माय मराठीमहोत्स - निळु दामल्यांशी गप्पा

0
0


मराठी ग्रंथप्रदर्शनात अक्षरधारा हे नाव आता इतके रुजलय कि ग्रंथप्रदर्शन म्हणले कि अक्षरधारा असे समीकरण रुजलय.अक्षरधारा तर्फे मराठी वाचकांसाठी सातत्याने काही उपक्रम राबवले जातात. त्यात वेगवेगळ्या साहित्यिकांशी गप्पा हा प्रमुख कार्यक्रम असतो. काल निळू दामल्यांची मुलाखतीचा कार्यक्रम पहायला/ ऐकायला टिळकरोडच्या मराठा चेंबर्सच्या सभागृहात गेलो. अक्षरधारा व परचुरे प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा मायमराठी महोत्सवातला एक कार्यक्रम होता. कार्यक्रम अगदी औपचारिकतेला फाटा देउन थेट चालु केला. हा प्रकार आपल्याला जाम आवडला ब्वॉ!
निळू दामले म्हणजे एक अवलिया पत्रकार. पारंपारिकतेची जोखड झुगारुन मनस्वी लेखन भ्रमंती करणारा मुक्त लेखक पत्रकार. मुलाखत कसली अगदी अनौपचारिक गप्पाच झाल्या. एकदम संवादी शैली, तरुणाईची भाषा. बोजड विद्वत्ताप्रचुर भानगड नश्शे. आयुष्यावर बोलू काही हाच मानस. प्रशांत दिक्षित हे सामाजिक राजकीय भाष्य करणारे पत्रकार म्हणुन वाचकांना माहीत आहेत त्यांनी निळू दामल्यांना श्रोत्यांच्या वतीने बोलत केल.बदलता अमेरिकन या त्यांच्या पुस्तकाच्या संदर्भाने तेथील वर्णद्वेष, सामान्य नागरिक,गुन्हेगारी,राजकीय व सामाजिक परिस्थिती यावर दिलखुलास सोदाहरण भाष्य निळु दामले करीत होते. रात्री ट्रेन मधे प्रवास करताना आई मुलीचे भांडण चाललेले त्यांनी पाहिल्यावर त्यांना अगदी आपल्या भारतात आल्यासारखे वाटले. त्यांच्यातला उत्सुक पत्रकार जागा झाला. मुलीला भारतात येउन संस्कृतचा अभ्यास करायचा होता. दामल्यांनी भारतीय असल्याचा फायदा घेउन त्यांना बोलते केले व त्या कुटुंबातला एक हितचिंतक सदस्य बनले. अमेरिकेत आणि भारतात माणसे मुलभुत सारखीच. फरक फक्त चाकोरीबाहेर जगण्याची मानसिकता व तेथील भौतिक सुख सुविधांबाबत आग्रही असणारा नागरिक. तो धर्म तिथे आड येत असेल तर धर्माला बाजुला करतो. तिथल बेसिक जगण अ‍ॅश्युअर्ड आहे.
समलैंगितेला पाश्चात्य जगात मानाचे स्थान आहे तो त्यांचा अधिकार म्हणुन. त्यांच्यात असलेल्या जिनियस वृत्तीला आर्थिक सुबत्तेची जोड मिळाली. मॆंचेस्टर च गे सिटी त्याच उदाहरण आहे. समलैंगिकतेला ख्रिश्चनिटी मधे पण विरोध होता तो नंतर कसा मोडुन निघाला हे सांगताना त्यांनी उपयुक्तता मुल्याचा वापर करुन समलिंगी लोकांनी उपेक्षित जगण्यातुन कसे स्वत:ला वर आणले हे सांगितले. लैंगिक मानसिकते बद्दल वेगळेपण हाच काय तो फरक. मला धनंजयच्या कोणार्कच्या मंदिराची शिल्पे ची आठवण झाली.
निळुभाउंनी भारतातील समकालीन परिस्थितीव भाष्य करताना उपदेशाचे डोस न पाजता साध्या साध्या संकल्पना राबवण्यावर भर दिला. अभिमत विद्यापीठांची उत्पत्ती व त्यातील लागेबांधे यावर मिष्किल व रोखठोक भाष्य केल. येथील ए आय सी टी, नॅक च्या मान्यता घेण्यातील भ्रष्टाचार मांडला. नॅक मान्यता प्राप्त कॊलेज मधे संडास बाथरुम नाहीत. ज्या कॊलेजच्या संडासांमधे जाणे हेल्दी नाही अशा कॊलेजना ही मान्यता कशी मिळते? असा प्रश्न उपस्थित केला आहे अमेरिकेत जेव्हा अस काही घडत तेव्हा ब्लॊगच्या माध्यमातुन अशा गोष्टींची वाट लावतात. NIKE या कंपनीत मुलांना कमी पगार देउन शोषण करणा‍र्‍या प्रकरण एका एमाआयटी तील ब्लॉगर विद्यार्थ्याने उघड्कीस आणले.आपल्याकडेही ते माध्यम उपलब्ध आहे आपण ते वापरु शकतो. हे ऐकताना मला नीधप यांच्या स्वच्छतेच्या बैलाला या ब्लॉगिंगच्या माध्यमातुन केलेला स्तुत्य प्रयत्नाची आठवण झाली. नीधप जेव्हा मराठी ब्लॉगर्स मेळाव्याला आल्या होत्या तेव्हा मी व्यक्तिश: भेटुन त्यांच स्वत:हून (या बाबतीत) कौतुक केल होत बर का! :-ड असो तर सांगायचा मुद्दा हा कि निळु दामल्यांनी ब्लॉगर्स मधे असलेली ताकद वापरण्याचे आवाहन केल.
गप्पा मारताना त्यांनी वाचन संस्कृतीत लंडनमधील बुक स्टॊलविषयी उदाहरण दिल. तिथ शेजारीच कॆफे मधे व्हिस्की मिळते आणि चक्क विस्की महोत्सव साजरा करतात. इथे पुण्यात पाथफाईंडर मधे जेव्हा मी गेलो होतो तेव्हा मला तेथील कॆफे मधे कॊफी बरोबर बिअर किंवा वाईन पण ठेवली असती तर काय मजा आली असती असा विचार चाटुन गेला होता. निळू दामल्यांनी चक्क आमच्या मनातील हीच वाईन महोत्सवाची कल्पना मांडली त्यामुळे आपण त्यांच्यावर एकदम खुश झालो ब्वॊ.
अक्षरधाराने १००० रुपयांच्या पुस्तकावर ३०० रु ची वाईन फ्री अशी कल्पना राबवली तर मजा येईल. नाहीतरी तुम्ही ३०% देताच कि!
कार्यक्रमाच्या शेवटी प्रशांत दिक्षितांनी वर्षा दोन वर्षांनी जेव्हा भेटु तेव्हा पुस्तक महोत्सवाबरोबर वाईन महोत्सवही असेल अशी आमच्या मनातील आशा व्यक्त करुन एक आनंददायी गप्पांचा शेवट केला. आम्ही पुणेरी पद्ध्तीने चपळाईने पुढे येउन मराठी ब्लॉगर्स ग्रुपच्या वतीने आभार मानुन लक्ष वेधुन घेतले व मराठी ब्लॉगिंग विषयी थोडक्यात माहीती दिली. आता कुणी याला टिमकी वाजवुन घेतली असे म्हणले तर म्हणोत बापडे!
तुम्हाला या गप्पा मात्र टिचकीसरशी गप्पा ऐकता येतील. ऐका!

