१. अध्यात्म : पूर्वभूमिका
१) अध्यात्माचा साधा अर्थ आपण मुळात काय आहोत हे समजणे असा आहे. जे तुम्हाला समजेल ते तुम्ही आत्ता, या क्षणी आहातच त्यामुळे अध्यात्म म्हणजे तुमचा तुम्हाला पत्ता सांगण्या सारखे आहे.
जीवनातली सगळी निराशा, टेन्शन्स, असहायता आणि जे जे काही म्हणून उणे आहे ते आपण मुळात कोण आहोत हे न समजल्यामुळे आहे.
आपल्या मूळ स्वरूपाला सत्य, शाश्वत, अमृत, शून्य, आत्मा, निराकार, अनंत, अपरिवर्तनीय अशी अनेक नांवे आहेत पण सगळ्याचा अर्थ एकच आहे. त्यामुळे अध्यात्मात शब्दाला महत्त्व नसून कळण्याला आहे. सत्य कळले की नाही हे समजण्याचा एकमेव मार्ग किंवा पुरावा तुमच्या जीवनातली चिंता पूर्णपणे नाहीशी झाली की नाही, तुम्हाला जगण्याची मजा यायला लागली की नाही, तुम्हाला कोणत्याही प्रसंगात पूर्णपणे स्वस्थ वाटते की नाही हा आहे.
अध्यात्मातला पॅरॅडॉक्स असा आहे की तुम्हाला सत्य कळले नाही म्हणून तुमचे स्वरूप किंवा मूळ रूप बदलत नाही. स्वरूप कळल्याने तुम्ही निश्चिंत होता आणि न कळल्याने किती जरी प्रयत्न केला आणि मनाजोगते झाले तरी सचिंत राहता एवढाच फरक आहे.
२) अध्यात्मातला संवाद हा नेहमी ऐकणार्याच्या ओपननेसवर अवलंबून असतो, ज्या क्षणी तुम्हाला मला काही कळले नाही असे वाटेल त्या क्षणी माझ्यातला आणि तुमच्यातला दुवा निखळेल. त्यामुळे मला समजले असो अगर नसो तुम्ही मला समजले आहे असे मानता की नाही यावर मी काय म्हणतो ते तुमच्या पर्यंत पोहोचणार की नाही अवलंबून आहे.
आध्यात्मिक चर्चा हा दोघातला संवाद आहे त्यामुळे बोलणार्याला ऐकणार्याला समजले आहे की तो उगाच वाद घालतो आहे हे लगेच समजते. अर्थात सांगणार्याचा आनंद हा ऐकणार्याला समजल्यावर द्विगुणित होतो पण बोलणारा प्रतिसादांचा कौल पाहून बोलत नाही, कारण मग ते न समजलेल्याने समजलेल्या शिकवण्या सारखे होईल.
तुम्हाला ही चर्चा निरस वाटली तर तुम्ही बाजूला होऊ शकता पण एखाद्याला खरंच समजत असेल तर त्याला डायव्हर्ट करू नका.
या लिखाणाचा उद्देश एक अतिशय सोपी गोष्ट अत्यंत सोप्या पद्धतीनं तुमच्या पर्यंत घर बसल्या आणि मोफत पोहोचवणे आहे, वाद निर्माण करणे, कुणाचाही अपमान करणे, कुणालाही कमी लेखणे हा नाही. तुम्हाला सत्य समजलं नाही म्हणून तुमच्यात कोणतेही न्युनत्व येत नाही त्यामुळे अश्या प्रकारचे गैरसमज करून घेऊन किंवा मी स्वतःला कोण समजतो अशी माझी संभावना करून काहीही साधणार नाही.
काहीही करून तुम्हाला समजलेच पाहिजे किंवा मला समजलंय हे सर्वमान्य झालं पाहिजे असा या लेखनाचा हेतू नाही. जेव्हा मला वाटेल की या लेखनाचा कुणालाही काही फायदा होत नाही तेव्हा मी लिहीणं बंद करीन.
