मतदानाचा अधिकार

0
0

" अनिवासी भारतीयांना मतदानाचा अधिकार द्यायचा असं भारत सरकारने ठरवलेलं आहे. पुढल्या २०१४ निवडणुकीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायचा भारत सरकारचा मानस आहे!" -- पंतप्रधान मनमोहन सिंग

वरील बातमी वाचली आणि वाटलं की काथ्याकूट करायला ही अगदी योग्य आहे. हास्य
पण बातमी खरी का? मटा कधीकधी घोटाळाही करतं....
पण काल टीव्हीवर प्रत्यक्ष डॉ. सिंग यांना ही घोषणा करतांना या डोळ्यांनी पाहिलं!! खरं आहे...
तर मंडळी, करा काथ्याकूट सुरू!!!!

अरे हो! कुणीतरी मध्येच "अहो पण तुमचं मत काय?" असं विचारू नये म्हणून जाहीर सांगतो....
मी धन्य झालो!!! अतिशय आनंद झाला!!!! इतका की त्या सरदारजीच्या दाढीचा जाऊन मुका घ्यावा असं वाटतंय!!!!
हास्य

निर्णायाच

1

निर्णयाचे स्वागत आहे. हास्य
पण नक्की कुणाला अधिकार मिळणार आहे? ओसीआय लोकांना मिळेल असे वाटते पण पीआयओंना मिळेल का?


-Nile

ओसीआयना

2

ओसीआयना मिळेल असे मलाही वाटते...
पीआयओंना मिळायलाही हरकत नसावी...
बघूया...

काका,

3

काका, पीआयओ माहित आहे. ओसीआय हा नक्की काय प्रकार आहे?

ओसीआय

4

ओसीआय म्हणजे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया
पी आय ओ म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन
थोडक्यात...
पिडांकाका ओसीआय
अल्विन कालिचरण पीआयओ!!!
हास्य

काका!!! हेच

5

काका!!! हेच आत्ता गूगलवत होतो. पण दोन्हीतला फरक नीटसा कळला नव्हता.. तुम्ही एकदम पर्फेक्ट समजवलात. हास्य

अवांतर: इष्टूरी?

पिडांकाका

6

पिडांकाका ओसीआय
अल्विन कालिचरण पीआयओ

असे होय .....
बरे झाले हो तुम्ही फरक सांगितला तो. आम्ही अल्वीन कालीचरण हे पिडांकाचे दुसरे नाव समजत होतो. wink फोटो बघून फसगत व्हायची फार.
धमाल मुलगा आणि ऋतीक रोषन यांच्यातही अशीच फसगत होते.
अवलीया आणि मायकेल जॅक्सन या दोघांच्याबाबतीत कोणी स्पष्टीकरण करेल तर बरे होईल


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

आणि एक पश्टीकरन हवं हाये!

7

विजुभाऊ आणि चर्चिल ब्रदर्स यांच्यातला फरक काय?

मला वाटते...

8

मला वाटते... चर्चिल ब्रदर्स एकाहून जास्त आहेत आणि आमचे इजाभौ एकटेच जास्त आहेत...

छे

9

ते जरा जादाच जास्त आहेत.

मास्तर मी

10

मास्तर मी सभ्य शब्दात बोललो... तुम्ही डायरेक्ट शिरलात. wink

थोडक्यात

11

थोडक्यात काय, हाफव्हॉली इच्छेनुसार सीमापार तडकवला आहे.

ह्म्म

12

नक्की बातमी कळली नाही. बहुदा भारतीय पारपत्रधारकांना/नागरिकत्व त्यांच्या देशातील एम्बसीमधे किंवा इंटरनेटद्वारे असावे. बाकी कल्पना नाही.

