"गोल्डन बॉय'चा नेमबाजी सोडण्याचा इशारा ..... तुम्हाला काय वाट्तं ?

0
0

सध्या भारतीय क्रिडा क्षेत्रात बर्याच खळबळजनक घडामोडी चालू आहेत ... कधी "हॉकी", कधी "टेनिस", कधी "क्रिकेट" तर कधी "शूटींग" ...

ही बातमी - दुवा
राष्ट्रीय रायफल संघटनेच्या (एनआरएआय) नेमबाजीकडे पाहण्याचा संकुचित दृष्टिकोनामुळे निराश झालेल्या ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या अभिनव बिंद्रा याने शनिवारी नेमबाजी सोडण्याचा इशारा दिला.

तुम्हाला काय वाट्तं ... ऑलिंपिक किंवा जागतिक स्पर्धांमध्ये पदक मिळवणार्या खेळाडूंना "निवड चाचणी" नसावी ?

{अच्छा हा}

1

अच्छा हा पण खेळ असतो होय... आम्हाला ते बॅट बॉल शिवाय दुसरे काही माहितच नाही.

असो जे समोर येतय तेवढेच नसणार पडद्या मागे बरेच कारणे असणार... अर्थकारणाचा विचारही व्हावा... पण पदक मिळवणारा एक खेळाडु मागे राहतो ह्याचे वाईट तर वाटणारच


-निखिल

{असेलही ..}

2

पण जर फक्त "निवड चाचणी" हेच कारण असेल तर ते चुकीचे आहे ...

{"जर देशाला}

3

"जर देशाला अभिनवने स्पर्धेत सहभागी व्हावे असे वाटत असेल, तर त्याला त्याच्या नियोजनानुसार प्रशिक्षण कार्यक्रम आखायला हवा. त्याच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीचाही विचार करण्यात यावा.''

हे जरा अती वाटत नाहि का??? फॉर्म हे गणित नसावे का???
आता क्रिकेट आपल्या ओळखीचे म्हणुन एक उदाहरण म्हणुन बघुयात...
सौरव गांगुलीचा फॉर्म च्या बेसिस वर आपण टिम मधुन हाकललाच होता ना??? तेव्हा त्याचा नावाचा किंवा पुर्व कामगिरीचा विचार कितीदा झाला होता... तसाच संघटणेचा उद्देश करंट फॉर्म तपासणे कश्या वरुन नसेल??? त्यासाठी त्यांनी अगदी बिंद्रालाही चाचणी साठी बोलवणे योग्यच म्हणता येईल...


-निखिल

{मलाही तेच}

4

मलाही तेच म्हणायचं आहे ...
फक्त "पदक" हा निकष नसावा ... चाचणी गरजेची आहे

{तो सध्य}

5

तो सध्य परतेशात सराव करतोय एक स्पर्धेत. या निवडसमीत्यच्या चाचणी साथी तो भारतात पण आला होला. पण या ना त्या कारणाने समितिनणाचाचणिच घेतली नाही तेव्हा.
आतो परत परदेशात असताना त्यला बोलावण धाडलय. त्यावर त्याने मी स्पर्धेचा स्कोर पाठवतो अस उत्तर दिल.
आपले पदाधीकारी ही काही धुतल्या तांदळा सारखे नाहीत.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{आपले}

6

आपले पदाधीकारी ही काही धुतल्या तांदळा सारखे नाहीत.

अगदी असेच म्हणावेसे वाटते.. दोन्ही बाजुने काही तरी चुकले असेल असे वाटते


-निखिल

{आजकी ताजा खबर ...}

7

अभिनव बिंद्राला पुढ्च्या २ विश्वकप आणि दिल्ली राष्ट्र्कूल स्प्रर्धेतून बाहेर करण्यात आले आहे ....

{ह्याला}

8

ह्याला म्हणतात, 'तुला ना मला, घाल कुत्र्याला' !

