नमस्कार,
लेखन स्पर्धा २०१० ( १-१२-२०१० ते ३१-१२-२०१० ) चा निकाल आज जाहीर करत आहोत यांचा आम्हाला खूप आनंद होत आहे.
मराठी अंतरजालावर प्रथमच अश्या प्रकारची स्पर्धा मी मराठी.नेट आयोजित करत होत होती, त्यामुळे पूर्वानुभव देखील काही मागे नव्हता, स्पर्धकांचा प्रतिसाद कसा असेल, पासून स्पर्धेचे स्वरुप कसे असावे, काय नियम असावेत, कोण परीक्षक असतील याची दिवसरात्र चर्चा फोन वर, ईमेल मध्ये, व्यक्तीगत निरोपाच्या माध्यमातून भरपूर चर्चा केली गेली.
मी मराठीचे व्यवस्थापक मंडळाच्या सदस्यांनी यात मोलाची कामगिरी पार पाडली. अगदी नियमावली तयार करणे पासून ते आलेला प्रत्येक लेख वाचणे, स्पर्धकांची आलेली माहिती एकत्र गोळा करणे, त्याचा विदा गोळा करणे, परीक्षक व प्रायोजक मेहता पब्लिकेशन हाऊस बरोबर संपर्कात रहाणे त्यांना हवी ती माहिती, योग्य वेळात पुरवणे ही व बाकी अनेक कामे सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनातील अमूल्य वेळ देऊन केली. त्या सर्वांचे आधी मी येथे आभार व्यक्त करतो.
श्री. रमताराम ( मार्गदर्शक)
श्री. प्रसन्न केसकर ( मार्गदर्शक)
श्री. पुण्याचे पेशवे
श्री. सुहास
श्री. विशाल कुलकर्णी
श्री. सागर भंडारे
श्री. अधर्वट
सौ. मितान
सौ. स्वाती दिनेश
कु. अनामिका१
स्पर्धेची योजना तयार करण्यात या सर्वांनी मोलाची कामगिरी बजावली आहे, मी मराठी.नेट आपला ऋणी आहे.
*
स्पर्धेला जो प्रतिसाद आम्हाला अपेक्षित होता, तो ५०-६० प्रवेशिका, कमी अथवा जास्त. पण स्पर्धकांनी आम्हाला एकदम सुखद धक्का दिला व अंतिम तारखेपर्यंत २३० च्या वर लेख स्पर्धेसाठी प्रकाशित झाले, काही नियमबाह्य लेखन बाद झाल्यावर देखील २०७ प्रवेशिका स्पर्धेत होत्या. आता परीक्षा परीक्षकांची होती.
श्री. शंकर सारडा
श्री. प्रविण टोकेकर
श्री. रामदास
यांनी आपल्या कार्यातून, सामाजिक तसेच घरगुती जीवनातून वेळ काढून सर्व प्रवेशिका वाचल्या, तिघांशी आम्ही सतत संपर्कात होतोच, कुठले लेखन विजेता म्हणून घोषित करावे यांची अक्षरशः चिंता लागून राहिली आहे, सगळेच उत्तम लेखन आहे अश्या शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले होते. हा जो वेळ लागला निकाल घोषित होण्यासाठी त्याचे मुख्य कारण हे होते, पण त्यांना हवा तेवढा वेळ लेखन वाचण्यासाठी देणे हे आधीच ठरले होते, जेवढा आनंद आपणासं होतो आहे तितकाच आनंद त्यांना देखील निकाल हाती देताना होत होता व त्यांनी सर्वांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा असे कळवले आहे.
*
मेहता पब्लिकेशन हाऊसचे श्री. मेहता व श्री सागर धुमाळ यांनी मी मराठीवर जो विश्वास दाखवला व संयुक्तपणे स्पर्धेसाठी मान्यता दिली व नियमीतपणे स्पर्धेतील लेखन वाचन करत राहिले व सक्रिय सहभाग नोंदवला या बद्दल त्यांचे अनेक आभार. आपला स्नेह हाच वाढत राहिली व पुढील योजनांना देखील तुम्ही असाच पाठिंबा देत रहाल हा विश्वास आहे.
