ओनियन उत्तप्पा

0
-1

गेल्या वर्षी मद्राश्यांच्या प्रदेशात असताना डोसे , इडल्या, उतप्पे या पदार्थांनी अगदी उत आणला होता आणि तेव्हा पासुनच त्यांच नाव टाकल होतं.
तसा मी काही यांचा द्वेष्टा नाही पण सारख सारख तेच आणि तेच खाउन जीव कंटाळला होता.
आता बरेच दिवस झाले हाणुन तशी त्यांची आठवण येउ लागली म्हणुन हा प्रपंच....

साहित्यः
पीठासाठी दोनास एक या प्रमाणात तांदुळ आणि उडिद डाळ कमीत कमी ४-५ तास भिजत ठेवावे.
(उपलब्ध असल्यास साध्या तांदळा ऐवजी उकडा तांदुळ घ्यावा.)
१ वाटी शिळा भात. ( असल्यास)
१/२ छोटा चमचा यीस्ट्/इनो


कांदा,टोमॅट,भोपळी मिरची, हिरवी मिरची बारीक चिरुन.
चवीनुसार मीठ.
कृती:

४-५ तास भिजत ठेवलेले तांदुळ आणि उडिद डाळ वेग वेगळे वाटुन घ्या.
शिळा भात असल्यास तो पण मिक्सर मध्ये वाटुन घ्या. एका मोठ्या भांड्यात एकत्र कराव.
घरात यीस्ट् नसल्यास १/२ छोटा चमचा इनो टाकुन मिश्रण चांगले ढवळुन घ्याव.
भांड्यावर झाकण ठेवुन भांड जरा उबदार जागेत रात्र भर ठेवाव.
थंडीत पिठ चढत/फुलत नाही आश्यावेळी रात्रीच ओव्हन २-३ मिनिटांसाठी गरम करुन हे भांड त्यात ठेवाव.
ओव्हन नसेल तरी फिकर नॉट.. तवा १-२ मिनिटांसाठी गरम करुन हे भांड त्यावर ठेवा.

दुसर्‍या दिवशी हे अस दाम दुप्प्टीने वर येईल.

पीठात चवीनुसार मीठ टाका.

उतप्पा टाकताना आधी नॉनस्टीकचा तवा चांगला तापवुन घ्या. थोड पाणी शिंपडुन चुर्रर्रर्रर्रर्रर्र..आवाज आल्यावर त्यावर डावाने पीठ टाकुन थोड पसरवुन घ्याव.


बाजुने थोड तेल सोडुन १/२ मिनिट वर झाकण ठेवाव. झाकण काढुन मग वरुन कांदा, हिरव्या मिरच्या टाकुन परत झकुन ठेवा.


एक दिड मिनिटाने वरुन उतप्पा शिजल्यावर (जाळी पडेल) उलथण्याने उलटुन बाजुने तेल सोडावे. १-२ मिनटे खरपुस शिजु द्यावे.


हिरव्या चटणी सॉस सोबत वाढा.


थोडा बदल म्हणुन पुढच्या खेपेस कांद्या सोबतच भोपळी मिरची, टोमॅटो टाकुन ट्राय करा.

हिरव्या चटणी सॉस सोबत वाढा.

{छळवाद}

1

;( छळवाद मान्डलाय ह्या गणप्याने

{सहमत. असेच}

2

सहमत.

असेच म्हणतो.


Hope is a good thing...

{एक नंबर}

3

रेशिपी आणि फोटो आहे रे गणपा.
अर्थात आम्ही दरवेळी फोटो चांगला आहे म्हणजे पतंगराव कदम जसे दरवेळी मुख्यमंत्री निवडायची वेळ आली की जसे दिल्लीला जाऊन येतात व उगाच आपण 'स्पर्धेत आहे' अशा कंड्य पिकवतात त्यासारखे रुटिन झाले आहे.
मस्तच रे ...

आमची रेशिपी शिंपल आहे त्यामानाने.
रविवारी सकाळी ( ११ नंतर कधीही ) उठावे, निम्मा पेपर आणि निम्मा टीव्ही ( चॅनेल्स विचारु नये, सांगण्यासारखी नाहीत ) पहात ब्रश करावा, नाष्ट्यानंतरच्या चहापानसाठी लागणारी इतर सधने गोळा करावीत ( वॉलेटची आवश्यकता असतेच असे नाही ) , (शे सव्वाशे रुपायांचे एकुण बिल भरण्याची क्षमता असलेले ) ४ मित्र बोलवावेत व खाली जाऊन आरामात "वंदु वनीयन उत्तप्पा, स्वल्प वनीयन एक्स्ट्रा " अशी ऑर्डर द्यावी अशी आहे.
असो. बदलण्याची शक्यता नाही.

{विथ बेण्णे}

4

विथ बेण्णे की विदाउट?

{???}

5

म्हणजे ?
बेण्णे म्हणजे काय ?

{कलंक आहेस}

6

कलंक आहेस बंगळूराच्या नावावर...

बेण्णे म्हणजे लोणी. तिकडे बेण्णे डोसा, उत्तप्पा वगैरे फेमस आहे.

