लेखन व लेखकाचे बाह्यरुप

0
0

हा धागा केवळ मौजमजेखातर आहे. तत्राप यात काही वैज्ञानीक तथ्य असेल तर आपण सांगू शकतात.
असे म्हणतात की आपण जे लिहीतो तसे आपले मन असते. आपल्या मनातले आहे ते कागदावर उमटते. थोडक्यात आपले लिखाण आपला स्वभाव, वागणूक दाखवते. या लेखनात कार्यालयात केले जाणारे लेखन, अनौपचारीक पत्रे येत नाहीत. जे ललीत आहे, जे लेखकाला आनंद देते व जे खरे आहे ते लेखन येथे अभिप्रेत आहे.
थोडक्यात केले जाणारे लेखन लेखकाच्या मनाचा आरसा असते. अशाच प्रकारच्या मनाच्या आरशातून त्या लेखकाचे बाह्यरुप देखील आजमावता येईल का? बाह्यरुप म्हणजे तो लेखक/ लेखिका कसा / कशी आहे? त्याला कोणत्या आवडीनिवडी आहेत? पुरूष लेखक असेल तर त्याला मिशा ठेवण्याची आवड आहे का? त्याला कोणते कपडे आवडत असतील? लांब बाह्यांचे सदरे की अर्धी बाही? त्याला कसले व्यसन आहे? नाही? डोळ्यांचा रंग / केसांची ठेवण कशी आहे? असे काही जाणता येते का?
लक्षात घ्या की येथे स्वभाव कसा आहे याची पडताळणी घ्यायची नाही. केवळ बाह्यरूप कसे असेल याचा धांडोळा घ्यायचा आहे. येथे असणार्‍या लेखकांच्या मनात काही प्रतीमा तयार झाल्यात. आपल्याही मनात असल्या काही प्रतीमा तयार झाल्या आहेत काय?
येथे कोणतेही भविष्य वर्तवण्याचा हेतू नाही. किंवा 'सहीवरून स्वभाव, अक्षरावरून स्वभाव' वर्तवण्याचा हेतू नाही. कारण भविष्य व 'सहीवरून स्वभाव, अक्षरावरून स्वभाव' असे काही असते यावर माझा विश्वास नाही.
माझे वरील लिखाण थोडे विस्कळीत वाटेल पण जे जाणकार आहेत त्यापर्यंत माझ्या मनाच्या भावना पोचल्या असतील. कोणी माझ्या मतांची त्यांच्याबद्दल खाजगीरीत्या मागणी केली तर मी माझे मत त्या पर्यंत पोचवू शकतो.

बरं पुढे

बरं पुढे thinking



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हा

हा हा...
खरंय!
सही आयडिया आहे.

पाषाणभेद,
तुम्हीच सुरु करा की हास्य सांगा बरं, माझी काय प्रतिमा आहे तुमच्या डोक्यात?
आणि ह्या राजेचीही सांगा हास्य
आणि हो, त्या दुर्बिटणेबाईंचीही सांगा.
आणि...सगळ्यांच्याच सांगा हो..
मग आपण सगळेच 'ओळखा पाहु'चा खेळ खेळुया हास्य

कुणाकुणाल

कुणाकुणाला त्यांच्याबद्दलच्या बाह्यरूपाची कल्पना केलेली येथे आवडेल ते सांगा म्हणजे लिहीता येईल. ज्यांना व्य.नी हवा असेल त्यांनी तसे सांगा म्हणजे जो माहीती सांगेल तो त्यांना व्य. नी. करेल.

कृपया लक्षात घ्या की आपण ही केवळ मौजमजा करतो आहे. एकदम हि& हि पातळीवर जाणार नाही आहोत. केवळ विरंगूळा. ज्यांना सार्वजनीक मत नको तसे सांगा.

आता तुम्ही माझ्या पासून सुरूवात करा. कोणी सांगेल का की मी कसा दिसतो? लेखनावरून माझ्या स्वभावाचा अंदाज येतो का? (हो पण त्या साठी आधी लेख वाचायला पाहिजे हं हास्य )
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

हो, पण

हो, पण खेळीमेळीचेच वातावरण राहू द्या. कोणाला राग येतो कोणाला नाही. जास्त वैयक्तिक शेरेबाजी टाळा. केवळ आपल्या बुद्धीला चालना द्या व अंदाज करा.
कोणी 'माझ्याबद्दल येथे अंदाज करा' असे म्हटले तरच लिहा ही कळकळीची विनंती.




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

"वैयक्तिक

"वैयक्तिक शेरेबाजी टाळा" हे मान्य आहे. पण टवाळ लोकांत वावरायचं तर थोडी टवाळी सहनही करण्याची तयारी हवी. नाहीतर मीमवर येऊन लहानच रहायचं असेल तर काय फायदा?

माझ्याविषयी लिहा

पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)

तुम्ही माझ्याविषयी इथे या धाग्यावर लिहू शकाल काय? इतरांनी वाचल्यास माझी काहीच हरकत नाहीय. अगदी सविस्तर लिहा. फक्त तुम्ही जेव्हा लिहाल तेव्हा कृपया मला लिंक पाठवा कारण धागा फारच लांबलाय त्यामुळे शोध घेण्यास अडचण होऊ शकेल.

धन्यवाद.



चेतन सुभाष गुगळे
+९१९५५२०७७६१५
http://at-least-i-think-so.blogspot.com/

राजे:

राजे: हातात सतत लिंबू खोचलेली तलवार धरलेली. कुठेनाकुठे पळायच्या तयारीतच असलेला.
धमाल मुलगा: लहानपणी फास्टर फेणे वाचला होता. चौकड्यांचा शर्ट घालणारा. तुडतुड्या पायांचा काटकोळा पण चळवळ्या मुलगा
दुर्बिटणे बै: डोळ्यावर जाड चश्मा,नौवारी,डोक्याला डोक्यापेक्षा मोठा अम्बाडा,हातात वेताची छडी, आता कोणाला मारायचे या विचारात हातातली छडी चौफेर फिरवत ठेवलेली.
पर्नल नेने मराठे:खुर्चीत बसून सतत बडबड चालू असेल्.बडबड बंद असेल तेंव्हा सदैव काहीतरी खात असेल.



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

>>राजे:

>>राजे: हातात सतत लिंबू खोचलेली तलवार धरलेली.
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
लिंबू खोचलेली.... Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

दुर्बिटणे बाई एकदम पर्फेक्ट wink

>>पर्नल नेने मराठे:खुर्चीत बसून सतत बडबड चालू असेल्.बडबड बंद असेल तेंव्हा सदैव काहीतरी खात असेल.
हा हा हा.....आणी खाता खाता कोणतं दुकान चालु करायचं ह्याचा विचार चालु हास्य

विजुभाऊ ब्याक इन वरिजन्यालिटी... सह्हीये भाऊ हास्य

विजुबाउ

Big smile विजुबाउ १०० पैकी ११०

ध.मु. आलोच बघ दंगा करायला

प्रतिमा म्हटलकी आम्ही लगेच हजर ;-)
तु विचारणा केल्या प्रमाणे
दुर्बिटणेबाईंची प्रतिमा काहीशी अशी असावी

राजेंची काहीशी अशी असावी

आणि तुझी ६ पॅक अ‍ॅब प्रतीमा अशी असावी

अंदाज चुकल्यास क्षमा असावी चु.भु.दे.(आणि हलकेच)घे. हास्य



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

(विषय दिलेला नाही)

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

वरच्या

वरच्या फोटोतला राजा ड्रेस आणि तलवारी सकट लोळतोय असेच दृष्य समोर उभे राहीले



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

हा हा

हा हा हा....
जयपाल... अवघड आहेस रे भावा हास्य
_/\_

क्यांपूट्

क्यांपूट्र, चष्मा इथपर्यंत ठीक आहे रे जयपाला, पण काड्यामुड्यांचे हात असलेला पुरूष ही माझी प्रतिमा ... "कोण आहे रे तिकडे? या जयपालला पहिले माझ्या जिमची पावती दाखवा!"

आयला

या जयपालला पहिले माझ्या जिमची पावती दाखवा!"
काकु, म्हणजे आता दिवसापण तारे दाखवणार तुम्ही ?



