मी मराठीवर बदल व त्या बद्दल सुचना
मी मराठीवर आम्ही नवनवीन सुविधा व बदल करत आहोत त्याची माहीती देण्यासाठी हा धागा.
तसेच सदस्यांच्याकडे जर काही नवीन कल्पना / बदल असतील तर त्यांची सुचना देखील येथे दिली तर चालेले जेणे करुन मी मराठी संकेतस्थळ अजून सदस्यांच्या सेवेस तत्पर होईल अशी आशा.
सर्वांच्या सुचनांचे स्वागत आहे..
१. चुकीचे टाचण द्या - सुविधा.
ह्या सुविधेचा वापरत सर्व सदस्य करु शकतात.
ह्याचा वापर एखादा लेख / प्रतिसाद नियमबाह्य असेल तर काढू टाकण्यासाठी केला जातो.
उदा. २० पेक्षा जास्त सदस्यांनी जर चुकीचे टाचण दिले तर तो लेख / प्रतिसाद आपोआप काढून टाकला जातो.२ पेक्षा जास्त सदस्यांनी जर चुकीचे असे टाचण दिले असेल तर व्यवस्थापकाकडे तो लेख / प्रतिसाद तपासणीसाठी येतो. ह्या सुविधे मुळे व्यवस्थापनावरील त्रास कमी होईल व संकेतस्थळावरील वातावरण मुक्त राहील अशी आशा.
२. आजच्या बातम्या
ह्या दुव्यावर तुम्हाला मराठी मधील ठरावी वर्तमानपत्रांच्या महत्वाच्या बातम्या ह्याच संकेतस्थळावर वाचता येतील, अशी सुविधा आहे. ह्यामध्ये अजून काही वर्तमानपत्रांची भर घालण्याचे काम चालू आहे.
३. उघड झाप करणारा मार्गदर्शक व डाव्या बाजूचे ब्लॉक्स.
ह्याचा वापर सदस्य आपल्या सोयीनूसार शकतात.
तुम्ही एकदा केलेली ब्लॉक्स सेटिंग तशीच राहते ( कुकीज डिलिट करत नाही तो पर्यंत)
ह्याचा फायदा संकेतस्थळ वेगाने उघडणे व अनावश्यक माहीती / ब्लॉक्स न दिसणे ह्यासाठी होऊ शकतो.
४. व्यक्तिगत निरोप सुविधा
व्यक्तिगत निरोप सुविधेमध्ये आता तुम्हि एखादी फाईल / चित्र सलग्न करु शकता.
५. फेसबुक वर मी मराठी
आता तुम्ही सरळ फेसबुक वर मी मराठी वर आलेले लेख वाचू शकता व तेथून मी मराठीवर परस्पर येऊ शकता.
लेख आल्यानंतर काही क्षणामध्येच फेसबुक वर अपडेट होतो.
येथे बघा
६. सदस्य नाव दोनदा दिसणे
सदस्य नाव दोनदा दिसण्याची अडचण आता दुर केली गेली आहे, जर सदस्य एकावेळी लॉगईन असेल तर त्याच नावाने दुसरा लॉगईन होणार नाही. जर का ५ वेळा पेक्षा जास्त प्रयत्न केला गेला तर ते खाते तात्पुरते रद्द होईल. व तुम्हाला व्यवस्थापकांशी सपर्क साधावा लागेल. rj.jain@gmail.com
७. ट्विटर.
मी मराठीवरील लेख ट्विटर वर आपोआप अद्यावत तथा प्रसिध्द करण्याची सोय चालू केली आहे.
८. लेखन शोधणे
विभागानूसार / दिनांकानूसार लेखन शोधणे सोपे जावे ह्यानूसार मार्गदर्शक मध्ये काही बदल केले आहेत. वरील डाव्याबाजूस तुम्हाला विभागानूसार लेखन पाहता यावे अशी योजना केली आहे तसे मुखपृष्ठावर सर्वात खाली दिनांकानूसार लेखन शोधण्याची सोय आहे.
एखाद्या सदस्याच्या प्रोफाईल वर जाऊन तुम्ही 'माझे लेखन' ह्या टॅबवर त्या सदस्यांचे मीमवरील सर्व लेख पाहता येतील.
९. चित्रे / दुवा चिटकवण्याची सुविधा
ह्या सुविधेमध्ये बदल करुन आता ती वापरण्यास अजून सुटसुटीत करण्यात आली आहे, ह्यामध्ये तुम्ही चित्राचा आकार बदल व माहीती देण्याची सोय करण्यात आली आहे.
