कातरवेळ

0
0

सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्याने त्या शुक्रवारी मी जरा लवकरच घरी आलो होतो अन इंग्रजी चित्रपटाची सीडी लावुन बसलो होतो. कुशीत गोटु झोपला होता. अन रात्री अकरा वाजण्याच्या सुमाराला फोन घणघणला. सहसा माझ्या कार्यालयीन कामाचे फोन भ्रमणध्वनीवरच येतात त्यामुळे लॅन्डलाइनवरचा फोन बहिणीचा किंवा भावाचा असेल असा अंदाज करत मी उचलला.

"अरे आईला संध्याकाळपासुन चक्कर येतीये. डॉक्टरकडे जाऊन आलो आम्ही तर ब्लडप्रेशर जास्त होतं. त्यांनी ब्लडप्रेशरची गोळी घ्यायला सांगीतल होत अन ती गोळी तासाभरापुर्वी घेतली तरी अजुन चक्कर येतेच आहे," ठाण्याहुन बहिण बोलत होती. आवाजात तणाव जाणवत होता.

आई सुमारे दहा दिवसांपुर्वीच बहिणीकडे ठाण्यात रहायला गेलेली. जाताना पुण्यात डॉक्टरांकडे सगळे हेल्थ चेक अप केलेले अन तेव्हा तब्येत नॉर्मल असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिलेला. त्यामुळे काहीतरी किरकोळ असेल असे वाटले अन बहिणीला मी सांगीतले की, "थोडा वेळ वाट बघु, कदाचित बरे वाटेल. वाटल्यास डॉक्टरना परत फोन कर. नाहीतरी उद्या मला सुट्टी आहेच तर मी उद्या सकाळी तिकडे येतो." अन फोन ठेवला. पण कुठेतरी काहीतरी चुकत असल्याचे जाणवत होते. फोन ठेवला अन लक्षात आले की आपण ब्लड प्रेशर किती आहे, गोळी घेऊन किती वेळ झालाय ते विचारलेच नाही. परत फोन लावला तर बिझी होता. बहुतेक बहिण डॉक्टरांशीच बोलत होती. रिडायल केले तर फोन लागला.

"डॉ़क्टरांशी बोलले मी. ते म्हणाले गोळी घेतल्यावर लगेच चक्कर थांबायला हवी होती. त्यांनी ज्युपीटर हॉस्पीटल मधे न्यायला सांगीतलय," बहिण म्हणाली. चौकशी केली तर कळले डॉक्टरांनी तपासले तेव्हा ब्लडप्रेशर १०५/२१० होते. आई फोनवर बोलु शकत होती. तिने सांगीतले, "बहिण ऑफिसमधे गेल्यावर घरात ती एकटीच होती. संध्याकाळ पर्यंत सगळे ठीक होते पण पाच वाजल्यानंतर ती जरा आडवी झाली तर जोरात चक्कर यायला लागली." बोलण्यावरुन आई पुर्ण सावध असल्याचे जाणवत होते पण आवाज खोल गेला होता अन थरथरत होता. लगेच निर्णय घेतला अन बहिणीला कळवलं, "आईला मिळेल त्या वाहनानं लगेच हॉस्पीटलमधे ने. मी ताबडतोब ठाण्याला पोहोचण्यासाठी निघतो आहे."

फोन ठेवला अन पुन्हा परिस्थितीच भान आलं. बहिण ठाण्यात रहात असली तरी दिवसभर कामानिमित्त मुंबईतच असते. तिला ठाण्यातली फारशी माहिती असणे शक्यच नव्हते. त्यात आई अशी आजारी, ती एकटी अन रात्रीची वेळ. मदतीला कोणीतरी हवे, किमान मी ठाण्याला पोहोचेपर्यंत तरी. पहिले नाव डोळ्यासमोर आले ते आंतरजालावर भेटलेला सुहृद निखिल देशपांडे याचेच. सरळ त्याला फोन लावला अन सगळी परिस्थिती कानावर घातली. बहिणीचे फोन नंबर दिले अन विनंती केली तिच्याबरोबर संपर्क साधुन हवी ती मदत करण्याची. त्यानेही हात आखडता न घेता लगेच फोन करतो अन ताबडतोब त्यांना भेटायला जातो असे कळवले.