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

मोठे व्हा

मोठे व्हा जयपाल! ;-)

आत्ता दिवस नसून रात्र आहे, अर्थात तुम्ही हिरव्या माजुर्ड्या देशात नसाल तर ... त्यातही रेडीओ दुर्बीणीतून तारे दिसत नाहीत!

मी

हिरव्या माजुर्ड्या देशात राहत नाही.
मुपो.बेडग, ता.मिरज, जि.सांगली सध्या वास्तव्य ठाणे
आवडती फळे= अंजीर केळे हास्य
आपल्या मल्ल विद्ये बाबत मी म्हणालो की "दिवसा तारे दाखवणार तर"
असो मी बदलणार नाही. मी मोठा होणार नाही. ;-)
बडी मुश्कील से ये एटीट्युड पाया है/



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

जयपाल

जयपाल यांचे बाह्यरूप :
वजन ७५ ते ८० किलो. उंची: ५.५ ते ६ फुट, मिशी नाही, गोरा वर्ण, मध्यम वय, डोळ्याला कमी नंबरचा चष्मा, बारीक फ्रेम, हाफ बाहीचा शर्ट आवडणे, पायात स्पोर्ट शुज.

बाकी विषयानुसार चित्रे देण्याची तुमची कल्पना व निवड मात्र दाद देण्यासारखी आहे.

अन त्यामुळेच गळ्यात कायम कॅमेरा बाळगत असाल असा अंदाज करता येतो. पण तरीही तुम्ही कॅमेरॅच्या क्षेत्रात (जसे पत्रकार आदी.) काम करीत नाहीत असा उगीचच समज होतो आहे.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या इंजन मेक्यॅनीक (ITI-डिझल)




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आयडिया आहे

आयडिया आहे ते ठीक आहे ..पण सुरुवात कुठन करायची ...चला मीच करतो....

छोटा डॉन ....डॉन्याची आणी माझी खडाजंगी मिपावर झाली...तेव्हा एक हेकट ,विक्षीप्त पण एक अतिशय हुशार माणुस आहे असे वाटायचे ...पैंकी पहिले दोन चुकीचे ठरले....

परा : आमची तर मारामारी व्हायचीच बाकी होती.....मला हा एक कुठल्यातरी वर्तमानपत्रात ..ते गमतीशीर उत्तरे लिहीण्याचा एक कॉलम असतो ना ...दुसर्‍या कोणा प्रसिध्द व्यक्तीच्या नावाने नावाने खपविलेला....तो हा लिहीतो असे वाटायचे....

राजे ::: मला वाटायच की मस्त दाढी वगैरै वाढवुन एक गममध्ये बसुन दिवसरात्र पित बसणारा "मजनु" वाटायचा...

गणपा.अर्थात नंतर फोटो बघीतला म्हणुन...पण खर सांगु का ? नावामुळे पहिले मला हा " मिथुन काशीनाथ भोईर" चाच दुसरा आयडी वाटला होता...

माझ्याबद्

माझ्याबद्दलचा अंदाज खरा ठरला असावा म्हणून माझ्याबद्दल लिहिलं नाहिस का रे? wink

@बिपीनदा.

@बिपीनदा.
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
ते हॉटेलच तुम्हाला विचारुन झालत ना म्हणुन नाही लिहीले..स्वारी

मित्रांनो ...बिपीनदा मला दुबईत "खाणावळ" चालवितात असे वाटायचे ..

द्रष्टा ...

सुहास, तुला द्रष्टा म्हणावे का रे ?

>>...बिपीनदा मला दुबईत "खाणावळ" चालवितात असे वाटायचे
हास्य
खरे आहे, "समर्थ भोजनालयाच्या दुबई फ्रान्चाईसचे" कॉन्ट्रॅक्ट बिकांकडेच होते व त्याचे नंदनच्या शुभहस्ते थाटात उद्धाटनही होणार होते.
पण काही कारणाने "श्री. नंदन" दुसरीकडे जेवायल्या गेल्याने हा प्लान फिस्कटला असे आम्हाला आतल्या गोटातुन समजले.

असो, बाकी ह्या धाग्यावरचा सुसंगत प्रतिसद नंतर देईनच.

आमच्या

आमच्या विषयी काय???

हा हा

हा हा हा...

>>राजे ::: मला वाटायच की मस्त दाढी वगैरै वाढवुन एक गममध्ये बसुन दिवसरात्र पित बसणारा "मजनु" वाटायचा...
एम.के. ??? wink

मी जे

मी जे लिहले आहे प्रेमभंगावर त्या थापा होत्या असे सांगितले तरी लोकांबा पटणार नाही बॉ Laughing out loud

**

प्रेम म्हणजे काय असतं
ते त्या बाटलीला विचारा
नशा घेऊन वावरते जन्मभर
पण धडपडत नाही क्षणभर..
मोकळी झाली तर पडते जाऊन
कुठेतरी भंगारामध्ये..
नाही तर फुटते रस्त्यावर..
पण दोष कुणाला देत नाही...
चार ठेंब देवदासाच्या तोंडी घालून
ती मोक्ष मार्ग पकडते... !



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

वा वा.... आता

वा वा....
आता खात्रीच पटली...राजे=एम.के.श्रोत्री.

एम.के.श्रोत

एम.के.श्रोत्री होणे खुप सोपं आहे रे
हवे काय ?
एक प्रेमभंग..
एक बाटली..
अंधार्‍या टेबलावर कुठे तरी
चार चणे.. व दर्द भरी गाणी
बस्स ! मग कुठे तरी
गटारी शेजारी..
घाणीच्या साम्राजात
कुणाच्या कळत नकळत
श्वास सोडले की
झाला त्याचा एम.के.श्रोत्री.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अग्गाबाब्बो....

राजे, 'सावर रे' !!!

सावर

सावर रे..
म्हणायला खुप सोपा शब्द रे
धडपडत्या पायांना
चाचपडत असलेल्या हातांना
एका हातात झुलत असलेल्या बाटलीला..
सावर रे म्हणायला खुप सोपे
पण डोळ्यातील आश्रुंना
ह्दयाच्या जखमेतील रक्त ओघळांना
सावरणारा हात आधीच कुठे तरी
कुणाच्या तरी गळ्यात गुंफलेला
मेलेल्या मढ्याला...
रस्त्यावर घंगाळत जाणार्‍या दगडाला
कोणी म्हणतं का रे... सावर रे.. !

असो,

बदलीन.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

_/\_ येऊ का

_/\_
येऊ का एम.के.?

राहु

राहु दे...

आय लै वंगाळ मारलं लाकडाने...

असो,

बाकीच्या कविता अश्याच कधी तरी मुड मध्ये... wink



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अरे.. पाषाण

अरे..
पाषाणभेद साहेब,
तुम्ही सांगितलंच नाही, तुमच्या मनात काय प्रतिमा आहेत त्या.

धमाल मुलगा

धमाल मुलगा यांचे बाह्यरूपाबद्दल माझा अंदाज:
उंची ६ फुटाच्या वर, बॉडी-मास इंडेक्स प्रमाणे आवाक्यात वजन, बारीक अंगकाठी, एकदम खेळकर व्यक्तीमत्व, डोक्याचे केस मात्र एकदम मऊ म्हणजे वार्‍याने भुरभूरणारे, डोळ्याला चष्मा, नाक्यावर चहा पितांना हातात सिगरेट हवीच, लांब बाह्यांचेच शर्ट वापरणार, अन मिशा नाहीत.




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

वाढदिवसाच

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

बिकाबद्दल

बिकाबद्दलचा भेटण्याआधीचा अंदाजः

उंच (खरं), अंगासरशी (साफ चूक), चेहेर्‍यावर गीकी भाव (साफच चूक), चष्मिश्ट (खरं) आणि हसमुख माणूस (हे दोन्ही पारच चुकलं) ...

(पळा आता मार खायच्या आत!)

(विषय दिलेला नाही)

Laughing out loud

हा

हा प्रतिसाद आपल्या आयडीतून??? काहीतरी गोंधळ आहे ... माता निर्मयीदेवी यांच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा आहे.

