञेचे पालन करण्यास आतुर पांडवही रणांगणात पोचले. सुशर्मन, वृषसेन आणी सत्यसेन हे कर्णाचे तीन पुत्र त्याच्या भोवती कडे करुन होते तर सात्यकी, शिखंडी, भिम, दृष्टद्युम्न, नकुल आणी सहदेव हे एकाच वेळी त्यांच्यावर चालुन गेले होते.
वार्यानी ढगांना उधळुन लावावे तसे कर्णानी त्यांना पळवुन लावले. आत युधीष्ठीर कर्णाला आव्हान देता झाला. थोड्याच वेळात कर्णानी त्याचा धनुष्य मोडला, रथ तोडला त्याला शस्त्र अस्त्र विहिन करुन गुढघे टेकण्यास भाग पाडले. त्याच्या छातीला आपल्या धनुष्याने टोचत कर्ण म्हणाला "क्षत्रीयांमध्ये जन्माल आलेला पण ब्राम्हणाचे हृदय असलेला तु एक अत्यंत पापभिरु असा क्षत्रीय आहेस. तु म्हणाला होतास ना की एका सुतपुत्राची क्षत्रीयां बरोबर काय बरोबरी ? आता क्षत्रीय असुनही तुझी तरी क्षत्रीयांबरोबर बरोबरी करता येउ शकेल काय ? जा आणी अर्जुनाला सांग की तुला कर्णानी जिवदान दिले आहे म्हणुन."
युधीष्ठीराच्या अपमानाने कृद्ध झालेला भिम कर्णावर तुटुन पडला, एका घनघोर युद्धानंतर कर्णाच्या बाणांनी भिम बेशुद्ध होउन कोसळला. ही वार्ता कळताच युधीष्ठीर पुन्हा कर्णावर चालुन गेला, मात्र काही वेळातच गंभीर जखमी होउन त्याला शिबीरात हलवावे लागले. ही वार्ता कळताच युद्धभुमी सोडुन कृष्णार्जुन त्याला बघायला धावले.
काही वेळातच परतलेल्या संतप्त अर्जुनाने आपला रथ कर्णाच्या रथाकडे घेण्याची विनंती कृष्णाला केली. दोघेही समोरासमोर येताच एका महाभयंकर युद्धाला सुरुवात झाली.
सात्यकी आणी भिम अर्जुनाच्या मदतीला धावले. सात्यकीने कर्णपुत्र सुशर्मनचा वध केला तर कर्णानी दृष्टद्युमनाच्या मुलाला ठार केले.
आता शिखंडी, ज़न्मजय, युधमन्यु, उत्तमौजस आणी दृष्टद्युम्न हे ५ महावीर एकतर कर्णावर चालु गेले पण सहजपणे कर्णानी त्यांना पळवुन लावले. ह्या गडबडीत दुर्योधन आपला भाउ दु:शासनासह कर्णाच्या मदतीला धावला. दु:शासनाल बघुन चवताळलेल्या भिमानी एकच गर्जना करुन दु:शासनावर आक्रमण केले. एका घनघोर युद्धानंतर भिमाने दु:शासनाला त्याच्या रथातुन खाली फेकले आणी प्रतिज्ञेप्रमाणे त्याचे हात उपटुन फेकुन दिले, त्यानंतर त्यानी दु:शासनाची छाती फोडुन त्यातील रक्त प्राशन केले. त्याचे हे रुप बघुन अनेकांना मुर्च्छा आली.