१०. ह्यावरुन आठवले
धाग्याच्या डाव्याबाजूला मार्गदर्शक ब्लॉकच्या खाली तुम्हाला ह्यावरुन आठवले हा ब्लॉक दिसेल ज्यामध्ये तुम्ही वाचत असलेल्या लेखाशी / लेखकाशी / विषयाशी / विभागाशी संबधीत लेख तुम्हाला येथे दिसू शकतात.
११. वाचनखुण साठवा
ह्यामध्ये तुम्ही आवडलेले लेख आपल्या वाचनखुण मध्ये साठवून ठेऊ शकता, लेखाच्या शेवटी तुम्हाला "वाचनखुण साठवा. " हा दुवा दिसेल ह्यावर तुम्ही टिचकी मारली की तो दुवा तुमच्या "वाचनखुणा" ह्या विभागात सुरक्षित केला जातो, आपल्या वाचनखुणा शोधण्यासाठी तुम्ही मार्गदर्शक मध्ये "वाचनखुणा" टिचकी मारा.
धन्यवाद.
********

.jpg)
मस्त रे ...
नव्या 'सुविधा' आम्हाला खुप आवडल्या.
अजुन नवे प्रयोग सुचवत राहुच, आमचा पाठिंबा आहे ...
" शुभं भवतु " असे म्हनतो.
ह्या
ह्या धाग्याचे स्वरुप नव्या सुविधा कळविण्याचे न रहाता... जास्तीत जास्त सुचना याव्यात असे वाटते
-निखिल
-निखिल
असेच
असेच म्हणतो...
डोक्यात एक कल्पना घोळत आहे..
१. जे पाक-कृती व भटकंतीचे फोटो देतात त्यांना आपल्या येथेच फोटो अपलोड ची सुविधा देणे.
२. संकेतस्थळ लोड होण्याचा कालावधी अजून कमी करण्यासाठी अजून प्रयत्न करणे. एजेक्स / जावा ह्यांचा वापर करुन.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
वा!
वा! चांगल्या सुविधा. काही चांगले बदल आठवल्यास नक्की सुचवु.
-Nile
१. स्वतः च्या प्रतिसादाला
१. स्वतः च्या प्रतिसादाला उपप्रतिसाद आला कि विरोप यावा. त्यामुळे त्याला उत्तर देता येईल.
२. आवडत्या लेखकाचा लेख आला की विरोप यावा.
३. एकाच वेळी अनेकांना खरडी/व्यनि करण्याची सोय असावी.
४. खरडीमध्ये दुसर्याची पानावर न जाता उत्तर देण्याची सोय असावी.
मराठी
मराठी संकेतस्थळ चालू केल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन
माझ्या काही सुचना खालीलप्रमाणे आहेत...
१) खरडवही व्यक्तिगत संदेश स्वगृह हे मीमराठी च्या मेन लोगो खाली असेल तर आणि त्यांचा फॉन्ट थोडा मोठा किंवा बोल्ड असेल तर जास्त हॅन्डी होइल.
आधी-आधी तर मी ते लेखाचाच भाग असल्याप्रमाणे वाचले होते... 
२) तुम्ही काय करताय ??? यामध्ये मोठा मेसेज टाइप करताना मेसेज पुढे-पुढे टाइप होत नाही...स्पेस दिल्यानंतरच आपण टाइप केलेला शब्द पाहू शकतो, म्हणजे मेसेज टाइप करताना तो कंटिन्युअसली टाइप होतगेला पाहीजे.
३) लेखांचे वर्गीकरण मलातरी दिसत नाहीये...जसं काव्य, पाककृती, लेखन...
४) तुम्ही काय करताय??? हे फक्त मेन पेज किंवा स्वगृह मधूनच अपडेट करता येतं...माझ्यामते ते कुठल्याही पेजवरून अपडेट करता यायला हवं.
५) "चुकीचे टाचण" चा फॉन्ट थोडा मोठा होतोय...त्यामुळे बर्याचदा त्यावरच क्लिक करायचा मोह होतो...
४) तुम्ही
४) तुम्ही काय करताय??? हे फक्त मेन पेज किंवा स्वगृह मधूनच अपडेट करता येतं...माझ्यामते ते कुठल्याही पेजवरून अपडेट करता यायला हवं.
ह्या ब्लॉक मधे... ज्या पानावर आपण सध्या असाल त्यापानाच्या लेखकाचे स्टेट्स दिसते. म्हणजे तुम्ही तुमचे स्टेट्स स्वगृह, खरडवही (तुमची), तुम्ही लिहिलेले लेख येथुन नक्कीच बदलु शकता. जर आपण एखाद्या लेखावर असाल तर तिथे त्या लेखकाचे स्टेट्स दिसते हे बदलणे थोडे अवघड आहे. पण प्रयत्न करता येईलच.
-निखिल
-निखिल
बदलांचे स्वागतच असेल.