*
लेखक व वाचक शिवाय संकेतस्थळाला शोभा नाही, तुम्ही नसता तर ना ही स्पर्धा असती ना येथे आम्ही निकाल जाहीर करत असतो. तुम्हां सर्वांचे अगदी मनःपूर्वक आभार व मी मराठी बरोबर असलेला तुमचा स्नेह असाच कायमस्वरूपी राहो ही तुमच्या चरणी प्रार्थना. तुम्ही सर्वांनी उत्तम लेखन केले आहे, परीक्षकांना इतका वेळ घ्यावा असे वाटले यातच तुम्हा सर्वांचे यश आहे. ही स्पर्धा म्हणजे शेवटची स्पर्धा नाही आहे, तुमचा सहयोग असाच राहिला तर आपण नवनवीन योजना, स्पर्धा नियमित घेत राहू. आज निकाल जाहीर होत आहे विजेत्यांचे तर अभिनंदन आहेच पण तुम्हाला सर्व स्पर्धकांचे देखील अभिनंदन !
सर्वांचे आभार कुठल्या शब्दात व्यक्त करावे हे कळत नाही आहे, मी मराठी.नेट चे व्यवस्थापन मंडळ व सदस्य आपले ऋणी आहेत, आपण जो विश्वास व प्रेम मी मराठी.नेट वर दाखवले आहे ते असेच वाढत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
*
लेखन स्पर्धा २०१० निकाल
प्रथम तीन विजेते.
उत्तेजनार्थ निवडले गेलेले स्पर्धक (लेखन) खालील प्रमाणे.
बक्षिसांची सुचना स्पर्धकांना लवकरच दिली जाईल व त्यांचा वेगळा धागा असेल.
पुन्हा एकदा सर्वांचे अनेकानेक आभार. पुढील लेखनाकरता अनेकानेक मी मराठी व व्यवस्थापन मंडळातर्फे सर्वांना शुभेच्छा.
सर्वांचा असाच लोभ रहावा ही विनंती.
आपलेच,
मी मराठी.नेट
*
{धन्यवाद..}
अनेक धन्यवाद..
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
{अभिनंदन}
अभिनंदन
Hope is a good thing...
{अभिनंदन}
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि त्या निमित्ताने बरेच सुंदर लेख वाचायला मिळाले त्याबद्दल राजेंचे आभार
चेतन
{हाबिणंदण}
सर्व विजेत्यांचे जोरदार हाबिणंदण. इतर सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{असेच म्हण्ते}
असेच म्हण्ते
{अभिनंदन!!!}
दिप्ती जोशी, आदित्य जोशी, नचिकेत गद्रे, निरंजन, अशोक कुलकर्णी, रुणूझुणू, स्नेहाराणी, अनघा निगवेकर, सुहास झेले, कौतुक शिरोडकर, गंगाधर मुटे, मणिकर्णिका, मोगरा फुलला यांचे हार्दीक अभिनंदन
प्रशांत कवळे
{अभिनंदन }
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
राजे , परीक्षक, प्रायोजक आणि इतर सर्व मदत करणार्यांचे आभार.
- मोहन
{सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक}
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!!!
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{फायनली :-)}
सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. मिम, राजे आणि सर्व परिक्षकांचे मनापासून आभार.
{अभिनंदन}
अभिनंदन
Hope is a good thing...
{विजेत्यांचे}
विजेत्यांचे अभिनंदन.....!
स्पर्धेचे परिक्षक, संयोजक आणि मीमराठीचेही अभिनंदन.
पुढेही असेच उपक्रम राबवावेत यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
{अगदी हेच म्हणतो}
विजेत्यांचे अभिनंदन.....!
स्पर्धेचे परिक्षक, संयोजक आणि मीमराठीचेही अभिनंदन.
पुढेही असेच उपक्रम राबवावेत यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
{अभिनंदन!}
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
एक एक लेख वाचून ही स्पर्धा संपूच नये असं वाटंत होतं...
पुढील उपक्रमांसाठीही हार्दिक शुभेच्छा.