>>उंची ६

>>उंची ६ फुटाच्या वर,
Laughing out loud पहिल्या वाक्यालाच बोल्ड झालो.....नाही, अंदाज कींचितच चुकला हो...अर्ध्या फुटानं हास्य

>>बॉडी-मास इंडेक्स प्रमाणे आवाक्यात वजन,
BMIला झीट येते माझं वजन पाहिलं की...एकेकाळी बारक्या, कांडी अश्या नावानं हाका मारायचं पब्लिक Sad

>>बारीक अंगकाठी,
ह्ये बराब्बर हास्य

>>एकदम खेळकर व्यक्तीमत्व,
ते काही म्हायती नाय बॉ! ते दोस्तलोकच सांगु शकतील.

>>डोक्याचे केस मात्र एकदम मऊ म्हणजे वार्‍याने भुरभूरणारे, डोळ्याला चष्मा,
हां ह्ये बराब्बर हास्य

>> नाक्यावर चहा पितांना हातात सिगरेट हवीच,
ह्ये पण बराब्बर..पण एक सुधारणा...शिग्रेट्सोबत कधीमधी चहा असला तरी चालतो हास्य

>>लांब बाह्यांचेच शर्ट वापरणार,
हास्य बर्‍याचदा! नायतर हाताच्या कांड्या दिसतात ना लोकांना Big smile

>>अन मिशा नाहीत.
हा हा हा...चुक्क! साफ चुक्क!!! अहो, अपार कष्टानं उगवलेली (आणी तेव्हढीच उगवलेली) जतन केलेली फ्रेंचकट दाढीसुद्धा असते...म्हणजे माझ्या ओळखीच्या खुणांमध्ये ती एक खुण म्हणुन वापरतात लोक हास्य

आया आया कस्ल भरी

लिवतय हे राज . आमस्नी ठावच न्हवतं.
एकदम कडक १ल्या धारेचा माल



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

कुणाकुणाल

कुणाकुणाला त्यांच्याबद्दलच्या बाह्यरूपाची कल्पना केलेली येथे आवडेल ते सांगा म्हणजे लिहीता येईल. ज्यांना व्य.नी हवा असेल त्यांनी तसे सांगा म्हणजे जो माहीती सांगेल तो त्यांना व्य. नी. करेल.

कृपया लक्षात घ्या की आपण ही केवळ मौजमजा करतो आहे. एकदम हि& हि पातळीवर जाणार नाही आहोत. केवळ विरंगूळा. ज्यांना सार्वजनीक मत नको तसे सांगा.

आता तुम्ही माझ्या पासून सुरूवात करा. कोणी सांगेल का की मी कसा दिसतो? लेखनावरून माझ्या स्वभावाचा अंदाज येतो का? (हो पण त्या साठी आधी लेख वाचायला पाहिजे हं हास्य )
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आपली

आपली काऽऽही हरकत नाही बरं का हास्य
बिंधास्त लिव्हा आपल्याबद्दल हास्य (लाज नाही मला..काहीपण बोला wink )

बाकी, तुमच्या लेखनावरुन आपण...
साधारण मध्यमवयीन, कदाचित चष्मा, असलाच तर बहुतेक अर्ध्या फ्रेमचा, सदरे बहुतेक बारीक चौकड्यांचे घालत असाल..बाह्या मुडपलेल्या..सदरा थोडासा सैलसरच खोचलेला, बर्‍याचदा गडद रंगाच्या विजारी वापरत असाल. फिरतीला असताना कार्गोज्/मल्टी पॉकेट्स पँट वापरत असाल.
वाहन चालवताना काळजीपुर्वक चालवत असाल. कामे करताना पुन्हा पुन्हा तपासुन समाधान झाल्यानंतरच ते पुढे जात असेल.

सध्या तरी इतकंच सुचतंय... हास्य

हा फोटो कुणाचा ओळखा पाहु

चु.भु.दे. आणि हालके घेणे



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

कोणता?

कोणता? मध्यभागी आहे तो की डाव्या बाजूला किंचित वरच्या बाजूला आहे तो?

चुकल मालक

दुरुस्ती करतो . मध्यभागी जो माणुस आहे तो फोटो



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

दगड फोडे

दगड फोडे कि काय thinking

उत्कृष्ठ

उत्कृष्ठ प्रकल्प आहे पाषाणभेदांचा , आवडला. असे वेगवेगळे पण उत्कृष्ट प्रकल्प करण्यात श्री सुधीर काळे ह्यांचा आदर्श घ्यावा. मस्तंच.
माझ्या जिज्ञासु आणि शिघ्रग्रहण स्वभावामुळे लोक मला संशयाने पहातात.
(शापित गंधर्व)



(शापित गंधर्व)

छन्न प्रतिसाद

तुम्ही गंधर्व त्यात शापित त्यामुळे हो बाकी काही नाही.. चालू दे.. !

***

हॅ हॅ हॅ



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ठ्या:.........

राजे...
मेल्या उडली ना कॉफी मॉनिटरावर!!!

Laughing out loud
=)) Laughing out loud
=)) Laughing out loud Laughing out loud

हा गंधर्व

हा गंधर्व आहे का बहिर्जी नाईक का ब्रिटनी टिंगी?

हा हा

हा हा हा....

इसि बात पर इक आशर याद आया है..इजाज़त चाहुंगा|

मेरी हैरत की क़सम आप उठ्ठायें तो नका़ब
मेरा जि़म्मा है की जलवे ना परेशां होंगे|
(जिगर मुरादाबादी)

wink

ए तुझं

ए तुझं जिगर मुरादाबादेत दाखव! पण वरच्या शेराचा लुत्फ अंमळ मराठीत लूट की!

हॅहॅहॅ!!!

समझने वाले समझ गये...ना समझे.. त्यांनी द्या सोडुन wink

मेरी हैरत

मेरी हैरत की क़सम आप उठ्ठायें तो नका़ब
मेरा जि़म्मा है की जलवे ना परेशां होंगे|

माझ्या हैरतीची शपथ तुम्ही नकाब बाजूला सारा, माझ्या जबाबदारीवर सांगतो/ते की जळवा त्रासणार नाहीत.

यमे.......... (

यमे..........

( येथे छातीत चाकू भोकसून घेतलेला स्मायली )



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सहमत! जळवा

सहमत!

जळवा त्रासणार नाहीत????????????

राजे, एक चाकू मलाही पाठिव रं बाबा!!

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

प्रभो असा

असावा काय? (गल्ला भरणारा ;-))



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

हो, पण

हो, पण खेळीमेळीचेच वातावरण राहू द्या. कोणाला राग येतो कोणाला नाही. जास्त वैयक्तिक शेरेबाजी टाळा. केवळ आपल्या बुद्धीला चालना द्या व अंदाज करा.
कोणी 'माझ्याबद्दल येथे अंदाज करा' असे म्हटले तरच लिहा ही कळकळीची विनंती.




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

धन्यवाद

धन्यवाद श्री राजे, आदिती आणि धमाल मुलगा माझी दखल घेतल्याबद्दल.
तुम्ही सगळेच फार चांगले आहेत.
कुठे तरी वाचल होत राजे वेडा आहे म्हणून! नुसताच हसतो

(शापित गंधर्व)



(शापित गंधर्व)

कुठे तरी

कुठे तरी वाचल होत राजे वेडा आहे म्हणून! नुसताच हसतो
हा हा हा ... बहुश्रुत असण्याचा फायदा असा होतो तर ... ;-)

छे.... नुस्त

छे....

नुस्तेच हसलात ????

मला वाटलं नवीन ब्लॉग येतो की कय... किती खुष झालो अस्तो राव म्या.... तुम्हाला काय सांगू मी...



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पाषाणभेद

पाषाणभेद तुला एक चॉलेन्ज !!

जी कबुतर दरवाज्याबाहेर फड-फडत आहेत त्याच्या बद्दल काय सांगू शकतोस रे तु ??

thinking

त्यांच्या बद्दल अंदाज व्यक्त कर.. भले महाजालिय व्यक्तीरेखा सांग..

wink



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

च्यायला

च्यायला ह्ये तर लैच सौप्पंह्य!