Get this widget | Track details | eSnips Social DNA

लै

भारी

सुरेख

सुरेख आढावा!!!

मस्त

मस्त आढावा..

ग्रंथप्रदर्शन म्हणले कि अक्षरधारा

-निखिल



-निखिल

आवडला

पकाकाका, सुरेख आढावा घेतला आहे.
मस्त, आवडला.

निळु दामले हा माणुस मजेशीर आहे, त्यांची काही पुस्तके वाचली आहेत. एकंदरीत इंटरेस्टिंग प्रकरण आहे हे ...

अवांतर :
>>ग्रंथप्रदर्शन म्हणले कि अक्षरधारा
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
आयला मिश्टेक झाली, नंदनसायबाने मागेच ह्यावर लेख लिहायचा आग्रह केला होता, आम्ही आळस करुन टाळला.
मागे डिसेंबरमध्ये पुण्यात अक्षरधाराच्या प्रदर्शनास आम्ही गेलो होतो, प्रदर्शनाच्या नावाखाली जो सामुहिक मिरवण्याचा आणि कौतुक करुन घेण्याचा कार्यक्रम चालला होता ते पाहुन आमची चांगलीच करमणुक झाली होती.

बाय द वे, आम्ही दिलेल्या लिस्टमधली ८ पैकी ५ लै भारी पुस्तके त्यांच्याकडे नव्हती. कोन वाचत नाही आणि मागणी नाही असा काही पुस्तकांबद्दल अभिप्राय आयोजकांकडुन मिळाला.
बाकी "चिकन सुप्स, हाऊ टु वीन, लुज वेट इन ८ डेज" वगैरे सारख्या उच्चभ्रु आणि दिवाणखान्यातल्या शेल्फात छान दिसणार्‍या अनुवादित पुस्तकांची मांदियाळी होती. न्हाई तसल्या फालतु पुस्तकांवर "१ घ्या १ फ्री मिळवा" अशा मजेशीर ऑफर्स होत्या. नवौच्चभ्रु जन्ता मिरवत अशी पुस्तके घेत होती ह्याचे वाईट नाही वाटले पण आयोजकांना स्वतःच्या धंदेवाईकपणाचे कौतुक वाटते ह्याचे सखेद आश्चर्य वाटले.