मीऽच तो...
{विजेत्यांचे आणि स्पर्धेत भाग}
विजेत्यांचे आणि स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वाचे हार्दिक अभिनंदन.
या स्पर्धेने एक मस्त मेजवानी दिली जी अजुनही संपलेली नाही.
पुढिल उपक्रमांसाठी शुभेच्छा.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{अभिनन्दन !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!}
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन !
खरे तर आज आनंदाश्रू थांबत नाहीयेत
अन प्रथम पारितोषक विजेती दीप्ती जोशी
जी माझी धाकटी भावजय आहे....! तुम्हा
सगळ्यांना या पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा !!!!
{अभिनन्दन !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!}
"मोरया"
चि.सौ.दीप्ती आज माझे आनंदाश्रू थांबायला तयार नाहीत ...
तुला जे हृदया पासून आलेले प्रतिसाद च सांगत होते ........
अन रणजीत चितळे ह्यांनी तर तुझा रिझल्ट तर आधीच डीक्लेर
केला होता त्यांचे शब्द बघ ....
आपण मला रडवलत
रणजित चितळे यांनी शनी, 22/01/2011 - 20:04 ह्यावेळी प्रकाशित केले.
काय लिहू.........
फारच हृदयस्पर्शी. माझ्या कडून पहिला नंबर.....
अन चेतन गुगळे तुझे प्रेरणा स्थान विचारले होते.....
मी तर म्हणेन कि आज्जी नी ज्या पद्धतीने अध्यात्मिक
जीवन जगल्यात त्याला अन त्यांचे स्मृतीला ला हे पारितोषक
अर्पण व्हावे ...आपण निमित्त असतो ...आज आज्जी आपल्याला
जिथे असतील तिथून आशीर्वाद च देतील त्यांनी लावलेल्या सगळ्याच
वेली गगनाला गेल्यात ....!
दिप्ती तुझे मन:पूर्वक अभिनंदन !!!!
{निकाल आला सर्व विजेत्यांचे}
निकाल आला
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
{सर्वात प्रथम राज,}
मी मराठी, संयोजक, आणि परिक्षक यांना मनापासुन धन्यवाद.
"श्यामची आज्जी" ला पारितोषिक म्हणजे "जगातल्या सगळ्या सात्विकतेला, चांगुलपणाला पारितोषिक!!!! मी मराठीचे धन्यवाद कुठल्या शब्दात व्यक्त करावेत समजत नाहीये.
आदित्य जोशी, नचिकेत गद्रे, निरंजन, डॉ. अशोक कुलकर्णी, रुणझुणु, स्नेहाराणी, अनघा निगवेकर, सुहास झेले, कौतुक शिरोडकर, गंगाधर मुटे, मणिकर्णिका, आणि मोगरा फुलला.......तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन!!!!!!
दिप्ती जोशी
{अभिनंदन}
अभिनंदन
Hope is a good thing...
{सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक}
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
{सर्व विजेत्यांचे अभिनंदन,}
सर्व विजेत्यांचे अभिनंदन, इतर सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
{सर्व}
सर्व स्पर्धकांचे, विजेत्यांचे अभिनंदन! परिकक्षकांचे आभार!
आणखी मित्र-मैत्रिणींचेदेखील आभार!
{सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन... }
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच लेखकांचे मनापासून धन्यवाद आणि आभार
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन...
तसेच
सर्व लेखकांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
या लेखनस्पर्धेतून सर्वच लेखकांना काहीना काही शिकायला मिळाले असेन अशी आशा आहे.
या स्पर्धेमुळे वाचकांची खूप मोठी मेजवानी झाली हे मात्र नक्की
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{सर्व विजेत्यांचे मनःपुर्वक}
सर्व विजेत्यांचे मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन...
{अपेक्षित निकाल.. विजेत्यांचे}
अपेक्षित निकाल..
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..
आणि मीम मंडळाचे आभार ...
