महाभारत युद्ध (भाग २)

0
0

महाभारत युद्ध (भाग-१)

दिवस १

हा दिवस भीष्माचा होता, पांडव सैन्यात जिथे जाईल तिथे भीष्माने प्रेतांचा खच पाडला. ह्या दिवसातील प्रमुख घटना म्हणजे अभिमन्यूने भीष्मांवर चढवलेला हल्ला, विराटाची मुले स्वेत आणी उत्तर ह्यांना अनुक्रमे भीष्म आणी शल्याने यमसदनाला धाडले. पहिल्या दिवशी पांडवांच्या पदरी हार आणी निराशाच आली.

दिवस २

अर्जुन आणी भीष्म यांच्यातील तुंबळ युद्धाने हा दिवस गाजला. भीष्मांच्या रक्षणासाठी नेमलेल्या योद्ध्यांनी सर्व बाजूंनी अर्जुनावर हल्ला करून त्याला भीष्मांशी समोरासमोर लढण्यापासून रोकण्याचा प्रचंड प्रयत्न केला. कलींग सेनेचा भीमाने केलेला प्रचंड विनाश आणी शेवटी भीष्माच्या मदतीने प्राण वाचवून पळालेले काही बचावलेले कलींग योद्धे हा ह्या दिवसाचा सर्वोच्च क्षण. सात्यकीने भीष्मांच्या सारथ्याचा वध केला आणी अनियंत्रित घोडे त्यांच्या रथाला युध्धभूमी बाहेर घेऊन गेले.
ह्या दिवशी कौरवांची प्रचंड हानी झाली.

दिवस ३

भीष्माने कौरव सैन्याची रचना गरुडव्युहात केली आणी ते स्वतः: अग्रभागी होते, त्यांच्या ह्या व्यूहाला पांडवांनी अर्धचंद्राकृती चंद्रकला व्यूहाने प्रत्युत्तर दिले. अर्जुन आणी भीम यांनी अर्धचंद्राची दोन टोके सांभाळली होती.

कौरवसैन्य अचानक सर्व बाजूंनी अर्जुनावर तुटून पडले. अर्जुनाने अत्यंत शौर्याने सर्वांचा मुकाबला केला. भीम आणी त्याचा पुत्र घटोत्कच ह्यांनी दुर्योधनालावर भयंकर त्वेषाने हल्ला चढवला. भीमच बाणांनी घायाळ दुर्योधनाला त्याच्या सारथ्याने वेळीच युध्धभूमीबाहेर नेले. नेताच पळून चाललेला बघून कौरव सैन्यात पळापळ माजली, त्यावेळी सैन्याला भीष्माने पुन्हा एकतर केले. थोड्याच वेळात दुर्योधन युध्धभूमीवर पुन्हा परतला, परंतु पांडवांनी चालवलेला विनाश बघून तो अत्यंत रागाने भीष्मांची निर्भर्त्सना करून गेला.

चिडलेल्या भीष्माने युध्धभूमीवर आतंक माजवला, एकही वीर त्यांच्या समोर टिकाव धरू शकेना. मनापासून युद्धात न उतरलेला अर्जुनही निष्प्रभ ठराल, त्यावेळी रागारागाने आपली प्रतिज्ञा विसरून एका रथाचे चक घेऊन कृष्ण भीष्मांची हत्या करण्यास धावला.

देवाधिदेवाच्या त्या रूपासमोर भीष्म नतमस्तक झाले आणी त्यांनी स्वहस्ते मुक्ती द्यायची कृष्णाला विनंती केली. त्यांचे ते रूप बघून स्मितहास्य करत कृष्ण पुन्हा रथाकडे परतला.

ह्या दिवशी दोन्ही बाजूंची अपरिमित हानी झाली.

