गल्ला

1
0

आनंदयात्रींचा लहानपणावरचा लेख वाचला, आठवण आली गल्ल्याची.

लहानपणी गल्ला हा प्रकार फार म्हणजे अगदी जिवाहून प्रिय. आजकालची पोरं याला पिगीबँक पण म्हणतात ब्बॉ.
पहिला गल्ला बाबांनी घेउन दिला होता बालवाडीत छोट्या गटात असताना. मातीचा होता.

कधी मधी मनात आलं तर आजी(बाबांची आई) आणी आजोबा (आईचे काका) चाराणे -आठाणे-बंदा देत.
जास्त मागे लागलो तर आई एका धपाट्यासोबत दोन रुपयाची नोट देई. एक रुपयाची नोट एवढी आवडायची नाही.
त्याचा बंदा आवडायचा. अजूनही त्या दोन रुपयांच्या नोटेचा ओलसरपणा हाताला जाणवतो.
आता डॉलर कमावतोय पण त्याला त्या दोन रुपड्याच्या नोटेचा फील नाही.

हा पहिला गल्ला फोडला चुलत भावंडासोबत लावलेली पैज हारलो तेंव्हा.
तीन चार वर्षात तीन चारशे जमले होते. पैज सोडून उरलेल्या पैशातून नवा गल्ला आणी एक रॅम्बो चा सेट घेतला.

या वेळेस घेतलेला गल्ला होता प्लास्टीकचा. खालून उघडता येणारा. फोडायची गरजच नव्हती.
पण यामुळे एक फायदाही झाला.आईची नजर चुकवून बाहेरचं काहीही खायचं असलं की गल्याची दारं माझ्यासाठी सताड उघडी राहत.ह्यातले काही बंदे मी कधीच वापरले नाहीत. एक होता १९६० चा गांधीजींचा छाप असलेला चांदीचा दहा रुपयाचा बंदा जो माझ्या आजोबांनी बाबांना आणी आता बाबांनी मला दिला होता.

माझ्याप्रमाणे आजीचाही एक गल्ला होता.देवाचा गल्ला. कधी आरतीत जमा झालेले पैशे अधिक दिवसाचे एक-दोन रुपये आजी त्या गल्ल्यात टाकत असे.
बरचसे पैसे जमा झाले की देवासाठी त्यातून चांदीचं निरांजन, प्रसादाच्या वाट्या असं काहीतरी घरात दिसे.
ह्यातले पैसे जमीनीवर ओतून ते मोजत बसणे हा माझा आवडता छंद होता तेंव्हा.
घरातल्यांना तर नक्की वाटलं असेल की मोठा होऊन मी कोणत्यातरी बँकेत कॅशियरचे काम करणार म्हणून.

प्राथमिक शाळेतून बाहेर पडल्यावर गल्याचं भूत डोक्यावरून थोडं थोडं कमी व्हायला चालू झालं.
गल्ला जाऊन प्यांटीच्या मागच्या खिशात पाकीट आलं. पॉकेटमनी चालू झाला नं.

कॉलेजमधली आपली गर्लफ्रेंड (मैत्रीणी बर्‍याच असतात हो) कॉलेजनंतर एक दोन वर्षाने भेटावी.

आपण तिला आणी तिनेही आपल्याला भाव द्यावा अशी माझी आणी माझ्या गल्ल्याची स्थिती झाली बारावी पास होऊन इंजीनियरींगला प्रवेश घेतल्यावर.

शिकायला आलो पुण्याला. दोन तीन महिन्याने घरी जाण्यासाठी पैसेच उरलेले नसायचे.
कधी जाणार वगैरे काहीच ठरलेले नसे.गल्ला परत चालू केला सेविंगसाठी. दोन एक महिन्याकाठी शे-दोनशे सुटायचे.
हे वाचलेले शे दोनशे प्रवासाच्या कामी येत. पुढे सवय लागून जास्त पैसे वाचले की रूम पार्टनरला महिन्याला शंभर उधारीवर देऊ लागलो.
पुढे त्यालाही सवय झाली की मला न सांगता तो गल्यातून पैसे घ्यायचा आणी महिन्याभराने स्वतः परत करायचा.

