महाभारत युद्ध (भाग १)

0
0

महाभारत युद्ध हे कौरव आणी पांडव या दोन सैन्यात लढले गेले. आता आपण जरा दोन्ही बाजुंचे सैन्य आणी बळाबळ यांची माहिती घेउयात.

पांडव :-

पांडवांचे सैन्य हे पश्चीमेकडची बाजु घेउन पुर्वेकडे तोंड केलेल्या अवस्थेत युद्धभुमीवर हजर होते, सैन्याच्या बाजुलाच एक तळे असल्याचा उल्लेख भिष्मपर्वात सापडतो.

पांडवांकडे सात औक्षहीणी सैन्य होते. एक औक्षहीणी सेनेत २१८७९ रथ, २१८७० हत्ती, ६५६१० घोडे, १०९३५० पायदळ सैनीक यांचा समावेश होतो.

ही सात औक्षहीणी सेना प्रत्येकी एक औक्षहिणी असा भाग करुन सात विरांच्या अधिपत्याखाली लढत होती. ते वीर होते द्रुपद, विराट, दृष्टद्युम्न, शिखंडी, सात्यकी, चेकीतन आणी भिम. या जबाबदारी बरोबरच द्रुष्टद्युम्नाला पांडव सैन्याचा सेनापती सुद्धा घोषीत केले गेले.

अखील भारत वर्षातुन पांडवांसाठी युद्धात उतरलेली काही प्रमुख सैन्य होती ती म्हणजे केकया, पांड्य, चोला, केरला आणी मगध.

कौरव :-

कौरवांकडे अकरा औक्षहीणी सैन्य होते. कौरव सैन्याचे सेनापती म्हणुन भिष्मांची निवड करण्यात आली. भिष्मांनी दोन अटींवरती ही जबाबदारी स्विकारली १) ते पांडुपुत्रांपैकी कोणालाही हानी पोचवणार नाहीत २) कर्ण हा युद्धात ते असेपर्यंत भाग घेणार नाही. (कर्णानी आपले गुरु परशुरामांचा अपमान केल्याने आपण एकत्र लढु शकत नाही असे कारण भिष्मांनी दिले.)

कौरव सेना ज्या विरांच्या अधीपत्याखाली लडहली ते विर होते दुर्योधन, दु:शासन, शकुनी, द्रोण, कृतवर्मा, अश्वथामा, कृप, जयद्रथ, शल्य, भुरीसर्वास, सुदक्षीण आणी बहलीका.

बलराम आणी विदर्भ राज्याची सेना व स्वत: विदर्भ नरेश रुक्मी हे तटस्थ राहिले.

१८ हा आकडा या युद्धात अत्यंत महत्वाचा गणला गेला. हे युद्ध १८ दिवस चालले, १८ विभाग एकमेकांविरुद्ध लढले (पांडवांचे ७ आणी कौरवांचे ११) आणी ह्या महाभारत युद्धात सांगीतल्या गेलेल्या गीतेचे अध्यायही १८ च आहेत.

युद्धनियम :-

१) आपल्या तुल्यबळाबरोबरच युद्ध करावे. पायदळ पायदळाशी, रथी रथीशी, अतीरथी अतीरथीशी, महारथी महारथीशी या प्रकारे.

२) शरण आलेल्या प्रत्येकास जीवदान देण्यात यावे.

३) एकदा वापरलेले व जमीनीवर पडलेले शस्त्र पुन्हा वापरु नये.

४) रथाचे चालक, नोकर चाकर आणी प्राणी ह्यांच्यावर कुठल्याही प्रकारे हल्ला करण्यात येउ नये, त्यांना लक्ष करु नये.

४) युद्ध सुर्योदयाला चालु होउन सुर्यास्ताला संपलेच पाहिजे.

५) दोन विरांना मिळुन एका विराशी लढता येणार नाही.

(यातले जवळ जवळ सर्व नियम या युद्धात पायदळी तुडवले गेले.)

या युद्धात एकाच दिवसात सर्वात जास्ती नरसांहार करणारा अर्जुन ठरला. अभिमन्युच्या मृत्युच्या वार्तेने चिडलेल्या अर्जुनाने एका दिवसात कौरवांच्या एक औक्षहीणी सेनेचा विनाश केला.