{दिप्ती जोशी, आदित्य जोशी,}
दिप्ती जोशी, आदित्य जोशी, नचिकेत गद्रे, निरंजन, अशोक कुलकर्णी, रुणूझुणू, स्नेहाराणी, अनघा निगवेकर, सुहास झेले, कौतुक शिरोडकर, गंगाधर मुटे, मणिकर्णिका, मोगरा फुलला यांचे हार्दीक अभिनंदन
{सर्वान्चे अभिनन्दन आनि}
सर्वान्चे अभिनन्दन आनि परिक्शान्चे आभार.
{अभिनंदन}
दिप्ती जोशी, आदित्य जोशी, नचिकेत गद्रे, निरंजन, , रुणूझुणू, स्नेहाराणी, अनघा निगवेकर, सुहास झेले, कौतुक शिरोडकर, गंगाधर मुटे, मणिकर्णिका, मोगरा फुलला यांचे हार्दीक अभिनंदन
आपला स्नेहांकित...
-अशोक
{सर्व विजेत्यांचे हार्दिक}
सर्व विजेत्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
मी मराठी च्या सर्व टीमचे , परिक्षकांचे आभार !
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
{सर्वांचे अभिनंदन ! सर्व}
सर्वांचे अभिनंदन ! सर्व विजेत्यांचे अभिनंदन!सर्व स्पर्धकांचे अभिनंदन. मिम चे खूप खूप आभार , इतकी सुंदर संधी लेखकांना आणि वाचकांना पण दिली त्याबद्दल ! CONGOS!!! आता पार्टी म्हणून अजून लेख द्या आम्हाला वाचायला !
मोहिनी
{सुखद धक्का.}
दिप्ती जोशी, आदित्य जोशी, नचिकेत गद्रे, निरंजन, डॉ. अशोक कुलकर्णी, रुणझुणु, स्नेहाराणी, अनघा निगवेकर, सुहास झेले, कौतुक शिरोडकर, मणिकर्णिका, आणि मोगरा फुलला.......सर्वांचे हार्दिक अभिनंदन!!!!!!
मी मराठी, संयोजक, आणि परिक्षक यांना धन्यवाद.
..........
माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला चांगला भाव मिळाला आहे.
.......
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
{अभिनंदन प्रचंड टाळ्या!}
अभिनंदन
प्रचंड टाळ्या!
-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/
{सर्व विजेत्यांचे महानापुर्वक}
सर्व विजेत्यांचे महानापुर्वक अभिनंदन !!
{सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक}
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!!
..............................................................
क्या फर्क पडता है?
{अभिनंदन..}
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
या स्पर्धेच्या निमित्ताने उत्तमोत्तम कथा, लेख वाचायला मिळाले, धन्यवाद.
स्वाती
{स्पर्धा संपली }
आज निकालाची घोषणा पाहिली . मलाही निकाल अपेक्षित असाच लागला म्हणजे मला बक्षिसच नाही. मनात पहिल्या तिघात नाही पण पुढच्या दहात तरी असेन असे वाटले तिथेही नाही. मग काय केले माहित आहे रागारागाने पाहिले तीन आणि उतेजानार्थ दहा असे तेरा लेख एका बैठकीत वाचून काढले.
म्हटले एवढे काय माझ्यापेक्षा चांगले लिहले आहे पाहू तरी. मग तेरा लेख वाचून झाले आणि आपोआप लक्षात आले की आपले तीनतेरा का वाजलेत. कारण सरळ आणि साधे आहे ते म्हणजे हे बक्षीस् पात्र लेख आहेतच सुंदर
इथेच लक्षात आले स्पर्धा संपली कोण जिंकले कोण हरले यापेक्षा यातून मी नवीन काय शिकलो हे महत्वाचे. मी पुढील गोष्टी शिकलो
१.स्पर्धकांपेक्षा परीक्षकांची कसोटी होती. आणि त्यांनी त्याची जबाबदारी नक्कीच सुंदर प्रकारे पार पडली आहे.
२. स्पर्धा व्यवस्थापक आणि त्यांच्या दशावतारी संघाने गेले दोन महिने घेतलेले कष्ट बहुमोल आहेत.
३.स्पर्धे साठी प्रतिसाद खुपच जास्त होता हे "मीमराठी" या संकेत स्थळावर जे एका अदृश्य धाग्याने जोडले गेलेत त्यांच्या प्रेमाचे प्रतिक आहे.