तेव्हड्यातच आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे अर्जुनाने कर्णाच्या नजरेसमोरच त्याच्या पुत्राचे वृषसेनाचे डोके उडवले. चवताळलेला कर्ण प्राणपणानी लढु लागला. अग्नी, वरुण , इंद्र सर्व अस्त्रांचे एकमेकांवर प्रयोग करुन झाले. तेव्हड्यात कर्णानी गुरु परशुरामांकडुन प्राप्त झालेल्या भार्गवस्त्राचा प्रयोग केला. त्या अस्त्रानी पांडव सेना लाखोच्या घरात धारातिर्थी पडली. अर्जुनानी ब्रम्हास्त्राचे प्रक्षेपण करुन भार्गवास्त्राचा प्रभाव नाहीसा केला. सर्व सैनीक ,योद्धे आपापली युद्धे थांबवुन हे युद्ध बघु लागले. येव्हड्यातच कर्णानी अजुन एक पाशवी नागास्त्र अर्जुनाच्या दिशेने फेकले. सावध कृष्णाने रथाचे घोडे गुडघ्यावर बसवुन हे अस्त्र अर्जुनाला स्पर्शणार नाही ह्याची पुरेपुर काळजी घेतली. अर्जुनाच्या छातीचा वेध घेउन सोडलेले ते अस्त्र अर्जुनाचा किरिट घेउन अंत पावले. आता मात्र कर्णाच्या भात्यातील सर्व अस्त्रे संपली तरीही तो लढतच होता.
पण...
तेव्हड्यातच त्याच्या दुर्भाग्याला सुरुवात झाली. त्याचे एक रथचक्र शापानी जमिनीत धसले. रथाखाली उडी मारुन कर्णानी रथचक्र काढायचा आटापिटा चालु केला. ती एकच वेळ होती जेंव्हा त्याच्या हातातील धनुष्य खाली ठेवले गेले.
"हे महाधनुर्धरा , थांब मला रथचक्र उद्धरु दे, एका नि:शस्त्रावर वार करणे हा धर्म नाही." कर्ण अर्जुनाल म्हणाला.
त्याचवेळी कृष्ण ताडकन वदला " आज तुला धर्म आठवला राधेया ? प्रत्येक अधर्मात दुर्योधनाची साथ देताना, पांचालीला भरसभेत विवस्त्र करताना हा तुझा धर्म कुठे गेला होता ? तेंव्हा तर तीचा अपमान करण्यात तु सगळ्यात पुढे होतास, अभिमन्युला तुम्ही सर्वांनी वधले तेंव्हा तुझा धर्म कुठे गेला होता ? आज स्वत:चा मृत्यु समोर दिसताच तुला धर्म आठवला ?
कृष्णाच्या वाग्बाणांनी कर्णाचे हृदय जखमी करुन टाकले. जहरी पण सत्य शब्द होते ते.
त्याही अवस्थेत आपले विजय धनुष्य एका हातात धरुन तो लढु लागला. अर्जुनाने एकामागोमाग एक असे अग्नी, वरुण व पर्जन्य अस्त्राचे प्रक्षेपण केले. ही सर्व अस्त्रे अस्तंगत करण्यासाठी कर्ण ब्रम्हास्त्राचे आवाहन करु लागला परंतु परशुरामांच्या शापानी त्याची स्मरणशक्ती त्याला दगा देउ लागली.
त्याचवेळी अचानक.....
त्याचवेळी अचानक कृष्णाच्या आज्ञेनुसार अर्जुनानी वज्रबाण सोडुन कर्णाचे शीर उडवले.
एक प्रकाशाचा झोत सुर्यपुत्र कर्णाच्या शरीरातुन निघुन सुर्यात सामावला. काही क्षणासाठी सुर्यास्त झाला. जेंव्हा काही क्षणांनी सुर्य पुन्हा उगवला तेंव्हा सुर्यकिरणे इतकी निस्तेज पडली होती की जणु चंद्रप्रकाशाचा भास व्हावा.
अनाथ विजय धन्युष्याला आणी रथाला पाहुन मित्रशोकात दुर्योधन अक्षरश: वेडा झाला. त्यानी आजवर आपल्या कुठल्या भावाच्या मृत्युचाही असा शोक केला न्हवता. कर्णाचा मृत्यु दुर्योधनाला पुर्ण मोडुन गेला. इकडे क्रुष्ण व अर्जुन ही आनंदाची बातमी द्यायला युधीष्ठीराच्या शिबीराकडे धावले. युधीष्ठीर धावत आला कर्णाचे निष्प्राण शरीर बघण्यासाठी. आज दिवस फार फार लवकर मावळला.