या युद्धात दोन्ही बाजुंनी रचले गेले व्युह.

१.क्रौंच व्युह (क्रौंच पक्षाच्या आकारातील)

२.मकर व्युह (मगरीच्या आकारातील)

३.कुर्म व्युह (कासवाच्या आकारातील)

४.त्रिशुळ व्युह (त्रिशुळ आकारातील)

५. चक्र व्युह (चक्राच्या आकारातील)

६.कमल व्युह किंवा पद्म व्युह (कमळपुष्पाच्या आकारातील)

७.ग़रुड व्युह (गरुड पक्षाच्या आकारातील)

८.ऊर्मि व्युह (समुद्राच्या आकारातील)

९.मंडल व्युह (ग्रहमंडळाच्या आकारातील)

१०.वज्र व्युह (हिर्‍याच्या आकारातील)

११.षकट व्युह (सहा बाजुंच्या खोक्याच्या आकारातील)

१२. असुर व्युह (राक्षस आकारातील)

१३. देव व्युह (देवांच्या आकारातील)

१४.सूचि व्युह (सुईच्या आकरातील)

१५. श्रींगटका व्युह (शिंगाच्या आकारातील)

१६. चंद्रकला व्युह (अर्धचंद्राकृती)

युध्दानंतर वाचलेले एकुण बलाबल :-

पांडव :- पाच पांडव, कृष्ण, सात्यकी, युयुत्सु.

कौरव :- कृतवर्मा, अश्वथामा, कृप.

(काही संदर्भांसाठी विकिपिडीया व उदया पोर्टलचा वापर केला आहे.)

महाभारत कालात वापरलेले गेलेले बाण :-

१)सूची- अतिशय सूक्ष्म अग्र. डोळ्यांची बुबुळं फोडायला ह्यांचा उपयोग केला जाई.

२) अर्धचंद्र- नावाप्रमाणे चंद्रकोरीच्या आकाराचा बाण. शत्रूच मस्तक धडावेगळं करून आकाशात उडवायची क्षमता.

३) जिद्म- वेड्यावाकड्या शेपटाचा आणि तसाच नागमोडी जाणारा बाण. मधले असंख्य अडथळे चुकवून हव्या त्य लक्ष्याचा अचूक भेद. अतिशय कौशल्याने सोडायचा बाण. अर्जुनाने सिंधुराज जयद्रथाचा वध ह्याच बाणाने केला. ह्या बाणाने मधल्या अनेकांना चुकवून गर्दीत उभ्या असलेल्या जयद्रथाचा कंठनाळ अचूक फोडला.

४) भल्ल/मल्ल:- भरीव लोखंडाचा, cone-shaped बाण. जाडजूड लोहकवच फोडून प्रतिस्पर्ध्याचा मर्मभेद करण्यासाठी वापर.

५) वक्रदंत:- अग्राला उलटे दाते असलेला बाण. एकदा घुसला क बाजूच्या धमन्या फोडल्याशिवाय बाहेरच काढता येत नसे.

६) बस्तिक:- शेपूट मोडकं असे. दोन भाग लोखंडी तारेच्या मळसूत्री तिढ्याने जोडलेले असत. त्यामुळे घुसल्यावर बाहेर काढण्यासाठी ओढताच नुसतं शेपूटच हातात येअ असे आणि पातं आतच राहत असे. विष लावून वापर केला जात असे.

७) नाराच:- वजन आणि लांबीचं गुणोत्तर अचूक सांभाळून अतिशय काळजीपूर्वक तयार केला जात असे. अफाट वेगवान बाण.

८) वत्सदंत:- गाईच्या वासराच्या (वत्स) दाताच्या आकाराचा.

९)गवास्थि:- गुरांच्या हाडापासून केलेला.

१०) गजास्थि:- हतीच्या हाडापासून तयार केलेला.

११) काकपुच्छ:- कावळ्याच्या पिसांची शेपटी.

१२) कालदंड:- दंडावरच्या विशिष्ट खाचा वगैरेंच्या योगाने अतिशय कर्कष आवाज करत जात असे. अमोघ बाण.

१३) सन्नतपर्व:- वेताच्या दंडावर अनेक गाठी असलेला.