अगदी छान संकेतस्थळ आहे.
जरा खव, व्यसं यांचा फाँट मोठा असावा.
खूपच कष्ट घेताय, नक्कीच चांगलं मराठीतील संकेतस्थळ होईल.
फॉण्टकलर
फॉण्टकलर आणि ब्लॉकक्वोटची बटणंही प्रतिसाद आणि खवच्या खिडकीवर मिळतील का?
मला फक्त
मला फक्त प्रतिसादाच्या खिडकीवर ब्लॉककोटसचं बटण दिसत आहे.
मात्र खव आणि व्य. नि मधे दिसत नाही आहेत.
फॉन्टकलरचं आणि अंडरलाईनचं मात्र दिसत नाही आहे.
साईटच्या पुढच्या कामासाठी शुभेच्छा!
आहेत त्या
आहेत त्या सुविधा उत्तमच ! अजुन ज्या मिळतील त्याही छानच असतील.
नविन बदल
नविन बदल मस्तच आहेत
ते लोग आउटच बटण जरा वर करता येईल काय
आहे ते
आहे ते उत्तम आहे, ते उत्तरोत्तर अजुन उत्तम होत जावो.
बर्याच डोक्यात घोळणार्या सुचना वर दिपाली आणि अदितीने आधिच सुचवल्या आहेत.
जस सुचेल तर कळवुच.
त्यामुळे तुर्तास इतेकेच.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
चुकीचे असे टाचण द्या....
हे बटन तळावर उजव्या बाजुला घेता येईल. जी टॉकसारखी आपापसात बोलण्याची सोय पण करणे शक्य आहे का?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
चुकीचे असे
अवचिता
अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू । मी म्हणु गोपाळू, आला गे माये ......
निखिल आला
निखिल आला की 'परिमळु' येतो????
चतुर
व्वा !! चालु
व्वा !! चालु द्यात ..
उत्तम! ह्या
उत्तम!
ह्यासोबत जर मार्गदर्शकच्या वर्/खाली खरडवही आणि व्यसं च्या लिंक्स आल्या तर ते जास्त सोपे जाईल. ताबडतोब नजरेस पडेल.
बाकीचे बदल आणि सोयी स्वागतार्ह आणि छानच!
फेसबुकावर फीड्स गेलेली ही पहिलीच मराठी साईट का हो?
कोण काय
खरडफळा लवकर सुरू करावा म्हणजे लोक धाग्यावर गप्पा मारणार नाहीत.
).
अक्षरे रंगीत करण्याची सोय करावी (पांढर्या अक्षरात लिहिता येत नाही
धन्यवाद.
नितिन थत्ते
आधीच
आधीच बोल्लो होतो त्याला... पांढरी शाई संपली आहे म्हणाला.
अश्लिल
अश्लिल अश्लिल... राजा ह्या नव्या यू आय मधे पेज लोड होण्यास लै टाईम लागत आहे रे.
-पुण्याचे पेशवे
हे
कसे काय झाले?
खरडफळा
खरडफळा लवकर सुरू करावा म्हणजे लोक धाग्यावर गप्पा मारणार नाहीत.
हे वाचुन हसु आले....
खफ सुरु झाल्यावरही धाग्यावरच्या गप्पा बंद होतील असे वाटत नाही....
-निखिल
-निखिल
१००% सहमत
१००% सहमत जो पर्यंत धाग्यात माफक चेष्टा मरकरी होत नाही पर्यंत मजा नाही.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
इतिहासाची पुनरावृत्ती?
अवांतरबंदीचा वटहुकुम इथंपण निघणार की काय?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
त्याची
त्याची गरजच नाही आहे... त्यासाठीच चुकीचे टाचण द्या हि सुविधा आहे ना
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हुश्श्य!
म्हणलं राजेला अजुन एक साईट डेव्हलप करावी लागतेय का काय?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
हॅहॅहॅ!!!
सालं मराठी आंतरजालावर आलो तीच झक मारली की काय? कधी मार्क्स कधी लेनीन कधी माओ....सालं आमी काय कम्युनिश्टाचं जीणं जगावं काय?
तसेही....
इतरांच्या दृष्टीनं ऐटीतले लोक म्हणजे एकतर हिप्पी नायतर कम्युनिष्ट - अगदी मार्क्स, माओ, लेनिन, स्टॅलिन, क्रुस्चेव्ह पद्धतीचे नाय तरी गोर्बावेच स्टाईलचे. उगाचच झिप्र्या वाढवुन अन फाटक्या प्यान्टी घालुन अजागळागत फिरणारे, म्हागड्या शिग्रेटी फुकत देशाच्या सीमाबाहेर नजर लावणारे. लगीन केलं तेव्हा अनुभवलं नाय का?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
रिअॅलिटी
रिअॅलिटी असे लिहिल्यावर मध्येच एक मराठी नसलेले चिन्ह उमटते. ते काढता येईल का?
