लाजाळूची फुले....
"मग याला इंग्रजीत काय म्हणतात?"
"टच मी नॉट"
"अन हिंदीत?"
" हिंदीत तर फार सुंदर नाव आहे, छुईमुई!!"
माझ्या मुला बरोबर चालणारा माझा नेहमीचा शब्दांचा खेळ नेहमी सारखा रंगात आला. काही पण बोलता बोलता आमचा हा खेळ
सुरु होतो.
पण आज कारण खास होते. सकाळी मी वडिलां बरोबर पायी फिरायला निघालो तेव्हा पाहिलेली लाजाळू ची छोटी झाडे पाहिली
होती. ती मग मुद्दाम मुलाला ही दाखवली. त्याने झाडाला हात लावताच होणारी गंमत बघून चकित वगैरे झाल्या नंतर लगेच आमचा
नेहमीचा खेळ सुरु केला होता. एखादा शब्द वेगवेगळ्या भाषांमधे त्याला काय म्हणतात? ते शोधायचे, बहुतेक वेळा महाराष्ट्र राज्याच्या
त्रिभाषा सूत्रा पलिकडे आमची मजल जात नाही. मग आम्ही त्यावरच समाधान मानतो.
पण यावेळी आणखी खास बाब म्हणजे या वेळी मला लाजाळूची फुले सुद्धा पहायला मिळाली.


दुसर्या छायाचित्रात फुले गळल्यानंतर दिसणारी फळे (ज्यात बिया असतात की नाही ठाऊक नाही.) ही दिसत आहेत. त्या एका फुला
मधे अनेक छोटी छोटी फुले होती. फुलांच्या या प्रकाराला काय म्हणतात ते बारावीला बॉटनीत शिकलो होतो आता विसरलो.
( कुणाला चुपके चुपके मधले बॉटनीचे प्रो. सुकुमार आठवतात का?
)
"बाबा बाबा व्हिडीओ पण काढुया"
मग मोबाइलमधेच व्हिडिओ पण काढून झाला.
http://www.youtube.com/watch?v=0VKYnc09YPA
बाय द वे, एखादा लाजरा न साजरा मुखडा पाहुन काळजात काही "कुछ कुछ" झाल्याला आता तेरा वर्षे उलटून गेलीत. आता मुलींना लाजता येत
नाही म्हणे... त्यातही त्या जर आय टी वाल्या असल्या तर..? ( मेलो आता.. काही खरे नाही माझे.
)
.jpg)
{मला लाजाळूचे झाड खुप आवडते,}
मला लाजाळूचे झाड खुप आवडते, जिवंत वाटते अगदी त्याला स्पर्श केल्यावर.
करतो. करेन. व करेगें
{उत्तम लेख. "त्यातही त्या जर}
उत्तम लेख.
"त्यातही त्या जर आय टी वाल्या असल्या तर..? "
कसे होणार आता तुमचे ?
{>>" हिंदीत तर फार सुंदर नाव}
>>" हिंदीत तर फार सुंदर नाव आहे, छुईमुई!!"
येस.
मला खुप आवडते हे नाव.
Hope is a good thing...
{पंगा !! }
बाय द वे, एखादा लाजरा न साजरा मुखडा पाहुन काळजात काही "कुछ कुछ" झाल्याला आता तेरा वर्षे उलटून गेलीत. आता मुलींना लाजता येत
नाही म्हणे... त्यातही त्या जर आय टी वाल्या असल्या तर..? >>>
पंगा !!
आमच लाजाळुच झाड, आमच झाल तरी लाजतं अजुन .
{महिला मंडळ / स्त्रीविश्व}
महिला मंडळ / स्त्रीविश्व सदस्या झोपल्या आहेत की काय अशी शंका येत आहे, अरे रे, श्रींकात१९ ला धुण्याचा चांगला चान्स घालवला रे ह्या बायकांनी
Hope is a good thing...
{जागृत स्माईली..}
जागृत देवस्थानच्या देवी देवता असतात तसे मी म वरची
ही स्माईली जागृत असावी अन्यथा इथल्या महिला वर्गाने मला असे सहज सोडले नसते.
{श्रीकांत आहेस कुठे रे तु?}
श्रीकांत आहेस कुठे रे तु? लाज्ता येत नाय म्हणे....ये अस्सा समोर.......
{पहिली मिसाईल लॉन्च झाली तर...}
पहिली मिसाईल लॉन्च झाली तर...
Hope is a good thing...