{त्याचं कसं आहे की}

7

आम्ही उगाच बेंगलोरमधल्या गल्ल्या हिंडत बसत नाही त्यामुळे आम्हाला ते तुमचं लोणी, विरजण, खरवस वगैरे काही माहित नाही.

{बरोबर आहे...}

8

बरोबर आहे... माड्या चढताना गल्ल्या हिंडायला वेळ मिळत नसेल.

{असो.}

9

या कधीतरी इकडच्या "काँग्रेस भवना"वर.

स्वगत : तो माड्या चढण्याचा जमाना आता गेलाय हे कधी कळायचे ह्या सनातनी लोकांना ते देव जाणो

{सनातनी हा}

10

सनातनी हा शब्द मी भलताच चुकीचा वाचला ना .... नको इथे नकोच.

{प्रकाटाआ}

11

प्रकाटाआ

Big smile

{मस्तच}

12

मस्तच पाकृ...
गणपाभाउ आत्ताच वनियन उत्तपे खाउन आलो.


-निखिल

{झक्कास}

13

हॅ हॅ हॅ, रेशिपीतच इनो असल्यामुळे त्रास कमी झाला हास्य

{हीहीही}

14

हीहीही ...

गणपासेठ भारी पाकृ! घ्या, तुमच्या शेतात खतंच टाकते.

भारतात डोसा/उतप्प्याचे तयार पीठही मिळायला सुरूवात झाली आहे, तेही चवीला ब्येश्ट असते. विकणार्‍याची हिंदी भाषा ऐकून झीट आली तर पीठ उत्तम असेल याची खात्री बाळगावी.

असो. मिमवर डाळीच्या आप्प्यांची रेशीपी आपले कार्यकर्ते (हे बिकाच) टाकणार होते त्याचं काय झालं? (मी आळशी असल्यामुळे मी आप्प्यांच्या पीठाचे उतप्पेच करून खाल्ले.)

{एम टी आर}

15

>>भारतात डोसा/उतप्प्याचे तयार पीठही मिळायला सुरूवात झाली आहे, तेही चवीला ब्येश्ट असते.
+१, सहमत आहे.
फक्त घेताना "एम टी आर" हॅ ब्रँडचे मिळाले तर घ्या. ते फारच सुंदर असते.

>>मिमवर डाळीच्या आप्प्यांची रेशीपी आपले कार्यकर्ते (हे बिकाच) टाकणार होते त्याचं काय झालं?
अजुन काय होणार >
माती !!!!

>>(मी आळशी असल्यामुळे मी आप्प्यांच्या पीठाचे उतप्पेच करून खाल्ले.)
एवढे सांगण्याचे "कष्त" घेतल्याबद्दल आभार

{ब्रांडेड}

16

ब्रांडेड पीठ नव्हे, ओले पीठही अनेक सुपरमार्केटसच्या बाहेर विकतात. विक्रेत्याच्या हिंदीवरून त्याच्या मूळ गावाचा अंदाज घ्यावा. विक्रेता भयानक हिंदी बोलत असेल तर पीठ नक्की चांगलंच निघतं.

{नेहेमी}

17

नेहेमी प्रमाणे पाकृ उत्तम. गणपा, पुण्यातही हल्ली तयार डोसे, उत्तपा पीठ मिळते. छान असते. उसातही अनेक ब्रँडांचे तयार पीठ मिळते. घरी आणायचे कांदा-टमाटो चिरायचा उत्थप्पा करुन खायचा. एक लंबर बेत. उत्थप्प्यावर लोणी तर लई भारी लागते.
-डोसे-उत्तप्पेप्रेमी (चला ब्लॉग निर्माणेच्छूंसाठी एक नवीन नाव)


-पुण्याचे पेशवे

{आप्पलपोटेपणा}

18

>>> असो. मिमवर डाळीच्या आप्प्यांची रेशीपी आपले कार्यकर्ते (हे बिकाच) टाकणार होते त्याचं काय झालं?
--- आप्पलपोटेपणा केला असेल हास्य

{चला}

19

आता कोट्यांच्या 'नंदन'वनाचा 'सुका'ळ होणार

{:)}

20

>>> 'सुका'ळ
--- बाब्बौ, काहो असे शिव्याशाप देताय wink

{शिव्याशाप ?}

21

नशिब चांगले समजा की मी "कोट्या" हे शुद्ध लिहले, समजा मी चुकुन "कोद्या" लिहले असते तर केवढ्यात पडले असते ह्याचा विचार करा wink

{खरंय बा}

22

बडे मियाँ सो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभानल्लाह् wink

{नशिब}

23

नशिब चांगले समजा की मी "कोट्या" हे शुद्ध लिहले, समजा मी चुकुन "कोद्या" लिहले असते तर केवढ्यात पडले असते ह्याचा विचार करा

नशीब गोट्या लिहिले नाही.

{+१}

24

संपादकांशी बाडिस. नशीब ट चा ठ केला नाही ते.