... मध्येच
माझ्या मते हा फॉण्टचा घोटाळा आहे. माझ्या लिनक्स मशीनवर तुम्ही म्हणता तसं काहीसं दिसतं आणि विण्डोजमधूनमात्र नीट दिसतं.
विण्डोज
लिनक्स माहिती नाही. माझ्याकडे विण्डोज एक्स पी वरच असे दिसते.
जर संपादक
जर संपादक असतीलच तर त्यांना फोलीस किंवा लश्करात जशा पट्या, फिती,लेबल देतात तश्या द्याव्यात जेणे करून ते संपादक आहेत (व आपल्याला पुढे नडू शकतात) असे सामान्यांना वाटेल. म्हणजेच सामान्य लेखक त्यांनी लिहीलेल्या धाग्यांवर गोड गोड प्रतिक्रियाच देतील. दंगा करणार नाही.

------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या इंजन मेक्यॅनीक (ITI-डिझल)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
द्याच.
द्याच. समस्त संपादकांना फाट्यावर मारले जाईल
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
आता
आता प्रतिसाद / खरडवही / नवीन लेखन येथे शब्दांना रंग देणे शक्य झाले आहे त्या सुविधेचा सर्वांनी वापर करावी हि विनंती.
ज्यांना ज्यांना अडचणी येत आहेत त्यांनी येथे सांगावे त्या अडचणी दुर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हो, पण रंग
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
अक्षररंग
अक्षररंग देता येत नाही. माझे ब्राउझर आ ई आहे.
अरे रे काय
अरे रे काय चाललंय? इथे बॅकस्पेस काम करना की राव!
अन हे हो काय? इथे पहा: http://img34.imageshack.us/img34/4968/mimarathi.jpg
-Nile
काही अडचण
काही अडचण दिसत आहे थांबा बघतो आहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सावकाश.
सावकाश.
-Nile
चाचणी
चाचणी चाचणी चाचणी. कुठंय रंग? :|
-Nile
नवीन
नवीन सुविधा उत्तम आहेत पण अक्षराना रंग देणे जमले नाहि.
फाफॉ आहे.
bhaarI zalyat suvidha..
bhaarI zalyat suvidha.. ekdam best zaliy mimarathi
pan maza marathi font gayabla..
+१
asech mhaNato. viShay lihita yeto aahe Marathit, pratikriya nahi
.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
इथे तर
इथे तर येउन राह्यलयं! ???
-Nile
Gayab!
Gayab!
-Nile
मराठी
मराठी लिहता येत आहे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
aamhaalaa naay yet aahe naa.
aamhaalaa naay yet aahe naa. :|
-Nile
+१
phakast viShayaachyaa field madhye yetoy Marathi font
(Baki varachya pratikriyelaa chukoon 'Chukeeche TaachaN' dile gele. TikaDe kRupaya durlakSha karaave hee maananeeya vyavasthaapakannaa vinanti.)
VisheSh Soochanaa - Lavkar durust karaa ho, maalak. ChuchuvaaNee aattaa aattaa kuThe devanaagareetoon vaachataa yetey. Roman madhye kaaheech pattyaa laagaayachaa naahee
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
Pratisaad khidakitil sarva baTaNe (GaTaNe naahi!) gaayab jhaali aahet!!!
-Nile
मला जमला.
मराटीत लिवाया...पन रंग नाय देता येत.
द्द्द्या
द्द्द्या आधी निट शुढ्ह लिहायला शिक मग रंग्बिन्ग दे
चुचुताय..
तुम्चीच शिक्वणी लाव्तो आता.
ज्यांना
ज्यांना मराठी लिहाता येत नाही आहे त्यांनी सिस्टम कुकिज डिलिट करुन पुन्हा लॉगईन करावे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
झालं ब्वॉ!
झालं ब्वॉ! रंगाची बटणं कुठे गेलीत पण?
-Nile
ते सपोर्ट
ते सपोर्ट करत नव्हते... म्हणून काढून टाकले... दुसरे वापरु
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ओक्के!
ओक्के!
-Nile
आपल्या
आपल्या मध्ये कोण पीएचपी जाणकार आहे का ?
मदत हवी होती.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आनंदयात्री
नक्की माहीत नाही, पण बहुतेक आंद्या मदत करू शकेल.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हो मला
हो मला बर्यापैकी येते.
चुकीचे
चुकीचे टाचण द्या याची संख्या किती झाल्यानंतर तो प्रतिसाद उडतो? हे प्रमाण कसे ठरवले आहेस मित्रा? काही प्रतिसाद असे दिसताहेत की ते आत्ताच चेपले पाहिजेत.
