कंकणाकृती सूर्यग्रहण

0
0

(वायदा-ए/इ-आझम यांच्या रा.को. असलो तरीही आम्ही आमच्या शब्दाला जागायचे ठरवून रात्री जागून हा छोटेखानी लेख लिहीत आहोत.)
सर्व चित्रे विकीपीडीयावरून घेतली आहेत.

आपला जनक तारा सूर्य साधारण १३ लाख९२हजार किमी व्यासाचा असून आपल्यापासून साधारण १५ कोटी किमी एवढ्या अंतरावर आहे. आणि पृथ्वीचा (नैसर्गिक) उपग्रह चंद्र आपल्यापासून ३ लाख ८४ हजार किमी अंतरावर असून त्याचा व्यास ३४७४ किमी आहे. चंद्र आणि सूर्याच्या व्यास आणि अंतराचे गुणोत्तर काढले तर ते सारखेच आहे; याचा अर्थ आकाशात दिसणारा चंद्र आणि सूर्याचा आकार सारखाच आहे.

१. चंद्राच्या कला का दिसतात?
चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, त्यामुळे सूर्याभोवतीही. चंद्रावर दिवस असणारा भागच आपल्या दिशेला असला की असते पौर्णिमा आणि चंद्राची रात्र आपल्या बाजूला असली की असते अमावस्या. खालच्या चित्रात हे दिसत आहे.

याचा अर्थ असा की अमावस्येला सूर्य आणि पृथ्वीच्या मधे चंद्र असतो किंवा चंद्र आणि सूर्याची युती होते; तर पौर्णिमेला चंद्र आणि सूर्य आपल्यापासून दोन विरुद्ध दिशांना असतात; म्हणजेच चंद्र आणि सूर्याची प्रतियुती होते.

२. दर अमावस्या/पौर्णिमेला ग्रहणं का होत नाहीत?
पृथ्वी सूर्याभोवती फिरताना ज्या प्रतलात असते त्याला एक्लिप्टीक (मराठी शब्द आता चटकन आठवत नाही आहे.) म्हणतात (खालचे चित्र पहा.) हेच प्रतल म्हणजे सूर्याचा पृथ्वीभोवतीचा भासमान मार्ग. पृथ्वीचे विषुववृत्त "आकाशा"पर्यंत वाढवलं तर ते आकाशाला छेदेल त्या प्रतलास वैषुविक वृत्त म्हणतात. (एक्लिप्टीक आणि वैषुविक वृत्त यांचा एकमेकांशी २३ अंशाचा कोन आहे, कारण पृथ्वीचा आस २३ अंशात कललेला आहे.

या एक्लिप्टीकशी चंद्राच्या भ्रमणाचे प्रतल ५ अंशाचा कोन करते. ही दोन प्रतलं जिथे एकमेकांना छेदतात ते दोन बिंदू म्हणजे राहू आणि केतू! त्यामुळे चंद्र बर्‍याचश्या अमावस्या/पौर्णिमांना सूर्याच्या भासमान भ्रमण मार्गाच्या एकतर खाली किंवा वर असतो. जेव्हा चंद्र बरोबर या प्रतलात येतो तेव्हा ग्रहण होतं. बर्‍याचदा चंद्र आणि सौर ग्रहणं 'बॅक-टू-बॅक' होतात ती याचमुळे!

३. कंकणाकृती आणि खग्रास सूर्यग्रहण यांत काय फरक आहे?
चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा दीर्घवर्तुळाकार आहे, त्यामुळे चंद्र जेव्हा या कक्षेत पृथ्वीच्या जवळ असताना या एक्लिप्टीकच्या जवळ असतो, तेव्हा चंद्र आणि सूर्याचे आकार अगदी समान होतात आणि चंद्र सूर्याला संपूर्णपणे झाकतो. हे असतं खग्रास सूर्यग्रहणः

सदर चित्रात डाव्या बाजूला जे दाखवलं आहे ती खग्रास ग्रहणाची स्थिती आहे. umbra म्हणजे गडद छाया आणि penumbra म्हणजे विरळ छाया! चंद्राच्या गडद छायेच्या भागातून खग्रास ग्रहण दिसतं आणि जिथे विरळ छाया पडते तिथून खंडग्रास ग्रहण दिसतं.

जेव्हा चंद्र पृथ्वीपासून लांब असताना एक्लिप्टीकमधे येतो तेव्हा दिसतं कंकणाकृती ग्रहण. वरच्या चित्रात उजव्या बाजूला ती स्थिती दाखवली आहे. या स्थितीतही जिथे विरळ छाया पडते तिथून खंडग्रास ग्रहणच दिसतं. १५ जानेवारीचं ग्रहण अशा कंकणाकृती प्रकारचंच होतं.