-पुण्याचे पेशवे

{छान छान}

25

आता श्री गणपाजींचा पदार्थ छान नाही कसे म्हणायचे. पण वर श्री डॉनराव म्हणाले तसे उडप्याच्या हाटीलात उत्तप्पा खाण्यासारखी मजा नाही. हास्य

{>>उडप्याच्य}

26

>>उडप्याच्या हाटीलात उत्तप्पा खाण्यासारखी मजा नाही.
हाव ना राव, पन इकडे लुंगीवाले आहेत भरपुर पन हाटिल नाय ना.. मंग इकडच्या सरदाजीच्या हाटिलात जाउन दक्षिणेकडचा पदार्थ मागवायचा म्हंजे लै मोठ्ठ काळिज लागत.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{+१}

27

>>सरदाजीच्या हाटिलात जाउन दक्षिणेकडचा पदार्थ मागवायचा म्हंजे लै मोठ्ठ काळिज लागत.

+१, सहमत आहे.
इकडेही उडप्याच्या हाटेलात भेळ खायला गेलं की ते भेळ "गाजर, कोबी टाकुन आणि वरुन सांबाराचा हबका" मारुन देतात.
खायला सोडा पण ती तयार करण्याची पद्धत बघायलाच मोठ्ठे काळीज लागते.

{वॉव}

28

फोटो सॉल्लीड दिसतोय एकदम...इथे उसगावात फारच थंडी आहे त्यामुळे करता नाही यायचा... मार्च पर्यंत वाट पहावी लागेल्...विकतच्या पिठात उडीदडाळ जाम कमी असते त्यामुळे चवीत फरक पड्तो...

{याक नंबार}

29

याक नंबार

{ज ह ब ह}

30

ज ह ब ह र्‍या!!!

गणपा फुल्ल फार्मात रे हास्य

ओनियन उत्तपा, त्यावर लोण्याचा गोळा...सोबत अस्सल कानडी सांबार (मद्राशी सांबार लैच्च्च आंबट असतं राव Sad ) आणि खोबर्‍याची चटणी..... आ हा हा .....आणि हे हादडुन झालं की २-२ फिल्टर काऽपी ...बास्स...आणखी काय वेगळा असतो हो स्वर्ग?

अवांतरः का कोण जाणे, अचानक दहा-बारा वर्षांपुर्वी संकेश्वरला पहाटेपहाटे हाणलेल्या इडल्यांची आठवण झाली.... हास्य

{(विषय दिलेला नाही)}

31

{माझी सर्वात आवडती दक्षिण भारतीय डिश }

32

प्रद्युम्न यांना धन्यवाद की हा धागा वर आणलात.

ओनियन उत्तप्पा ही माझी सर्वात आवडती दक्षिण भारतीय डिश आहे हास्य

खूप खूप धन्यवाद..

गणपा मित्रा भारतात कधी येणार आहेस ते नक्की सांग, त्यासुमारास मी पुण्यात येऊ शकलो तर आपली भेट नक्की होऊ शकेल.

आता या पाककृतीचे प्रिंटआऊट उद्या बायको कडे देतो. एक-दोन दिवसांतच तोंडात पाणी आणणार्‍या तुझ्या या पाककृतीचा आस्वाद घेईन

माझी सर्वात आवडती दक्षिण भारतीय डिशची पाककृती दिल्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद मित्रा हास्य
जहांपन्हाह तुस्सी ग्रेट हो Grade


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{नक्की पुरुषच हाय नव्हं }

33

गणपा?

नक्की पुरुषच हाय नव्हं तुम्ही?
अहो काय हा एक्स्पर्टपणा ?

प्रत्येक गोष्ट अगदी मुद्देसूद. मांडणी, पाककृती, फोटो, अहाहा. अगदी सुगरण स्त्री ला लाजवेल असे तुमचे बल्लव कौशल्य

एकदा हैद्राबादेला जाताना हैद्राबादच्या अलिकडे सकाळी सकाळी एका ढाब्यावर ओनियन उत्तपा हाणला होता त्याची आठवण झाली अगदी.
मान गये उस्तादोंके उस्ताद.
तुमच्या सगळ्या पाककृती वाचणार आहे सवडीने.

या रविवारी सकाळचा नाश्ता फिक्स झाला माझा. हास्य माझ्या मेडने दांडी मारली नाही म्हणजे मिळवली.


भ्रमिष्ट आहे हो मी
भ्रमिष्टपणे मी इथे वावरतो
जानवं काढून ठेवलेला भट

{तुमच्या ओनियन उतप्पाचा इथे}

34

तुमच्या ओनियन उतप्पाचा इथे फ़ोटॊ टाका आणि चवी बद्दलही लिहायला विसरु नका


Quickly, bring me a beaker of wine, so that I may wet my mind and say something clever.

{ओनियन उत्तप्पा खाणार हे}

35

ओनियन उत्तप्पा खाणार हे नक्की
मेडने दांडी मारली नाही तर घरात नाहीतर एखाद्या हाटेलात wink

मेडने केला तर फोटो द्यायचा नक्की प्रयत्न करेन


भ्रमिष्ट आहे हो मी
भ्रमिष्टपणे मी इथे वावरतो
जानवं काढून ठेवलेला भट