पाषाणभेद काका म्हणजे पतंग उडवताना साध्या दोरा वापरतात.
गल्लीत मुले क्रि़केट खेळायला लागली कि किशोर मासिकांचे त्यांना वाटप करतात.
एखादा बेवडा दारुपिउन बायकोला हाणत असेल तर त्याला 'अहिंसा आणि मी' वाचायला देतात.

ओळख्लं ना बरोब्बर? wink

ह्,घ्या. लि. पा. का?



-Nile

हा हा

हा हा हा
मस्त लिवलेय बर का.
पर अंदाज लईच चुकला बर का काका. तुमी माझ्यावाला आयडी कलंत्री काकांवाला समजले की काय?
बाकी किशोर मासिक भन्नाट होते हो. आजकाल फक्त दिवाळी अंक निघतो वाटत त्याचा.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या इंजन मेक्यॅनीक (ITI-डिझल)




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मी सुद्धा

मी सुद्धा जोवर सकाळी आरशात पहात नाही तोवर बर्‍याच कल्पना असतात.
आरशात बघून भांगपडताना त्यातल्या बहुतेक कल्पनांचा चक्काचूर होतो.



--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

विजु भाउ

असे तर नाहीत ना? ;-)



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

अरेरे

थोडक्यात नेम चुकला बघा.

नंदन..

मला नंदन हा पन्नाशीच्य पुढचा.. सर्व असतील नसतील तेवढे केस पांढरे झालेला.... सोडावॉटर्च्या बाटली सारख्या काचेचा चष्मा लावणारा माणूस असेल असे वाटले होते... Big smile

:-)

मला नंदन ही एक व्यक्ती नसुन, मराठी साहीत्यकोष भरलेली (आर्टीफिशियल इंटेलिजन्स ) एक संगणप्रणाली / प्रयोग आहे असेच वाटत होते.

मला तर

मला तर नंदन हा एक ग्रुप आयडी वाटला होता.



-पुण्याचे पेशवे

+१

सहमत आहे.

आमची कल्पना म्हणजे नंदन हा कुणी सेवानिवृत्त सरकारी अधिकारी असावा व स्वभावाने एकदम कर्मठ वगैरे वगैरे.
पत्ता बहुदा सदाशिवपेठ-पुणे किंवा ठाणे-मुंबई ( अर्थात ठाणेकर स्वतःला मुंबईचा भाग मानतात की नाही ह्याबद्दल दुमत असु शकते ) ...
वेळ जात नाही म्हणुन संस्कॄत ग्रंथाचा अभ्यास आनि जुनी कागदपत्रे धुंडाळणे वगैरे छंद असावेत असे वाटले होते.
फावल्या वेळात लोकांची भविष्ये वगैरे सांगत असावा असा अंदाज होता.

पण आंतरजालावरचा सद्यस्थितीत चाललेला 'फालतुपणा' पाहुन आपल्या मस्तकावर चंदनाचा लेप थापत ' शिव शिव शिव, काय ही नवी पिढी ? अगदी ताळतंत्रच सोडला आहे शिंच्या / चांडाळांनी " असे शापोद्गार काढत असावा असे वाटत होते.

असो, हळुहळु सर्व चित्र साफ झाले.
( त्या चित्राबद्दल नंतर सवडीने ) wink
नंदन म्हनजे एकदम फस्क्लास माणुस आहे असे आमचे वैयक्तिक मत आहे.

हा हा

हा हा हा....मलाही नंद्याबद्दल असाच गैरसमज होता आधी हास्य

हॅ हॅ हॅ

>>> मला नंदन हा पन्नाशीच्य पुढचा.. सर्व असतील नसतील तेवढे केस पांढरे झालेला.... सोडावॉटर्च्या बाटली सारख्या काचेचा चष्मा लावणारा माणूस असेल असे वाटले होते.

--- तेवढे दोन-तीन दिवस काय त्या मकामावशी थोड्या आदराने बोलल्या हो, त्यानंतर मात्र... wink

पिडांकाकांबद्दल असाच गैरसमज झाला होता. पन्नाशी-साठीच्या घरातले, पाच-सव्वापाच फुटांच्या आसपास उंची असा साधारण समज झाला होता. जेव्हा त्यांना प्रथम भेटायला गेलो, तेव्हा ते हॉटेलच्या बाहेर उभे होते. हे पिडांकाका असणं शक्य नाही, म्हणून सरळ पुढे गेलो हास्य

>>पिडांकाका

>>पिडांकाकांबद्दल असाच गैरसमज झाला होता.
खरंय खरंय! मलाही असंच वाटलेलं... टु बी व्हेरी स्पेसिफिक, हिंदी शिणुमात दाखवायचे त्या रिटायर्ड कर्नल संजीव कुमार छापाचं वगैरे Laughing out loud

हॅ हॅ हॅ

हॅ हॅ हॅ मला पण असेच वाटले होते पण संजीव नाही रे... उत्पल दत्त स्टाईलचा बुढा असेल असे वाटायचे wink



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

उत्पल

उत्पल दत्त!!
Laughing out loud Laughing out loud
राजे..मेला तु आता...डांबिसकाका तुला धरुन त्यांच्या लॅबमध्ये नेऊन तुझा गिनीपिग करणार! Big smile

हॆहॆहॆ

आमाला नंदन हा आधुनिक सखाराम गटणेच वाटला होता.



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

नाही हो,

नाही हो, एवढा आमचा विकास झालेला नाही अजून wink

अनुशेष

अनुशेष भरुन काढायला पुण्यात सेटल व्हा मग Laughing out loud

कसला

कसला, कसला अनुशेष पुण्यात भरून निघतो? थोडं सविस्तर लिही की...

विकासाचा!

विकासाचा! दुसरा कसला?
काय हे मोडक,
हल्ली तुमचे वैदर्भिय संपर्क कमी झाले आहेत का? wink

ह्या...

जयपालच्या प्रतिसादाच्या शीर्षकातून माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.

सख्याहरी

म्हणजे अजुन विकसनशिल आहात तर ;-)
पुढिल विकसास शुभेच्छा



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

मस्त धागा

मस्त धागा आहे! मजा आली वाचायला! हास्य

मस्त्..............

मस्त्................व्यक्तिचित्रण

हॆहॆहॆ

आता लेखकाच्या अंतरंगा विषयी बोला!
उस डोंगा परि रस नव्हे डोंगा।
कारे भुललासि वरलिया रंगा॥
कोण तिकडे बोल्ला रे दिली का काडी लाउन.जाउ दे भासच तो



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

>>आता

>>आता लेखकाच्या अंतरंगा विषयी बोला!
येस येस..टेल टेल.. हास्य

उस डोंगा परि रस नव्हे डोंगा।
कारे भुललासि वरलिया रंगा॥

किंवा काही काही बाबतीत उलटही असु शकतं ना हो पकाकाका? wink

माला बी

माला बी आवडल त्ये. तुमी काय काय वाटतं त्ये लिवा. म्या माझ्या बद्दलच मत तुमाला व्यनी करतो जेनेकरून दुसर्‍यांच्या बुदीला चालना मिळल. नंतर सांगनच की कोन बरूबर हाय त्ये.

आन धमू तु कोनाला सांगू नको तुला म्या व्यनी आधीच क्येलाय त्ये.

आन आता म्या घरी हाय. तुमच्या परतेकाच्या बाबतीतल मत म्या रातीला हापिसात ग्येलावर टाकतो.

आन बर झालं घाटपांडे काकांनी फोटू दिला नाय तो. मजा येईल मत सांगाया.




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आयला..मला

आयला..मला व्यनी???
हां हां....बरं बरं...आलं आलं..ध्यानात आलं...त्यो व्यनि व्हयऽऽ???? wink

चालुंद्या समद्यांचं...म्या तवर जरा बार लावतु...
द्या वो पाषाणभेद, वाईच चुना द्या जरा.