त्या रात्री दु:खी दुर्योधन पितामहांना कर्णाच्या मृत्युची बातमी देण्यास गेला. त्याचे सात्वन करत पितामह म्हणाले "सुयोधना दु:खी होउ नकोस, कर्णाला कायम एका क्षत्रीयाप्रमाणे विरमरण हवे होते आणी ते त्याला मिळाले. तो सगळ्यात तेजस्वी क्षत्रीय होता."
"काय? क्षत्रीय??" आता मात्र दुर्योधन हडबडला.
"होय सुयोधना. कर्णानी माझ्याकडुन वचन घेतले होते की त्याच्या जन्माचे रहस्य मी तुला त्याच्या मृत्युनंतरच सांगीन. तेही तु ते गुप्त ठेवणार असशील तर."
"माझ्या परम मित्राची ही इच्छा मी प्राण गेले तरी मोडणार नाही" सुयोधन वदला.
"सुयोधना कर्ण हा राधेय न्हवता तर कौंतेय होता......" भिष्मांनी कर्णरहस्य सांगायला सुरुवात केली.
कर्णाची हि महानता हे मित्रप्रेम बघुन दुर्योधनाला गहिवरुन आले. "जगण्याची इच्छा संपली पितामह" येव्हडेच म्हणुन त्यांना वंदन करुन तो परतला.
आज पहिल्यांदाच त्याला "उद्या काय?" हा प्रश्न छळत न्हवता.
दिवस १८
शल्याच्या सेनापतीपदी नेमणुकीने आजच्या दिवसाची सुरुवात झाली. अश्वत्थाम्याच्या सुचनेनुसार त्याला सेनापतीपद देण्यात आले होते. शल्य हा एक नावजलेला योद्धा होता. गदायुद्धात तो विशेष प्रविण होता. आयुष्यात त्याने कधिही कोणतेही युद्ध हरलेले न्हवते.
शल्यानी आपली सेना रणांगणात आणली. कौरव सेनेवर ३ बाजुंनी तुटुन पडण्यासाठी दृष्टद्युम्न, सात्यकी आणी शिखंडीच्या अधिपत्याखाली पांडव सेना तयार होती.
"शल्य हा सामान्य योद्धा न्हवे, पांडवांच्यात जर कोणी शल्याचा वध करु शकेल तर तो युधीष्ठीरच" असे कृष्णानी सर्वांना समजावले. त्याच्या आज्ञेनुसार युधीष्ठीर शल्याला सामोरा गेला.
दोघांच्यात एक जोरदार धुमश्चक्री उडाली. काही वेळाने एका भाल्याच्या फेकीने युधीष्ठीराने त्याला वधले. आता स्वत: दुर्योधन कौरव सेनेचे नेतृत्व करु लागला. वाचलेले कौरव बंधु त्याच्या मदतीला धावले पण भिमाने त्या सर्व बंधुंना ठार केले.
दुर्योधन एकाचवेळी सात्यकी, दृष्टद्युम्न, अर्जुन आणी युधीष्ठीराशे लढत होता. आज दुर्योधन खरच अतिशय त्वेषाने लढाई करत होता. शकुनी आणी त्याचा पुत्र उलुका हे दुर्योधनाचे खंदे समर्थ प्राणपणानी लढत होते. सहदेव आणी नकुल त्यांच्यावर चालुन गेले. नकुलाने उलुकाचा तर सहदेवाने शकुनीचा वध केला.
कौरवांची संपुर्ण सेना नष्ट झाली तर पांडवांकडे फक्त काहीशे सैनीक, रथ आणी हत्ती येव्हडेच सैन्य उरले होते. एका घोड्यावरुन रणांगणात फिरणार्या दुर्योधनाच्या घोड्याला अचानक कुठुनतरी एक बाण येउन लागाल. त्याच अवस्थेत घोडा पळवत दुर्योधन द्वैपायन सरोवराच्या काठी येउन पोचला आणी त्यानी स्वत:ला त्या थंडगार पाण्याच्या सरोवरात विश्रांतीसाठी झोकुन दिले.