तर आता मी पुन्हा एकदा इतकेच म्हणेन की स्पर्धा संपली आता वेळ आहे विजेत्यांच्या कौतुकाची म्हणून शेवट इतकेच म्हणेन की-
तेराही लेख रागारागात वाचले पण सर्व राग पाळला. अहंकार गळाला आणि मन म्हणाले त्यांचे कष्ट आलेत फळाला.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन ! स्पर्धा व्यवस्थापकांचे आभार !! असाच खुला राहुदे भविष्यात राजदरबार !!!
{क्या बात है!}
माझ्या मते हा प्रतिसाद मिमवरचा आजपर्यंतचा सर्वोत्तम प्रतिसाद् असावा. प्रगल्भता, समंजसपणा, प्रामाणिकपणा, जिंदादिली या विषयावर आपण सगळे बरेच बोलत असतो पण या गुणांचा वस्तुपाठ म्हणजेच हा प्रतिसाद.

अशी भुमिका घेण्याचे धैर्य मलादेखील सतत लाभो हीच इच्छा!
जिंकलंत माझं मन रविकिरण तुम्ही या एका प्रतिसादात. (लेखन आधी वाचलेले होतेच.)
लिहिते रहा एव्हढेच म्हणतो.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{+१}
रविकिरण यांचा प्रतिसाद अतिशय आवडला. बाकी प्रसन्नदानी लिहलेच आहे.
{स्पर्धेच्या निमित्ताने खूप}
स्पर्धेच्या निमित्ताने खूप काही शिकले.
उत्तम लेखन वाचायला मिळाले.
या सर्व निवडल्या गेलेल्याच नव्हे तर स्पर्धेसाठी आलेल्या सर्व लेखांचे विषयवार ( ललित, कथा, आध्यात्मिक, सामाजिक ) असे इ-पुस्तक मीम ने तयार करावे अशी आग्रहाची विनंती राजे यांना करते.
सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. तुम्ही सर्वांनी परीक्षकांचीच परीक्षा घेतलीत
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
अजून लिहा. आम्हाला वाचायला द्या.
असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥
{>>या सर्व निवडल्या गेलेल्याच}
>>या सर्व निवडल्या गेलेल्याच नव्हे तर स्पर्धेसाठी आलेल्या सर्व लेखांचे विषयवार ( ललित, कथा, आध्यात्मिक, सामाजिक ) असे इ-पुस्तक मीम ने तयार करावे अशी आग्रहाची विनंती राजे यांना करते.
यावर विचार चालू आहे, लवकरच कळवतो
Hope is a good thing...
{सर्व विजेत्यांचे अभिनंदन व}
सर्व विजेत्यांचे अभिनंदन व स्वागत!
स्पर्धा यशस्वी करण्याकामी सर्व परिक्षकांचे हार्दिक अभिनंदन व आभार.
मीम च्या व्यवस्थापकांना अशी चोखंदळ स्पर्धा आयोजित केल्याबद्दल अनेक धन्यवाद!
*****
{सर्व विजेत्यांचे हार्दिक}
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
मला खरेतर इथे मीमराठीच्या टीमचेही अभिनंदन करायचे आहे. ही स्पर्धा घ्यायचे असे ठरल्यापासुन आम्ही काय व्यनि, फोन्स च्या माध्यमातुन एकमेकाच्या संपर्कात होतो. तरी शेवटचा काही काळ कार्यालयीन अडचणींमुळे मी हवा तेवढा वेळ नाही देवु शकलो. समजुन घेतल्याबद्दल सर्व टीमचे आभार आणि अभिनंदन !
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{दिप्ती जोशी, आदित्य जोशी,}
दिप्ती जोशी, आदित्य जोशी, नचिकेत गद्रे, निरंजन, अशोक कुलकर्णी, रुणूझुणू, स्नेहाराणी, अनघा निगवेकर, सुहास झेले, कौतुक शिरोडकर, गंगाधर मुटे, मणिकर्णिका, मोगरा फुलला यांचे हार्दीक अभिनंदन
"मराठी माणसा जागा हो, मी "मराठीचा" धागा हो"
{धन्यवाद सर्वांचे}
अभिनंदनाच्या प्रतिसादाबद्द्ल सर्वांचे मनापासुन धन्यवाद.