एकतर स्वतःच्या अ‍ॅकॅडेमीतनं असे चांगले खेळाडु घडवायची, ते मेंटेन करायची लायकी नाही, चांगले असलेल्यांना लालफीतीच्या महामुर्ख कारभारात अडकवुन खच्चीकरण करायचं, आणि नंतर बोंबलायचं, "इतर क्रिडाप्रकार दुर्लक्षित राहतात. हल्ली लोकांना क्रिकेट सोडुन इतर क्रिडाप्रकारांशी घेणंदेणं नसतं" वगैरे वगैरे वगैरे..............

{सहमत!}

9

सहमत! बर्‍याचदा आपले भिकारचोट राजकारणी (हे निवड फिवड करणारे अधिकारी वगैरे)असे मुर्खा सारखे निर्णय घेतात.

अहो जिथे ऑलिंपिकला सुद्धा ठराविक परफॉर्मन्स केल्यास वाइल्ड कार्ड इंट्री असते तिथे हे निवड चाचण्याच्ं काय सांगताहेत?


-Nile

{समर्थांनी}

10

समर्थांनी मुर्खांच कैक लक्षणं देउन ठेवली आहेत आणि आपले पदाधिकारी त्याला जागुन नित्य नेमाने आपल्याला त्याचे दर्षन घडवत असतात.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{पूर्ण सहमत ...गोल्डनबॉय बिंद्राने खेळ सोडून द्यावा}

11

वैतागून खेळाडूंनी क्रिडा क्षेत्राला रामराम ठोकणे काही नवीन नाही...
धनराज पिल्ले सारखा गुणी खेळाडू ज्याला ध्यानचंद नंतरचा तारा समजले जायचे, त्याला पण हॉकी च्या पदाधिकार्‍यांच्या गलिच्छ राजकारणाने सडवले आणि निवृत्त होण्यास भाग पाडले....

बिंद्राच्या बाबतीत जे झाले त्यासाठी लालफितीचे तानाशाही अधिकारी जास्त जबाबदार आहेत. अनुशासन कोणाला शिकवतात हे? जिथे सरकारला कोणतेही अनुशासन नाही. मनमानी कारभार करते तिथे क्रिडा क्षेत्रात ही घाण पसरली तर नवल ते कसले? पाणी नेहमी वरुन खाली वाहते...
ऑलंपिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूशी असे वर्तन करणार्‍या या भ्रष्ट पदाधिकार्‍यांनी स्वत: नेमबाजीसाठी कधी बंदूक हातात धरली असेन का?

फक्त आणि फक्त पैसा खाणे हेच ज्यांना माहित आहे त्यांनी साधी या गोष्टीची पण सोय केली नाही की खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा प्रशिक्षणासाठी उपलब्ध करुन द्याव्यात. कशाला आपले खेळाडू परदेशी जातील मग?
इथे सुविधा देण्याच्या नावाने बोंब आणि मग परदेशी खेळाडू स्वतःच्या खर्चाने गेले तरी पोटात दुखते यांच्या...
हॉकीची टीम पण म्हणाली होती की आम्ही आमच्या पैशाने वर्ल्ड कप खेळू. यातच क्रिडा क्षेत्राच्या भ्रष्ट्राचाराचा बुडबुडा फुटतो. पण सरकारी मंत्रीच नव्हे तर खुद्द पंतप्रधान देखील मांजरासारखे डोळे बंद करुन बसतात.

मुळात दर्जा निर्माण करण्याबद्दल शासकीय यंत्रणाच झोपलेली आहे तर खेळाडूंनी किंवा सर्वसामान्यांनीही काय करावे?

सर्व खेळाडूंना मोलाचा सल्ला : हा देश दर्जेदार खेळाडूंसाठी नाहिये. फक्त वशिला आणि मोठ्या नेत्याचा पाठींबा असणार्‍या खेळाडूंसाठीच आहे. तेव्हा खेळ सोडा आणि आपले पोटापाण्याचे उद्योग बघा ... किंवा पैसे असतील तर विदेशात जा. तिथे तुमची कदर होईन...