१४) नतापर्व:- दंडावर एकही गाठ नसलेला.

१५) पद्म:- कमळाच्या आकाराचं अग्र. योद्ध्यांचे अवयव समूळ तोडायला उत्तम.

१६) द्व्यग्री:- दोन टोकं असलेला.

१७) धृष्ट- दंडावर स्पायरल आकारात, ड्रीलवर असतात तश्या चार खाचा असत. त्यामुळे गरगर गोल फिरत जात असे. विविध प्रकारची कवचे फोडयण्यासाठी वापर.

१८) वज्र- अतिशय दणकट आणि खूप दणका देणारा बाण. रथाची चक्रे निखळवणे, ध्वजदंड मोडणे, जू तोडणे अश्या कामांसाठी वापर.

(क्रमशः)

{उत्तम}

1

उत्तम संकलन... वाचत आहे.

विस्तृत प्रतिक्रिया गरज वाटल्यास लेखमालेच्या शेवटी.

उत्तम.

{उत्तम}

2

उत्तम संकलन... वाचत आहे.

+१

{+२ उत्तम}

3

+२
उत्तम संकलन... मग वाचेन.

{+४}

4

वाचतोय

{+५}

5

वाचतोय

{+६}

6

छान माहिती संकलन!!!

अवांतरः पराला अचानक काय झालं???

{+७/+१}

7

>>> छान माहिती संकलन!!!
+७

>>> अवांतरः पराला अचानक काय झालं???
+१

{छान्..माहिती}

8

+३ उत्तम
असेच लिहित रहा पुढचे भाग!

{चुचु}

9

याहू च्याटवरील चुचू मराठे का तुम्ही?


"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.

{अरे वाह}

10

अरे वाह !

छान रे.

पुढील भाग लवकर लिही मी ही एक कथा लिहीत आहे महाभारतावरच.
त्याचा एक भाग त्यार आहे.. टाकेन लवकरच.


Hope is a good thing...

{चांगली माहिती!}

11

असेच लिहीते रहा!

अवांतर : द्रुष्टदुम्न महाभारतानंतर जिवित होता का?

{+१}

12

असेच म्हणतो.
लिहीत रहा, आम्हीही जमेल तशी माहितीची भर टाकुच.

बाकी द्रॄष्टद्युन्मच्या मरणाचे काही माहित नाही बॉ, बहुदा तो जिवंत असावा.

{नाही}

13

जसे वाचले आहे , आणि मालिकेत पाहिले आहे त्याप्रमाणे द्रुष्टद्युम्न आणि द्रौपदीच्या पाच मुलांना अश्वथामाने मारले ..

{:)}

14

बहुतेक बरोबर आहे.
कारण अश्वत्थाम्याने त्या सर्व जणांना व इतर अनेक जणांना "झोपेत ठार मारले" आणि म्हणुन त्याची शिक्षा करण्यासाठी भगवान श्रीकॄष्णाने त्याच्या माथ्यावरचा मणी काढुन घेतला असे वाचल्याचे आठवते.
बरोबर आहे, द्रुष्टद्युम्न युद्धाच्या शेवटच्या दिवशी अशा प्रकारे मरतो.

{भगवान}

15

भगवान श्रीकॄष्णाने त्याच्या माथ्यावरचा मणी काढुन घेतला असे वाचल्याचे आठवते.

डॉन शास्त्री तुमचे बरोबर आहे
कृष्णाने जो मणी काढून घेतला त्या मण्याचे नाव स्यमंतक असे होते. तो मणी अश्वथ्थामाच्या माथ्यावर( कपाळावर) होता. अश्वथ्थाम्याच्या डोक्यावरची जखम आहे ती त्यामुळेच.
अश्वथ्थामा हा द्रोणाचार्यांचा मुलगा होता.त्याला चिरंजीवीत्वाचा शाप होता. हिमालयात सापडतो अधूनमधून कोणाकोणाला म्हणे. आणि डोक्यावरच्या जखमेसाठी तेल मागत असतो


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

{विजुभौ ?}

16

Laughing out loud Laughing out loud

विजुभौ ? आज काय दुपारीच का काय ?

