3 idiots आणि चौथा - मी

0
0

नुकताच 3 idiots पाहुन येऊन बसलोय. सिनेमा तसा ठिकठाक! विधु विनोद चोप्राची छाप अगदी जाणवण्याइतका..पण मग, इतकं रात्री सिनेमा पाहुन आल्यावर लगेच इथं लॉगिन करुन हे असं कळफळकावर टकटकत का बसलोय?
सिनेमा बर्‍याच जणांनी पाहिला असेलच, सध्याचा 'मोस्ट हाऊसफुल्ल'चा धनी आहे तो. काही मुलभुत संस्कार/विचार ह्यांच्याभोवती विनोदाची पेरणी करत अडीच तीन तास प्रेक्षकांसमोर चित्र मांडायची ही विधु विनोद चोप्राची परंपरा ह्यातही जपलेली आहे...
हां हां..मी काही परिक्षण वगैरे लिहायला लागलेलो नाही..घाबरु नका! आपल्याला त्या क्यामेरा अँगल्स, पटकथा, संगीत, अभिनय वगैरेमधलं कळतंयच काय की डोंबलाचं परिक्षण लिहिणार? हास्य

मग मी का लिहितोय?
आठवण येतेय....
त्या..त्या साल्या एकेका हरामखोरांची आठवण येतेय, ज्यांच्यासोबत आयुष्याची ती सोनेरी वर्षं असाच दंगा करत घालवली.
नाही..नाही, सिनेमातल्यासारखे आम्ही कोणी डायरेक्टरच्या हातुन अ‍ॅस्ट्रॉनॉट पेन घेण्यासारखे एक्स्ट्राऑर्डिनरी वगैरे नाही! मुळात त्या सिनेमातल्या घटना किंवा पात्रं ह्यांच्याशी तसं साम्य काहीच नाही...पण तरीही एक हुरहुर लागलीये! सिनेमा पाहताना खळाळुन हसताना बायकोची नजर चुकवुन हलकेच डोळे पुसुन घ्यावे लागावे इतकी आठवण येतेय दोस्तांची!!
कारण साम्यस्थळं इतकीच : कॉलेज, दंगा, आणि जिवापाड केलेली आणि निभावून नेलेली दोस्ती!

पण..अशी थीम असलेले तर बरेच सिनेमे आहेत की. मग हाच सिनेमा पाहुन असं का वाटावं? की हेच यश आहे त्या सिनेमाचं आणि थेटराबाहेर लागलेल्या हाऊसफुल्लच्या बोर्डांचं?
कोण जाणे!

सालं उद्या पिट्याला फोन करायला पाहिजे. सहा आठ महिने होत आले शेवटचं बोलुन..दिड वर्षापासुन पर्‍याकडं जायचं जायचं करत राहुनच जातंय. आता २ दिवसांच्या सुट्टीचा बंदोबस्त करावाच लागेल. तो जोश्या भो*डीचा कुठं अमेरिकेत उलथलाय कोण जाणे..उम्या डुक्करही चेन्नईनंतर गायब आहे. एकदा सगळी भुतावळ परत गोळा करुन त्या सोनेरी काळातले काही क्षण उधार मागुन परत एकदा थोडसं जगायला हवं...

सारी उमर हम
मर मर के जी लिये
इक पल तो अब हमें
जीने दो जीने दो....
..................................
Give me some Sunshine
give me some rain
Give me another chance
wanna grow up once again!!!!!!!!!!!!!!!!!

:)

1

एकम सत म्हणतात ते हेच का? हास्य

अवांतरः शिर्षकात "3 idiots आणि 'चौथा' मी" असं लिहायचं होतं का? wink


-Nile

+१

2

हा धम्या अंमळ idiot आहे! मित्रात असताना मैत्रिणीचा (तेव्हाच्या) विचार व आता मित्रांचा विचार... चालायचेच!

बाकी राव शाळकरी मित्र, कॉलनीतील मित्र सगळे पुर्वेपासुन पश्चिमेपर्यंत पसरले व नुस्ते पसरले नाही डायरेक्टर, चेयरमन, सीइओ.. लै लै अभिमान वाटतो राव त्यांचा अजुनही चक्क फोन उचलतात माझा हास्य

हा हा हा. ते

3

हा हा हा. ते पूर्वेतले मित्र तुमचेच मित्र का?

धम्या लेख छान. चित्रपट पाहीला नाही.

-पेशवे


-पुण्याचे पेशवे

:-)

4

श्री पेशवे जी गौर फर्माईये! <शाळकरी मित्र, कॉलनीतील मित्र >

श्री पेशवे

5

श्री पेशवे जी गौर फर्माईये! <शाळकरी मित्र, कॉलनीतील मित्र >

हॅहॅहॅ!!! तुमचं तरी वय कुठे माहित आहे सगळ्यांना!!! काय? wink

तुम्ही पण ना

6

बिकाआजोबा!