२० टाचणे
२० टाचणे झाली की प्रतिसाद उडतो.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
२०
वीस... एवढी टाचणे एकट्यालाच करता येतात का? येत असतील तर तसे होऊ देऊ नका. पण आणखी एक करा - संख्या वीसच्या आत असली तरी, काही जणांना तो प्रतिसाद पसंत पडलेला नाही हे दिसेल अशी काही सोय करता येईल का?
नाही.
नाही.
एकट्याला नाही करता येत.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
चामारी,
चामारी, चुकून तुलाच चुकीचं टाचण दिलं आहे.
राजे, श्रामोंना असं म्हणायचं आहे की एखाद्या प्रतिसादाला काही लोकांनी, समजा ४-५ लोकांनी चुकीचे असं टाचण दिलं आहे तर ते इतरांनाही दिसेल का? कारण ४-५ लोकांनी तसं केलं असेल तर तो प्रतिसाद उडणारही नाही (आणि नेमका तू तेव्हा अॅक्सलरॉड झाला असलास तर ...)
उदाहरणार्
उदाहरणार्थः इथे पहा: इथे किती लोकांना प्रतिसाद आवडला आणि कितींना नाहे आवडला ते दाखवतात, तसे. बरोबर का हो बै?
-Nile
झुठ बोले
झुठ बोले कौआ काटे ... आपलं, हो बरोबर; या निळ्याला बरोबर समजलं आहे.
नविन बदल
नविन बदल मस्त आहेत. फेसबुकावर फीड्स गेलेली ही पहिलीच मराठी साईट असावी. फोटो इथेच चढवण्याचा बदल खूप आवडेल
लंबुटांग
लंबुटांग ह्यांच्या मदती मुळे आता मी मराठीवर शब्दांना रंग देणे शक्य झाले आहे......
त्यांचे अनेकानेक धन्यवाद !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
लै भारी
लै भारी लंबुटांगराव आणि इतर मंडळी! स्वतःच्या रंगात लिहण्याची मजा काही औरच.
-Nile
धन्यवाद :)
नव'चैतन्या'बद्दल धन्यवाद
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
तुम्हाला
तुम्हाला नवोन्मेष म्हणायचे आहे का नंदनशेठ?
-Nile
+१
नव'चैतन्या'बद्दल धन्यवाद
हेच म्हणतो
+२
नव'चैतन्या'बद्दल धन्यवाद!
अरेच्च्या, पण सगळ्यांना रंगांची उधळण वाटणार्या लंबुटांगला मात्र 'काळे'च अक्षर का?
'रंग माझा
'रंग माझा वेगळा' असं म्हणत असेल तो! ;-)
काय
रंग उधळताय रे सगळे मिळून?
सख्या चला
बागा मदी रंग खेळु चला.................
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
मोडकांबरो
मोडकांबरोबर तुम्ही बागा मधी जाताय? जा जा, देव तुमचे भले करो!
-Nile
का हो....
आमच्या बागांना तुमची काही हरकत?
हरकत कुठली
हरकत कुठली हो? आता 'चला बागामधी' ऐकतोय. नंतर उसाला लागला कोल्हा ऐकु! त्यात काय मोठं?
-Nile
आधी
आधी सभासदांचे attitude बदला.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
'मोठे व्हा'
'मोठे व्हा' एवढंच म्हणता येईल.
इंद्रधनु
त ना पि ही नि पा जा बद्दल लंबुटांगजी धन्यवाद
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
बघुया
बघुया रंगीबेरंगी कसे लिहिता येइल ते.
एखाद्या
एखाद्या लेखकाचे लेखन पाहण्याची इच्छा नसेल तर ते पाहणे बंद करण्याची सुविधा चालू केली आहे त्याचा वापर करावा.
धन्यवाद.
म्हणजे? अशी
म्हणजे?
अशी सुविधा नक्की कोठे आहे?
तिचा वापर कसा करायचा? एखाद्या सदस्याच्या प्रोफाईलवर जाऊन काही ऑप्शन निवडायचे आहेत का? की प्रतिसादाखालीच तसं दिसणार आहे?
ज्या
ज्या लेखकाचे लेखन तुम्हाला पाहण्याची इच्छा नाही त्या लेखकाच्या लेखा खालीच तुम्हाला एक टॅब दिसेल " **** ह्यांचे लेखन दिसणे बंद करा. " तेथे क्लिक केल्यावर तुम्हाला त्या लेखकाचे धागे दिसणे बंद होईल. पुन्हा सुरवात करण्यासाठी / त्या लेखकाचे धागे पाहण्यासाठी तुम्ही लेखक सुची मध्ये जाऊन बदल करु शकता.