दिप्ती जोशी
{अरे वा !!}
निकाल लागला..... अरे वा !!
सगळ्यात पहिले सगळ्या विजेत्यांचं मनापासून अभिनंदन
स्पर्धा आयोजक आणि परिक्षकांची मात्र खरंच प्रचंड पळापळ झाली असेल. एक तर जबरदस्त प्रतिसाद होता आणि पूर्वानुभव नव्ह्ता. पण ज्या तर्हेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली ते बघून मात्र आयोजकांचं कौतुक वाटलं. ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. खूप खूप अभिनंदन !!
पुढल्या आयोजनासाठी शुभेच्छा !!
जयश्री अंबासकर
{मनापासून अभिनंदन..}
फारच सुंदर लेख वाचावयास मिळाले!!! मनापासून अभिनंदन.... खूप वाईट वाटले हो !!! .
मी स्मरणांच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो .... सुकलेली वेचीत सुमने भिजणारे डोळे पुसतो....
-मेघ
{स्पर्धा जाहीर झाली तेंव्हा}
स्पर्धा जाहीर झाली तेंव्हा पासून ते निकाल हा कालावधी माझ्या साठी एक अत्यंत आनंदाचा गेला. अनेक नव्या कथा, लेख वाचायला मिळाले. ह्याटस ऑफ टू संयोजक ... हमारा सलाम कबूल करो राज जी !
आपला स्नेहांकित...
-अशोक
{अभिनंदन.}
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.व्यवस्थापकांचे आभार.ह्या स्पर्धेनिमीत्त खूप वाचायला मिळाले [अजून वाचतोय.]
पुन्हा एकदा धन्यवाद.
{सर्व विजेत्यांचे मनापासुन अभिनंदन!}
सर्व विजेत्यांचे मनापासुन अभिनंदन!
दिप्ती जोशी, आदित्य जोशी, नचिकेत गद्रे, निरंजन, अशोक कुलकर्णी, रुणूझुणू, स्नेहाराणी, अनघा निगवेकर, सुहास झेले, कौतुक शिरोडकर, गंगाधर मुटे, मणिकर्णिका, मोगरा फुलला यांचे हार्दीक अभिनंदन.
स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मालक, संचालक मंडळाचेही अभिनंदन.
वेळ काढुन सर्व लेखन वाचणार्या परिक्षकांना धन्यवाद.
सर्वच स्पर्धकांनी स्पर्धेत ज्या उत्साहाने भाग घेतला याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच.
या काळात मिमवर अक्षरशः वाचन मेजवानी होती.
अश्या प्रकारे जालीय भिंती तोडणारी ही पहिलीच स्पर्धा अन ती अगदी इजिप्तच्या क्रांतीसारखी सुपर डुपर हिट ठरली.
यापुढील काळातही असेच उपक्रम वारंवार हाती घेतले जातील अन त्यांनाही असाच भरभरुन प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{आभार आणि अभिनंदन !}
मी मराठी, संयोजक, आणि परिक्षक यांचे मनापासुन आभार !
आणि सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
कामाच्या व्यस्ततेमुळे लेखनस्पर्धेतील बरेच लेख वाचायचे राहिले आहेत. आज हा निकाल कळल्यावर आधी पहिले तीन विजेते लेख वाचून काढले. खरंच मस्त आहेत !
श्यामच्या आज्जीने तर डोळ्यात पाणी आणलं !
{सर्व विजेत्यांचे अभिनंदन, इतर}
सर्व विजेत्यांचे अभिनंदन, इतर सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
{रविकिरण}
यांच्या प्रतिसादाबद्दल प्रसंन्न केसकर यांनी जे मत मांडलय त्याच्याशी मी २००% सहमत्....इतकी खिलाडु वृत्ती माणसामध्ये असणे....व्वा क्या बात है!!!!!
