एगलेस केक

1
0

अंड्याशिवायच्या केकच्या पाककृती खूप जणांनी खव तून आणि धाग्यातून विचारल्या आहेत, बिनाअंड्याचा केक मी फारसा करत नाही.. त्यामुळे मी एगलेस केक करणार आणि फटू काढणार मग ती केकृ (केकच्या पाकृला आमच्यात केकृ म्हणतात, )मिपावर टाकणार.. ह्यात बराच काळ लोटेल आणि विचारणार्‍यांचा केक करण्याचा उत्साह निघून जाईल.. म्हणून केकृ देते आहे, संबंधितानी करुन पहावे आणि पुराव्यासाठी ह्या धाग्यावर फोटो टाकावेत. बिनाअंड्याच्या केकच्याही अनेक रेशिप्या आहेत, ह्या पाकृचा फोटो प्रतिसादात आला की (च) दुसरी पाकृ मिळेल.
सुरुवात सोप्या केकने करुया-
हा केक फार पटकन आणि छान होतो. शिवाय क्यालरी पण जरा बेतात आहेत..
साहित्य- १ वाटी मैदा, १ वाटी पिठीसाखर, पाऊण वाटी दही, १ च. चमचा बेकिंग पावडर, १ चिमूट मीठ, १ च. चमचा कॉर्नफ्लोअर, ५ च.चमचे तेल, ५ च. चमचे पाणी, २-३ च. चमचे कोको पावडर (कोको फ्लेवर/चॉकलेट फ्लेवर नको असेल तर १ च. चमचा वॅनिला किवा आपल्या आवडीचा इसेन्स)
च. चमचा= चहाचा चमचा म्हणजेच टी स्पून आणि वाटी म्हणजे आमटीची वाटी..
(हे म्हणजे रुचिरा ष्टाइल झालं..)
कृती-
तेल + पाणी एका भांड्यात एकत्र करुन भरपूर फेटणे.
त्यात इसेन्स घालून फेटणे.(कोको घालणार असाल तर इसेन्स घालायची गरज नाही.)
दही घालून फेटणे. साखर घालून फेटणे.
मैदा+बेकिंग पावडर+ मीठ + कॉर्नफ्लोअर एकत्र करणे. कोको पावडर घालणार असाल तर तीही त्यात मिसळणे.
चॉकलेट फ्लेवर नको असेल तर कोको पावडर घालू नका, त्या ऐवजी आपण इसेन्स घातलेला आहेच.
हे म्हणजेच मैदा+बेकिंग पावडर+ मीठ + कॉर्नफ्लोअर +कोको पावडर (ऑप्शनल) वरील मिश्रणात घालून फेटणे.
सर्व वेळी फेटताना भरपूर फेटणे आवश्यक आहे हे आता वाचून वाचून तुम्हाला माहिती झाले आहेच .
१८० अंश से वर प्रिहिटेड अवन मध्ये साधारण ३० मिनिटे बेक करणे.
नेहमीप्रमाणेच -
केक झाला की नाही हे (त्याच्या)पोटात विणायची सुई किवा सुरी खुपसून पाहणे.
केक झाला तरी लगेच अवन बाहेर न काढता अवनचे दार उघडून तसाच पाच मिनिटे राहू देणे.
नंतर जाळीवर काढणे, पूर्ण थंड झाला की स्लाइस करणे.
(केक जाळीवर काढला की आणि स्लाइस केले की - फोटो काढणे आणि ह्या धाग्यावर इतरांना जळवण्यासाठी टा़कणे व माझ्याकडून येणार्‍या पुढच्या बिनाफोटोच्या, बिनाअंड्याच्या रेशिपीची वाट पाहणे)

{वॉव !!!! आज पहिल्यांदा जैनानं}

1

वॉव !!!!

आज पहिल्यांदा जैनानं खावं असे काही तरी आले बॉ पाक-कृती विभागात wink


Hope is a good thing...

{ह्म्म..}

2

आमच्या ओळखीतले जे राज जैन म्हणून एक जण आहेत ते म्हणे सर्वभक्षी आहेत, हास्य
बरं, आलीय ना आता जैनाने काही खावे असे पाकृ विभागात.. मग कर तर तुझे पाकप्रयोग.. आणि फोटो टाक इथे पुराव्याचा.. wink
स्वाती

{>>आमच्या ओळखीतले जे राज जैन}

3

>>आमच्या ओळखीतले जे राज जैन म्हणून एक जण आहेत ते म्हणे सर्वभक्षी आहेत,

जैनाच्या नावाला कलंक आहे तो व्यक्ती..

>>मग कर तर तुझे पाकप्रयोग..

सध्या आत्मघाताचा मुड नाही आहे Big smile

>>आणि फोटो टाक इथे पुराव्याचा..

पुराव्याचा च्या जागी पुरल्याचा असे वाचले व दचकलोच Laughing out loud


Hope is a good thing...

{लय भारी....}

4

आता केक करता येईल. पण ते मायक्रोवेव्ह नसेल तर? ओव्हनमधे कसा करायचा?


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{मायक्रोव्हेव?}

5

साध्या अवन मध्येच करायचा केक दिलाय हो प्रसन्नदा..

मायक्रोवेव मध्ये जर केक करायचाच असेल तर साधारण ५ ते ७ मिनिटे लागतात, कमी जास्त वॅटेजप्रमाणे. परंतु त्याला ब्राऊनिंग येत नाही आणि कधी कधी केक आतून होतो पण बाहेरून सॉगी राहतो. (वाफ धरल्यामुळे)
मी स्वत: केक मायक्रोवेव मध्ये करणं प्रेफर करत नाही. मायक्रोवेव+कन्वेक्शन असेल तर गोष्ट निराळी..
मायक्रोवेव + कनव्हेक्शन असेल तर कन्वेक्शन मोड वर ठेवून साध्या अवन प्रमाणे वापरा. म्हणजेच साध्या अवन मध्ये जितका वेळ लागतो साधारण तितकाच वेळ त्यातही लागतो आणि केक उत्तम होतो, हे मी स्वतः करून पाहिले आहे.

स्वाती

{कधी केक आतून होतो पण बाहेरून}

6

कधी केक आतून होतो पण बाहेरून सॉगी राहतो.

माझा एकदा प्रयत्न केला होता अगदी असेच झाले होते.

{हे वाचले आणी मी केलेल्या}

7

हे वाचले आणी मी केलेल्या केकची आठवण झाली....मायक्रोवेव्ह आणला म्हणून हौसेने केक केला..
पण हे माहित न्हवते पाच ते सात मिनिटे ठेवायचा...मग काय कोळसा बाहेर आला....हे हे हे ...

पण आता करुन पाहिन आणी इथे फ़ोटु डकवीन..


----निवेदिता--------

{ह...रेसेपी सोपी वाटत}

8

ह...रेसेपी सोपी वाटत आहे...करुन बघते


विनीता देशपांडे
मी एक अक्षरयात्री..http://vineetadeshpande.blogspot.com