३) जेव्हा एखाद्याला सत्य समजतं तेव्हा तो आपल्या भाषेत आणि आपल्या पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न करतो. तो कुणाचेही अनुकरण करत नाही. त्यामुळे गीता ही गीता आहे, उपनिषदे ही उपनिषदे आहेत, कुराण वेगळ्या पद्धतीने सत्य मांडतं, पातंजली त्यांची पद्धत सांगतात, बुद्ध त्याच्या भाषेत शून्याची उकल करतो, त्यामुळे सत्य जरी एकच असलं आणि सगळ्यांचा निर्देश एकाच गोष्टीकडे असला तरी मार्ग आणि अभिव्यक्ती भिन्न होतात आणि त्यात समन्वय होऊ शकत नाही.
तुम्हाला माझं म्हणणं समजलं नाही तर तुम्ही गीता वाचा पण मला गीतेतल्या प्रमाणे सत्याची उकल करा असं तुम्ही म्हणू शकत नाही कारण मग ते गीतेवर प्रवचन होईल. मी माझ्या पद्धतीनं उकल करीन. मला कॉंप्रमाईज करता येणार नाही.
४) सत्य शोधनाचे खरं तर तीनच मार्ग आहेतः एक : सांख्ययोग (म्हणजे ज्याला समजले आहे त्याचे फक्त ऐकणे), दोन : भक्तीयोग (म्हणजे एखाद्या मानसिक आकाराशी तद्रूप होऊन निराकाराला जाणणे) आणि तीन : तंत्र (म्हणजे काही शारीरिक किंवा मानसिक प्रक्रियांनी सत्याप्रत पोहोचणे).
आपण सांख्य योगाचा मार्ग अवलंबणार आहोत. हा मार्ग भक्तिमार्गा पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. तुम्हाला तुमची कुणावरही श्रद्धा असली तरी ती बाजूला ठेवावी लागेल. नाहीतर तुम्ही गोंधळात पडाल किंवा दुखावले जाल. सांख्ययोगात निराकाराला सरळ समजून घेतले जाते त्यामुळे देव ही कल्पना निराधार ठरते. कारण देवाची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी आहे आणि प्रत्येक कल्पना हा आकार आहे, पण निराकार एकच आहे.
तंत्रमार्ग म्हणजे पातंजलींचा अष्टांगयोग किंवा शिवाचे तंत्रसूत्र या शारीरिक किंवा मानसिक प्रक्रिया आहेत त्या ह्या चर्चेत येणार नाहीत. फक्त ऐकणे आणि समजून घेणे हा अत्यंत सहज आणि सोपा सांख्य मार्ग आपण बघणार आहोत.
५) ह्या लेखनाचा प्रत्येक लेख संपूर्ण असेल. जसं एका महालात जायला शंभर दारं आहेत तुम्ही कोणत्याही दरानं आत जाऊ शकता तसं कुठलाही ऐक लेख तुम्हाला सत्याची उकल करू शकेल. एकदा महालात आल्यावर तुम्हाला कळेल की सगळी दारं एकाच ठिकाणी येत होती. तुम्हाला उकल होत नाही याचा अर्थ तुम्हाला दार सापडलं नाहीये. एकदा उकल झाल्यावर तुम्हाला कळेल की मी ऐकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकाराने सांगत होतो कारण सत्य ऐकच आहे.
कोणत्याही ऐका लेखनाची दुसर्या लेखनाशी विसंगती असू शकत नाही त्यामुळे तेव्हा तसे आणि आता असे अश्या चर्चा करण्यापेक्षा समोर असलेल्या लेखनावर चर्चा विधायक होईल.
चर्चेसाठी समान भाषा-समज आवश्यक आहे. निराकार हा माझा सत्याकडे निर्देश करण्यासाठी आवडता शब्द आहे. ओशो ज्याला 'नाऊ अँड हिअर' बुद्ध ज्याला शून्य, उपनिषदे ज्याला पूर्ण, आध्यात्मिक परिभाषेत ज्याला सत्य, कुराण ज्याला अल्ला, कृष्ण्मूर्ती ज्या प्रक्रियेला 'चॉईसलेस अवेअरनेस' निसर्गदत्त महाराज ज्याला सदवस्तू आणि एकहार्ट टोल ज्याला बीइंग म्हणतो त्याला मी निराकार म्हणणार आहे.