धन्यवाद.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ओह अच्छा!
माहितीबद्दल धन्यवाद.
मला वाटतं, ही सोय धाग्यांपेक्षा प्रतिसादाबद्दल जास्त संयुक्तिक ठरावी. काही ठराविक आयडींद्वारे वैयक्तिक चिखलफेक्,अश्लील आणि हिडीस अशा प्रकारच्या येणार्या प्रतिक्रिया पाहुन उद्वेग येण्यापेक्षा त्या न पहाणे हेच जास्त योग्य असे माझे मत आहे.
हो
हो प्रतिसाद ही दिसणार नाहीत त्या लेखकाचे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अच्छा! असे
अच्छा! असे आहे तर.
धन्यवाद.
आपले
आपले लेखन न पाहण्याची इच्छा एखाद्या (अज्ञात) आयडीला आहे हे लेखकाला समजण्याची काही सोय आहे का?
>>आपले लेखन
>>आपले लेखन पाहण्याची इच्छा एखाद्या (अज्ञात) आयडीला आहे हे लेखकाला समजण्याची काही सोय आहे का?
आहे की नाही?
कारण सर्वसामान्यरित्या नकारात्मक मते फार कमी/कमी आयडींना असण्याची शक्यता आहे. तेव्हा नकारात्मकचेचं फ्लॅगिंग काऊंट जास्त सोपा राहिल असं वाटते.
हे सांगा
हे सांगा ब्वॉ! इथे आम्ही इतक्या व्यस्त वेळापत्रकामधुन 'समाजकल्याणासाठी' इथे येतो. एखाद्या दुर्दैवी जीवाला आमचे प्रतिसादच दिसणार नसतील तर आम्ही टंकायला वेळ घालवणार नाही.
-Nile
जमल हो जमल.
जमल हो जमल.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
क्ष टेस्ट
क्ष टेस्ट
नमस्कार, आपण आता ड्रुपल चे
नमस्कार,
आपण आता ड्रुपल चे नवीन आवृती ड्रुपल ६.१५ वर कार्यरत झालो आहोत.
काही जुन्यासुविधा बंद केल्या आहेत व नवीन चालू केल्या आहेत ज्यांना अडचण येत असेल त्यांनी येथे लिहावे ही विनंती.
ओक्के....सुविधा टेस्टींग
ओक्के....सुविधा टेस्टींग करताना पाहिल्या.. आवडल्या..
जुन्या कोणकोणत्या सुविधा बंद
जुन्या कोणकोणत्या सुविधा बंद केल्या आहेत?
१. चुकीचे टाचण द्या
२.काय करताय
३. खरडवही????????????????????????????????????? तीव्र निषेध
४. खरडफळा
यातल्या कोणत्या कोणत्या सुविधा आणि कधी परत कार्यान्वित करणार ते सांगा.
-पुण्याचे पेशवे
राजेच्या बैलाला
राजेच्या बैलाला ..............खव चालू कर रे......
अरे वा राजे! छान आहे की हे
अरे वा राजे!
छान आहे की हे संस्थळ.
साधे आणि सुटसुटीत!
आवडलं.
आणि आपले जुनेच पंटर दिसताहेत सगळे.
क्या बात है! मस्त मैफल जमलेली दिसतेय.
माझी खरडवही दिसत नाहीए
माझी खरडवही दिसत नाहीए
हेच म्हणतो
मी पण. तसेच हजर सभासदांची यादी एकाखाली एक अशी दोनदा दिसतेय, काय कारण/प्रयोजन?
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
आणि चॅट बोक्स काय आहे ? त्यात
आणि चॅट बोक्स काय आहे ? त्यात मराठी नाही येत लिहिता
बाप रे
मोडक काकांना जो प्रश्न पडलाय तोच
"आपले लेखन न पाहण्याची इच्छा एखाद्या (अज्ञात) आयडीला आहे हे लेखकाला समजण्याची काही सोय आहे का?"
मला वाटत आणखी थोडा त्रास सगळ्यंनाच होईल बस्तान बसेपर्यंत तरी?
श्री रा रा राजे. आपण ज्या
श्री रा रा राजे.
आपण ज्या पद्धतीने दिवस रात्र खपुन मी मराठीला ज्या नवनवीन सुविधांनी संमृद्ध करीत आहात त्याबद्द्ल आपले आभार.
हे बदल करत असताना खव, खफ या सोयी आणि मीमच नव वैशिष्ठ्य "कोण काय करतय?....... "
हे ही बंद दिसत आहे.