त्यानंतर पुण्यातच असलेल्या बहिणीला फोन केला अन असे असे झाल्याने मी ठाण्याला जात असल्याचे कळवले. मेहुण्यानी धीर दिला परंतु मन काही थार्‍यावर नव्हते. मग टुर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल बिझिनेस मधल्या माझा मित्र माऊली याला फोन केला अन ताबडतोब गाडी हवी असल्याचे कळवले. काय झाले आहे ते कळल्यावर त्याने स्वतःच माझ्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला. अडचण फक्त एकच होती, त्याची सगळ्यात आरामदायक गाडी त्या दिवशी औरंगाबादला पाठवली होती अन केव्हाही परतणे अपेक्षित होती. कुणी गाडी नेलीय चौकशी केली तर कळले माझाच मित्र नितीनकडे ती होती. लगेच नितीनला फोन केला. तो रस्त्यात जेवायला थांबला होता पण मला गाडी हवीये म्हटल्यावर न जेवता तसाच पुण्याला परतला.

दरम्यान बहिणीने ठाण्यातच असलेली तिची एक मैत्रीण अन माझ्या तिथेच रहाणार्‍या मामेबहिणीशी संपर्क साधला होता अन ते सगळे लोक बहिणीच्या घरी पोहोचले होते. निखिल स्वतः हॉस्पीटलमधे त्यांची वाट पहात होता. हॉस्पीटल मधे जायला निघता निघताना आईला दोन उलट्या झाल्याचे कळले अन चिंता अजुनच वाढली. पण आई स्वतः फोनवर बोलत होती त्यामुळे जरा धीर येत होता.

तरी गाडी येऊन मी घरुन निघेपर्यंत साडेबारा-एक वाजलेच. पण निखिल, मामेबहिणीचा मुलगा, वगैरे मंडळी आईबरोबर असल्याने अन ते फोनवरुन थोड्या थोड्या वेळाने संपर्कात असल्याने जरा आधार वाटत होता. आईला ट्रीट करणार्‍या डॉ़क्टरांशीही त्यांनी फोनवर बोलणे करवुन दिले. रात्री अडीच-तीन वाजता मी हॉस्पीटलमधे पोहोचलो तेव्हा सगळे तिथेच थांबले होते. बराच आग्रह करुन सुद्धा निखिल वगैरे मंडळी पहाटेपर्यंत बरोबर थांबली. त्या दिवशी कुणालाच झोपता आले नाही.

तीन दिवस आय सी यु मधे अन एक दिवस वॉर्ड मधे काढल्यावर आईला डिस्चार्ज मिळाला अन ती पुण्याला परतली सुद्धा. डॉक्टरांनी सांगीतले मानेचे स्नायु आखडल्याने तिला त्रास झाला. आता औषधे, व्यायाम वगैरे सुरु आहे अन तिची तब्येत सुधारते आहे. पण अजुनही त्यारात्रीची आठवण अस्वस्थ करुन जाते. सुहॄदांच्या सहकार्यानेच अवघड परिस्थितीवर मात करुन ती कातरवेळ निभावुन नेणे शक्य झाले.

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी किंवा रिअल व्हर्च्युअ‍ॅलिटी म्हणतात ती हीच असेल का?

आई सुखरुप

1

आई सुखरुप आहे हे वाचून आनंद झाला.

निख्या बद्दल काय बोलावे.... एक वेगळा माणूस... हास्य

ह्या नवीन वर्षातच किती नाती जुळली बघा ना..

महाजालीय जिवनातून आपण कट्टा व ढोसरी साठी एकत्र येत गेलो व एक वेगळीच मैत्री निर्माण झाली व अश्या प्रसंगातून ही मत्री अजून पक्की होत गेली... धीस ईज रियल वल्ड !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हुश्श

2

हुश्श ... शेवट वाचल्यावर असे झाले. ती माउली तुमचे म्हातारपण पाहो.
बाकी ... निखिलरावांचा विजय असो. औरंगबादकरांचा विजय असो हास्य

आई सुखरुप आहे हे वाचून आनंद झाला

3

>>आई सुखरुप आहे हे वाचून आनंद झाला
असेच म्हणतो.