शिक्षण पुर्ण झाले आणी नोकरीला लागलो. आजही मी माझा गल्ला सुरुच ठेवलाय.
रोज ऑफिसवरून आल्यावर पाकिटातले सगळे सुट्टे टाकतो त्यात.

सह्ही रे

1

सह्ही रे प्रभ्या. उसात 'Kohl's' मधे एक हाय फाय गल्ला मिळतो. त्याच्यात नाणी टाकली की तो आपोआप नाण्याच्या आकारावरून नाण्याचे वर्गीकरण करून ती साठवतो. तसेच त्याच्या इलेक्ट्रॉनीक डिस्प्लेवर किती पैसे जमले तेही दाखवतो. मस्त असतं ते प्रकरण.
छान लिहीले आहेस.
-पेशवे


-पुण्याचे पेशवे

हा हा ! छान

2

हा हा !

छान अनुभव कथन रे...

लहानपणी माझ्याकडे देखील मातीचा मोठा गुल्लक होता.. त्याची आठवण झाली.
आज ही मी खिश्यातील चिल्लर एका डब्ब्यात टाकतो व महिना अखेरीस ती कामी येते... wink

कधी कधी चिल्लरचा आकडा ४००-५०० पर्यंत जातो... तेव्हा नवल वाटतं !

मोडक* -

मोठे व्हा. चा सल्ला प्रभोला चांगलाच मानवला आहे, एक उत्तम लेख त्याच्या किबोर्ड मधून बाहेर पडला बघा wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त रे

3

मस्त रे प्रभ्या. लहानपण जाग केलस. काळाच्या ओघात माझा तो गल्ला आता कुठेसा हरवलाय.
शाळेत संचयनी म्हणुन एक बँके सारखा प्रकार होता. छोटे खानी पासबुक पण असायच. तेव्हा स्वत:च पासबुक आहे याचा केवढा आनंद व्हायचा.
गेले ते दिन गेले!!!!!!!!


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

शाळेत

4

शाळेत संचयनी म्हणुन एक बँके सारखा प्रकार होता.
त्याचीच आठवण झाली.

गल्लाभरू

5

गल्लाभरू लेख आवल्डा. हास्य

+१

6

+१

+२

7

+२

मस्त झालाय लेख....

8

आठवण झाली पैसे कसे साठवत होते त्याची, ह्या गल्याला आम्ही भिशी, बिशी म्हणत असू. दोन महिन्यापुर्वीच घेतला मातीचा गल्ला म्हणजे आजीनं घेऊन दिला पण तो भावाने घेतला Sad

मस्त रे

9

मस्त रे प्रभो ! एकद "कल्ला" लेख हास्य

सही रे

10

सही रे प्रभ्या हास्य

एकदम मस्त आठवणी हास्य

माझ्याकडेही महाराष्ट्र बँकेची मिंटी नावाच्या खारीच्या आकाराची पिगीबँक होती. पण चॉकलेट्ससाठी जेव्हा मी त्यातुन हळुच पैसे घ्यायला लागलो तेव्हा आमच्या जहांपनाह ह्यांनी त्या मिंटीतल्या पैशांचा रोजचा हिशेब लिहायचा फतवा काढला....आता आमचं जगण्यातलं बेहिशेबीपण तसं लहानपणापासुनचंच..त्यामुळं त्या मिंटीची ओढ संपली ती संपलीच....
अजुनही कोणी ते गल्ले वगैरे समोर आणले की पहिल्यांदा आठवतं ते एकाच कागदावर कालची जमा, आजची शिल्लक, काढलेली रक्कम वगैरे रकान्यांत बालबुध्दीप्रमाणे केलेल्या अ‍ॅडजेस्टमेंट्स (घोटाळे हो wink )!

छान लिहिलंयस रे प्रभ्या हास्य
आवडलं.

.

11

.


-पुण्याचे पेशवे

छान लेख

12

लहानपणाच्या आठवणी जागवणारा छान लेख इतकेच म्हणतो.
बाकी "गल्ला" ह्या प्रकारात आमचे काहीच योगदान नसल्याने काही लिहणे उचित ठरत नाही.

छान लेख

13

छान लेख


-निखिल

वा वा

14

वा वा लिहायलाही लागलास का ??
मसत लेख ..