अंमलात कधी येईल कोणास ठावूक पण अर्थात निर्णयाचे स्वागत आहे. आता पुणे ३०, ५२, कराड, सातारा अजुन इतर मतदार संघात उलथपालथ होइल की काय? हास्य

आणि हो, राजे, निख्या अजुन खफ कार्यन्वित न झाल्याबद्दल डबल निषेध!

आम्ही

13

आम्ही देउन थकलो. दिल्यावर मिळते घेउन थकलो.
आता तुम्ही द्या.
तुम्हाला घ्यायचे काहीच नाही आहे.

ह्म्म... आता

14

ह्म्म...
आता खरी मजा येइल...
सगळ्याच राजकारण्यांना आपापल्या एकगठ्ठा मतपेट्या दिसत असतात, त्यात ह्या एका वेगळ्या बाजुची भर पडेल. मग अनिवासी भारतियांसाठीच्या नव्या वेगळ्या प्रकारच्या गाजरांची शेती करायला सुरुवात होणार तर हास्य
अर्थात, एकुण अनिवासी भारतिय किती, त्यातले मतदानाचा हक्क वापरणार किती (कदाचित आपल्या देशापासुन दूर असल्याच्या ओढीनं इथं राहणार्‍यांपेक्षा जास्त टक्केवारी असु शकते!) ह्या बाबीमुळे राजकारणी ह्या विषयाकडे कोणत्या नजरेने पाहणार तेही बघायला आवडेल...

असो,
तुर्त तरी सर्व अनिवासी भारतीय बांधवांचे हार्दिक अभिनंदन हास्य

सहमत

15

सहमत आहे.

राजकारणी लोकांचे गणीत समजुन घेण्यास आवडेल.. कुठे आहे छोटा डॉन्न ????


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

>>मग

16

>>मग अनिवासी भारतियांसाठीच्या नव्या वेगळ्या प्रकारच्या गाजरांची शेती करायला सुरुवात होणार तर
मला असं वाटत नाही,धमु!
ही बातमी भारताबाहेर रहाणार्‍या भारतीय नागरिकांसंबंधी (एच१, ग्रीन-कार्ड वगैरे!!) आहे असं मला वाटत नाही!! त्यांना मतदानाचा हक्क असतोच! फक्त अंमलबजावणीचे वांधे असतात!!!हास्य
उरलेल्या अनिवासी भारतीयांना मोहात पाडण्यासारखी गाजरं भारतीय राजकारण्यांकडे असतील असं मला वाटत नाही!
हा सगळा गुडविल जनरेट करायचा प्रकार आहे! हा हक्क दिल्याने स्थानिक लोकांचं काहीही कमी होत नाही आणि वर अनिवासींची गुडविल मिळत्येय!!
ठीक आहे, आम्हाला त्यातही आनंद आहे!!
भारत सरकारला हे सुचलं याचंच कौतुक आहे!!!

पीडाकाकां

17

पीडाकाकांशी सहमत. (फक्त) मत देण्याच्या अधिकाराने अनिवासी (अन्य देशाच्या नागरीकांना) काय मिळणार आहे? उलट (काही टक्के का होइना) झालाच तर सुशिक्षित अनिवांसीकडुन जातीय वगैरे राजकारण न होता थोडाफार फायदा भारतालाच होइल असे वाटते.

बिका काका: ओसीआय= ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया.


-Nile

झालाच तर

18

झालाच तर सुशिक्षित अनिवांसीकडुन जातीय वगैरे राजकारण न होता थोडाफार फायदा भारतालाच होइल असे वाटते.

असहमत... जातीय राजकारण होणारच माणुस सुशिक्षित असो अशिक्षित.. निवासि असो अनिवासि काहि फरक पडणार नाही असे वाटते


-निखिल

गोंधळ!

19

म्हणुनच सुशिक्षित असे म्हणले आहे नुसतेच शिक्षित म्हणालो नाही. हास्य


-Nile

कदाचित

20

कदाचित गोधंळ झाला असेल पण आपल्या वाक्यातुन अनिवासी भारतियांन मधे सुशिक्षित जनता जास्त आहे असे म्हणायचे आहे असे प्रतित होते. त्या बद्दल असहमती. जर आपल्याकडे काही विदा असेल तर आवश्य पुरवावा.