असेच

4

असेच म्हणतो. तुमची आई सुखरुप आहे हे ऐकून जीव भांड्यात पडला. बरेच दिवस त्यामुळे तुम्ही दिसला नाहीत, मनात शंकेची पाल चुक चुकली पण आता हायसे वाटले


-पुण्याचे पेशवे

आई सुखरुप

5

आई सुखरुप आहे हे बर वाटल.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

प्रसन्न,

6

प्रसन्न, आईची काळजी घे रे बाबा. बाकी, आंतरजालावरच्या आभासी दुनियेत जीवाभावाचे खरे दोस्त मिळाले हे खरेच. मागे माझ्या घरी काही समस्या उद्भवली असताना धमी पण अशीच सरळ बॅग घेऊन आली आणि तीन दिवस राहून मदत केली सगळी. आता याला कोणी कंपू म्हणत असतील तर म्हणोत बापडे. डब्यात यायची इच्छा प्लॅटफॉर्मवरच्या सगळ्याच लोकांना असतेच. असो.

सहमत.... माझे

7

सहमत....

माझे हॉस्पिटल मधील ८ दिवस मी पण कधीच विसरु शकणार नाही पुण्यातले... खुप जिवाळ्याची माणसं भेटली.... !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मला सुध्दा

8

मला सुध्दा आता आडमिट व्हावेसे वाटतेय :$

ए गपे...

9

ए गपे... काहीही बोलते ही बया...

चुचु

10

चुचु तुझ्या काय जीभेला हाड thinking


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

(विषय दिलेला नाही)

11

Laughing out loud त्यानिमित्ताने मला भेटाल तरी...जेवहा पासुन फोटो पाहिलाय जिमेल ला एकही बाइ न बुवा फिरकत नाहिये ;(

तुझ्या

12

तुझ्या भारतवारीचे काय ठरले??? २८ जाने???
-निखिल


-निखिल

होय.....येतेय

13

होय.....येतेय

तू काही

14

तू काही कारणासाठी अ‍ॅडमीट झालीस तर आम्ही येऊ भेटायला. काळजी नको करु.


-पुण्याचे पेशवे

अ‍ॅडमीट

15

अ‍ॅडमीट होवे चुचु के दुश्मन !!!

तु ये मग

16

तु ये मग आम्ही तुला पण भेटू... बाकी तुच जी टॉक वर नसतेस ऑनलाईन wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

>>>

17

>>> व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी किंवा रिअल व्हर्च्युअ‍ॅलिटी म्हणतात ती हीच असेल का?
--- अगदी, अगदी. बिकाकाकांशी सहमत आहे. कोणाला कंपूबाजी म्हणायची असेल तर म्हणू देत, पण अशा प्रसंगी विश्वासाने मदतीसाठी ज्याला हाक घालू शकतो तोच खरा मित्र.

पण अशा

18

पण अशा प्रसंगी विश्वासाने मदतीसाठी ज्याला हाक घालू शकतो तोच खरा मित्र.

अ फ्रेंडीन्नीड इज फ्रेंडींडीड Big smile

+१००%सहमत

19

प्रसनदा, आईंची तब्येत ठीक आहे हे वाचून बरे वाटले.

बाकी मलाही बरेच जिवाभावाचे मित्र भेटले आपल्या मराठी जालावर....

+२

20

बिका, नंदन आणि आमच्या समस्त कंपुशी सहमत ...
शब्दात नाय सांगता येणार च्यायला ही अ‍ॅटॅचमेंट, ज्यांनी ती अनुभवली / भोगली त्त्यांनाच कळेल न सांगता ...

बाकी प्रसनदा, काळजी घे रे बाबा. आधी समजले होतेच काय ते पण आता तुझ्याकडुन खुशाली कळाल्याने बरे वाटले.
निख्याबद्दल काय बोलायचे ? राजा माणुस आहे साला...
तसेच आमचे पुण्यातले काही मित्र, पुर्वी काही कशाकशाचा संबंध नव्हता, पण आज जेवढे पुणे ट्रिपमधेय बहिणीचे घर कंपल्सरी तेवढेच ह्या हलकटांना भेटणे कंपल्सरी. जाऊ द्या, लै जीव लागतात हो !

प्रसनदा,

21

प्रसनदा, तुमची आई सुखरूप आहे हे वाचून बरं वाटलं. वर्णन वाचताना माझ्याच आईच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी आठवल्या आणि .... असो.

कंपू कंपू म्हणून लोकांना आवाज करायचा तो करू देत, खूप चांगले मित्र-मैत्रिणी आंजामुळे मिळाल्या हे मी अगदी आनंदाने म्हणू शकते.

खूप चांगले

22

खूप चांगले मित्र-मैत्रिणी आंजामुळे

चुकून 'आंद्या मुळे' असं वाचलं, आणि 'चांगले' आणि 'आंद्या' हे दोन्ही शब्द तुमच्या एकाच वाक्यात आले हे बघून अंमळ आश्चर्यचकित झालो.