दिवस ४

हा दिवस पुर्णपणे भीमच पराक्रमाने गाजला. एका पूर्णं गज सेनेला नेस्तनाबूत करून भीमाने एकट्याने ८ कौरव बंधूंचा वध केला. शेवटी संपूर्ण कौरव महारथी एकट्या भीमावर तुटून पडले, एका बाणाने घायाळ होऊन रथातच कोसळला तेव्हा चिडलेल्या घटत्कोचाने कौरव सैन्यावर केलेले प्रतिआक्रमण त्याच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देते. त्यावेळी एकही रथी, महारथी अगदी भीष्म सुद्धा त्याच्या रागापुढे टिकाव धरू शकले नाहीत.

युद्ध संपल्यावर दुर्योधनाने भीष्मांना विचारले की येवढी मोठी सेना, पराक्रमी योद्धे असूनही आपला विजय दूर का जात आहे ? तेव्हा भीष्म तत्काळ उद्गारले की ह्याचे कारण आहे की पांडवांची बाजू सत्याची आहे.

दिवस ५

ह्या दिवशी भीष्माने मकरव्युह रचला तर पांडवांनी आपली सैन्य रचना ससाण्याच्या आकारात केली.

दुर्योधनाने द्रोणांना विनंती केली ते गुरु असूनही पांडवांना का हरवू शकत नाहियेत ? ? त्यांनी लवकरात लवकर पांडवांचा वध करावा म्हणजे त्याच्या भावांच्या वधाची आग शांत होईल.
द्रोण दुर्योधनाला समजावंत म्हणाले की दुर्योधना तुला अजुनही कसे लक्षात येत नाहीये की कृष्णाच्या छत्रछायेखाली लढणारे पांडव अजिंक्य आहेत.
त्याचवेळी भीष्मांच्या दिशेने निघालेल्या शिखंडीला बघुन सावध झालेल्या द्रोणांनी आपला मोर्चा त्याच्याकडे वळवून त्याला भीष्मांशी लढण्यापासून रोकुन धरले.

हा दिवस पुन्हा एकदा अभिमन्यू आणी सात्यकीच्या पराक्रमाने गाजला, त्यांनी अनेक कौरव वीरांना यमसदनाला धाडले. अभिमन्यूने तर दुर्योधनपुत्र लक्ष्मणाला जखमी करून युध्धभूमी सोडण्यास भाग पाडले.

दिवस ६

ह्या दिवशी पांडवांनी आपल्या सेनेची रचना मकर व्यूहात तर कौरवांनी क्रौंच व्यूहात केली होती.

हा दिवस द्रोण आणी द्रुपद ह्यांच्यातल्या घनघोर युद्धाने गाजला. शेवटी शेवटी द्रोणांच्या बाणाने घायाळ झालेल्या द्रुपदाला वाचवण्यासाठी दृष्टद्युम्नाला धावावे लागले. त्याने सोडलेल्या प्रमोहना अस्त्राने सर्वच जण मोहीत होऊन अचल झाले अशावेळी पटकन सावध होऊन द्रोणांनी आपल्या कडील अस्त्राने ( ह्याचे नाव मला खूपं प्रयत्न करूनही सापडले नाही) त्या अस्त्राचा बीमोड केला.

भीमाने अतुलनीय शौर्य गाजवून दुर्योधन वधाचा पूर्णं प्रयत्न केला पण तो फक्त त्याला बेशुद्धच करू शकला, जयद्रथाने तत्परतेने त्याला युध्धभूमीबाहेर नेले.

अर्जुन, अभिमन्यू आणी द्रौपदीच्या मुलांनी प्रचंड पराक्रम गाजवून कौरव सैन्याची खूपं मोठी हानी केली.

दिवस ७

भीष्माने रचलेल्या मंडल व्यूहाला पांडवांनी वज्र व्यूहाने उत्तर दिले.

द्रोण द्रुपद आणी विराटावर, अश्वथामा शिखंडीवर, दुर्योधन दृष्टद्युम्नावर, नकुल सहदेव शल्यावर तर विंदा अरविंदा अर्जुनावर तुटून पडले. भीष्माने पुन्हा एकदा प्रचंड नरसंहार केला.