-निखिल

पुन्हा

21

पुन्हा गोंधळ.

आमचे उपरोल्लेखित वाक्य त्यातील 'काही टक्के का होईना' हा वाकप्रचार वगळुन तुम्ही सोयीस्कर अर्थ घेतलात आणि स्वतःचा विचार आमचे प्रतिपादन आहे असा अकांडतांडव करीत आहात!

सुशिक्षित जनता जास्त आहे असे म्हणायचे आहे असे प्रतित होते

संख्येने नसेल सुद्धा, पण कदाचीत शेकडा प्रमाण जास्त असु शकेल. हास्य

राजेंना सुचना: शुद्ध लिहुन सुद्धा 'विशफुल थिंकीगने (दुवा नंदन कडुन घ्यावा wink ) ' हवे ते अर्थ काढले जात असताना खिशाला खार लावुन शुद्धिचिकित्सक बसवण्याची जरुरी नाही असे वाटते. wink


-Nile

राजेंना

22

राजेंना सुचना: शुद्ध लिहुन सुद्धा 'विशफुल थिंकीगने (दुवा नंदन कडुन घ्यावा ) ' हवे ते अर्थ काढले जात असताना खिशाला खार लावुन शुद्धिचिकित्सक बसवण्याची जरुरी नाही असे वाटते.

हा आपल्याला वैयक्तिक हल्ला वाटत नाही काय..
आपण प्रतिसादच असा लिहिला आहे की त्यातुने अनेक अर्थ काढल्या जाउ शकतात.
असो


-निखिल

आपण

23
आपण प्रतिसादच असा लिहिला आहे की त्यातुने अनेक अर्थ काढल्या जाउ शकतात.

बरोबर आहे, शेवटी ज्याची त्याची 'विश'. हास्य


-Nile

उलट (काही

24
उलट (काही टक्के का होइना) झालाच तर सुशिक्षित अनिवांसीकडुन जातीय वगैरे राजकारण न होता थोडाफार फायदा भारतालाच होइल असे वाटते.

आर यु शुअर?
निदान मलातरी असे नाही वाटत. आणि समजा झालाच तरी अशी किती मोठी टक्केवारी असेल ती? उलट देशातलेच तथाकथित विचारवंत जर मतदानादिवशी गाड्या काढून हिलस्टेशनांच्या रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम न करता मतदानाला गेले तर आपण म्हणता त्या टक्केवारीच्या कानफाटात मारेल इतकी मोठी टक्केवारी दिसुन येईल...
आता भारताला फायदा म्हणाल, तर राजकारण, मतदान आणि तो सावळागोंधळ ह्याचा फायदा कोणाला आणि कसा होते ते सगळ्यांनाच ठाऊक आहे की हास्य

>>(फक्त) मत देण्याच्या अधिकाराने अनिवासी (अन्य देशाच्या नागरीकांना) काय मिळणार आहे?
तुर्त तरी सांगता येत नाही. पण लाँगरनमध्ये फॉरेनकरन्सीच्या देशी मालकांचा इन्वेस्टमेंट लॉबीचा विचार नाकारता येण्याजोगी परिस्थिती मलातरी दिसत नाही.
(सगळेच तसे आहेत असं माझं मत नक्कीच नाहीये. पण अमेरिकन राजकारणातले भांडवलशाहीचे संस्कारही नाकारता येत नाहीत.)

अरे रे,

25

अरे रे, 'तुमच्या विचारवंतांची' सरकसकट सर्व अनिवासींशी तुलना करताना तुमची बोटे कळफलकावर थिजली कशी नाहित?