हॅहॅहॅ

आन बर झालं घाटपांडे काकांनी फोटू दिला नाय तो. मजा येईल मत सांगाया

.
ह्ये कोन आमचा फोटु पेपरमदी आलाय



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

घाटपांडे मामा विषयी

माझा अंदाज



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

हॅहॅहॅ

मे १९९७
ShivajiNagar HQ 2
आता स्वेच्छानिवृत्त बिनविषारी साप (काका /मामा/दादा)
-प्रघा



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

प्रकाटाआ

प्रकाटाआ




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

हा तुमचा

हा तुमचा अंडरकव्हर ऑफीसर असतांनाचा फोटो का टाकलात. अवलिया साधूच्या जवळचे वाटतात ना त्यामुळे.




मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

छोटा डॉन

छोटा डॉन हा एक अंमळ विचारवंत वाटला होता आमच्या मुसुसारखा. मी मुसुला आधी भेटलो असल्याने मला 'छोटा डॉन हा एक मुसु' असेच वाटायचे.

धमाल मुलगा: एक किडमिडीत पण चपळ असं एक कार्ट वाटलं होतं.
राजे: एक भैय्या चेहेरेपट्टीचा माणूस वाटला होता. पण राजा बरेच मराठी दिसतो.
आनंदयात्री: हा जीव एक छान पैकी तब्येत कमावलेला उंच वगैरे वाटला होता. प्रत्यक्षात हे साहेब अंमळ जाडजूड आहेत.
बिपीन, मोडकः समाजवादी चेहेर्‍याची माणसे वाटली होती.
अदिती: एक सडपातळ, शिष्ट, बुटकी अशी मुलगी वाटली होती.



-पुण्याचे पेशवे

मला बी

मला बी सेम तस वाटल्याल. फक्त आंद्या हा मला कि किडकिडित झोळी घेउन कवितेची भीती दाखवणारा वाटला होता.



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

बरं...

बिपीन, मोडकः समाजवादी चेहेर्‍याची माणसे वाटली होती.

बिकाचं ठाऊक नाही. माझे धन्यवाद. वाटली होती या शब्दांबद्दल!

हॅहॅहॅ!!!

कसं ना...कसं!!
समाजवादाच्या पायाभरणीपासुन झगडणारेसुध्दा जाहीररित्या संबंध नाकारायचे त्याची आठवण झाली wink

गप्पे

ए गप्पे... असल्या कोणत्याही बाह्य वादाचा समर्थक नव्हतो. मी फक्त स्ववादी आहे.

वाटलंच

वाटलंच होतं की आपण खोलीबंद, स्ववादी समर्थक असणार ते. wink



-पुण्याचे पेशवे

वाटलंच

वाटलंच होतं की आपण खोलीबंद, स्ववादी समर्थक असणार ते >>>

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

धन्या, सुधर रे जरा !!

लगेच...

लगेच तिरकस. पूर्वी अभ्यासवर्ग वगैरे केलेले दिसतात...

>> अदिती: एक

>> अदिती: एक सडपातळ, शिष्ट, बुटकी अशी मुलगी वाटली होती. <<
म्हणजे मी शिष्ट आणि बुटकी नाही? thinking

आय डी बदला आता तुम्ही.....

>>शिष्ट, बुटकी
"शिष्ट ठेंगणी" असा.

खबरदार

खबरदार माझ्या आयडीबद्दल काही बोललास तर ... 'पाय' लावून पळायला लागेल ...

आदीती मला

आदीती मला एक बंगाली साड्या आवडणारी, स्थूल, ५' २'', गव्हाळ, जाडजूड भिंगांचा चष्मा असलेली व विदुषीचा थाञ्ट असलेली वाटते

>>धमाल

>>धमाल मुलगा: एक किडमिडीत पण चपळ असं एक कार्ट वाटलं होतं.
thinking म्हणजे तुला असं म्हणायचं की मी आता तब्येत कमावलीये वगैरे?...थ्यांक्यु रे धन्या!!! (चालः थ्यांक्यु रे जोश्या.. नाटाकःएका लग्नाची गोष्ट)

>>राजे: एक भैय्या चेहेरेपट्टीचा माणूस वाटला होता. पण राजा बरेच मराठी दिसतो.
मझ्या डोक्यात पहिल्यापासुन राजे=एम.के. असंच समिकरण पक्कं आहे.

>>अदिती: एक सडपातळ, शिष्ट, बुटकी अशी मुलगी वाटली होती.
महाशिष्ट, खडुस आणि सरकारी नोकरीमुळे अंगभुत गुणांना आगळीच झळाळी प्राप्त झालेली

>>आनंदयात्री: हा जीव एक छान पैकी तब्येत कमावलेला उंच वगैरे वाटला होता. प्रत्यक्षात हे साहेब अंमळ जाडजूड आहेत.
नो कॉमेंट! आमच्या दोस्ताबद्दल आम्ही वाईटसाईट बोलणार नाही wink

>>छोटा डॉन हा एक अंमळ विचारवंत वाटला होता आमच्या मुसुसारखा.
+९८७६५४३२१०
आणि आहेही बराचसा तस्साच. Big smile

अरेरे

एका प्रतिसादातच किती अशोक चव्हाणपणा करणार हो शब्द फिरवताना ?

"नो कॉमेंट! आमच्या दोस्ताबद्दल आम्ही वाईटसाईट बोलणार नाही"

हे तुमचे वाक्य
आणि हे ही तुमचेच वाक्य

>>छोटा डॉन हा एक अंमळ विचारवंत वाटला होता आमच्या मुसुसारखा.
+९८७६५४३२१०
आणि आहेही बराचसा तस्साच.

अस्सो !!!

- संतप्त
डॉन्या गांधी

असच... की वेगळं?

मला चुचु म्हटलं की ती भुवया वर करून डो़ळे फिरवणारी स्मायलीच आठवते.
बाकी राजे कोल्हापुरचे म्हटंल्यावर कोल्हापूरी स्टाईलचे असावेत अस वाटतयं.
बिकाकाका फार मोठे ५० वर्षापर्यंत असावेत
अन् अवलिया हे देखील वयाने फार मोठे असतील असे वाटत होते.

(विषय दिलेला नाही)

thinking

आमचे २ शब्द

आमच्या आंतरजालावर झालेल्या ओळखींच्या क्रमाने व नंतर जुळलेल्या ॠनानुबंधाच्या जमा-खर्चाच्या हिशोबात काही व्यक्तींसंबंधी ४ शब्द लिहतो आहोत :

१. आनंदयात्री : जेव्हा आंतरजालावर एकदमच नवे होतो तेव्हा हे साहेब एकदम सिरीयस लिहताना आणि जुन्या आयडी नंबरशी चर्चा करताना दिसायचे. कोणीतरी फार मोठ्ठा साहित्यिक खोट्या नावाखाली लिहतोय असे वाटायचे. नंतर आमच्या खवत गप्पा सुरु झाल्या, नंतर वाटले की कोणीतरी कॉलेजातल्या टगेगिरीत मुरलेला, अनंत लफडी पचवलेला व ढीगभर पुस्तके वाचलेला इन्सान असावा.
अंगकाठी ( आता ह्याला काठी हा शब्दच कर्मदरिद्री वाटतो. असो. ) विषयी काही अंदाज नव्हते पण एकदम गंभीर चेहर्‍याचा, चष्मा वगैरे लावलेला, सुखवस्तु जीवन जगणारा हा इसम भासला.
नंतर जेव्हा भेटलो तेव्हा तो तसा निघाला नाही ह्याचा आनंद झाला.

२. धम्या :
पहिल्यांदा बोललो ते पुणे कट्ट्याच्या प्रसंगात, फोन लावल्यावर गंभीरपणे "हालो ऽऽऽ " ऐकले आणि आम्ही फाफललो. म्हणजे मायला फोन लावायचा भारत भालकेंना आणि उचलायचा प्रमोद महाजनांनी अशी गत झाली होती. एकुनच हा इसम जिगरबाज व फिरस्ता वाटला. आधीच्या संवादात दुर्गा कॅफे, शिवाजीनगर ठेसन, अपाची वगैरेत भेटलो असल्याच्या बाता ( बात चे अनेकवचन. धन्यवाद ) झाल्याने अंमळ चरबी कमावलेला, उभ्या आडव्या स्तायलीश दाढी-मिश्या वाढवलेला, विटक्या जीन्स आणि चित्रविचित्र ती शर्ट्स घालणारा व "यो मॅन, हॅव अ ब्लास्ट. यु रोक्स " वगैरे सहजगत्या उच्चारणारा ड्युड वाटला होता. फोनवर बोलुन वाटले की "स्कोडा" वगैरे गाड्यात बसुन पांढराशुभ्र शर्त घालुन ब्लॅकबेरीवर मेल्स चेक करत आपली टीम संभाळनारा लै मोठ्ठा मॅनेंजर असावा.
असा शॉल्लेट घोळ झाला होता.