दिप्ती जोशी
{मित्रांनो, सप्रेम नमस्कार, }
मित्रांनो,
सप्रेम नमस्कार,
मायबोली या संकेतस्थळावर मी "शेतकरी आत्महत्त्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे" हा लेख लिहीला होता. त्यावर आलेल्या एका प्रतिक्रियेवर खुलासा करतांना मी स्वतःचा अनुभव विषद केला. नंतर लक्षात आले की हा अनुभव म्हणजे एक स्वतंत्र ललित लेखच तयार झालेला आहे.
त्यापूर्वी मी कविता आणि वृत्तपत्रीय/स्फ़ुट लेखन वगैरे केले होते. परंतू कथा किंवा ललित स्वरुपाचे लेखन कधीही केलेले नव्हते. प्रतिक्रियात्मक स्वाभाविक अनुभव कथन केला आणि अनपेक्षीतपणे या ललित लेखाचा जन्म झाला. आणि हाच माझ्या आयुष्यातला पहिला ललितलेख ठरला.
आयुष्याच्या एका वळणावर भोगावा लागला भोगच आज मला एक पुरस्कार देवून गेला. मी आयुष्याच्या पुर्वाधात आयुष्याने माझ्या पदरात टाकलेले ”नकोनकोसे" क्षण मागे वळून पाहण्याचे कटाक्षाने टाळत आलो आहे.
पण आज या निमित्ताने मला वाटायला लागलेय की, याच क्षणांनी खरे तर माझे आयुष्य अधिक अनुभव समृद्ध केले असावे. मी काही लेखक नाही, लेखन कौशल्य आणि प्रतिभासंपन्नतेच्या बळावर मी "वांगे अमर रहे...!" हा लेख लिहिला नाही. केवळ अनुभव कथन केला, जो शब्दश: खरा आहे. त्यातला एकही शब्द रंजित वा आगाऊ नाही. याउलट त्यातलाच बराचसा भाग लिहायचा राहून गेला आहे.
जेष्ठ गझलकार श्री श्रीकृष्णजी राऊत यांना माझ्यात काय दिसले, कोण जाणे पण त्यांनी मला मी माझे अनुभव लिहून काढावेत, असा आग्रह केला होता. माझ्या अनेक मित्रांनीही केला होता पण "मला मागे वळून पाहायचे नाही" या सबबीखाली मी ते टाळण्याचाच प्रयत्न केला.
आज मात्र मी द्विधा अवस्थेत आहे. लिहून काढावेत की नाही, संभ्रम आहे. लिहू नये याचे मुख्य कारण "मागे वळून पाहणे" माझ्यासाठी फ़ारच पिडादायक ठरणार आहे. पण माझ्याकडे काही अनुभव आहेत, जे सर्वसाधारणपणे दुर्मिळ किंवा कल्पनेबाहेरचे किंवा ऐकण्यात/वाचनात न आलेल्या स्वरुपाचे आहेत.
असो, यातूनही काहीतरी मार्ग निघेलच. आपल्याशी थोडेसे हितगूज करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच.
गंगाधर मुटे
...................................................................................................
माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत.
...................................................................................................
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
{जरुर लिहा.. तुमच्या अनुभवांचा}
जरुर लिहा.. तुमच्या अनुभवांचा खजिना सर्वांच्या हाती लागेल.
तुमची नैसर्गिक शैलीच रसाळ आहे. त्यात कसला अभिनिवेश नाही हेच तर खरं सौंदर्य आहे.
लिहाच..
तुम्हाला वाटतंय की मागे वळून पाहताना त्रास होईल. पण आठवणी दाबाव्यात तितक्या उसळतात. त्यापेक्षा त्या येऊदेत.
उलट मोकळे व्हाल त्यातून ते नीट सर्व लिहिल्यानंतर. आणि इतरांना त्याचा फायदा होईल याचं ही समाधान तुम्हाला अॅडिशनल बोनस म्हणून होईल.
तुमच्या अनुभवांतून खूप प्रकारचे लाभ वाचणार्या अनेकांना होऊ शकतात.