काही वेळातच संजयानी येउन त्याची भेट घेतली. त्याची पाठ वळते न वळते तोच अश्वत्थामा, कृपाचार्य, क्रितवर्मा तळ्यापाशी पोचले. त्यांनी दुर्योधनाला धिर देउन आपण अजुनही हे युद्ध जिंकु शकतो असे आश्वासन दिले. त्याच तळ्याच्या पाण्यानी अभिषेक करुन दुर्योधनाने अश्वत्थाम्याला सेनापतीपद बहाल केले.
गुप्तहेरांनी तोवर दुर्योधनाच्या लपण्याची जागा पांडवांपर्यंत पोचवली. भिम तर आनंदाने नाचायालच लागला. अर्जुन, कृष्ण, भिम, शिखंडी, सात्यकी, उत्तमजौस ह्या सर्वांनीच तळ्याकडे कुच केली.
सरोवरात लपलेल्या दुर्योधनाला पांडवांनी भेकड , पळपुटा अशी विशेषणे बहाल केली. ह्या कटु शब्दांनी घायाळ होउन दुर्योधन सरोवराबाहेर आला.
"मी लपलो न्हवतो तर विश्रांती घेत होतो भ्याडांनो, आत्ता सुद्धा मी तुम्हा सर्वांना वधु शकतो." दुर्योधन गरजला.
"शस्त्र आणी प्रतिस्पर्धी तु हवा तो निवड सुयोधना" युद्धज्वराने पेटलेला युधीष्ठीर बोलुन गेला. त्याच्या वाक्याने सर्वांच्याच चेहर्यावर काळजी दाटली.
"माझे आवडते शस्त्र आहे गदा आणी त्यात माझी बरोबरी फक्त भिम करु शकतो. म्हणुन मी त्याला आव्हान देत आहे" सुयोधन गरजला.
त्याचवेळी नारदांनी कळवल्यानुसार त्यांची लढत बघायला दोघांचेही गुरु बलराम तिथे उपस्थीत झाले. त्यांना पाहुन दोघांनाही परमानंद झाला.
सरोवरापासुन जवळच असलेल्या समंतपंचक ह्या पवित्र ठिकाणी हि लढत व्हावी असे बलरामांनी सुचवले. ह्या ठिकाणी जो कोण मृत्यु पावेल त्यास स्वर्गप्राप्ती होत असे.
काही वेळातच ह्या लढतीस समंतपंचकावर सुरुवात झाली. दुर्योधनाच्या प्रहारांनी अनेकवेळा भिम मुर्च्छीत होउन पडला पण पुन्हा सावध होऊन लढु लागला. शेवटी अर्जुनानी केलेल्या इशार्यानुसार त्यानी दुर्योधनाची मांडी गदेने फोडुन त्यास लोळवले. युद्धनियमाचा हा भंग बघुन बलराम आपला नांगर घेउन भिमावर धावले परंतु कृष्णाने त्यांना आवरले. "तुला मोक्ष मिळेल" असा दुर्योधनाला आशिर्वाद देउन बलराम रागारागानी चालते झाले.
मांडी फुटलेल्या दुर्योधनाला मृत्युसाठी एकटा सोडुन पांडवही त्याच्याकडे पाठ वळवुन चालु लागले.
============================= *** ==============================
(समाप्त)
.jpg)
{सही}
महाभारत युद्धाची ही क्रिस्प आवृत्ती आवडली.
कोणत्या ग्रंथावर आधारीत हे लेखन आहे म्हणे?
{आवडला....}
मस्त शेवटचा भाग सूंदर झालाय.
{मस्त रे}
मस्त रे परा...
छान लिहले आहेस..
छान विष्लेशन व माहीती मिळाली त्या १८ दिवसांची.
Hope is a good thing...
{१. रथाची}
१. रथाची प्रत्यंचा कसे बरे?
२. जवळहवळ म्हणजेच जवळजवळ का?
३. मी लपलो न्हवतो तर विश्रांती घेत होतो भ्याडांनो, आत्ता सुद्धा मी तुम्हा सर्वांना वधु शकतो
हे मी चुकून भाड्यांनो असे वाचले.
