पुस्तके आम्हां सोयरी.. (२)
निर्मयी ताईंनी चालुकेलेल्या पुस्तके आम्हां सोयरी.. या धाग्यावर उत्स्फुर्त प्रतिसाद आले. बर्याच चांगल्या चांगल्या पुस्तकां विषयी तेथे माहीती मिळाली.
सध्या तो धागा +२०० प्रतिसाद आल्याने उघडायला वेळ लागतोय. म्हणुन मुद्दाम हा नवा धागा चालु करावासा वाटला.
.jpg)
{छान केलेस मित्रा... आदिपर्व }
छान केलेस मित्रा...
आदिपर्व , नर्मदे हर हर व अक्षयपात्र ही पुस्तके वाचण्यांची खूप इच्छा आहे. बघू कधी योग येतो. यातील अक्षयपात्र ला पुरस्कार देखील मिळाला आहे, व दोन-तीन लोकांनी आर्जवून सांगितले की वाच म्हणून..
अजून यादी खूप मोठी आहे.. पाहू कधी व कशी पुर्ण होते..
सध्याच पर्व वाचून संपवले
Hope is a good thing...
{नर्मदे हर हर हवे तर माझ्याकडून घेऊन जा}
राज,
नर्मदे हर हर वाचायचे असल्यास घेऊन जा माझ्याकडून कधीपण
माझ्याकडे जगन्नाथ कुंटे यांची पाचही पुस्तके आहेत
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{उद्याच रे..... नर्मदे हर हर }
उद्याच रे..... नर्मदे हर हर
तुला मी तीन पुस्तके देतो उद्या माझ्याकडून...
The 7 habits of highly Effective people, आत्म-साक्षात्कार (स्वामी प्रभुपाद) व श्री मदभगवतगीता (स्वामी प्रभुपाद) नर्मदे हर हर च्या वाचना निमित्य गिफ्ट
Hope is a good thing...
{ठीक तर उद्या भेटूयात}
११-१२ ला भेटू
मी फोन करतो मग आणतो तुला हवे ते पुस्तक
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{गुड.. मित्र हवा तर असा }
गुड.. मित्र हवा तर असा
तिन्ही पुस्तके माझ्याकडे आहेत.... आलास तर लगेच देईन
Hope is a good thing...
{डन् रे... नक्की भेटू उद्या}
फोनवतो तुला आधी मग भेटू
बाकी स्वामी प्रभुपाद म्हणजे ते ईस्कॉन टेम्पल वाले असतील तर नको रे त्यांची पुस्तके
ऑलरेडी आहेत माझ्याकडे
बंगळुरात मी तुझ्याअगोदर आलोय हे विसरलास काय
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{गिफ्ट ला असे नाकारू नये.. शाप}
गिफ्ट ला असे नाकारू नये.. शाप लागतो
Hope is a good thing...
{ठीक आहे घेतो मग}
शाप नको
गिफ्ट घेतोच आता
पण त्या ३ पुस्तकांऐवजी सुहास शिरवळकरांची ३ पुस्तके द्या
स्वर्गाचे पुण्य लाभेल तुम्हाला
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{या धाग्यावर केवळ पुस्तकांवर}
या धाग्यावर केवळ पुस्तकांवर चर्चा व्हावी. वरील ४-५ प्रतिसाद आपल्या खवत जास्त शोभले असते
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
{असूरवेद - संजय सोनवणी}
नुकतेच 'असूरवेद' ही कादंबरी वाचून संपवली. हो संपवली म्हणजे हातातली कामे बाजूला ठेवून प्रसंगी टाळून ही कादंबरी संपवली इतकी ती ओघवती कादंबरी आहे. पण फक्त ओघवती कादंबरी आहे म्हणून मी 'असूरवेद' बद्दल लिहित नाहिये. तर या कादंबरीने मला एक सखोल चिंतन करण्यास भाग पाडले म्हणूनही मी या आगळ्या वेगळ्या कादंबरीबद्दल लिहित आहे. संजय सोनवणी हे तसे वादग्रस्त लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. पण या कादंबरीद्वारे त्यांनी कादंबरी लेखनात एक क्रांतिकारी पायंडा पाडला आहे. सर्वमान्य जे आहे त्यापेक्षा स्वतः संशोधन करुन जे निष्कर्ष काढले आहेत (त्यावर त्यांनी स्वतंत्र पुस्तके देखील लिहिली आहेतच) त्याआधारे कादंबरी रचण्याचा प्रयोग करणे हा एक धाडसी प्रयोगच म्हणावा लागेल. कारण कादंबरी चे रुप सर्वसामान्य जनतेच्या मनावर जेवढी पकड घेते तेवढी पकड संशोधनात्मक ग्रंथ घेत नाहीत हे खेदाने म्हणावे लागेल. याचे कारण सर्वसामान्य वाचकवर्ग कादंबरी, कथा व कविता या साहित्यप्रकारांत जेवढा रमतो तेवढा संशोधनग्रंथ, पुरातत्त्व विद्या यासारख्या विषयांत रस असल्याशिवाय अशी पुस्तके हातातही घेत नाही. तेव्हा सर्वसामान्य वाचकच नव्हे तर सर्व प्रकारच्या वाचकांना समोर ठेवून संजय सोनवणी यांनी असुरवेद ही सुंदर कादंबरी देताना वाचकांना एका मागोमाग एक परंपरागत समजुतींना धक्के देतानाच एक सखोल चिंतनही करायला लावतात. आणि मला वाटते की हेच या कादंबरीचे खरे यश आहे
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{वाचली पाहिजे कादंबरी.. सध्या}
वाचली पाहिजे कादंबरी..