आपण मुळात निराकार आहोत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सध्या निराकार हा तुमच्यासाठी शब्द आहे पण मुळात निराकार हे आपलं या क्षणी आणि काहीही न करता लाभलेले स्वरूप आहे.
{"अध्यात्म" हे ई-पुस्तक }
"अध्यात्म" हे ई-पुस्तक नव्याने आपल्या ई-पुस्तक विभागात समाविष्ट झालेले आहे.
आभारी आहे संजय साहेब
something terribly wrong with this country, isn't there?
{सर्व वाचून झाल्यावर मी माझे}
सर्व वाचून झाल्यावर मी माझे मत मांडेन.
मनोगत वर यातील काही लेख मी वाचले आहेत त्यामुळे समजावून घेण्यास मला अडचण होणार नाही ही आशा.
{मनी माऊ}
मुळात आपण आकार नसून निराकार आहोत ही अगदी साधी गोष्ट सर्व अध्यात्म मांडायचा प्रयत्न करतं. तुम्ही ही एकच गोष्ट मनाशी पक्की ठेवा, तुम्हाला मजा येईल आणि एकदम उलगडा होईल!
संजय
संजय
www.sanjayunlimited@yahoo.com
जे जगतो तेच लिहितो!
सत्य समजणं आणि आपण स्वत:च सत्य आहोत हा बोध होणं यात अंतर नाही
समोर : http://sanjaynowhere.blogspot.com/
{नवीन ७ भाग जोडलेले आहेत या}
नवीन ७ भाग जोडलेले आहेत या ई-पुस्तकात.
something terribly wrong with this country, isn't there?
{राजे}
पुनश्च धन्यवाद!
संजय
www.sanjayunlimited@yahoo.com
जे जगतो तेच लिहितो!
सत्य समजणं आणि आपण स्वत:च सत्य आहोत हा बोध होणं यात अंतर नाही
समोर : http://sanjaynowhere.blogspot.com/
{वाचतो आहे}
वेळ लागेल पण वाचतो आहे
http://rashtravrat.blogspot.com
http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
{धन्यवाद. छान धागा आहे हा अमोल}
धन्यवाद. छान धागा आहे हा
अमोल केळकर
भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठे इथे टिचकी मारा
{अनुभवातीत आणि अभ्यासपूर्ण लेखन }
= सर्व लेख वाचले आहेत. सर्वच लेख अनुभवातीत आणि अभ्यासपूर्ण आहेत पण काही प्रश्नही आहेत.
स्त्री आणि पुरुष >
“तुम्ही शरीर बसलं आहे आणि मला कळतं आहे या बोधात आणखी थोडे स्थिरावलात तर तुम्हाला 'कळतयं पण नक्की कुठे कळतयं' हे सांगणं शक्य नाही हे लक्षात येइल. तुम्ही इथपर्यंत आलात तर मुक्त झालात, तुम्हाला अस्तित्वाची संरचना कळली : इथे फक्त 'घडणं आणि कळणं' आहे; ज्याला कळतयं असा कुणीही नाही म्हणून बुद्ध या बोधाला 'शून्य' म्हणतो. मुक्ती ही 'मी' ची किंवा 'मी' पासून नाही तर 'मी नाही' ही मुक्ती आहे.”
=कळतय हे मन्य आहे. पण ’कुठे कळतयं' ??? हाच तर प्रश्न आहे.
असण्याचा बोध/जाणीव आहेच. मन सघन झाले की जाणीव अस्पष्ट होत जाते.
माझ्या असण्याचा बोध नेमका कुठे आहे हेच काळत नाही आणि तुम्ही म्हणताय “तुम्ही इथपर्यंत आलात तर मुक्त झालात” हे पटत नाही. कराण शरीराबरोबर मी जेथे असेल तेथे हा बोथ असतो. मात्र ‘फिक्स लोकेशन’ माहित नाही.
मग मी आत-बाहेर कसा असेल?
अध्यात्मवादी असे सांगतात की आपण हे शरीर नव्हते तेव्हांही होतो आणि शरीर नसेल तेव्हांही असू. पण
जाणीव तर मी जिवंत असतांना मला होते आहे. यावरून मी नसेल तेव्हां ही जाणीव असेल हे सिद्ध होत नाही.