का रे

23

का रे आद्याला छळतोस Big smile

एकदा

24

एकदा त्याला भेटून बघा मग कोण कोणाला छळतो ते कळेल. असो. योग यावाच बहुधा लवकर.

अदिती

25

अदिती किंवा आदिती हलकट आणी खडुस आहे !!

-
(चांगला) आंद्या

- ३.१४ असहमत

26

- ३.१४

असहमत + सहमत = वैचारिक गोंधळ !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मोठ्या

27

मोठ्या प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे...
प्रसन्नदा आई बरीएनरे आता... आणी तु कसा आहेस???
ह्या धाग्यात उगाच माझे नाव टाकलेस....
-निखिल


-निखिल

बरीएनरेथो

28

बरीएनरे

थोडा हेल काढून वाचला तर हा शब्द सौधिंडियण वाटतो. असो.

हुश्श!

29

आई सुखरुप आहे हे वाचून आनंद झाला.

खरे आहे ह्या आभासी जगातुन अनेक चांगले मैत्र मिळाले आहेत.

ऑल इज वेल!

व्हर्च्यु

30
व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी किंवा रिअल व्हर्च्युअ‍ॅलिटी म्हणतात ती हीच असेल का?

क्या कही!

कुपमंडुक वृत्तीचे लोक, जे वास्तवातच काय पण आंतरजालारही मित्र बनवु शकत नाहीत ते असेच कंपु कंपु करुन ओरडत असतात. सोडुन द्यायचं. आज खरं तर आंतरजालामुळेच अनेक जिव्हाळ्याची नाती तयार होत आहेत, आपल्यातच हे गेल्या काहि दिवसात दिसुन आलं आहे.

काळजीचे काही कारण नाही हे वाचुन बरे वाटले.


-Nile

लेखाच्या

31

लेखाच्या सुरुवातीला एखाद्या कड्याजवळ आणल्यासारखे वाटले, शेवटी परत खेचले. शेवट वाचुन आनंद झाला. आईची काळजी घ्या !!

--टुकुल

नाती...

32

नाती अशीच असतात. आजकाल रक्ताच्या नात्यांपेक्षा अनेकदा ही नवी नातीच अधिक घनिष्ट असतात. वैयक्तिक स्तरावर माझे काही मित्र असे आहेत की जे घरचेच आहेत. माझ्या चुलत, मावस, आते, मामे वगैरे भावांशी मी अनेकदा जितका रिलेट करू शकत नाही त्यापेक्षा अधिक या मित्रांशी रिलेट करू शकतो. तीच गोष्ट दोन मैत्रिणींची. नात्यातील काही बहिणींपेक्षा या दोघींशी माझे अधिक जमते. हे फक्त माझ्या पिढीपुरते नाही. माझ्या आधीच्या पिढीतील ज्येष्ठांबाबतही असाच अनुभव मी अनेकदा घेतला. जाणीवपूर्वक स्वतःच्या व्यवहाराचे निरिक्षण केल्यानंतर ही बाब ध्यानी येत गेली माझ्या.
इथे आंतरजालावर आपण असतो ते फक्त जालीय जगण्यापुरते नाही. त्यापलीकडे आपण भेटत असतो, बोलत असतो, भांडत असतो, एकमेकांना छेडत असतो. त्यातूनच हे बंध आकाराला येत असावेत.
हा विषय अशा पद्धतीने मांडल्याबद्दल आनंद झाला.
बदलत्या काळातील संवादमाध्यमे आणि त्याचा नात्यावर होणारा साधक-बाधक परिणाम असा हा चर्चा करण्याजोगा विषय आहे!

प्रसन्नदा,

33

प्रसन्नदा, आई सुखरूप आहेत हे ऐकुन बरे वाटले. निख्यानी वेळेला धावुन जी मदत केली त्याबद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. अशा कातरवेळा टाळता येत नसल्या तरी त्या शक्यतो कोणाच्या आयुष्यात येउ नयेत हिच प्रार्थना.

काल्जी घ्या.

34

पुनेरि बरा वाटला तुमची आय लवकर बरी झाली म्हनून.
तरिबी काल्जी घ्या. आय नाय तर जगन्यात राम नाय.

आचरट्...शेव

35

आचरट्...शेवटचे वाक्य लिहायची काहि गरझ होति का thinking

तुमचे आई

36

तुमची आई बरी आहे हे वाचून बरं वाटलं...

