
मला दुग्धजन्य पदार्थ काही विशेष आवडत नाहीत. आणि Murphy's law च्या कृपेनं आमच्या ह्यांना तेच सर्व पदार्थ पक्वान्न (विशेष) खूप आवडतात. तर अश्या पंचायीतीचा हा एक सुवर्ण मध्य. शेवयांचा शिरा. मी स्वता dietician असल्याने असा शिरा फारसा काही माझ्या डायेट समीकरणात बसत नाही, पण तरी!
सामग्री:
२ वाट्या अगर १०० ग्राम भाजलेल्या बारीक शेवया
१ मोठा चमचा साजूक तूप
अर्धी वाटी साखर
१ १/२ कप दूध
१/२ वाटी काजू (काजू कमी जास्त नाहीसे करण्या ची सूट आहे)
५ वेळच्या बारीक केलेल्या किंवा १ चमचा वेलची पूड
कृती:
- एका कढईत तूप गरम करून त्यात शेवया चांगल्या गुलाबी होई पर्यंत परता. मग त्यात कोंबट दूध घालून चांगल हलवा आणि झाकण ठेवून एक वाफ काढा (साधारण २ मिनिटे).
- आता ह्यात साखर, वेलची आणि काजू घालून नीट कालवा आणि परत झाकून मंद आचेवर शिजवा. आता त्या शिऱ्याला साखर विरघळे पर्यंत परता आणि गरम गरम सर्व्ह करा.
{छान ! मी स्वता dietician}
छान !
मी स्वता dietician असल्याने असा
वजन कमी करण्यासाठी टिप्स देखील द्या, यांच्यावर प्रयोग करायचे आहेत
{देवा रे. योगेशभाउंचं काय खरं}
देवा रे. योगेशभाऊंचं काय खरं नाय. योगेशभाऊ, तुम्हाला वानप्रस्थाश्रमाला इलिजिबल व्हायला किती वर्षे राहिली हो? नाय म्हणजे ते स्वेच्छनिवृत्तीचा प्रकार इथेपण चालत असेल तर जरा विचार करा, नाहीतर काही खरं दिसत नाही तुमचं.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{अरारा ! आधीच सुकलेला त्यांचा}
अरारा !
आधीच सुकलेला त्यांचा देह... आता त्यावर डायटचे प्रयोग !
कसं होणार आजोबांचे , काळजी लागून राहीली आहे.. काही दिवस या पळून बेंगलोरला म्हणावे..
Hope is a good thing...
{आता बसा.}
म्हणून सिग्नेचर्स ऊर्फ़ पोस्टमधील स्वाक्ष-या जपून वापराव्यात. आता बसा एक खांब "सिग्नेचर" घेऊन...
{ओ ताई. ह्यो शिरा पन चालंल का}
ओ ताई. ह्यो शिरा पन चालंल का रैवारी वाईच खाल्ला तर डाईट्ला..लाळावलंय तोंड लई.
{चवीला नक्कीच चांगला असणारे..}
चवीला नक्कीच चांगला असणारे.. पण दिसायला मला फारच कसातरी वाटतोय गिळगिळीत ...
{मिने ह्म्म... थोडे दुध कमी}
मिने ह्म्म... थोडे दुध कमी घालायला हवे त्यात्..म्हणुन मो़कळा नाहि वाटतेय
{चावायची गरज नाही. बुळ्ळकन}
चावायची गरज नाही. बुळ्ळकन खाली जाइल.
{शेवयांचा शिरा...}
आठवुनच तोंडाला पाणी सुटते.
आमच्या हेडमास्तरीणबाई मस्त करतात ही डिश.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{हो अगदी बरोबर}
हो अगदी बरोबर.. दूध कमी घातला कि मोकळा होयील. मी माझ्या आईला फोन करतच होते हेच विचारायला.
Khaadaad Amita cha Blog
{शेवयांची खीर माझी सर्वात}
शेवयांची खीर माझी सर्वात आवडती
पण हा प्रकार कधी खाल्लेला नव्हता. आता या शनिवार-रविवार कधीतरी मेड कडून करुन घेईन
सुंदर पाककृती
भ्रमिष्ट आहे हो मी
भ्रमिष्टपणे मी इथे वावरतो
जानवं काढून ठेवलेला भट