३१ जानेवारीला "छायाकल्प" ग्रहण दिसलं तेव्हा चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून गेला. जेवढा भाग दाट छायेतून गेला (चंद्राच्या) तेव्हढ्या भागावर खंडग्रास ग्रहण दिसलं.

वर्षाला जास्तीत जास्त ७ ग्रहण (२ चांद्र, ५ सौर) दिसू शकतात. त्यातली काही समुद्रातूनच दिसण्यामुळे बघणं कठीण होतं. मला स्वतःला खग्रास सूर्यग्रहण पहायला खूप आवडतं, खग्रास स्थितीचा जास्तीत जास्त वेळ ७मि.३०से. एवढा असू शकतो. काळजीपूर्वक शोधल्यास ग्रहणांची यादीही मिळू शकते. २१ व्या शतकातल्या सूर्यग्रहणाची यादी विकीपिडीयाने उपलब्ध करून दिली आहे.

सरतेशेवटी लुटा लुत्फ (१५ जानेवारीच्या) कंकणाकृती सूर्यग्रहणाचा:*

*हा फोटो मात्र मीच काढलेला आहे.

{अतिशय}

1

अतिशय सुरेख माहीती व उपयोगी.
ग्रहणाच्या दिवशी घरी वाद घालत होतो फाल्तु रिती रिवांज बद्दल त्यांचा मनातील कल्लोळ दुर करण्यासाठी ह्य लेखाचा प्रचंड उपयोग होईल. उद्याच क्लास घेतो wink

*

यमे फोटो अप्रतिम !!!!!

शब्दच नाहीत काही बोलायला.


Hope is a good thing...

{फोटो आणि}

2

फोटो आणि माहिती छान. हास्य
कंकणाकृती ग्रहण पहायला मिळाल ही किती भाग्याची गोष्ट आहे.

{फोटो}

3

फोटो झक्कास आहे.
बाकी माहिती वाचुन परत शाळेतला भुगोकाच्या तासाल बसलोय,
बाई पोटतीडकीने शिकवताहेत आणि आमचा एल. एल. बी. चा कंपु टवाळक्या करतोय अस चित्र डोळ्या पुढे तरळुन गेले.
धन्यु अदिती.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{एकदम झकास}

4

एकदम झकास माहीती.
असाच एक वर्ग भरती अन ओहोटी चा घ्या ना मॅडम.

अन आपल्यात "लुटा लुत्फ" नाही तर "लुटा लुफ्त" असे म्हणायचे असते.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या इंजन मेक्यॅनीक (ITI-डिझल)



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{सुरेख लेख}

5

वाचनखुण साठवली आहे.

> बर्‍याचदा चंद्र आणि सौर ग्रहणं 'बॅक-टू-बॅक' होतात ती याचमुळे!

ओह खरचं की मोमेंट! हास्य

फोटो कुठल्या स्पेशल कॅमेर्‍याने काढला आहे? लेन्स खराब होते म्हणतात ना?

{सहजराव}

6

सहजराव लेन्ससमोर एक्स रे चि फिल्म धरायची आणि काढायचा फोटो. काही नाही होत.


-पुण्याचे पेशवे

{क्यामेर्‍}

7

क्यामेर्‍याची असेल तर लेन्स नव्हे डिटेक्टर खराब होईल.

मी साध्या कॅनन पावरशॉट एस्३आय.एस.ने फोटो काढला आहे. आणि फिल्टर्सचं काम ढगांनी केलं.

{वा}

8

मस्त लेख

नितिन थत्ते

{ग्रहणाच्य}

9

ग्रहणाच्या दिवशी खग्रास आणि खंडग्रास आणि कंकणाकृती ग्रहण म्हणजे काय ह्यावर वाद चालु होते आज योग्य ती माहीती मिळाली.
अदिती छान लेख
असाच मी पाहिले सुर्यग्रहण आणि कन्याकुमारीची सफर ह्याव्र सुद्धा एखादा लेख येवु दे


-निखिल

{हम्म्म् ...}

10

पहिल्या वाक्यानंतर लेख पुढे वाचवला नाही.
पहिल्या घासातच खडा लागावा असे झाले. असो.

जोक्स अपार्ट, छान लेख आहे हो.
मराठीभाषेत अशा प्रकारची माही आंतरजालावर फारच कमी उपलब्ध असल्याने ह्या माहितीचा निश्चितच उपयोग होऊ शकतो असे वाटते.
विकिपेडियाचे अकाउंट घेऊन त्यात माहितीचीभर घालावी जेणेकरुन मराठी भाषेत सदर माहिती भविष्यात कुणीही वापरु शकेल.

{छान....!}

11

मस्त भरपूर माहिती मिळाली.
उपयुक्त लेख.

