बांगड्या आणि गजरा !! ..( Confusing but soooo sweet ! )

0
0

डिसक्लेमर : समस्या वैयक्तिक पातळीवरून मांडली असली तरी ती जागतिक समस्या आहे असे लेखकाचे मत आहे .शिवाय त्या समस्येचं आजवर कोणीही निवारण केले असण्याची शक्यता अतिशय कमी आहे (जे साक्षात ब्रह्मदेवाला जमलं नाही ते आम्हाला काय कप्पाळ जमणार आहे . शिवाय मनोहर काकांसारख्या आमच्या मित्रांना, नवरा-बायकोच्या नात्यातला एक प्रकारचा जो गोडवा(भांडणातही आणि परस्परविरोधी सवयीतही ! ) असतो, त्याचा आंनद कसा लुटायचा हे ही सांगायचा आमचा एक झीण प्रयत्न ! wink

दिनांक : १ ऑगस्ट २००९
स्थळ : निळकंठेश्वर (कात टाकलेला रम्य निसर्ग)
वेळ : साधारण सकाळी साडे आठ

ती : खुप छान परिसर आहे रे हा. एकदम झकास .
मी : काल-परवाच कोणीतरी सुचवला.
ती : ती नारदमुनी ची मूर्ती किती क्युट दिसते आहे ना !( आँ !)
मी : तुला एक सांगू ? मला मुर्तीच तितकसं महत्त्व वाटत नाही, पण आपण मूर्ती कडे किंवा एखाद्या वस्तूकडे बघताना आपल्या मनात असलेल्या त्याच्या प्रतिमे कडे बघत असतो असे मला वाटते.
ती : म्हणजे ?
मी : अगं ! तुझ्या हातात बांगड्या आहेत ?
ती : नाssssssही !! मला बांगड्या घालायला अजिबात आवडत नाही. एक तर सर्जरी करताना खूप अडचण करतात आणि दुसरं म्हणजे ते स्त्री च्या... , जाऊ दे , तु सांग काय सांगत होतास ते ?
मी : ओके बाबा , चल उदाहरणार्थ माझ्या हातातलं कडं घे , हे कडं गेली सहा वर्षे माझ्या मनगटात आहे. माझ्या फायनलच्या वर्षात मला चांगले टक्के मिळावेत म्हणून एका मित्राने आणून दिले होते ते मला शिर्डीवरून .
ती : मग ?
मी : आता हे बघ मी शिर्डीला कधी ही गेलो नाही. पण हे कडं मी मला फायनलला कमी टक्के पडले असून असूनही घालतो.
ती : म्हणजे तुझा साईबाबा वर विश्वास आहे तर .
मी : असेल ही बहुतेक , पण माझा माझ्या त्या मित्राच्या विश्वासावर विश्वास आहे हे नक्की . माझा हितचिंतक पॅरलली साई असला तरी , त्याच प्रकारे मूर्ती आणि प्रतिमेच आहे.
ती : कधी-कधी तू खूप छान बोलतोस.
मी : तुला आवडणार असेल तर असेच मी तुझ्याशी आयुष्यभर बोलू शकतो. (हजरजबाबी बाळ्यासाठी प्रचंड टाळ्या !)
ती : हे 'प्रपोजल' आहे का ?
मी : होय ! आय लव्ह यू ! लग्न करशील माझ्याशी ?
ती : मला विचार करायला वेळ हवा आहे ?
मी : दिला ! इथून आपल्याला जी पहिली सि.सि.डी. लागेल, तेथे थांबे पर्यंतचा !
ती : हा खूप कमी वाटत नाही तुला ?
मी : मॅडम ! साल दोन हजार नऊ आहे हे ! थिन्क क्विक, अअ‍ॅक्ट क्विकचा जमाना आहे हा आणि तेव्हढेच माझे कॉफीचे पैसेही वाचतील (समोरून धबधब्यावरून कोसळणाऱ्या खळाळत्या पाण्यासारखं हास्य !! जीव खल्लास !! हसली म्हणजे...हसली म्हणजे...म्हणजे रेशीमगाठ बसली ! )