३. इनोबा :
आंतरजालावरचा आमचा पहिला जिग्री मित्र, एकदम आपल्यासारखा वाटला. उंची, बॉडी लँग्वेज वगैरे एखाद्या 'सिवसैनिका'सारखी वाटली होती आणि तशीच निघाली. बोलण्यात एकदम रोखठोक वाटला आणि भाझवला भांतोत तसाच निघाला.

४. कांता :
पहिल्यांदा ह्या इसमाला आम्ही भयंकर घाबरत होतो, मायला बघता बघता खाते गाय्ब करायचा अशी भिती वाटायची. त्याचे प्रतिसाद वाचुन मला तो आधी पत्रकार वाटला होता किंवा गेला बाजार प्राध्यापक ( म्हणजे शिक्षक वगैरे हो, उगाच वाद नकोत प्लीज ).
नावावरुन आणि कर्तुत्वावरुन एखादी सॉफ्तवेअर फर्म चालवत असावा, एकदम चपळ आणि पळापळ करणारा मेहनती इसम वाटला होता.

५. अदिती :
ही आधी आम्हाला नुकतीच कॉलेजातुन पास होऊन बाहेर पडलेली अस्सल पुणेरी कन्या वाटली होती, भयंकर भांडखोर, हेकेखोर आणि नादिष्ट असावी असे वाटत होते. नंतर कळाले की शायंटिस्ट आहे, मग म्हन्ले बो की बोर्डात आलेले असतात ना चुणचुणीत व्यक्तिमत्वाचे तसे असावी ( म्हणजे त्यात हेकेखोरपना येतोच).

६. टिंग्या :
ह्याबद्दल वाटत होते की कुणीतरी असाच टवाळ मुलगा आहे, तब्येतीने वगैरे गबरगंड असावा म्हणुन शक्यतो लिहण्याचा त्रास न घेता प्रतिसाद आणि खरडी कॉपी-पेस्ट करत असतो. तेव्हा फोरीनात होता म्हनुन वाटले की ग्रीनकार्ड वगैरे असावे साल्याकडे ( तेव्हा इंग्लंडात ग्रीन कार्ड ही सिस्टिम नसते हे आम्हाला ज्ञात नव्हते, ह्यावरुन बघा आमची तयारी ), मायला मस्त लेक्सस वगैरे घुमवत व शिवासचे घुटके घेत हा आंतरजालावर टिवल्याबावल्या करण्यासाठी येत असणारा अत्यंत हलकट इसम वाटला/आहे.

७. राज्या :
सुरवातीला ह्याबद्दल लै मोठ्ठे मोठ्ठे ऐकले होते, आंतरजालावरची बाप लोकं पन ह्याच्यासमोर नरमाईने बोलायची, शिवाय हे महाशय होते दिल्लीत. म्हन्ल मायला कोनतरी लै गबरगंड शिरीमंत असामी असावा किंवा पाल्टिक्समधला एखादा जनसामान्यात उगाच भोळेपनाचा आव आणणारा बिलंदर इसम असावा. ""माझे शब्द" पासुन ह्याचे नाव ऐकत होतो, वयाने आनि ज्ञानाने बराच मोठ्ठा वाटला होता, त्यातुन बोलणे एकदम हायफाय.
प्रकृते म्हणाल तर टिपीकल दिल्लीकर वाटला, त्यातुन आडनाव जैन. हे अशी मस्त कमावलेली बॉडी, हातात मस्त महागडे घड्याळ, गळ्यात चेन वगैरे असा गाड्यातुन फिरणारा व वाक्यावाक्यात "हां, कर देंगे भाई, बस आप की मेहरबानी सेठ" असे पॉलिटिकल गेम टाकणारा मोठ्ठा असामी वाटला होता.

८. निखिल देशपांडे :
जास्त ओळख नव्हती आधी, धम्याकडुन परिचय झाला. पहिल्या काही संवादात माणुस आपल्यातला वाटला.
नावावरुन ( म्हणजे आयडी ) वाटले की एखाद्या अलाण्या-फलाण्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करणारा, ८-१० निवडक मराठी मित्रमैत्रिणी असणारा, वेळेत निघुन वेळेत घरी पोहचणारा, चैन म्हणुन महिन्यातुन २ वेळा बाहेर जेवण अणि १ पिक्चर पाहणारा, बाहेर फिरताना नेहमी नाकासमोर रुमाल धरणारा हा असा साधासरळ आणि आमच्या आई-बाबांच्या नजरेतला 'आयडियल' असा होता.
नम्तर तसा निघाला नाही आणि आमची दोस्ती वाढत गेली आणि वाढतेच आहे.

९. पेशव्या :
भयंकर व्यासंगी, अत्यंत तत्वनिष्ठ आणि चेष्टा-मस्करी पण ती ही तात्विक आणि सुसंस्कृत भाषेत करणारा, नेहमी फॉर्मल्स घालुन शर्टाचा इन करणारा, टायटनचे टिपीकल सोनेरी घड्याळ घालणारा, रोज नेमाने व करड्या शिस्तीत मुलांचा अभ्यास घेणारा, नियमांवरुन ट्राफिक हवालदाराशी भांडणारा व चिरीमिरीच्या मागणीला फेटाळुन कायदेशीर दंड भरणारा, रोज नेमाने टीव्हीवर बातम्या पाहणारा व पेप्रांचे अग्रलेख वाचणारा असा हा सुसंस्कॄत उच्च मध्यमवर्गीय मराठी माणुस वाटलेला.
पुणेकर असल्याने दिवाळी पहाट, संगित नाटके, प्रदर्शन आणि तुळशीबाग ह्यात मनापासुन रमणारा प्राणी वाटला होता.

१०. बिपीनदा :
पहिल्यांदा कधी बोललो आणि शेवटचा भेटुन किती दिवस झाले हे आठवत नाही कारण तो गॅप कधी जाणवतच नाही. एकदम बॅलन्स्ड वाटला होता पेशव्यासारखाच. वयाने जरा मोठ्ठा असावा, मोठ्ठा उच्चपदस्थ असावा असे वाटत होते.
पर्सनॅलिटी बाबत अंदाज जवळपास ९९ % अचुक निघाला.
पहिल्यांदा बेंगलोरल भेट झाली तेव्हा आधी फोतो न पाहताही मॉलच्या दारात माझी वाट पाहणारे बिपिनदा एका क्षणात ओलखु आले व नंतर आम्ही ४ तास ४ वर्षांनी भेटलेल्या कॉलेज यारासारख्या गप्पा मारल्या ह्यातच सर्व आले.
वाचन आणि व्यासंग भयंकर असावा असे वाटत होते, पॅरालल एखादी सामाजिक संघटना ही चालवत असावेत असा अंदाज होता.
मस्त प्राणे आहे पण एकंदरीत.

