चिंचोके

0
0

आन्याच्या ग्लास मधे जिमलेट होते.
माझा सिंगल माल्ट.
ग्लास उंचावुन 'चिअर्स' झाले.
आणि आन्या बोलता झाला.
दर दोन वर्षाने आन्या भारतात येतो.
अगदी न चुकता.
अमेरीकेत गेले २० वर्षे स्थायिक असलेला आन्या भारतातील सुट्टीच पसंद करतो.
अगदी कुटुंबासकट.
मोठी झालेली मुले सुद्धा अगदी निर्मळ मराठी बोलतात.
तसे आन्या काही फारसा हुशार विद्यार्थी नव्हता.
गंमत म्हणुन जी.आर.ई दिली.
चांगले मार्क मिळाले.
सातत्य बघुन स्कॉलरशिप सुद्धा मिळाली.
एम्.एस. करता अमेरीकेला गेला.
पोस्ट ग्रॅज्युएशन मधे मात्र चमकला.
सुट्टीत एक काम न चुकता तो करतो.
भारतातील विधायक काम करणार्‍या संस्थांची चौकशी करतो.
भेट देतो.
काम आवडले तर आपल्या वार्षिक उत्पन्नाचा ठराविक हिस्सा २ ते ३ सस्थांमधे विभागुन देतो.
"काय रे चो, तु कुठल्या विभागात सद्ध्या"
म्हणजे?
"श्रीमंत की उच्च मध्यम वर्गिय"?
अरे तु सिंगल माल्ट वर जाउ नकोस. ते केंव्हा तरी असते म्हणुन. आणि तु आहेस म्हणुन. नाही तर शक्य तो नाहीच.
मी उच्च आणि मध्यम च्या मधला. पण का रे?
"ह्या वर्षी जरा वेगळा अनुभव आला म्हणुन"
काय.
"रायगड मधील एका वृद्धाश्रमात गेलो होतो. चांगले व्यवस्थापन आहे. म्हातार्‍यांची चांगली काळजी घेतात. आई आणि बाबांनी नाव सुचवले म्हणुन गेलो होतो.पन्नास हजाराचा चेक दिला. मॅनेजर चे एक वाक्य कळाले नाही."
कुठले?
"अमेरीकन श्रीमंताना १२५० रुपये म्हणजे काहीच नाही"
हां, म्हणजे त्याने चलनाचे रुपांतर केले. तु त्याला प.न्ना.स. ह..जा..र असे ठणकावयचे होतेस.
"अरे, ते पैसे माझ्या मेहेनतीचे.त्या पैशाला अस क्षुद्र करणे योग्य नाही."
सोड रे. कुठल्या तरी झुरळाचे बोलणे काय मनावर घेतोस.विसरुन जा.
"मी अमेरीकेतला श्रीमंत नाही रे. तुझ्या सारखाच. तु रुपयात कमवतोस. खर्च करतोस. मी डॉलर मधे."
खुपच दुखावला गेलायस का? अरे तो मॅनेजर एका खास भोचक वर्गातला आहे. वाचाळ वीर. ही मंडळी सारखी बोलतात. टीका करतात. पण स्वतः काहीही करत नाहीत. पण मला एक सांग तु हे पैसे का देतोस? सामाजिक बांधिलकी,अपराधी पणाची भावना,कर्तव्य, देशाचे देणे ह्या हेडींग खाली.
"खरे म्हटले तर असला कुठलही प्रकार नाही. फक्त मला बरे वाटते म्हणुन."
मग सोड ना. जाउ दे. तु तुझे करत रहा.अशा भोचक मंडळी कडे फारशे लक्ष देउ नकोस.
नंतर सुमारे ३ तास गप्पा रंगल्या. बील आले.आन्या हॉटेल मधे माझ्या आधी १५ मिनिटे आला होता. त्याने कार्ड देउन बील मला भरायला लागणार नाही ची व्यवस्था केली होती. बील आल्यावर त्याने ५ डॉलर ची (बीलाच्या १५%)टीप दिली.
कीतीही बिल झाले तरी मी ५० रुपयांपेक्षा जास्त टीप देत नाही हे ऐकुन आन्या चकीत झाला.