******************************************************************************

दिनांक १५ ऑक्टोबर २००९
स्थळ : माझ्या घरातील स्वयंपाकघर

मी : मम्मी, तिला बांगड्या आवडत नाहीत.
मम्मी : मग ? तिने घालाव्यात असं काहीही नाही. पण आपलं कर्तव्य म्हणून कराव्याच लागतील.
मी : अगं म्हणून काय सोन्याच्या करायच्या ?
मम्मी : हे बघ ! एक तर परक्या ची पोरं अशी पळवून आणल्यासारखी आणणार आहेस तु, मग तिचं सर्वकाही आपणच करायला नको का ?
मी : अगं आधीच लग्नाचं सगळं काही करताना बँक बॅलन्स ला आग लागली आहे, जर परत रेसेशन मध्ये फसलो ना तर काही धडगत नाही माझी .
मम्मी : गप्प बैस ! बापासारखेच कंजूष आहात सारे ! (आतल्या खोलीतून वर्तमानपत्र चुरगळलेला आवाज ! ) थांब, दोन मिनीटे आलेच मी.
दोन मिनीट शांतता
मम्मी : हे घे ***** , त्या अजुन **** टाक आणि बांगड्या घेउन ये.
मी : पण मम्मी
मम्मी : जा आता लवकर (आज्ञाधारक बाळ्या !)

******************************************************************************
दिनांक : २० ऑक्टोबर २००९
वेळ : सकाळी १०.३०
स्थळ : आळंदीतील 'पवार' मंगल कार्यालयाचा स्टेज (समोर हवन ! मंत्र चालू ! समोर ३०-४० जणांचा गोतावळा ! )

ब्राम्हण : हम्म ! टाका .
ती : इतक्या महाग बांगड्या आणायची काय गरज होती का ?
मी : श्शsss ! आपण लग्न करतो आहे ना !!
ब्राम्हण : हम्म ! टाका.
मी : हार कुठे गेले ?
ती : मम्मीकडे आहेत . अरे, सन दोन हजार नऊ आहे हे ! मॉर्डनायजेशनचा जमाना आहे हा . (न्युटनचा तिसरा नियम.) आज नंतर मी नाही घालणार .
मी : घालू नकोस, पण किमान आजच्या पूर्ती तरी राहू देत.
मम्मी : गप्प बसा दोघेही जरा ! लग्न लागतयं तुमचं.
ब्राम्हण : हम्म ! टाका .

******************************************************************************

दिनांक : १८ नोव्हेंबर २००९
वेळ : सकाळी ७
स्थळ : माझ्या लोहगावातल्या घराचं किचन.

ती : अय्या ! सोड , डॅडी उठतील ना !
मी : तुला सुट्टी असताना इतक्या लवकर का उठली आहेस ?
ती : डँडी साठी साबुदाणे भिजवायला विसरले रात्री , म्हटल आता भिजवले की किमान अकरा पर्यंत तरी बनविता येतील .
मी : मी बाहेरून आणतो ना !
ती : काही नको ! त्या पेक्षा एक काम कर , केळी घेउन ये. दुपारपर्यंत डॅडीं साठी वेफर्स आणि केळी तरी असतील.अरे पण तु काल उशीरापर्यंत काय ते स्क्रिप्टींग का काय तरी (बसला ना टोला सकाळी सकाळी !)करत होतास ना ? तु कसा काय लवकर उठलास ?
मी : खरं सांगू ? तुझ्या हातातल्या बांगड्यांची किन-किन कानावर पडली आणि जाग आली.तुझ्या नाजूक गोऱ्यापान हातात हिरव्या-लाल आणि त्या सोन्याच्या बांगड्या छान दिसतात.
ती : .......अरे मम्मीने एव्हढ्या प्रेमाने दिल्या आहेत म्हणून पंधरा-एक दिवस घातल्या. आता सवय झाली.