***
काल, अवकाश आणि सर्वज्ञता!
=जसे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. (उतार-चढ; उंची-खोली). तसे ‘आहे’ असं म्हणण्याला – ‘नाही’ मुळे अर्थ आहे. जेव्हां आपण ‘विश्व आहे’ असे म्हणतो, तेव्हां ‘विश्व नाही’ हे पण तितकेच बरोबर आहे. ‘विश्व आहे’ हा निराकाराचा व्यक्त पैलू आहे तर ‘विश्व नाही’ हा निराकाराचा अव्यक्त पैलू आहे. (सापेक्षतावाद निराकारालाच ‘डार्क मॅटर’ किंवा ‘काल-अवकाशाचे फाटणे’ असं म्हणत असावा.)
आपण निराकाराची काल्पना करू शकत नाही कारण आपल्या सर्व कल्पना ह्या आकारच आहेत.
काल आणि अवकाश यांच एकमेकांत मिसळनं म्हणजेच प्रकट विश्व होय. ही विश्वाच्या (Being) असण्याची अवस्था आहे. ही सतत घडत असणारी घटना आहे. काल-अवकाश ही ‘नाऊ’ची स्थिती आहे. हि स्थिती म्हणजे आकाररूपी विश्वाच प्रकटीकरण आहे. येथे काल (Time) आहे आणि त्याला विविध परिमाणही आहेत. प्रकट विश्वात काल सापेक्ष असतो.
अवकाश ही संकल्पना आपण अनुभवत असणारी विश्वाची पोकळी येथेच संपत नाही. आपण अनुभवत असलेली विश्वाची पोकळी ही शब्दशः अर्थाप्रमाणे पोकळ नसुन ती सघन (Solid) आहे. त्यामध्ये विवीध वायू, विद्युत/ध्वनी लहरी आणि असंख्य सूक्ष्म आणि अदृश्य गोष्टी आहेत. अवकाश हा ह्या सघन विश्वाचा रंगमंच (Platform) आहे. मर्यादित सापेक्षतावाद सांगतो की निर्मितीपासून विश्व प्रसारण पावत आहे. म्हणजे आत्ताच्या विश्वावाच्या मर्यादा जेथे संपतात. तेथूनपुढे ‘विश्व नाही’ (non-exitance) सुरु होते. आपल्यासाठी हे सगळे रहस्य आहे कारण आपण ह्या पसा-याकडे एक वस्तू म्हणून पाहतो. आपण याकडे प्रवाह म्हणून पहिल्यास रहस्य संपत नाही पण आपल्या कल्पनेच्या कक्षा मात्र जरूर रुंदावतात.
***
सहल
=ध्यान पद्धती अतिशय सुरेख आहे.
ध्यान करत असतांना आपण सतत काहीतरी ‘Object’ (शांती, आनंद, काही गुढ अनुभव) शोधत असतो. मात्र शोधनारा दुर्लक्षित राहतो. आपण शोधणाऱ्याला शोधत नाही.
***
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
> “आणि मजा म्हणजे हे लोक अपवादात्मक असल्यामुळे ते पुन्हा नियमच सिद्ध करतायत!”
= असा अर्थ कधी घेतला नव्हता.
ओम्| तस्य निश्चितनं ध्यानम|
{सुनील, तुमचे प्रश्न}
मी तुमच्या पहिल्या प्रश्न संचाला (स्त्री आणि पुरूष) या लेखावर उत्तर दिलंय.
हा प्रतिसाद संपादित करून प्रत्येक लेखावर ते प्रश्न पेस्ट करावेत म्हणजे सगळे संदर्भ व्यवस्थित लागतील आणि उत्तरं देता येतील. धन्यवाद!
संजय
www.sanjayunlimited@yahoo.com
जे जगतो तेच लिहितो!
सत्य समजणं आणि आपण स्वत:च सत्य आहोत हा बोध होणं यात अंतर नाही
समोर : http://sanjaynowhere.blogspot.com/
{खुप छान चांगले विचार वाचायला}
खुप छान चांगले विचार वाचायला मिळतील
बाकी
वाचल्यानन्तर