अहो स्मयंतक मणी हा सुर्यदेवाच्या मालकीचा होता. तो त्यानी आपला भक्त सत्रजीत ह्याला प्रदान केला. ह्याच स्मयंतकाच्या चोरीचा आळ पुढे श्रीकृष्णावर आला. ह्याच मण्याचा शोधात असताना पुन्हा एकदा श्रीकृष्णाची जांबुवतांशी भेट झाली आणी त्याने जांबुवतांच्या मुलीशी लग्न केले.

{आणि एक}

17

आणि एक राहिलं... इट्स अश्वत्थामा ड्यूड... नॉट अश्वथ्थामा!!!

{+१}

18

परा आणि बिकांशी सहमत.
मी आत्ता त्या मण्याचाच संदर्भ शोधत होतो. "स्यमंतक" हे नाव जरी ओळखीचे असले तरी ह्या संदर्भात नसावे असे वाटत होते.
माहितीसाठी धन्यवाद.

{महाभारत}

19

महाभारत शिर्षक वाचुन जरा गडबडलो होतो...

लेख छान ...वेगळा आनी वाचनीय

{अश्वथ्थामा हा द्रोणाचार्यांचा}

20

अश्वथ्थामा हा द्रोणाचार्यांचा मुलगा होता.त्याला चिरंजीवीत्वाचा शाप होता. हिमालयात सापडतो अधूनमधून कोणाकोणाला म्हणे. आणि डोक्यावरच्या जखमेसाठी तेल मागत असतो

अश्वत्थामा नर्मदा परिक्रमा करणार्‍याना भेटतो असेही कुठेतरी वाचले आहे.

{दृष्टद्युम्न}

21

लेखमाला चांगली आणि एकदम माहीतीपूर्ण आहे. (मराठी संकेतस्थळातील युद्धात याचा कसा वापर करता येईल याच्या सध्या विचारात आहे wink )

अवांतर : द्रुष्टदुम्न महाभारतानंतर जिवित होता का?

नव्हता हे उत्तर आले आहेच. थोडे अधिक: महाभारत युद्ध हे १८ औक्षहणी म्हणजे सुमारे ४० लाख योद्धयांमधे लढले गेले. युद्धाच्या शेवटी त्या योद्धांमधील (कृष्ण सारथी होता, तत्सम धरायचे नाहीत) केवळ सातच जीवंत राहीले. पाच पांडव, अश्वत्थामा आणि कृपाचार्य. त्यातील शेवटचे दोन चिरंजीवी होते. (की आहेत?)


विकास देशपांडे

{???}

22

युद्धाच्या शेवटी त्या योद्धांमधील (कृष्ण सारथी होता, तत्सम धरायचे नाहीत) केवळ सातच जीवंत राहीले. पाच पांडव, अश्वत्थामा आणि कृपाचार्य. त्यातील शेवटचे दोन चिरंजीवी होते. (की आहेत?)

???
नाही हो, असे काही नाही.
समस्त कौरवसेनेचा आणि पांडवसेनेचा विनाश झाला नव्हता. अर्थात प्रमुख योद्धे जरी मारले गेले असले तरी सर्वच सुफडा साफ झाला नव्हता.

अनेक यादववीर ह्या युद्धानंतरही जिवंत होते की ज्यांनी कुरुक्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला होता. सात्यकी, युयुधान, सांब, बलराम ( हा स्वतः लढत होता की नाही ह्याबाबत खात्री नाही ) वगैरे १-२ नावे आठवतात. कारण त्यानंतर "नशेपायी यादवांचा सर्वनाश झाला" हे वेगळे प्रकरण आहे इतिहासात. अर्थात माझी माहिती चुकीची असु शकते.
जाणकारांनी प्रकाश टाकावा.

शिवाय "पितामह भिष्म" जीवंत होतेच की, युधिष्ठिराच्या राज्याभिषेकानंतरच्या शांतीपर्वात त्यांनी युधिष्ठीराला केलेला उपदेश सर्वांना ज्ञात आहे त्यावरुन ते जीवंत होते असे मानायला हरकत नाही.

{माझ्या माहितीप्रमाणे}

23

माझ्या माहितीप्रमाणे -

अश्वत्थामा
कृपाचार्य
कृतवर्मा
५ पांडव
सात्यकी
आणि श्रीकृष्ण

एवढे १०च जिवंत राहिलेत.