११. सुहास :
मला आधी वाटले की हा १००% सक्रिय राजकारणी आहे व आंतरजालातुन मनसएवर होनार्‍या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठीच हा त्याच्या (हाणामारीच्या टाईट) वेळापत्रकातुन वेळ काढुन आंतरजालावर येतो. एकदम शिडशिडीत, तरुण, उंचपुरा आणि "भेंचोत तुला दोस्त मानले ना एकदा,, मग आता तुझ्यासाठी जान देईन साला. कोन काय म्हन्ल की आपल्याला आवाज टाक, गुडघ्यातुन पायच काढतो भडव्याचा" ह्या टायपातला वाटला होता. तसा निघाला ह्याचा आनंद जास्त ...
आधी आमचे प्रचंड वाजले होते, कारण हेच आपले कंपुबाजी. तेव्हा जरा आक्रस्ताळा आणि संयम कमी असलेला तसेच डोक्यातुन नव्हे तर दिलापासुन विचार करणारा वाटला होता. तो बेंगलोरला असतो हे कळाल्यापासुन आम्ही काही दिवस आयपी चेंज करुन इथियोपियाच्या आयपीने लॉगिन मारत होतो ह्यातच सर्व आले. wink

१२.प्रसनदा उर्फ पुणेरी :
आधी ह्याने गोटुची शाळा वगैरे लेखन मिपावर केले होते त्यावरुन वाटले की पेशव्यासारखाच हा ही सरळमार्गी मध्यमवर्गीय पापभिरु माणुस आहे.
नंतर आले ती पम्याची डायरी, आपला साला सुफडा साफ झाला की प्रसनदा पत्रकार आहे हे कळाल्यावर.
लेखनातुन अजुन ओळख होत गेली व एक प्रतिमा मनात बनु लागली. अंमळ कमी उंची, क्षणात समोरच्याचा वेध घेणारी व पुढच्या क्षणाला त्याची कुंडली बनवणारी नजर, झोकुन कामात वाहुन जाण्याची वृत्ती, वैयक्तिक स्वतःकडे साफ दुर्लक्ष, सगळी दुनयादारी बघितलेला असा तो आम्हाला "पेज-३ मधल्या अतुल कुलकर्णीच्या पत्रकारासारखा" असा आमचा प्रसनदा वाटला होता.
आता तो प्रत्येक्षात कसा आहे ते एकदा भेटुनच पहा साला.

१३. मोडक :
तात्या सुरवातीला जेव्हा सारखा "अरे हा हलकट मनोगती मोडक इकडे कसा" असा उल्लेख करायचे तेव्हा अम्हाला मोडक टिपीकल मनोगती ( म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे, उगाच आमच्या तोंडुन वदवुन घेऊन पाहुण्याच्या हातुन ** मारु नका ) वाटले होते.
नंतर काही प्रतिसाद, चर्चा, अशातशा नोंदी ह्यातुन मोडकांची भयंकर वेगळी ओळख होत गेली.
नावावरुन आणि कार्यावरुन एकदम भारदस्त, बुलेटवरुन पोलिसांचे सलाम घेत हिंडणारा एक पोचलेला "असामी" वाटत होता...

असो. आलोच थोड्या वेळात.
च्या मारुन मग अजुन खरडतो.

अग्गाय्या

अग्गाय्यायायाया....
आपल्या प्रतिसादात श्री.छोटा डॉन दिसले!

बाकी,
>>२. धम्या :........
एकुण काय, तर 'दिखावे पे मत जाव..अपनी अकल लगाव' Big smile

बाकी एकेकाची वर्णनं जोरात रे डान्या हास्य

भ न्ना ट !

हा एकच शब्द!



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

फोनवर

फोनवर बोलुन वाटले की "स्कोडा" वगैरे गाड्यात बसुन पांढराशुभ्र शर्त घालुन ब्लॅकबेरीवर मेल्स चेक करत आपली टीम संभाळनारा लै मोठ्ठा मॅनेंजर असावा.

Laughing out loud Laughing out loud

गचकेश !!

गचकेश !!

सुहास.

सुहास: हा प्राणी प्रथम एक किडमिडीत आणि आंबट थोबाडाचा वाटला होता. प्रेमभंगामुळे करवादलेला व तत्सम लेख लिहीणारा. पण नंतर मनसे वगैरे प्रकरण, सुके मटण यामुळे त्याबद्दल त्याची प्रतिमा सुधारली मनातली. असो. भेटून आनंद जाहला. असे वाटले त्याला भेटल्यावर.
टिंग्या: हा पूर्वी जालावर एका स्त्रीनामाने वावरत असे. नंतर त्याने स्वतःचे खरे नाव धारण केले. त्यामुळे सर्व लोक त्याला जुना आयडीच चांगला होता असे सर्व सांगू लागले. सर्वानी सांगितले म्हणून आम्हीही सांगितले. नंतर तो स्वतःच्या जुन्या आयडीने परत आला. हल्ली तो भारतात असून ब्रिटीश बिरुदे मिरवणारा एकमेव वाटतो. असो. हल्ली त्याचा हलकटपणा वाढला आहे.
पाषाणभेदः हा एक अंमळ केस पिंजारलेला दाढी वाढलेला, जुनाट मळके कपडे घातलेला जीव वाटायचा. (कारण त्याचा जॉबलेस का काय तो धागा). हल्ली जरा माणसात आल्यासारखा वाटतो.



-पुण्याचे पेशवे

सहज म्हणजे

सहज म्हणजे कायम टि शर्ट व जिन्स मधे वावर्णारा, दोक्यावर रेब्यान, हातात कम्युनिकेटर, गोरा, सडपातळ ३२-३५ चा देखणा पुरुश :8

बाब्बौ

एकविसाव्या शतकातल्या स्नेहलता दसनूरकरांच्या कादंबरीची सुरुवात वाटते हास्य

(विषय दिलेला नाही)

:-ड

आयच्चा घ्घो!!!

नंद्या फुल्टु मोक्काट आज Laughing out loud
स्नेहलता दसनुरकर Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
सुमती क्षेत्रमाडेसुध्दा वाचायचास का रे तू?

+१

अजुन ४ शब्द :

१. सहजकाका :
आधी एकदा आम्ही जेव्हा जर्मनीला निघालो होतो ( मंग, आणला की नाही विषय फिरुन फिरुन इकडेच ? ) तेव्हा ह्यांच्या व्यनी आला होता "टर्किश पोरी" का असाच कायतरी. म्हन्ल आयला माणुस रसिक दिसतोय आणि जेवढा वाटतोय तेवढा उच्चभ्रु नाहीये.
आधी आम्ही लै घाबरायचो, काय करणार हो, त्यांचा आयडी नंबर तर मिपावारचा, एकदम आतल्या गोटातला वाटायचा.
नंतर कळाले की परदेशस्थ भारतीय आहेत. म्हन्ल असतील बॉ एक मस्त अलिशान व्हिला , २-४ गाड्यांचे गॅरेज आणि उठता बसता "कॅथे पॅसिफिक किंवा गेलाबाजार लुफ्थांसा (म्हणुन जर्मन हुशार, शब्दापासुनच ते 'लुफ्त' लुटतात. असो. ) " मधुन फिरणारे.
मग गप्पांमधुन ( म्हणजे तेच व्यनी वगैरे ) त्यांचा खेळकरपणा आणि सहज मिसळण्याचा स्वभाव कळाला बर्‍यापैकी.

२. घाटपांडे काका :
जेव्हा आंतरजालावर लोक शुद्ध लेखनाचा आणि व्याकरणाचा अतिरेक करायचे तेव्हा पकाकाकांची ' मातीतली आपली भाषा' मपल्यान लै आवडायची, वाक्यावाक्याला हॅ हॅ हॅ व्हायचे. ते संयमीतपणे जेव्हा एखाद्याची बिनपाण्याने करायचे तेव्हा ईलॅश्टिक लुज व्हायची वेळ यायची.
मानुस तसा म्हन्लं तर बिनतारी, कसलेच लागेबांध नसलेला मुक्त आणि मनोसोक्त. पोरांच्यात पोराहुन पोर होउन मिसळणारा.
आधी वाटातचे की हे साहेब फोलिसात लै मोठ्ठे सायेब असल्यान उगाच कडक वगैरे असतील, ज्याम भ्या वाटायचे त्यांचे.
एक डाव पुणे-अभिरुची कट्ट्यात भेट झाल्यावर त्यांच्याविषयी बांधलेले सर्व अंदाज वायरलेसचे नेटवर्क कोसळावे तसे साफ कोसळले, अगदी हॅ हॅ हॅ झाले म्हणा ना.