-Nile

मतदानाच्य

26

मतदानाच्या वेळी तुलना फिलना कसली आलीये?
नगाला नग! आकड्याशी मतलब!
माझ्या आधीच्या प्रतिसादाचा रोख ह्याच टक्केवारीबद्दल होता...
नाईल्या, तुला हल्ली अभ्यास फार करावा लागतोय का? wink

पिडाकाकां

27

पिडाकाकांंचं म्हणणं पटत आहे. अनिवासी लोकांखेरीज काही निवासी मतांमुळे या लोकांना काय फरक पडणार आहे?

१+

28

सहमत
राजकारण्याना गोड आवडते.

फरक

29

उद्देश स्तुत्य आहे, मात्र महाराष्ट्रात तरी मोजके मतदारसंघ वगळता मतांच्या गणितात फार फरक पडेलसे वाटत नाही. गुजरात किंवा आंध्र प्रदेशमध्ये मात्र जाणवण्याइतका फरक पदावा हास्य

>>> मी धन्य झालो!!! अतिशय आनंद झाला!!!! इतका की त्या सरदारजीच्या दाढीचा जाऊन मुका घ्यावा असं वाटतंय!!!!
--- Laughing out loud Laughing out loud

पूर्ण

30

पूर्ण विरोध. ज्यानी भारत सोडून इतर कोणत्या देशाचे नागरीकत्व घेतले आहे त्याना भारताच्या निवडणूकीत मतदानाचा अधिकार नसावा असे वाटते. असो.


-पुण्याचे पेशवे

पेशवे,

31

पेशवे, ज्यांनी इतर देशांचे नागरीकत्त्व घेतलं आहे ते भारतीय नसणारच ना, मग त्यांना कसं मतदान करता येईल?

हा हक्क अनिवासी भारतीयांना दिला आहे; ज्यांचा पासपोर्ट भारतीयच असतो.

सहमत. ओसीआय

32

सहमत.
ओसीआयना ठीक पीआयओना नको.


-पुण्याचे पेशवे

ओसीआय

33

ओसीआय बाबतीत थोडासा गोंधळ झालेला दिसतो. जन्माने दुसर्‍या देशाची नागरीक असलेली व्यक्ती ओसीआय बनु शकते. (आठवा 'ड्युअल सीटीझन्सशिप')


-Nile

टॅक्स भरत

34

टॅक्स भरत असलेल्या सर्वानाच मतदान सक्तीचे करावे. बराच फरक पडेल


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

अधिकार

35

नक्की कोणता गट या नव्या अधिकाराने मतदानाचा लाभ मिळवणार आहे?

अनिवासी भारतीय/ओसीआय यांना आधीच मतदानाचा अधिकार आहे असे वाटते. सरकार बहुधा त्यांची परदेशातून मत देण्याची 'सोय' करणार आहे. तशी सोय ही बहुधा पूर्वीपासून परदेशातील सरकारी कर्मचार्‍यांना असावी.

महत्त्वाचे: त्यांना मतदानाचा अधिकार "नसेल", तर सरकार तसा अधिकार बहुधा देऊ शकणार नाही. तसा अधिकार देण्याचा अधिकार सरकारला नाही. मतदानाचा अधिकार हा घटनात्मक अधिकार आहे. तो नव्याने कुणाला द्यायचा असेल तर संसदेला घटनादुरुस्ती करावी लागेल. त्या घटनादुरुस्तीस विरोध होईल असे नाही पण मुद्दा महत्त्वाचा. तज्ञांनी खुलासा करावा.

टॅक्स भरत असलेल्या सर्वानाच मतदान सक्तीचे करावे. बराच फरक पडेल

36

टॅक्स भरत असलेल्या सर्वानाच मतदान सक्तीचे करावे. बराच फरक पडेल.

पुर्ण सहमत.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

ट्युबलाईट उशीरा पेटते

37

मान्य. पण इतकी उशीरा? सहा महिन्यांनी?