'त्यांच्या' लग्नाची पत्रिका आज घरी आली,
गालात हसत आम्ही उरलेल्यांची संख्या मोजली,
संख्या पाहुन आमचा पहिलाच ठोका चुकला,
त्रास नको म्हणुन औषधाचा पेला लगेच भरला,
दोन-चार वर्षं कशी अशीच सरली होती
तो रुसला आहे म्हणुन ती माझ्यापाशी रडली होती,
समजवायचं त्याला म्हणुन घरातच बैठक मांडली होती,
त्या दिवशी पिताना त्याला बाटलीच जास्त प्यारी होती,
'Please share our happiness' बघुन डोक्याला शॉट लागला,
वैतागुन आम्ही लगेच उरलेल्यांचा घोळका जमवला,
थोड्याच वेळात टेबलावर बाटल्यांची रांग लावलेली होती,
दिलासा एव्हढाच प्रत्येकाने एक तरी बाटली आणली होती,
विषय बदलुन आम्ही लगेच बॅचलर्स पार्ट्या आठवल्या,
पुढचा नंबर कोणाचा ठरवत बाटल्या मात्र संपवल्या,
दुसर्या दिवशी सकाळी कॅलेंडरावर नोंद होती,
त्यांच्या लग्नाची तुतारी मलाच तर वाजवायची होती...
{हा हा हा ...}
हा हा हा ... निळ्या लिहीलंस काहीतरी शेवटी!
असो, अचानक मला एक संवाद आठवला:
मी: टीशर्टवर लिहीलं आहे, "त्यानं प्रेम केलं, तिनं प्रेम केलं, मला सांगा तुमचं काय गेलं"
तो: ती कोण आहे यावर काय गेलं हे अवलंबून आहे ना!
असो. चालायचंच!
{यु टू?}
ओ.सी.डी. नंबर २?
>निळ्या लिहीलंस शेवटी काहीतरी!
असेच म्हणतो.
{वेळकम}
वेळकम वेळकम निळूभौ. जमलंय.
-पुण्याचे पेशवे
{मस्त्च...}
छान जमलय....
आवडलं
{वा!}
>>> वेळकम वेळकम निळूभौ. जमलंय.
--- पुपेंशी सहमत आहे.
>>> तो रुसला आहे म्हणुन ती माझ्यापाशी रडली होती,
--- अरेरे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार की वो.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
{हॅ हॅ हॅ}
हॅ हॅ हॅ शेवटी लिहिते झालात.
उत्तम.
येवंद्यात अजुन.....
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{शेवटी}
शेवटी लिहिते झालात हो..
छे चांगली प्रतिक्रिया काय लिहायची कोणितरी निळ्या स्टाईल प्रतिसाद द्या
-निखिल
{अशा}
अशा क्वालीटीचं लिहितल तर स्वागतच. नाहीतर त्या पतंगाच्या धाग्यावरचे प्रतिसाद वाचून शंका येत होती.
{कसली शंका}
कसली शंका हो?
-Nile
{शेम प्रश्न}
शेम प्रश्न .... प्रतिवाद केला, त्यासाठी काही भौतिकशास्त्राचा आधार घेतला तर त्यात क्वालिटीचा प्रश्न कुठून आला?
{>>>>>दोन-चार}
>>>>>दोन-चार वर्षं कशी अशीच सरली होती
तो रुसला आहे म्हणुन ती माझ्यापाशी रडली होती,
समजवायचं त्याला म्हणुन घरातच बैठक मांडली होती,
त्या दिवशी पिताना त्याला बाटलीच जास्त प्यारी होती,
'Please share our happiness' बघुन डोक्याला शॉट लागला,
वैतागुन आम्ही लगेच उरलेल्यांचा घोळका जमवला,
थोड्याच वेळात टेबलावर बाटल्यांची रांग लावलेली होती,
दिलासा एव्हढाच प्रत्येकाने एक तरी बाटली आणली होती, >>>>
काहीच्या काही बोलणे थांबवा! तुम्ही ज्याला समजावले त्या घटनेची तारीखवार द्या आधी. समजावयाचे म्हणून समजावले तर कोणी समजत नाही.