बाकी 'साहित्यसेवा आणि साहित्यठेवा' ह्याबद्दल आम्ही पामर काय बोलणार बॉ ?
असो.

सहमत!! अक्ष

सहमत!!
अक्षरधाराच्या प्रदर्शनं आणि सवलतींबाबत भ्रमनिरास झाला इतकेच म्हणेन.

असो!

निळु दामलेंबाबत बरंच काही ऐकलं आहे..दुर्दैवानं अजुन काही वाचलं नाही Sad

पकाकाका, आढावा छान हास्य

असहमत.

असहमत. यावर्षीच्या अक्षरधाराचे माहीत नाही पण गेल्यावर्षी म्हणजे २००८ अक्षरधारा मधेच मला 'महाराष्ट्र सारस्वत भाग -१ व भाग -२' मिळाले होते ते सुधा अत्यल्प किंमतीत. १७५ रु. मात्र मधे. असो.



-पुण्याचे पेशवे

गप्पा आवाडल्या.

आडावा बी ब्येस हाय.

गप्पा लई

गप्पा लई आवडल्या !!

गप्पा मारताना त्यांनी वाचन संस्कृतीत लंडनमधील बुक स्टॊलविषयी उदाहरण दिल. तिथ शेजारीच कॆफे मधे व्हिस्की मिळते आणि चक्क विस्की महोत्सव साजरा करतात. इथे पुण्यात पाथफाईंडर मधे जेव्हा मी गेलो होतो तेव्हा मला तेथील कॆफे मधे कॊफी बरोबर बिअर किंवा वाईन पण ठेवली असती तर काय मजा आली असती असा विचार चाटुन गेला होता. >>>

ही सोय मात्र पाहिजे बर का !!

आनि

बरुबर बाई नुको का? विस्की काय,दारू काय...गपगुमान पुस्तका वाचाय्ची सोडुन उगा कायबाय मागत्यात. thinking thinking
मायला,पब्लिक पन लय चावनट झालया. उद्या मुकपृस्टावरची बाय बी मागाल. Sad

हा हा

हा हा हा...खरंय दादु !
कलीयुग हो कलीयुग.

कलीयुग हो

कलीयुग हो कलीयुग. >..

सुधारलेले तळीराम

व्हिस्की, बीअर

व्हिस्की, बिअर... हल्ली झालंय काय या मंडळींना? हा प्रश्न घाटपांडे यांच्याविषयी नसून, दामले, वागळे अशांविषयी आहे. या वागळेंनी काही दिवसांपूर्वी अंनिसच्याच कार्यक्रमात बिअर वगैरेची चर्चा केल्याचे ऐकले होते. आता दामले व्हिस्कीविषयी बोलत आहेत.
ही मंडळी नक्की कोणत्या पीठातील आहेत? आमचा आपला भ्रम होता की ही मंडळी तत्वनिष्ठ, समतावादी आणि म्हणून चंगळवादविरोधी असतात. व्हिस्की, बिअर वगैरे यांच्यालेखी चंगळ असते. आणि म्हणून त्यालाही त्यांचा विरोधच असतो. आता भलतंच काही. बहुदा आम्हीच बिघडले आहोत. म्हणजे, आमचे पाच सेन्सेस बिघडले आहेत. त्यामुळंच हल्ली हे लोक बोलू लागले की, कार्पोरटायझेशन, व्हिस्की, बिअर वगैरेचं उदात्तीकरण असं काहीतरी ऐकू येतं. मग दिसायलाही लागतं तसंच काही तरी... व्हिस्की, बिअरची चव लागेनाशी होते, भलते वास येऊ लागतात, लावासासारख्या ठिकाणच्या रस्त्यांचा गुळगुळीतपणा हातांनी जाणून घ्यावासा वाटू लागतो...
आयला, डॉक्टर गाठला पाहिजे... हेल्प!

मार्क्स् काय घेत होता?

शोध घ्यायला पाहिजे. जर्मनीत बहुतेक बीयरच असेल, व्होडका नसेल.



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

मार्क्स

मार्क्स परवडला. तो नक्की काही तरी घेत असला पाहिजे. बिअर तर नक्कीच. पण व्हिस्कीसुद्धा. काही काळ ब्रिटनमध्ये होता ना... आणि तो परवडतो ते दुसऱ्या एका कारणानं. किमान तो असा होता की "नशीब, मी मार्क्सवादी नाही" असं तो म्हणाला, किंवा त्यानं असं म्हटल्याचं म्हटलं जाऊ शकतं इतका तरी उमदा असावा. कसे?

बाकी जाऊ दे...