सध्या नवे काही वाचत नाही. इंग्रजी फिक्शन भरपूर वाचते पण सांगण्यासारखे काही नाही.
या धाग्याच्या निमित्ताने भरपूर नवी पुस्तके कळतिल अशी आशा..
धन्यवाद गणपाभौ
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
{नक्की वाचा मितानताई}
असूरवेद च्या निमित्ताने इतिहाससंशोधनात दुर्लक्षिलेल्या बाबी सर्वसामान्यांच्या समोर आणण्याचे मोठे काम या कादंबरीच्या माध्यमातून संजय सोनवणींनी केले आहे.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{'असूरवेद' वाचावी असे वाटत}
'असूरवेद' वाचावी असे वाटत आहे,
अप्पा बळवंत चौकात मिळेल असे वाट आहे. आज घेऊन येतो.
{नक्की वाचा...}
संजय सोनवणी हे सुरुवातीला डिटेक्टीव्ह आणि रहस्यकथा लिहायचे. उत्तरोत्तर या लेखकानी जी साहित्यनिर्मिती केली ती केवळ अत्भुतच आहे.
चाकोरीबाहेर लिहायचे म्हणून ते लिहित नाहीत तर प्रत्येक गोष्टीचा नीट सखोल विचार करुन आणि संशोधनाअंती सिद्ध झालेल्या निष्कर्षांवर लेखन करणे हे सोनवणींचे वैशिष्ट्य आहे. जात पात न मानता केवळ पात्रता , योग्यता हेच निकष लावून सोनवणींचे लेखन बघायला मिळते. वाचनाबरोबरच एक सखोल चिंतनही संजय सोनवणी वाचकांना देतात हेच त्यांचे वैशिष्ट्य
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{संजय सोनवणी यांचे कुशाण ही}
संजय सोनवणी यांचे कुशाण ही कादंबरी आधी वाचलेली आठवत आहे. छान लिहतात.
कुशाण जर कोणाला मिळाले तर नक्की वाचा, प्राचिनकाळातील भटक्या जातीवर आधारित कादंबरी आहे.
Hope is a good thing...
{संजय सोनावणी यांचे "..आणि}
संजय सोनावणी यांचे "..आणि पानिपत ! " देखील छान वाचनीय आहे.
{वाह सागर एका चांगल्या}
वाह सागर एका चांगल्या पुस्तकाची ओळख करुन दिलीस.. वाचायला हव हे.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{Tinderbox: The Past And Future Of Pakistan }
Tinderbox: The Past And Future Of Pakistan
Nations do not commit suicide, nor die of accidents or old age. There is, however, a serious malaise within Pakistan's body politic, arising from one gene within the country's DNA. The question is not whether Pakistan will survive, but what it will survive as: a modern democracy or an illiberal theocracy.
परवाच प्रकाशित झालेले पुस्तक आहे हे.. वाचनीय आहे असे कळाले.
कोण वाचले असेल तर सांगा.
Hope is a good thing...
{एम जे अकबर...}
एम जे अकबर... हा एक जबरदस्त माणूस आहे. बारीक निरिक्षण व भन्नाट कल्पनांचा जुगाड करणे ही खासियत आहे त्यांची.
----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.
{लिहा यांच्या विषयी...}
लिहा यांच्या विषयी...
Hope is a good thing...
{अस्वस्थ दशकाची डायरी हे खूप}
अस्वस्थ दशकाची डायरी
हे खूप आधी वाचले होते, नंतर आपल्याच मीमराठीच्या पुस्तक भीशीच्या माध्यमातून मला परत ते पुस्तक श्री दत्ता काळे यांच्याकडून मिळाले... व पुन्हा एकदा वाचले.. आधी वाचले होते तेव्हा नवतरूण होतो
त्यामुळे भारावून गेलो होतो.. पण आता परत वाचले तेव्हा युवक भारावून गेल्यामुळे काय घडू शकते हे सांगणारे हे पुस्तक मला खूपच आवडले..
Hope is a good thing...
{सध्या हे वाचत आहे. Gandhi: a}
सध्या हे वाचत आहे.
Gandhi: a political and spiritual life
By Kathryn Tidrick
{अगदी हल्ली अवचटांचं}
अगदी हल्ली अवचटांचं "मुक्तांगणची गोष्ट" वाचलं. खूप व्यक्तिगत टाईपचं लिखाण आहे.