{मुळात राज्या तुझी चुक}
मुळात राज्या तुझी चुक आहे.....लाजणारी स्मायली दिली नाहीस
{ही कसली स्मायली आहे मग ????}
Hope is a good thing...
{अजुन वेग्ळी.....नाय}
अजुन वेग्ळी.....नाय का?
\आम्हाला व्हरायटी आवडते.....:ड
{हे पाहिल्या बरोबर..}
ये अस्सा समोर....... >>.
हे पाहिल्या बरोबर मला शिरीष कणेकरांनी ऐकवलेली " फ्रेण्डिन्नीड इज फ्रेण्डिन्डीड" ही कन्नड म्हण आठवली. नुकतेच " मय्तरी क्रनार क? " अशी खरड पाठवलयावर कट्ट्यावर रमताराम मित्र झाले आहेत. र रा F1, F1, F1,F1
{मय्तरी क्रनार क? " आता जुइना}
मय्तरी क्रनार क? "
आता जुइना झाला हा पैतरा भौ नव काही शोधा
{श्रीकांतभौ, पुढल्या घरी!एक}
श्रीकांतभौ, पुढल्या घरी!
एक तर भलत्या लोकांशी पंगा घ्यायचा नि मदत आमची मागायची हे काय बरोबर नाय हां. मित्र म्हणवता आणि चारचौघात आमचे कच्चे दुवे उघडे पाडताय राव. च्यामारी आम्हाला महिला मंडळाशी पंगा घेत असता तर 'कुछ् कुछ' होण्याची अवस्था संपली नसती केव्हाच? पुढची पिढी तर आणखी ढालगज, आमचा काय पाड लागणार. आता मदत मागितली आहेच तर फर्स्ट-एडचे सामान आणून ठेवले आहे नि अॅम्ब्युलन्सला फोन केला आहे. आमच्या कडून एवढीच मदत होऊ शकते, क्षमस्व. (वैतागून) भोगा आता आपल्या कर्माची फळं.
(सावध नि प्रामाणिक) रमताराम
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{अजुन वेग्ळी.....नाय}
अजुन वेग्ळी.....नाय का?
आम्हाला व्हरायटी आवडते.....
सहमत
कोन ते आयटि वाल्यांच्या नावाने खडे फोडतय??
बघुया रे एकदा सगळ्यांना लेखक पण आणि रिप्लायवाले पण
सर्फ एक्सेल्ची ऑर्डर देऊ का??
आमच्या हापिसात ये, १०० एक तरि लाजणा-या पोरी दाखवेन
{आमच्या हापिसात ये, १०० एक तरि}
आमच्या हापिसात ये, १०० एक तरि लाजणा-या पोरी दाखवेन
तुम्ही काय 'आशा काळे' किंवा 'अलका कुबल' प्रॉडक्शनच्या ऑफिसमधे काम करता का हो? की सध्या सरोज खान एखादा नवा डान्स 'कोरिओग्राफ' करते आहे ज्यात सामूहिक लाजण्याची एखादी 'स्टेप' आहे, आं?
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{लाजाळू..}
लाजाळूची फुले आवडली, छुईमुई नाव फारच चपखल आहे,
स्वाती
{लाजाळूची फुले}
पहिल्यांदाच पाहीली.. लहानपणी शाळेच्या वाटेवर काही लाजाळूची झाडे होती, येता-जाता पाण्याच्या बाटलीने त्यांना स्पर्शकरुन पाने मिटताना पाहाणे हा आमचा रोजचा खेळ असे. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या
{शाळेत जात होतीस हे सांगण्याचा}
शाळेत जात होतीस हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न आवडला
Hope is a good thing...
{पळून पळून किती आणी कुठे पळशील!}
{आहेस होय मी असेच टिपी करत}
आहेस होय मी असेच टिपी करत होतो....
महिला मंडळाच्या मोर्चाला घाबरलेला
Hope is a good thing...
{लहानपणापासूनची पळायची सवय}
लहानपणापासूनची पळायची सवय इथे नक्की उपयोगी पडेल
{विशेष आभार...}
लाजाळूची फुले ज्यांना आवडली व त्यांनी प्रतिसाद दिले, ज्यांनी नाही दिले, अशा सगळ्यांचे आभार.
अन हो, मला फार धुवुन न काढल्या बद्दल आय टी वाल्या मुलींचे/तायांचे विशेष आभार !!
)
( आता इथे आय टी वाल्या काकू/मावशा/आत्या/आज्या लिहिले नाहीये कृपया नोंद घ्यावी