अवांतरः युद्धवर्णने छान.
-पराव्यास.
-पुण्याचे पेशवे
{हे मी चुकून भाड्यांनो असे}
हे मी चुकून भाड्यांनो असे वाचले.
लै लै लै हासलो. अगदी कॉफी-मॉनिटर हास्य.
बाकी सर्व लेख झकास झालेत रे परा.
{मस्त रे}
मस्त रे परा आता यांची एकत्र पि.डी.एफ. करुन निवांत पणे परत एकदा वाचीन म्हणतो.
एकंदर मालिका झक्कास झाली.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{मस्त रे}
मस्त रे परा महाभारताच्या युद्धाचे एक छोटेखानी पुस्तक वाचत आहे असे वाटले...
-निखिल
-निखिल
{सुंदर शेवट}
शेवट अगदी सुंदर झाला आहे रे परा... याचे एक छोटेखानी पुस्तक कर.
मस्त झाले आहे एकदम. अजून जमले तर अवश्य लिहि महाभारतावर...
सुरुवातीपासून लिहिलेस तरी छान वाटेन वाचायला.
(महाभारतप्रेमी) सागर
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{याक नंबर}
याक नंबर
{या}
या अर्जुनाच्या धनुष्याच्या नावाचा काही इतिहास आहे का मोहोदय ? कसलं गलिच्छ ते नाव , आणि बहुदा मांडी फोडण्याची सुचना किरीस्ना ने केली होती का ? कथा बाकी छानंच सांगितलीये हो )
(शापित गंधर्व)
(शापित गंधर्व)
{ब्युटी}
ब्युटी (अँड फॉर दॅट मॅटर एव्हरिथिंग एल्स) इज इन द आय ऑफ द बिहोल्डर.
{थँक्स फॉर}
थँक्स फॉर द एक्स्प्लनेशन
(दर्टी माईंड)
(शापित गंधर्व)
{(दर्टी}
हे मी चुकून दर्दी माईंड वाचलं! ;-)
{पराकोटी}
लेख
{खुपच छान..}
सर्वच भाग मस्त झालेत्..परत एकदा सगळे एकापाठोपाठ एक असे वाचणार आहे..
यावेळी नकुल आणि सहदेवाचा पराक्रमही दिसला.
एक गोष्ट ऐकिवातली...खरी की खोटी कोण जाणे...भीष्म आणि द्रोण यांनी जेवढी सेना ११ दिवसात नाही मारली, तेवढी सेना एकट्या कर्णाने एका दिवसात मारली...
योगी९००
{जबरदस्त!!}
मस्त रे पर्या!
खिळवुन ठेवणारे असे लेख जमले आहेत एकेक !
महाभारत युध्दाची आम्हालाही सफर घडवुन आणल्याबद्दल हे परीकथेतील संजया, धन्यवाद!!
- किंग धृतराष्ट्र VXIII
{किंग}
किंग धृतराष्ट्र VXIII
अरे वा!!! पर्फॉर्मन्स मेन्टेन करा.
{मस्त + अजून थोडेसे}
सर्व मालीका आवडली!