दारू पितांना कोणी असला विचार करत नाही. कवितेत वाचून एखाद्याला वाटेल इंच इंच भरलाय टेबल दारूच्या बाटल्यांनी.
ह. घ्या अन लिहीत रहा.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{जाऊ द्या ..}
अधिक माहितीसाठी बिका किंवा मोडक ह्यांच्याशी संपर्क साधा.
@ निळे : कविता मस्तच हो. ह्या निमित्ताने का होईना तुम्ही लिहते झालात हे पाहुन आनंद झाला.
{(विषय दिलेला नाही)}
{:?}
{हा हा हा.....}
लय भारी!!!
नायल्या....
सदाशीवपेठी पाट्यासदृश्य प्रतिसादातुन लेखनकार्यावर आल्याबद्दल आपले हार्दिक हाबिणंदण
इडांबन झक्कास रे
आणी पाषाणभेद सायेब
,

आपल्या प्रतिसादात नायल्या दिसला.....
ह्या धाग्यावर नाइल्याचा प्रतिसाद वाचायला मिळणार नाही अशी चिंता होती ती दूर झाली
{:)}
सदाशीवपेठी पाट्यासदृश्य प्रतिसादातुन लेखनकार्यावर आल्याबद्दल आपले हार्दिक हाबिणंदण >>
{मस्त रे..}
छानच जमलंय...
नि आता लिहिता झालाच आहेस तर थांबू नकोस!!!!
{नव्हे बोळा}
नव्हे बोळा निघाला आहे तर दुष्काळाचा आव आणू नकोस! ;-)
{+१}
"’इजिप्शियन’ सभासदाने" ज्येष्ठ सदस्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
{आयला! नाव}
आयला!
नाव तर नाव, नाइल्याचा आयपीसुध्दा इजिप्तातला आहे?
तरीच जिथंतिथं असं दहशतवाद्यासारखा वागतो
{छान छान....}
छान छान.... एसीच्या गार गार हवेत बसून... मऊ मऊ रोलिंग खुर्ची वर बसून.. हिरव्या नोटा मोजत केलेले हे दारु व बाटलीचे विडंबन.
असो,
बदलाल कधी तरी.
Hope is a good thing...
{"’इजिप्शिय}
साक्षात नंदनशेठनी आदेश दिला म्हणुन हा प्रतिसाद.
दुर्बिटणेबै,
सुरुवातीलाच शेवट का? असो.
बायदवे, तो संवाद आपल्यातच झाला होता, असो.
पुपे, सध्या सगळीकडे परप्रांतियांचा तिरस्कार चाललेला असताना तुमचे स्वागत सुखावुन गेले.
नंदन,
शेवटी समदुखी: मनुष्यासच खरा त्रास कळणार.
धमालपंत आगलावे,
इजिप्शिअन कवापासुन दहशतवादी झाले हो?
बिका आणि मोडककाकांनी आम्हालाही शिकवणी द्यावी कधीतरी.
प्रोत्साहनाबद्दल सगळ्यांचे आभार, विडंबनाकरीता यासम निमित्तं कुणालाही न मिळोत.
-Nile
{धमालपंत}
धमालपंत आगलावे,
इजिप्शिअन कवापासुन दहशतवादी झाले हो?
जेव्हापासून त्यांच्यातल्या एकाने डायानामधे रस घेतला .... ;-)
{धमालपंत}
आँ???
अल जवाहिरीनं तुम्हाला 'द मॅन्युअल' शिकवलंच नाही की काय?
{मी तर}
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{मि वाच्ल की}
तात्यांच्या लग्नाची पत्रिका आज घरी आली
{:))}
{कूल}
.
And then !