किमान शेळीचे दुध मिळायला तरी हरकत नसावी!



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

हाहाहाहा

हाहाहाहा... खरंय. पण तिथंही शिळी भाकरी असते, दूध शेळीचंच असलं पाहिजे हे ठीक. त्यापासूनच बनवलेलं दही किंवा ताकही अनेक जण मागतात. मग त्या दह्यासाठी विरजण म्हशीच्या किंवा गाईच्या दुधाचं चालेल का हा प्रश्न येतो (श्रेय सुनीताबाईंचे). गांधीवादी जाऊ द्या. ते कर्मठच असतात हे गृहीत धरता येते. मुद्दा या 'परिवर्तन'वाद्यांचा आहे. प्रश्न इतकाच की, मग मध्यमवर्गीय (ज्याच्या नावे हे शिव्यांच्या ओव्या गात असतात) इतकी वर्षं यांच्या आदर्शवादाबाबत हेच सांगायचा की, बाबाहो इतकं ताठर नको. थोडी देवघेव करावी लागतेच. ती केली असती तेव्हाच तर...
असो.

अग्ग्ग्ग्

अग्ग्ग्ग्गं...........
उद्या आमच्या सी टू वाल्या दोस्तांना दाखवतो हे wink

जोरात आहे आज मोडक-प्रसनदाची जोडी हास्य

खरं आहे.....

पण काही परिवर्तनवादी बरेच व्यापक विचार करतात. त्या तिवारींचच बघा ना. एव्हढ्या पॉश बंगल्यात शेळी कुठं बांधायची, तिच्या लेंड्यांमुळं अजुन प्रदुषण होणार असा सगळा विचार करुन त्यांनी वेगळा पर्याय शोधला पण समाजाचीच विचारसरणी संकुचित, शेवटी राजीनामा द्यावा लागला.



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

मार्क्सवादी

चालायचंच हो श्रामो, ज्योती बसूंनाही रोज रात्री तीन उंची स्कॉच व्हिस्कीज् लागत असत म्हणे - http://www.mid-day.com/opinion/2010/jan/180110-Jyoti-Basu-West-Bengal-Ch...

@राजे - हायपरलिंकचं बटण गायब झालं की

शॉट आहे

शॉट आहे डोक्याला ..पण बघतो.....

रात्री उशीरापर्यंत बियर पिणारे , सिगरेट पिणारे काय राजकारण करणार ?? " ईति बारामतीचा म्हमंद्या.....

अवांतरः

साहेब वाक्य नीट आठवा हास्य

रात्री उशीरापर्यंत बियर पित सिगारेटी ओढत जागरणं करुन आणि सकाळी अकरा वाजता उठुन राजकारण काय करणार? त्यासाठी पहाटे उठुन कामाला सुरुवात करावी लागते. wink

त्यासाठी

त्यासाठी पहाटे उठुन कामाला सुरुवात करावी लागते. >>

अनुभवाचे बोल !!

साहेब...

उठतात बर का सकाळी रात्री कितीही उशीरा झोपले तरीपण. पाहिलय मी स्वतः ते. कौतुकास्पद आहे ती सवय, बाकी मतभेद कितीही असले तरी.



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

पका काका

पका काका सुंदर आढावा घेतला आहेत हो.

मस्त

मस्त आढावा. निळू भाउंच्या अफगाणीस्थानातल्या गोष्टी वाचल्या होत्या.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या इंजन मेक्यॅनीक (ITI-डिझल)




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

गप्पांचा

गप्पांचा घेतलेला आढावा आवडला.

निळू दामले सर

घाटपांडे मामा, मस्त आढावा घेतला आहे, आवडला.
सेंट झेवीयर्स(मुंबई) मधे मराठी पत्रकारीतेच्या कोर्सच्या दरम्यान मला शिक्षक म्हणुन लाभले आणि मी त्यांचा फॅन झालो. लै भारी आणि येगळा माणुस.



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

लवासा

कार्यक्रमानंतर अन्य लोकांशी बोलताना लवासाच्या लेखावर अनेकांच्या शिव्या बसल्या असे दामले म्हणत होते. मला उपक्रमावरील खरच लवासा एवढे सालसपणे वागेल ? या लेखाची आठवण आली तसेच प्रकाश बाळांचा विरोधक आणि समर्थक दोघंही एकांगीच! या लेखाची आठवण आली.
श्रामो पत्रकारितेतील अंतरंग जाणतात. मला वाटत कुठलाही माणुस वा उत्तर कायमस्वरुपी विवेकी वा अंतिम असु शकत नाहीत.
अवांतर-आपल्याला वाईन महोत्सव नाही झाला तरी शास्त्रापुरती वाईन प्यायला नक्कि आवडेल.



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

गप्पांचा घेतलेला आढावा आवडला.

गप्पांचा घेतलेला आढावा आवडला.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."