भीष्मांवर हल्ला चढवणार्‍या अर्जुनाला भीष्माबरोबरचं त्यांच्या बाजूला कडे करून असलेल्या दुर्योधन, त्रिगार्ताचा राजा सुशर्मा ह्यांचा एकाचवेळी सामना करावा लागला.

द्रोणांनी विराटपुत्र संखाचा वध केला, शिखंडीनी अत्युच्च पराक्रम दाखवत अश्वथामाला आपल्या अनेक बाणांनी घायाळ केले. युधिष्ठिरानेही प्रचंड पराक्रम गाजवला. एकट्या अभिमन्यूने एकहाती दुर्योधनाच्या ८ कौरवबंधुना पळवून लावले. भगदत्ताने मात्र कौरवांकडुन अतुलनीय शौर्य गाजवून घटोत्कोचाला पराभूत करून रणभुमी सोडण्यास भाग पाडले.

शिखंडीचे भीष्मांपर्यंत पोचायचे सर्व प्रयत्न आजही कौरव सेनेने निष्फळ ठरवले.

(क्रमशः)

{छान}

1

छान लेखमाला परा-जी. चालु द्या... वाचनोत्सुक आहोत.

{असेच म्हणते..}

2

लेखन छान ...चालू द्या

{असेच म्हणतो..}

3

लेखन छान ...चालू द्या

{+४}

4

असेच म्हणतो..
लेखन छान ...चालू द्या


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{+५}

5

खरंय!
चांगले लिहितोयस. संकलन उत्तमच...

{+६}

6

उत्तम संकलन ...

{अतिशय}

7

अतिशय उत्तम माहीती संकलन !

आवडले रे पर्‍या हास्य

पुढील भाग लवकर लिही वाट पाहत आहे...


Hope is a good thing...

{+१ असेच}

8

+१

असेच म्हणतो

{येऊद्या}

9

येऊद्या येऊद्या अजून.


-पुण्याचे पेशवे

{छान}

10

छान लेखमाला

अर्जुन, अभिमन्यू आणी द्रौपदीच्या मुलांनी प्रचंड पराक्रम गाजवून कौरव सैन्याची खूपं मोठी हानी केली.
हे वाक्य कळाले नाही.

{मृत्युंजय}

11

मृत्युंजय राव आताशी तुमचा लेख आला होय मि म वर कधी पासुन मागे लागलो होतो
हरकत ईल्ले आला हेच महत्वाच

{आपण तर}

12

आपण तर संजय असल्यासारखी ही कथा सांगत आहात. फारच सुरेख .

(शापित गंधर्व)


(शापित गंधर्व)

{हा हा हा ..}

13

हा हा हा .. आपली उपमा ऐकून अमळ हळवा झालो. चित्रच आले डोळ्यासमोर. पर्‍या दुकानाबाहेर उभा आहे राजा तंगड्या गळ्यात घेऊन दुकानात बसला आहे. आणि पर्‍या बाहेर उभा राहून पक्षी निरीक्षण करत प्रत्येक अपडेट राजाला देत आहे.
||पोरीकथेतील राजकपूर||


-पुण्याचे पेशवे

{ठ्ठो...}

14

>>> ||पोरीकथेतील राजकपूर||
Laughing out loud Laughing out loud, सत्यम् शिवम् सुंदरम्

{ठ्ठ्ठो}

15

Laughing out loud

सत्याने वागून सुंदर रितीने शिवत जावे.

{आरारारा.... म}

16

आरारारा....

मी का कोण जाणे, सत्यम् शिवासम् सुंदरम् असं वाचलं...

असो..

{मिमवरचा}

17

मिमवरचा पहिली संग्रहणीय लिखाणमाला....

गुरुवर्या...हा ही भाग आवडला हे वेगळे सांगायची गरज नाही.....