श्रीकृष्ण, सात्यकी अन् कृतवर्मा हे प्रमुख यादव सोडल्यास इतर यादव सेनानींचा उल्लेख नाही.
४ अक्षौहिणी यादवसैन्य कौरवांकडून लढले अन् संपूर्ण संपले.
बलराम युद्धाच्या शेवटच्या दिवशी तीर्थयात्रेहून परत आलेत असा उल्लेख आहे.

बाकी प्रतिसाद देण्यास फक्त १ वर्ष उशीर झालाय.. हास्य

राघव

{उत्तम माहिती}

24

नेटकरांसाठी उत्तम माहिती
अवांतर- महाभारत काळात मदनबाण नव्हता की काय?


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

{क्या बात}

25

क्या बात है, परा-जी. तुम्ही महाभारताचा लुत्फ उठवून दिलात. पण संस्थळ अंमळ चुकले की काय अशी शंका आली. wink

पुढचे भाग टाक रे लवकर. आणि... या मालिकेची रूपरेषा स्पष्ट कर सुरूवातीलाच. म्हणजे जंतेला काही विचारायचे असेल तर आधीच सांगतील तुला आणि मग तू ते मुद्दे हाताळू शकतोस.

{छान!!!}

26

खुप नविन माहीती मिळाली .......

{छान !!!}

27

श्रीकृष्णाला भारत युद्धात दुर्योधनाच्या बाजूने, दिल्या शब्दाला जागून राहावे लागले असते तर ?
वाचा - "शून्य महाभारत"
लेखक- संजय सोनवणी
http://www.rasik.com/cgi_bin/display_online_book.cgi?bookId=ob6&lang=mar...

{धन्यवाद}

28

धन्यवाद संग्राम!

{छान संकलीत}

29

छान संकलीत माहीती रे परा.
(चोप्रांच्या) महाभारताल्या गाळीव माहिती बद्दल आभार.
आमच वाचन तोकड असल्याने आपल्या सरख्या मित्रांवरच अवलंबुन आहोत. तेव्हा और भी आन्ने दो.
राजे आपण पन मनावर घ्या आणि टाकाच महिती.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{एक शंका:}

30

एक शंका: परा बुवांचे पुराण? चातुर्मास सुरु झाला वाटते?


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

{हाहाहाहा}

31

हाहाहाहा... हे हास्य वेगळ्या कारणासाठी. या लेखनातील अनेक गोष्टी वाचल्यानंतर व्यासांनंतर कुणीही काहीही लिहिण्याची गरज नाही असे जे म्हटले जाते ते किती खरे आहे याची वेगळ्या संदर्भात प्रचिती आली.
लिहित रहा. वाचतो आहे. संकलन उत्तम करतो आहेस!

{आयला.. लै}

32

आयला..
लै भारी रे पर्‍या..
ती बाणांची माहिती तर एकदम झक्कास हास्य
(हल्ली मिळतात काय असे बाण? जरा वापरेन म्हण्तो!)

चांगलं संकलन आहे.

@मोडक,
का हो? ते व्यासांनंतर कोणी काही लिहिण्याची गरज नाही वगैरेचा अर्थ नक्की नाही कळाला. thinking

{वाचून आनंद झाला...}

33

ओर्कुट (मुक्तपीठ) सोडल्यापासून भेट झाली नाही आपली... हास्य इथे पुन्हा भेटून आणि तुझे लिखाण वाचून आनंद झाला..


जैसीं पुस्पांमाजि पुस्प मोगरी | की परिमळामाजि कस्तुरी |
तैसी भासांमाजि साजिरी | मराठिया ||

{महाभारत युद्ध १८ दिवस लढले}

34

महाभारत युद्ध १८ दिवस लढले गेले. पण प्रत्यक्षात ते ३७ की ३८ दिवस चालले होते.. एक युद्धाचा व एक विश्रांतीचा असे एक आड एक दिवस युद्ध सुरु होते.. असे कुठल्यातरी पुस्तकात वाचले आहे. बहुदा डॉ. पी व्ही वर्तकांचे पुस्तक असावे असे वातते.