३. गणपा :
आम्ही ती शाबुदाण्याच्या थालिपीठाची रेशिपी लिहल्यापास्न आम्हाला वाटायचे की आम्ही म्हंजे लै भारी कुक, अर्थात अजुन कधीमधी वाटते पण त्याला पर्याय नाही. मंग गणपाशेठ भेटले मिपावर त्यांच्या रेशिप्यासकट.
नाही, संसार माणसाला सगळे करायला शिकवतो पण एवढा चांगला स्वयंपाकही शिकवतो ह्याची शप्पथ कल्पना नव्हती. नंतर तो आयडी 'एका स्त्री चा' असल्याची बोंबाबोंब सुरु झाली व आमचा आनंद गगनात मावेना, त्या दिवशी आम्ही आमच्या रुममेट्सना मस्त कांदाभजी करुन खाऊ घातली.
दुसर्‍याच दिवशी 'दुध का दुध और पानी का पानी' झाल्याने ती भजी खुद्द आम्हालाच पचायला जड गेली हा भाग अलदिहा.
अजुनही जेव्हा कधीमधी गणपा समोसा किंवा हॉट & सॉर सुप सारखी रेशिपी टाकतो तेव्हा आमची जळजळ अशीच भयानक वाढते पण त्याला टक्कर द्यायला आमच्यात "पावर नसल्याने' आम्ही उगाच आपलं सुशिलकुमार शिंद्यांसारखा चेहरा करत "आवडली" असा प्रतिसाद टाकतो.
जेव्हा कधी भेट होईल तेव्हा त्याला गुपचुप खरे बोलायचे औषध पाजुन सत्य काढुन घेईन तेव्हाच स्वयंपाकघरात प्रवेश करेन अशी भिष्मप्रतिज्ञा आम्ही तुर्तास घेतली आहे.
असो.

४. मस्त कलंदर :
आम्हाला ह्यांचे सदस्यनाम ज्याम आवडले होते, पण नंतर जेव्हा ह्या इम्जिनियर्सना शिकवतात हे कळाले तेव्हा मात्र आमच्या काळजाने ठाव सोडला होता. अरे चुकुन त्या आमच्याच शिक्षिका निघाल्यावर काय घ्या ?
मग त्यांनी त्यांच्या ट्रिपचे वगैरे लेख टाकले व आम्ही निर्धास्त झालो. कॉलेजला जाणे, मास्तरांशी ओळखी ठेवणे, ट्रिपात सहभागी होणे ह्यासारखे पालथे धंदे आम्ही कधी केले नसल्याने आता आम्ही निर्धास्त होतो.
अजुन भेटलो नाही त्यांना कधी पण पदव्युत्तम शिक्षण घेतात म्हणजे हुशार असल्याच पाहिजेत, शिकलेला माणुस हुशार असतो असे गांधीजी म्हणत. आजकाल वाईट लोक गांधीजींची चेष्टा करतात.
बाकी जास्त लिहित नाही ह्याचे कारण असे खास काही नाही, माणसाने काही झाले तरी जिवाला भिऊन असावे एवढे कळण्याएवढे तरी आम्ही नक्की हुशार आहोत, दुनया काय म्हन्ली तर सुहास्याला बलावुन एकेकाचे तंगडे तोडु, काय समजलात ?

असो, पुन्हा एक ५ मिनिटे काम करुन येतो.
आलोच ...

लै भारी!!

पकाकाकांचं वर्णन आवडलं हास्य

लै भारी!

लै भारी! डॉनराव फुल्ल फॉर्मात! मजा आला.



-Nile

नंदन्...उच्

नंदन्...उच्चशिक्शित, वयाने २८-३०, ठोदे पोट सुटलेला (खात्या पित्या घरचा) अगदी बुटका नाही पण ५.५ चा हुशार, चांगला व्यासंग असलेला मुलगा Big smile

हॅ हॅ हॅ

>>> ठोदे पोट सुटलेला
Laughing out loud Laughing out loud. बाकी उंची वगळता इतर बाबींत थोडी अतिशयोक्ती आहे wink

नाना मिशी

नाना मिशी असलेला, जुनाट फ्याशन आवडणारा, उन्च ४०-४२चा वयस्कर :|

धमाल मुलगा

धमाल मुलगा कॉलेजात उन्डारणारा थोदा बुटका, हसमुख, छान कॉम्प्लेक्ष्न, खायची प्यायची आवड असलेला

थोडा???

थोडा??? असो!

आणि इत्कं चान चान लिह्ल्य्स म्ह्नुन मे लज्लोय :$

मस्त

मस्त कलंदर् उन्च, गोरीपान, सडसडित, फ्याषनेबल, श्रिमंत बापाची एकुलती एक

चुचु मला

चुचु मला एक, बिनधास्त ,बॉय-कट असलेली...आणी मुलाखतीच्या पहिल्या राऊंडमध्येच आवाज बसवणारी मुलगी (हो हो मुलगी बर का !! मावशी नाही ) वाटते ...पण अजुन भेटलो नाही हा भाग अलाहिदा....

जिमेल वरचा

जिमेल वरचा फोटो पाहुन वर्णन wink

मी कधी

मी कधी बघीतला तुझा फोटो...???? पण असेल तर लिंक पाठव ...माझा गेस बरोबर आहे का ते तरी कळेल !!

अरेरे...

>>>>मस्त कलंदर् उन्च, गोरीपान, सडसडित, फ्याषनेबल, श्रिमंत बापाची एकुलती एक

देवा.. या चुचुला माफ कर!!!
बाई गं.... यातलं एकही खरे नाही... तरी नशीब माझा फोटो पाहिला आहेस... असो... २८ ला येत्येच आहेस तर राहिलेले भ्रमाचे भोपळे फोडूयात!!! Big smile

पिडा काका

पिडा काका सेम तो सेम शिरीष कणेकर वाटले होते...तसे मी त्याना बोलले सुद्ढा होते.

अदिती अगदी

अदिती अगदी उन्च नाही न अगदी बुटकी नाही अशि मध्यम उंचीची, गोरी पण एक नं ची शिश्ट.

एक नं ची

एक नं ची शिश्ट.

हा हा हा ... मोगँबो खूष हुआ।

शीष्ठ नाही

शीष्ठ नाही पण पक्की भांडकुदळ आसेल अस वाटल होत सुरुवातीला (जालीय ओळख वाढण्या पुर्वी). wink



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

चुचु

चुचु श्रीमंत, कामाची अ‍ॅलर्जी असलेली, गोरी, कुरळ्या केसांची, काँप्युटरसमोर बसून असलेली शेठाणी !

ठेंगण्या

ठेंगण्या थोडी बुटकी, सुबक बान्द्याची, घारे डोळे असलेली, पन्जाबी सुट किवा फ्रॉकची आवड असणारी, सुग्रास खायची आवड असलेली.

सुहास

सुहास हाफस्लिव्ज शर्ट, ट्राउजर ,सावळा, बुटका, सिन्सियर.

हाफस्लिव्

हाफस्लिव्ज शर्ट, ट्राउजर >>.
मग बाकीच काय धोतर-गंजी घालुन फिरतात काय ?

,सावळा, बुटका, सिन्सियर >>.

कंल्पीटली राँग.....

डॉन व

डॉन व आन्द्या = एकदम चिकना, रापचिक, अगदी ताडमाड नसलेला, हुशार.

>>एकदम

>>एकदम चिकना, रापचिक,

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
अरे...अरेरे.. अरेरेरे... काय ही भाषा?

मी चुकुन नीमकर रस्त्यावर तर नाही ना आलो?
Laughing out loud

निमकर


निमकर नाहि पण शेख झाइद ऱोड वर येशिल

शाब्बास! बर

शाब्बास!
बरे तुला सगळे रस्ते ठाऊक गं ? जरा कमी भटक

तिन्ग्या

तिन्ग्या निळ्या डोल्याचा, उन्च गोरा, ह्ञ्नडसम, यो स्ताइलचा

परा घारा,

परा घारा, गोरा, खात्या पित्या घरचा,, देखणा, घरंदाज तरुण.

गणपा

गणपा नावामुळे आधी गावंढळ वाटला होता पण फोटो पाहुन माझ्जी चुक लख्सात आलि

श्रावण

श्रावण मोडक वयोव्रुढ वाटले सो भिती वाटायची

ह ल क ट!

ह ल क ट आहेस! wink

" वयोवृध्द "

" वयोवृध्द " हा ईतकाच मराठी शब्द ***ला कोणी शिकविला ?? (असामी-असामी)