अपेक्षा करतो की या सोयी लवकरच चालु होतील.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
ह्म्म
ह्या सोयी सुविधा ठीक आहे हो पण तुम्ही पुढचा विचार केला आहे का? जेव्हा नव्या पिढीतले मराठी जालवाचक येतील तेव्हा ह्या सगळ्या लेखनातील मोती / खरी खुरी उपयुक्त माहीती कशी त्यांना मिळेल, शोधता येइल. याचा काही विचार?
फक्त "शोध" या सोयीवर अवलंबून न रहाता, विविध कॅटेगरी/विभाग तयार करुन उत्तम साहीत्य/माहीती त्या विभागात टाकली जावी. की भावी वापरकर्त्यांना एक चांगला ऐवज, एक अमुल्य माहीतीचा ठेवा असेल.
विचार करा आज गुगल बहुसंख्य जालवापरकर्त्यांचे अत्यावश्यक साधन बनले आहे तसे मराठी माणसाठी हे संकेतस्थळ बनले पाहीजे यावर विचार, चर्चा करुया.
आणि हो, तयार झालेल्या गप्पाटप्पा किंवा तत्सम अनावश्यक साहीत्य, ढकल साहीत्य इ वरचेवर डिलिट करा म्हणजे "शोध" ही सोय अजुन लवकर व चांगले उत्तर देईल.
साफ सहमत आहे. गप्पा-टप्पा आणि
साफ सहमत आहे. गप्पा-टप्पा आणि फाल्तू कुचाळक्या करण्यासाठी खव आणि खफची सोय झालीच पाहिजे.
अवांतरः प्रतिसाद शेव्ह करत आहे.
+१
सहमत आहे. केळीच्या पानाभवती रांगोळी काढली आहे, उदबत्त्या लावल्या आहेत. पाच प्रकारची लोणची, कोशिंबिरी, पंचामृत, मीठ, लिंबू इ. सगळं आहे; फक्त पोळी-भाजी/वरणभात न वाढता "हं, करा आता सुरुवात" म्हटल्यासारखं वाटतंय
.]
[गणपाच्या पाकृ वाचण्याचा परिणाम. उपमापण खाण्यातलीच सुचते
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मला पण
उपमा खुप आवडातो/ आवडाते ;-)
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
हॅ हॅ हॅ
सोबत छायाचित्र नसल्याने प्रतिक्रियेवर विश्वास बसला नाही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अगदी मान्य.. ह्या दृष्टीनेच
अगदी मान्य..
ह्या दृष्टीनेच विचार चालु आहे,
-निखिल
हो ह्याच दिशेने प्रयत्न करत
हो ह्याच दिशेने प्रयत्न करत आहे व सर्वाचे सहकार्य मिळाले की होईलच.
सर्वात आधी सदस्यांच्या व्यक्तीगत सुविधा जसे चॅट / खरडवही ह्यांची पुर्तता करुन ह्याकडे वळू हा विचार केला होता.
धन्यवाद
खुलाशाबद्दल धन्यवाद व्यवस्थापक साहेब
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
'शोध'विना
'शोध'विना अस्वस्थ हा 'लिंकन'. राजे, निखिल, धमु, लवकर हे काम मार्गी लावा पाहू. आपला हा राजकुमार असा अस्वस्थ राहून चालायचं नाही. उपमा पहा कशा देतोय ते: 'पानात पोळी, भातवरण न वाढताच "हां, करा सुरवात" असं यजमानांनी म्हणायचं' वगैरे. पुणे - ३० च्या पलीकडचा टोला आहे हा.
:)
व्यवस्थापकांनी खुलासा केल्यामुळे धीर धरून अद्ययावतपणा पाहतो आहे
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हॅ हॅ हॅ ... नंदन, राजकुमार,
हॅ हॅ हॅ ... नंदन, राजकुमार, पुणे-३० असे शब्द एकत्र वाचून अंमळ गोंधळ उडाला आहे. असो, व्यवस्थापक खुलाशाबद्दल धन्यवाद.
चुकून अद्ययावतपणे 'वाहतो' आहे
चुकून अद्ययावतपणे 'वाहतो' आहे असे वाचले. असो.
उपरोक्त
उपरोक्त प्रतिक्रियांचा अभ्यास करता आमच्याच एका सल्ल्याची आठवण झाली!
हॅ हॅ हॅ
"जराशा" फरकाने हाच सल्ला का? - http://mr.upakram.org/node/468#comment-6685
. बाकी इतर प्रतिसादही वाचनीय आणि चिंतनीय.
बाकी आज मंगळ पृथ्वीच्या बराच जवळ येणार आहे म्हणे...जोजोकाकू काहीतरी सल्ला द्या वरील लेखात दिलाय तसा माहितीपूर्ण
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
क्या बात है!
क्या बात है!