******************************************************************************

दिनांक : १४ मार्च २०१०
वेळ : रात्री ११.५०
स्थळ : माझं लोहगावातलं घर. (फोनवर , ती अमरावतीवरून ! )

मी : हां ! बोल गं !
ती : ........
मी : हॅलो ! माझा आवाज येतोय ना !
ती : (केवळ स्फुंदण्याचा आवाज )
मी : काय गं काय झालं रडायला.
ती : ...........
मी : अगं सांग की मला असे बेचैन करू नकोस.
ती : त्या बांगड्या हो त्या ना !! त्या हरवल्या ? (हुंदके चालूच !)
मी : अरे रे (कसं सावरायचं आता.)
ती : माझ्या किती आठवणी होत्या त्यात (?) .मम्मी ने माझ्यासाठी आणल्या होत्या.
मी : जाऊ देत . कधी हरवल्या ?
ती : दोन दिवस झाले, सर्जरीला जाताना काढून ठेवल्या होत्या कप्बर्डमध्ये . नंतर येउन पहाते तर गायब.
मी : म्हणजे चोरीला गेल्या असतील .आता एक काम कर, मी सोनाराशी बोलतो. त्याला पैसै पाठवितो आणि जशाच्या तश्श्या बांगड्या बनवायला सांगतो. मम्मीला आत्ताच काही सांगू नकोस.
ती : आणि सोनाराने सांगीतले तर...
मी : मी सांगतो त्याला काय सांगायच ते ! तू रडू नकोस. सर्वकाही ठीक होईल.
ती : हम्म !
मी : जेवलीस .......................

******************************************************************************
दिनांक : काल-परवा
स्थळ : ऑफिसातली माझी खुर्ची
वेळ : ऑफिस भरगच्च असल्याची .(तिचा फोन..)

ती : हाय
मी : हाय (दिल खूष !) , काय गं करमत नाही का माझ्याशिवाय ? आता दहा मिनिटांपूर्वी तर फोन केला होतास.
ती : करमत नाही ते खरं आहे, पण डॅडींचा फोन आला होत आत्ता. ***** पाहिजेत म्हणाले . काय करू ? माझ्याकडे आहेत देऊ का ?
मी : नको ! मी लगेच ट्रान्सफर करतो आहे.
ती : मी दिले तर काय वाईट आहे. हे म्हणजे माझे ते माझे आणि तुझे तेही माझेच असे होते आहे.
मी : तसे काही नाही गं ! वेळ पडल्यावर घेईन तुझ्याकडून.
ती : ट्रान्सफर वरून आठवले. तु पुण्याला ट्रान्सफरचे काय केले आहेस ?
मी : नाही गं अजुन. थोडा वेळ लागेल.
ती : तुझं ना माझ्यावर प्रेमच नाही.
मी : अस्सं कशा वरुन ?
ती : तु आजपर्यंत मला कधी गजरा आणून दिलास का ?
मी : क्काय ? (आख्ख हाफिसची नजर माझ्याकडे !! )

आयच्या गावात या मॉडर्नायजेशनच्या !!!!!!!!

{खी: खी: खी: अरे बाबा}

1

खी: खी: खी:
अरे बाबा मॉडर्नायजेशन नि पुरोगामित्व (दोन्हीमधे काय फरक असा प्रश्न पडला असेल तर योग्य व्यक्तीस व्य. नि. करणे) सोयीचं तेवढं घ्यायचं असतं बाबा, चित भी मेरी पट भी मेरी (हिंदीबद्दल मनसे मापी मागतो) हेच खरं शेवटी.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{सुऽऽहाऽऽऽस!!!!!!!!!!}

2

अरे आजपर्यंत कधी गजरा आणून दिला नाहीस???????????????????????????

भोग आता आपल्या कर्माची.....

हा हा हा मस्त लेख!!

{अरे मेलेल्याला आणखी मारू नकोस}

3

अरे मेलेल्याला आणखी मारू नकोस रे. माहीत नसेल रे त्याला कुठे मिळतो ते.

अवांतरः सिंगापूरला गजरे मिळतात काहो? नाही म्हणजे सुहास तिकडे जाणार आहे असे ऐकले म्हणून विचारले हो.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{त्याला काय फरक पडतो?}

4

>>सिंगापूरला गजरे मिळतात काहो? नाही म्हणजे सुहास तिकडे जाणार आह>>...<<

जिथे नाक्या नाक्यावर फुलवाल्यांची दुकाने असतात, तिथे देखील देत नाही, तर सिंगापूरला मिळतो अथवा नाही, त्याला काय फरक पडणार आहे?

{अरे रे... तुमचा अनुभव काय}

5

अरे रे...

तुमचा अनुभव काय म्हणतो गजरा न दिल्यावर ?


Hope is a good thing...