(क्रिडा क्षेत्राच्या नासाडीने खिन्न झालेला) सागर


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{'नटरंग'}

12

'नटरंग' मधला "राजकाराणानी कलेनी ***" हा डायलॉग आठवला.


-पुण्याचे पेशवे

{अजून नटरंग}

13

अजून नटरंग पाहिलेला नाही त्यामुळे अर्थ कळायला वेळ लागेन Sad


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{क्रिकेट}

14

क्रिकेट सोडले तर भारतात कुठल्याच खेळाला महत्व मिळणार नाही हे ह्या घटने वरुन तसेच हॉकी च्या सावळ्या गोंधळावरुन कळाले आहे हास्य


Hope is a good thing...

{हॉकी!}

15

प्लिज! हॉकीबद्दलतर कोणी विषयच काढू नका Sad
फार फार वाईट वाटते.

{असेच म्हणतो...}

16

खरे आहे धमाल्या,
भारताचा राष्ट्रीय खेळाची जी सध्या लक्तरे झाली आहेत ती पाहवत नाहीत
कशाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा हॉकीला दिला कळत नाही ... असे दिवस पाहण्यापेक्षा हॉकी हा खेळच बंद करुन द्यावा... सर्व खेळाडूंनी सामूहिक बहिष्कार टाकावा हॉकीवर हे बरे......

अवांतरः सेहवाग सारखा क्रिकेटपटू हॉकीचा वर्ल्डकप भारतात होतो आहे याची सध्या जाहिरात करतो आहे हे पाहून सुखावलो... क्रिकेट खेळाडूला हॉकी खेळाडूंची जाण आहे. पण प्रशासन मात्र झोपले आहे


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{हा}

17

हा हा...झोपलेले नाही! टक्क जागं आहे प्रशासन आणी समिती..
अजुन पोटं भरलेली नाहीत ना!
जळवा कशा, एकदा चिकटल्या की पोट भरेपर्यंत रक्त शोषुन घेतात आणि मग निरुपद्रवीपणानं चिकटुन राहतात..तसंच!
मला सगळ्यात वाईट कधी वाटलं असेल तर विरेन रस्किन्हानं रामराम ठोकल्यावर! अरे, काय खेळायचा तो.... डिफेन्सचं आख्खं भित्ताड होता एकटाच! ह्यांच्या पालथ्या धंद्यांपायी कंटाळून खेळ सोडला बिचार्‍यानं Sad

बाकी, सेहवागबद्दल जरा बरं वाटलं.
(अर्थात, वर्ल्डकपच्या मिडिया मॅनेजमेंटला परवडेल असा तोच क्रिकेटियर असावा. अर्थात ऑफर स्विकारली हादेखील सेहवागचा मोठेपणा आहेच. )

{जरी सेहवाग असला तरी ती}

18

जरी सेहवाग असला तरी ती जाहिरात "हिरो होंडा" ची आहे

{हॉकी अन शूटींग....}

19

तुलना होऊ शकेल? एका मर्यादित अर्थाने नक्कीच होऊ शकेल.

पण शुटींगमध्ये किट, प्रशिक्षण, सराव सगळेच फार महागडे आहे. त्याचा खर्च झेपेल असे फार थोडे लोक असतात. खेळाडुंना प्रशिक्षण आणि सरावासाठी रेंजसारख्या मूलभूत सोयी देखिल नाहीत. पुण्यासारख्या ठि़काणच्या खेळाडुंना सरावासाठी रेंजच नाहीये, त्यांना मुंबई गाठावी लागते. रायफल्स असोसिएशन सारख्या संस्थांनी शूटींगबाबत जागृती करण्याचा प्रयत्न दहा एक वर्षे केला पण सध्या तिथेही राजकारणाचा बुजबुजाट झाला आहे. या परिस्थितीमुळे होतकरु खेळाडु क्रीडाविश्वातुन बाहेर पडल्याची उदाहरणे मी स्वतः जवळुन पाहिली आहेत आणि पहातोय. त्यामानाने हॉकी, फुटबॉलसारख्या खेळांची अवस्था जरा बरी वाटते.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)