आम्ही जेव्हा "मोठे व्हा" असं म्हणालो तेव्हा त्यामागं असलेला हा संदर्भ आज उजेडात आणलात त्याबद्दल किती धन्यवाद द्यावेत तुम्हाला? निदान आता तरी, या संदेशाचं (कुत्सीत) श्रेय आमच्या नावे खपवणं थांबवतील आमचे मित्र, अशी आशा करूया. ते श्रेय ज्याचं त्याला जावं. तुमच्या या प्रतिसादातील "जराशा" या शब्दाचे महात्म्य ते हेच. आशा करूया की, आपले मित्र मोठे होतील आणि हा फरक समजून घेतील.
हॅहॅहॅ!!! तुमचेच मित्र ते...
हॅहॅहॅ!!! तुमचेच मित्र ते... कुत्सीतपणा सोडला तर मैत्री तुटेल ना.
आता
आता मात्र "मोठे व्हाच!"
त्यांच्यातील (आणि त्यांच्या काही [निदान माजी तरी, म्हणजे ते "बेडरूम" वगैरे होण्याआधीपर्यंतचे तरी] मित्रांमधील, जे तुमचेही मित्र आहेतच) कुत्सीतपणा अंगभूत. तो पाहूनच आम्ही त्यांच्यापासून चार हात लांब राहतो. असं असताना हे काय भलतंच मैत्री वगैरे? मोठे व्हाच, मग कळेल!
सल्ला आधीच दिलेला आहे, मी
सल्ला आधीच दिलेला आहे, मी पुन्हा एकदा लिहू शकते ... मोठे व्हा! ;-)
पिन अडकली दिसतेय...
पिन अडकली दिसतेय. गाडी तिथंच येऊन थांबतेय, कारण नसताना!
काय आहे, पिना मारायची सवय
काय आहे, पिना मारायची सवय असताना अचानक पिन अडकली की अंमळ गोंधळ होतो ना ...
२ सूचना
१. नवीन होमपेज पेक्षा जुने होमपेजच जास्त चांगले होते - ते परत आले तर छान होईन.. आत्ता जशा कॅटेगरीज केल्या आहेत त्यांच्यासाठी जुन्या होमपेजवर लिंक्स देता येतीन...
२. "शोधा"मधे इंग्रजी टाईप का होते आहे? मी गूगल क्रोम ब्राऊजर वापरतो.. पण ही सर्व ब्राऊजर्स ची अडचण आहे.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
नवीन होमपेज पेक्षा जुने
नवीन होमपेज पेक्षा जुने होमपेजच जास्त चांगले होते - ते परत आले तर छान होईन.. आत्ता जशा कॅटेगरीज केल्या आहेत त्यांच्यासाठी जुन्या होमपेजवर लिंक्स देता येतीन...
+१२३४५६७८९०
बाकी 'लुक अँड फील' मधे अजून बरेच काही करता येईल.
आणि एक
आणि एक... कोणती चर्चा वा लेखन सध्या वाचकांच्या चर्चेत आहे ते काय बी कळत नाय...
कोण कुठे जास्त धुडगुस घालत आहे हे कसे कळणार ?
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
सर्वात शेवटी पाहिले तर
सर्वात शेवटी पाहिले तर तुम्हाला वाचकांना आवडलेले असा एक ब्लॉक दिसेल.
त्यात तुम्ही पाहू शकता.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
तेथे मराठी लिहण्याची सोय
तेथे मराठी लिहण्याची सोय सुरु झाली आहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
एक झुरळ (बग)
शोध पूर्णपणे कार्य करत नाही
उदा: दिवस असे होमपेज वर टाईप करा. मग तुम्हाला नवीन पेजवर सर्च रिझल्ट्स दिसतीन... त्या पानावर पुन्हा शोधायला इंग्रजीच टाईप होते आहे
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
झाले. बग नाही सेटिंग मुळे
झाले.
बग नाही सेटिंग मुळे तसे होत होते.
झाले आता.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
चांगले आहे
चांगले आहे
लेख वाचताना अक्षराचा आकार कमी
लेख वाचताना अक्षराचा आकार कमी अथवा जास्त करता आला तर बरे होईल
लहान अक्षरे वाचायला त्रास होतो.
पान १ २
पान १ २ हा दुवा पानाच्या शेवटि दिसतो. तो वर पण दिसल्यास सोइचे होइल
जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे
+१
सहमत
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
रोजच्या घडणार्या प्रसंगा चे मत मांडू शकतो का?
रोजच्या घडणार्या प्रसंगा चे मत मांडू शकतो का?
रश्मि मेस्त्री.
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील..... पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं...
....कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही..!!
एक ओळी लेखन नसेल तर चालेल
एक ओळी लेखन नसेल तर चालेल
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."