{छान!!!}

12

मस्त भरपूर माहिती मिळाली.शेवटचा फोटो खासच

{उत्तम}

13

चांगला लेख. चंद्र आणि सूर्याच्या व्यास आणि अंतराचे गुणोत्तर सारखेच आहे (बहुतेक ४००:१ अशा प्रमाणात, चूभूद्याघ्या) हा योगायोग विस्मयजनक आहे. सूर्यापासून ग्रहांची अंतरे अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनिटच्या एका सोप्या मालिकेत येतात त्याच कोटीतला.

{उत्तम लेख...}

14

साध्या सोप्या भाषेत छान सांगितलेस गं!!!!
नि वायद्याला जागून लेख पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन!!!! नाहीतर आहेच... तुमचा खेळ होतो.......... :प

{सह्ही}

15

सह्ही गं!

चांगली माहिती दिलीस. बरीचशी माहिती रिफ्रेश झाली तर काही आणखी नवी कळाली हास्य

शेवटचा फोटो तर एकदम खल्लास्स! एका बाजुला ग्रहणातला सुर्य आणि शेजारी ढग...कस्सला वेड आलाय तो फोटो हास्य

{मस्तच}

16

लेख आणि फोटो दोन्ही आवडले
***************************************************
मु.पो.बेडग, ता.मिरज. जि.सांगली पण सध्या वास्तव्य ठाणे ;-)
आवडती फळे= अंजिर, केळे


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{सुंदर लेख }

17

सुंदर लेख लिहिला आहेस आदिती...

सूर्य ग्रहणाचे प्रकार किती आणि ते कसे होतात ह्या माहितीबद्दल अंधारात चाचपडणार्‍या जिज्ञासूला अतिशय उपयोगी लेख आहे हा...

खासकरुन छायाचित्रांच्यामाध्यमातून (कुठुन का घेतलेली असेना) ग्रहणाचे प्रकार एकदम स्पष्टपणे कळतात आणि ज्याला या विषयाचे ज्ञान नाही त्या वाचकालाही तुझा हा लेख प्रकाशझोतासारखा मार्गदर्शक ठरेन यात शंका नाही...

अवांतरः असे कंकणाकृती सूर्यग्रहण पुन्हा तब्बल 1033 वर्षांनंतर म्हणजेच 24 डिसेंबर 3043 ला पाहता येणार आहे. तेव्हा ज्यांनी याची देही याची डोळा हे सूर्यग्रहण पाहिले ते नशिबवानच. कारण यापुढील कित्येक पिढ्या अशा प्रकारचे सूर्यग्रहण असते या पुस्तकी कल्पनेतच रमणार आहे.
अधिक माहिती : http://marathi.webdunia.com/newsworld/news/national/1001/15/1100115001_1...

एवढ्या सुंदर लेखाबद्दल मनापासून धन्यवाद

धन्यवाद,
(खगोलप्रेमी) सागर
अतिअवांतरः तू काढलेला फोटो खूप सुंदर आहे... न्यूज चॅनेलवाल्यांच्या लाईव्ह फुटेजपेक्षा तू काढलेला फोटो खूप आनंद देऊन जातो...


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{छान लेख.}

18

छान लेख. फोटोही उत्तम.

{छान माहीती}

19

उपयुक्त माहीती आणि शेवटचा फोटो छानच..
एलिप्टीकल म्हणजे लंबवर्तुळाकार असं म्हणता येईल का?

{एलिप्टीकल}

20

एलिप्टीकल म्हणजे लंबवर्तुळाकार असं म्हणता येईल का?
होय, बरोबर आहे.

आणखी एक शब्द आहे, पण आठवत नाही आहे, तो म्हणजे एक्लिप्टीक, सूर्याचा पृथ्वीभोवतीचा भासमान भ्रमणमार्ग.

{सॉरी}

21

मी नीट वाचलं नाही की ते एक्लिप्टीक आहे आणि एलिप्टीक नाही...

{फारच छान}

22

अवघड माहीती सोप्या भाषेत सांगितली आहे. असे अजूनही लेख वाचायला आवडतील.


विकास देशपांडे

{विकासकाका}

23

विकासकाकांसारखेच म्हणतो.


-Nile

{लेख आवडला}

24

लेख मनापासुन आवडला. माहितीतुन ज्ञानाशी जवळीक साधणारा लेख.
(संक्षिप्त)
प्रकाश घाटपांडे


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

{आम्हाला}

25

आम्हाला कोंकोणाकृती ग्रहण बघायला जास्त आवडले असते. असो.

{खूप आवडला लेख....}

26

असेच म्हणतो अदिती. तुझे अश्या विषयांवरचे लेख म्हणजे मेजवानीच असते.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)