ब्रेड बटाटेवडे
साहित्य :- उकडुन कुस्करलेला बटाटा एक बाउल, हळद १ चमचा, हिंग चिमुटभर, आलं-लसुण-मिरची पेस्ट २ चमचे, मीठ चवीनुसार, कोथींबीर, ताजा एकदम मऊ असलेला ब्रेड ८ स्लाईस.तळण्यासाठी तेल, टोमॅटो सॉस, थोडेसे लाल तिखट.
| From 27.11.2010 |
कृती :- प्रथम एका मोठ्या बाऊलमधे कुस्करलेला बटाटा घ्यावा. त्यात हिंग, हळद, मीठ, आलं मिरची लसुण पेस्ट, कोथिंबीर घालुन एकत्र मळुन घ्यावे. ब्रेडच्या कडा काढुन घ्याव्यात. एका कुंड्यामधे मीठ आणि तिखट घातलेले पाणी घ्यावे दोन्ही हात त्या पाण्याने ओलसर करुन त्यात एक स्लाइस घेउन ती स्लाईस जरा ओलसर करुन त्यात बटाट्याच्या मिश्रणाचा छोटा गोळा घालुन स्लाईस च्या कडा बंद करुन गोल आकार द्यावा अथवा आपल्याला जो आवडेल तो.
| From 27.11.2010 |
कढईत तेल चांगले गरम करुन घ्यावे आणि मंद आचेवर हे वडे तळुन घ्यावेत. गरम असतानाच टोमॅटो सॉस बरोबर खायला घ्यावेत. याबरोबर ओल्या खोबर्याची चटणी अथवा चिंचगुळाची चटणी पण छान लागते.
| From 27.11.2010 |
.jpg)
{असणार् तर खमंग पण भरपुर तेल}
असणार् तर खमंग पण भरपुर तेल पीत असणार
पहिल्या चित्रातलाल्या सगळ्यात खालच्या वाटीत काय आहे?
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{मी पण तोच विचार करत होते}
ते लालसर खडे मीठा सारख दिस्तय ते काय आहे?
आम्ही ह्याला ब्रेद रॉल म्हण्तो! मस्त दिस्तय.. खम्न्ग!
Khaadaad Amita cha Blog
{आताच ब्रेडरोल्ची फर्माईश झाली}
आताच ब्रेडरोल्ची फर्माईश झाली आईकडून
मला तो कांदा अहे अस वाटतय
{जळवा आम्हाला अजून !}
जळवा आम्हाला अजून !
Hope is a good thing...
{आम्ही याला पाववडा म्हणतो.}
आम्ही याला पाववडा म्हणतो.
*****
{खूप दिवस झाले आहेत, खाऊन. आज}
खूप दिवस झाले आहेत, खाऊन. आज मालकिन बाईचा मुड असेल तर सांगेन करायला
___________________________________
योगेश नाईक
{खूपच तेल पिणार हे..पण एक दिवस}
खूपच तेल पिणार हे..पण एक दिवस चालत
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{मस्तच}
आम्ही ह्याला ब्रेड रोल म्हणतो. खूप आवडतो हा प्रकार मला. लहानपणी आई करायची त्याची आठवण झाली अन पाठोपाठ मी केलेल्या प्रयत्नाचीही (अर्थातच फसलेल्या..!!). उसा त माझा पहिला प्रयोग.. मोठ्या आत्मविश्वासानी करायला घेतला आणि ब्रेड रोल तेलात सोडल्यावर सरळ बुडला आणि खाली जाउन चिकटून बसला. हा.. हा.. हा.. त्यानंतर कित्येक दिवस मी काही तळण्याचा धसकाच घेतला होता...
{हा हा हा ! असे धसके बिसके}
हा हा हा !
असे धसके बिसके काही घेणे नाही ताई...
माझे स्वयंपाकाचे प्रयोग नावाचे धागे तुम्ही वाचलेले नाहीत वाटतं :ड
Hope is a good thing...
{मस्त दिसतोय !}
मस्त दिसतोय !
-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/
{अरे काय जबरा आहे}
पाणी पाणी झाला
{म्हणून अनुभवी व्यक्तीचे मत}
म्हणून अनुभवी व्यक्तीचे मत मान्य करावे, पाणी कमी घेत जा रे
Hope is a good thing...
{राजे तुमच उत्तर }
माझा डोक्यावरुन गेले.
{कांदा सॉरी तो लालसर परतुन}
कांदा
सॉरी तो लालसर परतुन घेतलेला कांदा आहे पण मी तो ऑप्शनल ठेवला म्हणुन साहित्य आणि कृतीत लिहायचे लक्षात नाही..
भरपुर तेल जर कढईत असेल तर वडे तळताना जास्त तेल शोषुन घेतले जात नाही.. कमी तेलात तळले तर तसा प्रॉब्लेम येतो..
श्रद्धा
{चालतय}
तसा कांदा नी रडवले आहे सध्या