या नंतर अजून काही महत्वाचा प्रसंग घडले आहेतअसे वाटते. त्यातील एक (आठवणीतून)
दूर्योधनाला युद्धाचे नियम सोडून मरणोन्मुख सोडल्याचे पाहून अश्वत्थामा संतापला आणि त्या रात्री त्याने पांडवांच्या छावण्यांना आग लावली (असे त्याला वाटले) आणि सगळ्यांना मारल्याचे सांगत त्याने दुर्योधनास अंतीम समाधान दिले. मात्र जे गेले ते पांडव नसून त्यांचे पूत्र होते आणि द्रौपदीने चिडून भिमार्जूनास मारायला पाठवले आहे हे समजल्यावर अश्वत्थामा घाबरून लपून बसला. तरी भिमार्जून+श्रीकृष्ण येत आहेत हे पाहील्यावर त्याने ब्रम्हास्त्र सोडले. कृष्णाने अर्जूनास त्याला ब्रम्हास्त्राने उत्तर देण्याची आज्ञा केली. अर्जूनाने ती पाळली. वर्णनाप्रमाणे, संपुर्ण त्रैलोक्य (का जग?) त्या दोन ब्रम्हास्त्रांच्या मधे डगमगायला लागले. फक्त व्यास आणि नारद हे त्या दोन्ही ब्रम्हास्त्रांच्या खाली उभे होते. व्यास आधी कृष्णाला ओरडले की तू असे कसे केलेस? नंतर त्यांनी दोघांना (अर्जून-अश्वत्थाम्यास) ब्रम्हास्त्रे मागे घेयला सांगितली. अर्जूनाने ते लगेच ऐकले. पण अश्वत्थाम्यास ते कसे करायचे ह्याचे ज्ञान नव्हते. परीणामी त्याची दिशा पांडवावरून काढून इतरत्र करण्याची आज्ञा केली. त्याने ते अस्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडले. हेतू हा की पांडवांचा एकमेव वंशज त्यामुळे नष्ट होईल. तेंव्हा कदाचीत तो पर्यंत कधीच क्रोधीत न झालेल्या कृष्णाने त्याला अतिशय भयंकर शाप दिला (तो मूळातून वाचण्यासारखा आहे). नंतर भिमाने त्याच्या डोक्यावरील मणी हा द्रौपदीच्या मागणीप्रमाणे काढून घेतला. दुसरीकडे कृष्णाने "जर मी माझ्या आयुष्यात माझ्या स्वतःसाठी कधी खोटे बोललो नसेल..." असे म्हणत वरकरणी विरोधाभास असलेले जीवन झुगारत आवाहन केले आणि "..तर हा गर्भ जीवंत होईल" असा आशिर्वाद दिला.
त्या प्रमाणे परीक्षीत (अगदी नाजूक धागा - वंश पुढे नेणारा) हा त्यातून जन्माला आला...
विकास देशपांडे
{मस्त रे}
मस्त रे पर्या
{लेखमाला माहीतीपर}
लेखमाला माहीतीपर चांगली,
महाभारत घडले होते ह्याला काही पुरावा आहे का?
रामायन घडले नव्हते असे भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते,
{गुड क्वेश्चन}
गुड क्वेश्चन
{श्री अवलिया. धन्यवाद,}
श्री अवलिया.
धन्यवाद,
{अश्वथामा}
अरे मी वाचाले आहे कि तो अश्वथामा अजुन नर्मदेच्या काठी फिरतोय ...जखमेसाठी तेल मागत...
{आधी वाचले नव्हते. पण हा भाग}
आधी वाचले नव्हते.
पण हा भाग वाचला आणी आता सर्व भाग वाचण्याची उत्कंठा वाढली आहे.
मस्तच रे परा आणी धन्यवाद सुद्धा.
{महाभारत दुर्योधनाच्या}
महाभारत दुर्योधनाच्या मृत्यूनन्तर संपले?
मग ; सात्यकी कृतवर्मानी कौरवंच्या सेनेवर रात्री केलेला भ्याड हल्ला /पांडवांचा राज्य त्याग / यादव कुलाचा नाश / द्वारका बुडणे / श्रीकृष्णाचा पारध्याकडून मृत्यू हे कधी घडणार?
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{इजुभौ, धाग्याचे शिर्षक निट}
इजुभौ, धाग्याचे शिर्षक निट वाचलेत का ? 'महाभारत युद्ध' असे शिर्षक आहे, आणि हा धागा त्या विषयापुरताच मर्यादीत आहे.
खुलासेदार
परालाडू
{परा}
सगळेच भाग मस्त जमवलेस
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
{सर्व भाग सुंदर लिहिलेत.}
सर्व भाग सुंदर लिहिलेत.
{अतिशय सुंदर लेखमाला}
अतिशय सुंदर लेखमाला. भारावुन जाउन सगळे भाग एकदम वाचले.
{परीकथेतील संजया, मनःपूर्वक}
परीकथेतील संजया, मनःपूर्वक आभार !
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"