प्रभु.. जरा

प्रभु..

जरा डोक्यावरुन गेला लेख.

* व्यवस्थीत समजेल असा कोणी तरी प्रतिसाद लिहा रे...

माझ्या डोक्याला पण मार बसला आहे त्यामुळे शक्यतो कळत नाही आहे काहीच wink



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

घो

एका पद्धतीच्या 'आयचा घो' लेख आहे तो.
अगदी खरा खुरा.
झाला तसा.
जरा वेळ लागतो कळायला.
तुला नाही कळला तर फारसे मनावर घेउ नकोस राजे.

दोन-चार दा

दोन-चार दा वाचावा लागेल सेठ.

Sad



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हम्म!

तरी नशीब आन्याला "हिरव्या नोटांचा माज" वगैरे मुक्ताफळं ऐकायला लागली नाहीत!!!!
हास्य
आन्याने त्या भोचक मॅनेजरला विचारायला पाहिजे होतं...
"अरे तुझं शिक्षण किती आणि तू बोलतोस किती?
तुझा पगार किती आणि तू बोलतोस किती?"

(वरील क्वोट आंतरजालावरून साभार!!!)

हा पार्ट

हा पार्ट समजला मला पण तो टिपचा पार्ट नाही समजला Sad



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

टिप

बील १५००रुपये
टिप २२५रुपये
म्हणजे ५ डॉलर.

ओके ओके !

ओके ओके !

हास्य



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ओके काय ओके?

काय म्हणायचंय प्रभूमास्तरांना?
सांग बघू राजे?
हास्य

प्रभु

प्रभु सरांचे गणीत सॉलिड चांगले आहे wink



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

प्रभु

प्रभु सरांचे गणीत सॉलिड चांगले आहे wink



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

कायबी कलाले नाय

च्यायला आत्ताच उठलो मस्त सकाळी १०.३० ला, लॅपटॉप उघडला तर समोर हा लेख.
मस्तपैकी शॉट लागला आहे डोक्याला.
झोपतो आता पुन्हा.

लेख नाही समजला पुर्णत:
अमेरिकेत आहे म्हणुन तो श्रीमंतच असेल असे नाही हे समजले पण ते शेवटी टीपचे पार डोक्यावर गेले, असो झोपतो आता.

मास्तर लेख

मास्तर लेख आवडला..
एक वेगळा विषय

मास्तर

मास्तर भविष्याचा विचार करुन अंगात बाणवत असलेल्या अपरिहार्य विचारवंती भुमिकेला शुभेच्छा !

कायच

कळ्ळा नाय बघा अवलियाजी.

तो मॅनेजर

तो मॅनेजर एका खास भोचक वर्गातला आहे

हे तुम्हीच लिहता अन कळलं नाय म्हणता? wink



-Nile

अरे

अरे चोच्यांनो उसात बिलाच्या १०-१५% टीप देण्याची फ्याशन हाय..(आपण देत नाय जास्त ही गोस्ट वेगळी..)

१० नाय १५ %!!!!

आनि ती फ्याशन नाय वो, पद्धत हाय!!!!!
त्या दोन गोस्टीत फरक हाय!!!!
हास्य

वोक्के... अव

वोक्के...
अवांतरः कसे आहात काका??

मजेत!

मजेत!

प्रभुसर

प्रभुसर आपण आज एक वेगळ्या धाटणीचा लेख लिहिलात
असो टिप चा पार्ट समजला

आमाला नाय

आमाला नाय समजला...
कृपया एक्सप्लेन कराल काय?
आपला नम्र,
पिवळा डांबिस

वाह गुर्जी

वाह गुर्जी ! भारी लेख.

बाकी तुम्ही स्नेहाची तुलना चिंचोक्यांशी करत नाही ना?

प्रबु

प्रबु मास्तर नेहमी प्रमाणे कळले कळले म्हणताना काही तरी नाही कळले असे वाटायला लावणारा लेख



-निखिल

मला जे

मला जे कळले ते असे...

१) हा लेख मास्तरांनी लिहीला आहे.

२) मास्तर ठाण्यात रहातात..

आनि

मास्तरच दुसर नाव चो हाय.