वेगवेगळ्या व्यसनाधीन व्यक्तींची उदाहरणं आणि कथाही (बोलण्याच्या ओघात..कथासंग्रह नव्हे..) आहेत.
मधेमधे विस्कळीत किंवा क्वचित कंटाळवाणं झालंही पण , तसाच फॉर्मॅट आहे... आणि तरीही ओव्हरॉल इम्पॅक्ट खूप पॉझिटिव्ह आहे.
कित्येक ठिकाणी सुनंदाताईंची आणि अनिल अवचटांची तळमळ बघून डोळे भरुन येतात. त्यांचा पेशन्स आणि चिकाटी (विशेषतः सुनंदाताईंची) पाहून श्वास दडपतो. निस्वार्थ असं काही असू शकतं या चमत्कारावर विश्वास बसतो.
मी हे पुस्तक रेकमेंड करतो.
{सध्या मी अलाइव्ह वाचत आहे,}
सध्या मी अलाइव्ह वाचत आहे, पिअर्स पॉल रिडचे.
सुन्न करणारे पुस्तक आहे
{मीही तेच वाचून संपवले नुकतेच.}
मीही तेच वाचून संपवले नुकतेच. मीमवरुनच ऑर्डर केले होते.
सत्तर दिवस नावाचं रवींद्र गुर्जरांनी अनुवाद केलेलं याच अपघातावरचं पुस्तक आलं होतं तीसेक वर्षापूर्वी.
निव्वळ चित्तथरारक..
{नर्मदे हर हर सागरने परवा हे}
नर्मदे हर हर
सागरने परवा हे पुस्तक दिले.
खूप दिवसापासून असलेली इच्छा पुर्ण होत आहे.
पुस्तक छान आहे, प्रस्तावना वाचल्यावर नक्की वाटले की आपण इतक्या उत्सुकतेने ज्या पुस्तकाची वाट पाहिली ते व्यर्थ गेलेले नाही.
छान आहे सुरवात पुस्तकाची.
काही बाबतीत लेखक व माझ्यात साधर्म्य असल्यामुळे पुस्तक अजून जवळचे वाटू लागले आहे. सर्व वाचून झाल्यावर त्यावर लिहीनच
Hope is a good thing...
{एका काडातून क्रांती, छावा व}
एका काडातून क्रांती, छावा व मद्र मागवले होते मीम वरुन, आज मिळाले.
{मला "एका काडातून क्रांती" हे}
मला "एका काडातून क्रांती" हे विष्णू पळशीकर यांचे पुस्तक हवे आहे.
{उपलब्ध आहे मिळू शकेल.}
उपलब्ध आहे मिळू शकेल.
Hope is a good thing...
{काही छान पुस्तके}
गेल्या २-३ महिन्यांत काही नवीन पुस्तके संग्रहात आली आहेत.
व्योमकेश बक्षी रहस्यकथा - ३ पुस्तकांचा संच
महाराष्ट्राची कुळकथा - मधुकर ढवळीकर (महाराष्ट्रावरचे संशोधन)
महार कोण होते? - संजय सोनवणी (ऋग्वेदकालापासून केलेले एक संशोधन)
देवाज्ञा - नारायण धारप
मास्टर प्लॅन - सुहास शिरवळकर
स्टुपिड - - सुहास शिरवळकर
माझी स्वप्ने - न्यायमूर्ति राम केशव रानडे
थेंब अत्तराचे - नरहर कुरुंदकर (कुरुंदकरांनी लिहिलेल्या चौदा कवितासंग्रहांच्या प्रस्तावना, दोन काव्यसंग्रहांची परीक्षणे व एका कवितेसंबंधीचे विवेचन )
दुदैवी रंगू - भारताचार्य म्हणून ज्यांना गौरविले जाते त्या चिं. वि. वैद्य यांची पानिपत युद्धाचा उपकथानकाच्या साहाय्याने वेध घेणारी कादंबरी
टीकास्वयंवर - भालचंद्र नेमाडे (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त टीका व समीक्षा ग्रंथ)
तुकाराम - भालचंद्र नेमाडे
हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ - भालचंद्र नेमाडे (शेवटी घेतलेच)
राडा - भाऊ पाध्ये (प्रस्तावना भालचंद्र नेमाडे) मुंबईच्या पार्श्वभूमिवरची कादंबरी
सौंदर्यानुभव - प्रभाकर पाध्ये (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त 'साहित्य आणि समीक्षा' ग्रंथ)
म्हैसूरचा वाघ - ह.ना. आपटे (टिपू सुलतानवरची कादंबरी)
शिवभूषण - निनाद बेडेकर
चोमा महार - शिवराम कारंथ - मराठी अनुवाद - श्यामलता काकडे
यातली काही वाचली आहेत, बरीच वाचायची आहेत. ती वाचायला मुहूर्त कधी लागेल माहिती नाही. पण लवकरच वाचेन
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/