+१

37

+१

व्यवस्थित काळजी घ्या.

38

आईची काल्जी घ्या, असे मित्र मदत करतात तेव्हा मैत्री काय असते याची कल्पना येते.

सदिच्छा

39
व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी किंवा रिअल व्हर्च्युअ‍ॅलिटी म्हणतात ती हीच असेल का?

अगदी हीच. आभासी जगतातील आयडीं मागे माणुसच असतो शेवटी.
सहअस्तित्वातुन काही नाती तयार होतातच ना शेवटी. इथेही तसेच आहे.
आपल्या आईला निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा!
-प्रघा


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

प्रसन्नदा

40

प्रसन्नदा आहो उगाच मला मोठेपणा का देताय??? त्या दिवशी मी हॉस्पिटलात फक्त हजर होतो दुसरे काहीही केले नाही. उगाच काही तरी मोठे काम केलय असे वाटायला लागते... त्यात आपले मित्र तर काय काय प्रतिक्रिया देतात..

निख्या बद्दल काय बोलावे.... एक वेगळा माणूस...
निखिलरावांचा विजय असो. औरंगबादकरांचा विजय असो
निख्याबद्दल काय बोलायचे ? राजा माणुस आहे साला...
निख्यानी वेळेला धावुन जी मदत केली त्याबद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच.

अरे कौतुक कसची करताय... आता मला सांगा आपली मैत्री ज्याला आपण सोयीसाठी कंपु म्हणतो तो फक्त अभासी जगता पुरता मर्यादित राहिला आहे का??? त्यामुळे जे एखाद्या मित्रासाठी करायचे असते तेच मी केले.

असो माझ्या ह्या कौतुकात मुख्य विषय बाजुला राहिला नको!!!!
व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी किंवा रिअल व्हर्च्युअ‍ॅलिटी म्हणतात ती हीच असेल का?
वर मोडक म्हणतात त्या प्रेमाणे... आतंरजालावर निर्माण होणारी नाते हे बरेच वेळा आपल्या रिअल लाईफ नात्यापेक्षा जवळची वाटतात आणि असतात. कारण वेळ प्रसंगि आपण एखाद्या दुरच्या नातेवाईकापेक्षा ह्या मित्रांशी रिलेट करु शकतो. आता हे नाते अभासी आहेत का??? खरे पहाता होय!! कारण आपण जे माध्यम वापरतो त्यात अनोनिमस रहाणे खुप सोपे आहे. पण आपण ती स्टेज पार करुन गेलो आहोत... आपण एकमेकांना भेटलो आहोत आणि त्यामुळे एकमेकांशी छान रिलेट करु शकतो.
जाता जाता त्या दिवशी प्रसन्नदाचे एक नातेवाईक तिथे होते. त्यांनी प्रसन्नदाला एक प्रश्न विचारला " मी आय टी क्षेत्रातला, मग माझी आणि प्रसन्नदाची भेट झाली कुठे?" प्रसन्नदाच्या ईंटरनेटद्वारा ह्या उत्तरावर त्यांचा चेहर्‍यावरचे आश्चर्याचे भाव पाहण्यालायक होते.

-निखिल


-निखिल

इथे मोठेपणाचा प्रश्न नाही निखिल...

41

त्या रात्री तुझा खरच आधार वाटला मला. ब्लड प्रेशर वाढलेले अन त्यात दोन उलट्या पण झालेल्या म्हणल्यावर मनात काहीच्या बाही आलं होतं, एक क्षण सगळ जग गरकन फिरल्यागत झालं मला. रात्रीची वेळ, असं शहर कि जिथं आपलं म्हणावं असं कोणीच नाही अन आणीबाणीची परिस्थिती. कितीही तातडीनं निघालो तरी मला तिथं पोहोचायला किमान दोन्-अडीच तास लागणार. अश्यावेळी काय करावं हा मोठा प्रश्न होता अन त्या क्षणाला तातडीनं मदत घेण्याजोगं फक्त तुझं नाव डोळ्यासमोर आलं.

इथुन निघालो तरी रस्त्यात असताना जीव कासावीस तर होताच. पण त्यावेळी तू थोड्या थोड्या वेळानं अपडेटस देत होतात, तु तिथं आहेस हा मनाला आधार होता. मी तिथं पोहोचल्यावर लगेच तु निघुन गेला असतास तरी तु केलेल्या मदतीचं महत्व कमी होणार नव्हतं, पण तरी तु सकाळ पर्यंत तिथे बरोबर राहिलास अन नंतर दुसर्‍या दिवशी अजिबात आराम न करता परत ऑफिसलाही गेलास.

