स्वाईन फ्लू

0
0

स्वाईन फ्लू ज्यावेळी गाजत होता तेव्हा त्यावरील चर्चाही गाजत होती. संस्थळेही अशा चर्चांना अपवाद नाहीत. आज एक बातमी नव्याने समोर आली. दोन माध्यमांमध्ये ही बातमी दिसते - टाईम्स ऑफ इंडियाची पुणे आवृत्ती आणि सीएनएन आयबीएन वाहिनीचे संस्थळ.
सीएनएन आयबीएनच्या संस्थळावरील बातमीचा दुवा -
http://ibnlive.in.com/news/who-exaggerated-h1n1-to-benefit-
टाईम्समधील बातमी टाईम्सच्या संकेतस्थळावर ई-पेपरच्या दुव्यात पुणे आवृत्तीत पान १ वर पाहता येते. तिचा वाढावा पान १४ वर आहे.
बातमीचा संक्षेप असा -
स्वाईन फ्लूच्या काळात ही साथ असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने द्यावा अशी शिफारस ज्या गटाने केली, त्या गटातील सदस्यांचा औषध कंपन्यांशी थेट संबंध आहे. हा संबंध आर्थिक व्यवहाराच्या स्वरूपात (अर्थातच, प्रकल्पांच्या माध्यमातून) आहे. या गटाने दिलेल्या सल्ल्याविषयीच आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. टाईम्सची बातमी मुळातून वाचण्यासारखी आहे. अर्थातच, ही बातमी मूळ डेन्मार्कमध्ये आली आहे. तेथील पत्रकारांनी केलेले काम.
तुमचे काय मत आहे?

{लिंक दिसन}

1

लिंक दिसन नाहीये हाफिसातुन्....पन त्यावेळी आपली चरचा झाली होती...त्यानुसार तरी बरच गौडबंगाल आहे असे दिसत होते ..जरा बातमी सविस्तर पाहु द्यात..

{आयबीएन}

2

आयबीएनच्या वेबसाईटवर दुपारपासून असलेली ही बातमी आत्ता गायब झाली आहे. टाईम्सच्या मुद्रित अंकात मात्र ही बातमी आहे.
आयबीएनवरील प्रकाराबाबत मी त्यांच्या संपादकांना ईमेल पाठवले आहे. काही खुलासा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करीत!

{>>आयबीएनच्य}

3

>>आयबीएनच्या वेबसाईटवर दुपारपासून असलेली ही बातमी आत्ता गायब झाली आहे.
व्वा!!!!
आयबीएनने पुन्हा एकदा आपली लायकी दाखवुन दिली.

असो!

{आयबीएनने}

4

आयबीएनने पुन्हा एकदा आपली लायकी दाखवुन दिली.

+१ सहमत
बातमी वाचायला आवडेल... दुवा????

{ह्म्म...}

5

म्हणजे स्वाईन फ्ल्युबाबतची शंका योग्यच होती असे दिसते.
ह्या बाबतच्या एका चर्चेत बर्ड फ्ल्युचाही संदर्भ आल्याचे आठवते. त्यावेळी कश्या पध्दतीने घबराटीच्या मानसिकतेचा फायदा घेऊन औषध कंपनीनं स्वतःचं उखळ पांढरं करुन घेतलं वगैरे...

असो, 'द हिस्ट्री रिपिट्स' हे ह्याबाबतही लागु पडते तर हास्य

धन्यवाद मोडक..अशा महत्वाच्या मुद्द्याला हात घालुन योग्य त्या बाजुवर पुन्हा प्रकाश टाकल्याबद्दल!

आता बरं वाटतंय, की आम्हीही (आपल्याच मार्गदर्शनामुळे) ह्या स्वाईनफ्ल्युचा उग्गाच बाऊ करुन घेतला नाही आणि स्वतःला फालतु खर्चांमध्ये अडकवुन काळाबाजार करणार्‍यांची उखळं पांढरी करुन नाही दिली. हास्य
मोडकांचे आभार!!!

जाताजाता: स्वाईनफ्ल्युच्या घबराटीची लाट पुर्ण बहरात असतानाची भय इथले संपत नाही आणि डुक्करताप घबराट आणी मी ह्या दोन चर्चांमध्ये मोडकांनी तेव्हांच सर्वांना ही शंका बर्‍याचशा डेटाच्या आधारे बोलुन दाखवली होती त्याची प्रकर्षाने आठवण झाली. हास्य

{आय थिंक}

6

आय थिंक मोडक इज व्हिंडिकेटेड. तुम्ही अशाच प्रकारचे मत व्यक्त केल्याचे आठवते.

{हम्म्म}

7

मी त्यावेळी हे आणि हे लिहिले होते.

{मला देखील शंका येते आहे. आता}

8

मला देखील शंका येते आहे.

आता हे नवीन खुळ भारताच्या नावावर चालवले जात आहे Sad

http://www.superbugtheblog.com/

सुपरबग म्हणे !