- निखळ मनोरंजन
-काही घटना वैयक्तिक आयुष्यात टाळता येण्याची शक्यता.
-तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला
-असेच अनुभव आलेल्या इतर लोकांना आपल्यासोबत कोणी असाच अनुभव घेतला या "सहानुभवा"चा दिलासा.
तेव्हा पुन्हा सांगतो, लिहाच अगदी जरुर. आम्ही वाट पाहतो.
{असेच म्हणतो मुटेसाहेब, घ्या}
असेच म्हणतो मुटेसाहेब, घ्या लिहायला.
Hope is a good thing...
{> मितानशी १००% सहमत}
<<सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. तुम्ही सर्वांनी परीक्षकांचीच परीक्षा घेतलीत >>>
मितानशी १००% सहमत
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{त्रिवार अभिनंदन!!!}
दिप्ती जोशी, आदित्य जोशी, नचिकेत गद्रे आणि सगळ्या विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!!
या लेखनस्पर्धेने खूप आनंद दिला. खूपच स्तुत्य असा हा उपक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन!
लेखनाची गोडी आणि ऊर्मी ही काय चीज असते याची खरीखुरी जाणीव या स्पर्धेने दिली.
अशा सगळ्या उपक्रमांसाठी शुभेच्छा.
सर्व विजेत्यांचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन! आपल्या लेखनकलेला प्रोत्साहन देणारे हे यश आम्हा वाचकांच्या पदरात उत्तमोत्तम लिखाणाची मनमुराद बरसात करेल यात शंकाच नाही.
धन्यवाद,
समीर
{अभिनंदन}
अभिनंदन...
{विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन}
सर्व सहभागी स्पर्धक, विजेते, संयोजक आणि मुख्यतः परिक्षक सगळ्यांचेच अभिनंदन. असेच वरचेवर दर्जेदार साहित्य वाचायला मिळो.
{दिप्ती जोशी ,अॅडी जोशी ,नचिकेत गद्रे}
तसेच सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. मिम, राजे आणि सर्व परिक्षकांचे मनापासून आभार.
{सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक}
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
करतो. करेन. व करेगें
{अभिनंदन!}
सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!
*क्रान्ति*
नाही दु:खाचा आडोसा नको सुखाची चाहूल
झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल
{सर्व विजेत्यांच हार्दिक}
सर्व विजेत्यांच हार्दिक अभिनंदन, अप्रतिम कथा वाचायला मिळाल्या. स्पर्धकांनी किती मेहनत घेतलेली असेल ते लक्षात येतय. खुप कठिण काम होतं हे.
{सर्व विजेत्यांचे अभिनंदन.}
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
{दिप्ती जोशी, आदि जोशी, नचिकेत गद्रे,}
आणि बाकी सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन!!!! त्याच बरोबर मीम चे संचालक, व्यवस्थापक, आणि परिक्षक सर्वांचे अभिनंदन. स्पर्धकांनी सर्वांचीच परिक्षा घेतली एवढे मात्र खरे.....!!!
यापुढेही असे उपक्रम चालु ठेवा....!!
{अभिनंदन. विजेत्यांचे आणि}
अभिनंदन. विजेत्यांचे आणि आयोजकांचे पण. न लिहिणार्यांना लिहिते आणि लिहिणार्यांना प्रगल्भ लिहिते करणारे मीमराठी खरच कौतुकास पात्र आहे.
{सर्व विजेत्यांचे हार्दिक}
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.....
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
{अहो २०११ च्या स्पधेचा निकाल}
अहो २०११ च्या स्पधेचा निकाल कधी लागणार?
आम्ही तिष्ठतच आहोत निकालाच्या प्रतिक्षेत
लोक २०१० च्या धाग्यावर का चर्चा करत आहेत?
की २०११ चा निकाल लवकर लागावा म्हणून स्पर्धेच्या आयोजकांवर दबाव आणण्याचे तंत्र?
तसे असेल तर माझाही हा खारीचा वाटा
भ्रमिष्ट आहे हो मी
भ्रमिष्टपणे मी इथे वावरतो
जानवं काढून ठेवलेला भट