हे सगळं करतो तो माझ्या दृष्टीनं नातेवाईकापेक्षाही जवळचाच, अन म्हणुनच सुहृद - ज्याला हृदगत न सांगता कळतं तो. ते नातं रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळच असतं. अन हे नातं जमावं तरी कसं तर ज्याला आम्ही रियल वर्ल्ड मधली माणसं नेहमी व्हर्च्युअल म्हणतो त्या आंतरजालामुळं. अर्थातच आपले संबंध फक्त जालापुरते मर्यादित राहिलेले नसतात पण तरीही व्हर्च्युअ‍ॅलिटी आणि रिअ‍ॅलिटी यात किती कमी अंतर आहे, अगदी शहाणपण अन वेडेपण यांत असतं तसच, हे अश्याच निमित्तानं लक्षात येतं ना.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

चला..देव

42

चला..देव पावला! आई बर्‍या आहेत ऐकुन बरं वाटलं.
बाकी, आपला निख्या आहेच तसा देवमाणुस. हास्य मग भले तो कितीही नाकारो!

आता, आभासी जगातल्या वास्तवाबद्दल बोलायचं तर "आभासी आणि खर्‍या जगात वावरताना त्यामधले फरक लक्षात घेऊन दोन्ही जगण्यातला फरक करता आला पाहिजे' वगैरे तात्विकदृष्ट्या पटतं...पण...
असे काही अनुभव येऊन जातात आणि विचारांचा डोलारा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळतो आणि आयडीमागचा माणुस ही नजर मिळुन आपण वास्तवात येतो हेच खरं!
शेवटी व्हर्च्युअल असली तरी रिअ‍ॅलिटीच की हो ती!

मलाही असे आंतरजालावर सहजच भेटलेले लोक..त्यांच्या सहजच असलेल्या ओळखी कधी मैत्रीत आणि मैत्री गाढ मैत्रीत बदलुन गेली हे कळालंच नाही.
त्या जीवलगांनी वेळोवेळी केलेल्या मदती...दिलेला आधार...च्छ्या:! बोलुन करुन त्या माझ्यावर केलेल्या उपकारांचं महत्व मी कमी करु नाही इच्छित! त्यापेक्षा त्या उपकाराखालीच दबुन जगेन...त्यातच जास्त सुख आहे मला हास्य

प्रसनदा!

43

आई बरी आहे हे ऐकून बरे वाटले.
मागे प्रभू मास्तरांनी एक धागा काढलेला त्यात "बेरीज करत रहा" अस्सा संदेश दिला होता. चांगली कामं करत रहा कुठेतरी नोंद होत असते. तुम्ही राजेना मदत केलीत ना अपघाताच्या वेळी, तुमच्या गरजेला निख्या धावून आला. कुणीतरी कुठेतरी उभं रहात असतं फक्त विश्वास हवा!
गेल्या जुलै-ऑगस्टला माझ्या भारतभेटीत आईचं अचानक ऑपरेशन ठरलं पण मी सुदैवाने तिथेच असल्याने ती एवढ्या चटकन ऑपरेशनमधून बरी झाली की मला नेमक्या वेळी तिथे असण्याचे अत्यंतिक समाधान झाले.

म्हटलं तर सगळंच आभासी असतं. नाती ही सुद्धा मानण्यावर आणि निभावण्यावर असतात. नाहीतर कित्येकदा असे होतेच की वर्षानुवर्ष न भेटलेले लोकही सतत मनाच्या जवळ असतात आणि समोर असली तरी काहींना मनातच जागा नस्सते! मनाचे सूर जुळणे ही कंपूबाजी नव्हे. तुमच्या मनात मात्र प्रामाणिकपणा हवा.

चतुरंग

आई बर्‍या आहेत...

44

आई बर्‍या आहेत हे ऐकून बरे वाटले... तसे निखिलकडून त्यांची ख्यालीखुशाली कळतच होती.... नि खरंच आता आंजावरच्या ओळखी फक्त व्हर्चुअल आहेत असे वाटतच नाही....

नि आमच्या स्वघोषित आंजा बकर्‍याच्या चांगुलपणाबद्दल काय बोलणार..!!!! हास्य