{उत्तम}

18

उत्तम पराशेठ. उपक्रम चांगला आहे, वाचायला आवडेल.

{भाग ३ ची उस्तुकतेने वाट पहात आहे }

19

भाग ३ ची उस्तुकतेने वाट पहात आहे राजकुमारा ... हास्य

(सागर)


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{+१}

20

पुढच्या भागाची वाट पहात आहे.

प्रामाणिकपणे सांगायचे म्हणले तर माहिती जराशी त्रोटक वाटत आहे.
म्हणजे जेव्हा तुम्ही सैन्य रचनेबद्दल भाष्य करता तेव्हा तेव्हा नुसते आकॄतीचे नाव देऊन भागणार नाही तर त्या आकॄतीत सैन्याची रचना कशी होती म्हणजे घोडदळ, पायदळ, गजदल, रथदल वगैरे कुठल्या पोझिशनला होते व त्यामुळे त्यांना 'स्ट्रॅटेजिक' फायदा काय होत होता हे महत्वाचे होते.
तसेच काही योद्ध्यांच्या प्रमुख गुणांमुळे त्यांची युद्धात पोझिशन काय असायची हे ही महत्वाचे होते.

अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सैन्याच्या " हैरार्ची ( मराठी शब्द ? )" बद्दल थोडे भाष्य केल्यास वाचकांना समजुन घेणे सोपे जाईल.
कारण त्या युद्धाच्या नियमाप्रमाणे रथ्याने फक्त रथ्याशी लढायचे, महाराथी फक्त महारथ्याकडे जाणार, अर्धरथी कधीच महारथ्याला चॅलेंज करणार नाही.
( इनफॅक्ट युद्धाच्या सुरवातीस पितामह भिष्मांनी "कर्णाला" चक्क अर्धरथी बनवल्यामुळे त्याचा अर्जुनाशी भिडायचा चान्स गेला व त्याने नाराज होऊन युद्धातुन माघार घेतली व तो पहिले काही दिवस आपल्या शिबीरात बसुन राहिला असा इतिहास आहे. त्यामुळे ह्यावर भाष्य महत्वाचे ठरते. असो. )
आपण पुढच्या भागात हे मुद्दे कव्हर करणार असल्यास माझ्या आगाऊपणाबद्दल क्षमा मागतो.

मालिका उत्तम आहे, संग्रहणीय आहे म्हणुन काही उपयुक्त सल्ले द्यावे वाटतात, बस्स इतकेच.
वाचत आहे, लिहीत रहा !

{हायरार्की}

21

हायरार्की = उतरंड

{धन्यवाद. शब}

22

धन्यवाद.
शब्द आठवत नव्हता, आभारी आहे.

{बिका}

23

बिका त्यांनी हायरार्की नसून हायरार्ची विचारले आहे. असो.


-पुण्याचे पेशवे

{हम्म!!! मोठे}

24

हम्म!!! मोठे व्हा!!! (कॉपीराईटः मोडक)

{हा पण चांगला}

25

हा पण लेख / आढावा चांगला आहे. दिवसाअखेरीस क्रिकेटच्या मॅचची ताळेबंदी सांगितल्या सारखे वाटत आहे. (ही टिका नाही, धावत्या आढाव्याच्या पद्धतीस म्हणले आहे!)

हा दिवस पुन्हा एकदा अभिमन्यू आणी सात्यकीच्या पराक्रमाने गाजला, त्यांनी अनेक कौरव वीरांना यमसदनाला धाडले.

यात कौरवांकडील वीरांना म्हणले पाहीजे कारण सर्व म्हणजे १०० कौरवांना एकट्या भीमाने मारले आहे.


विकास देशपांडे

{ठीक आहे...पण नेमका उपयोग काय}

26

ठीक आहे...पण नेमका उपयोग काय या माहितीचा? कारण गोष्ट नाही तर दिवसाचे हायलाईट सांगितलेत म्हणून विचारले.