{मस्त रे...}

6

मॉडर्नायजेशन लय भारी. खरच वैश्विक प्रश्नाला हात घातलाहेत. आता घातलाच आहेस तर रहा तिकडेच. संबंधितांच्या नजरेत हे लेखन आलेले असले किंवा याबाबत काही कानावर पडलेले असले तर.... हे लक्षात घेऊन इकडे येण्याची घाई करु नकोस हा मित्रत्वाचा सल्ला. त्या परिस्थितीत जे भोगावे लागेल त्यापेक्षा राज्याबरोबर रहाणे केव्हाही बरे असे नक्कीच वाटेल तुला.

ती : म्हणजे तुझा साईबाबा वर विश्वास आहे तर .
मी : असेल ही बहुतेक , पण माझा माझ्या त्या मित्राच्या विश्वासावर विश्वास आहे हे नक्की .

या एका वाक्यावर सदके जावां यार! ही समज सगळ्यांना आली तर मराठी आंतरजालावर खरेच मोठी क्रांती होईल हा माझा विश्वास आहे.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{जबराssssssssट}

7

पण माझा माझ्या त्या मित्राच्या विश्वासावर विश्वास आहे हे नक्की .

यावर लाखो टाळ्या

ती : तु आजपर्यंत मला कधी गजरा आणून दिलास का ?
मी : क्काय ? (आख्ख हाफिसची नजर माझ्याकडे !! )

आयच्या गावात या मॉडर्नायजेशनच्या !!!!!!

याला म्हणतात अनुभव wink
एकसारख्या बोटीवर बुडबुडींग


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{हा हा. सुहाशा लई लई भारी लेख}

8

हा हा. सुहाशा लई लई भारी लेख रे. हास्य


-पुण्याचे पेशवे

{मस्त}

9

मस्त लिहल आहेस!
आयटीशियन असलास म्हणून (किंवा मॉडर्नायजेशन झाल म्हणून) काय वहिनींसाठी गजरा आणायला कसा विसरलास ऑ?

{बघ ना....गजरा विसरुच कसा शकतो}

10

बघ ना....गजरा विसरुच कसा शकतो तु म्हण्ते मी ?

{+१ हेच म्हणते मी ! बाकी मस्त}

11

+१ हेच म्हणते मी !

बाकी मस्त लेख ! आवडेश रे सुहास हास्य

(माझं दुखणं वेगळंच आहे.. बॉयकट असल्यामुळे अगदी साडी नेसून नवर्‍यासोबत बाहेर गेले तरी गजरेवाले आमच्या जवळ येतच नाहीत ! त्यामुळे नवर्‍याला पिडण्याचा हा चान्स जातो Stare


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

{बॉयकट}

12

बॉयकट असल्यामुळे अगदी साडी नेसून नवर्‍यासोबत बाहेर गेले तरी गजरेवाले आमच्या जवळ येतच नाहीत ! >>>>

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud

{आता वहिनीच्या मागे नको लागुस}

13

आता वहिनीच्या मागे नको लागुस बॉय्कट करुन घे म्हणुन Laughing out loud

{अनुभव नाही त्यामुळे शब्दात}

14

Laughing out loud

Laughing out loud

अनुभव नाही त्यामुळे शब्दात प्रतिसाद देणे अशक्य !!!


Hope is a good thing...

{@ सुहास जरा वैनींना भेटावे}

15

@ सुहास
जरा वैनींना भेटावे म्हणते.
खूप सुंदर लिहीलयर, तुमच्या मनात आणि ह्रुदयात रहाणा-या प्रेमाची प्रतिमा एकदा पहावी म्हणते हास्य

{(विषय दिलेला नाही)}

16

हास्य

{छान !!!}

17

Laughing out loud

{आयला, वाश्या हा नक्की तूच}

18

आयला, वाश्या हा नक्की तूच आहेस ना? मी कसा काय मिसला हा लेख?
आवडेश.... हास्य


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{अप्रतिम.........}

19

अप्रतिम......... हास्य

{आयला वाश्या, भन्नाट रे....}

20

आयला वाश्या,
भन्नाट रे.... बायका अस्शाच. न्यूनच दिसतं त्यांना.
ग्लास कधी भरलेला दिसतच नाही. wink रिका मी जागा दिसली की डोळे चमकतात यांचे. हास्य


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)