ओके डन

7

ओके डन wink
शिर्षक बदललंय रे नाइल्या Big smile

आगायायाया

8

आगायायाया ... हे काय पहातोय मी ? धम्या चक्क चक्क लेखन करतांना ?
पण धम्याला ३इडियट्स पाहून आठवणी जाग्या झाल्या आणि त्याने चक्क लेखणी उचलली हे काय कमी यश आहे का ह्या पिक्चरचं हास्य
जियो धम्या wink

- (धम्याच्या ललितलेखांचा फॅण) टारझन

चला एका

9

चला एका चित्रपटामुळे का होईना धम्या लिहता झाला.... बोळा निघाला !

आनंद झाहला....

असो,

बदलील तो.

wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

+१

10

+१

+२

11

आमचं अंतरजालीय जिवन सुरू झाल्यापासून धमु ने लिहिलेले पहिलेच लिखाण वाचून बरे वाट्लं.... हास्य

+३

12

सहमत आहे, द्मुसेठ लिहिते झाल्याचे पाहून आनंद झाला.

एक

13

नाव दिसत नाही आहे रे धमु.

कोणतं हो

14

कोणतं हो गुर्जी?
thinking

मुलगा.....मग

15

मुलगा.....मग करिना नव्हती का तेव्हा

हा हा

16

हा हा हा...
होती ना...प्रत्येकाची वेगवेगळी होती wink
एका मित्राच्या करिनापायी आम्हाला चांगलाच अनुभव आला हास्य पळवुन नेऊन लग्न लाऊन देण्याचा wink
सॉल्लीड मजा आली होती त्यावेळी...टेन्शन आणि उत्साह..काहीतरी वेगळंच रसायन झालं होतं राव...वाढलेलं अ‍ॅड्रिनाइल २ दिवस आधी आणि २ दिवस नंतर कमी होता होत नव्हतं हास्य

बाकी, आमची करीना कॉलेजआयुष्य संपलं त्यासोबतच निघुन गेली wink

लग्न केलं

17

लग्न केलं त्याने... आड्रिनालिन तुमचं का वाढलं? असो.

हा हा

18

हा हा हा...
पोरीचं घराबाहेर पडणं बंद झालेलं.. मित्राचे आईबाप पापभिरु शाळाशिक्षक, हाणामारीचा विषयही कापरं भरवणारा.. पोरगी नुकतीच १८ पुर्ण झालेली.
अश्या अवस्थेत मोहीम फत्ते करायची म्हणजे काय खाऊ की काय हो?

विश्वासातला गाडीवाला, साक्षीदार म्हणुन गोटातला वकील, पोरगी राजीखुशीनं येत असल्याचं नमुद करुन देणारा बाँडपेपर, परक्या गावात लग्नाची सेटींग लाऊन ठेवणं (आळंदी अगदी सहज सापडण्यासारखं म्हणुन दुसर्‍या दुर्लक्षित गावात जाण्याचा उपाय), नक्की कुठे चाललोय हे न समण्यासाठी पसरवून द्यायच्या अफवांचं म्यानेजमेंट, पोरीच्या घरात शिरुन तिला बापासमोर हाताला धरुन बाहेर काढून दाराला बाहेरुन कडी घालुन ३ मजले उतरुन तिला गाडीपर्यंत आणणं, त्यात हे लफडं झाल्याबरोबर तिच्या भावानं पोरं फोनाफोनी करुन पाठवलेल्या पोरांना गुंगारा देत गाडी सुरक्षीत बाहेर काढणं आणी मार्गाला लागणं..लग्नाच्या ठिकाणी जागता पहारा ठेवणं..आणि परत आल्यावर फौजदारी केस म्यानेज करुन घेणं.....
काय गम्मत वाटली काय? Big smile

त्यानंतर, ह्या अनुभवाच्या जोरावर च्यामायला आणखी २ लग्नं अशी 'इव्हेंट म्यानेज' करुन दिलीयेत भौ आपुन Laughing out loud Laughing out loud

*कोणाला गरज भासल्यास संपर्क साधावा. कागदपत्रांच्या यादीपासुन ते नवविवाहित जोडीला घरापर्यंत परत पोहोचवण्यापर्यंत सर्व कामांचा गायडन्स दिला जाईल

कोणाला गरज

19
कोणाला गरज भासल्यास संपर्क साधावा. कागदपत्रांच्या यादीपासुन ते नवविवाहित जोडीला घरापर्यंत परत पोहोचवण्यापर्यंत सर्व कामांचा गायडन्स दिला जाईल

वाक्य असे हवे होते. wink

भडजीबुवाना किडनॅप केले होते

20

मला हा असाच एक अनुभव आल आहे. पण जरा थोडासा वेगळा फरक फक्त इतकाच होता की ती मुलगी ऑलरेडी पळून आलेली होती. मुलगा सुद्धा तयार होता. लग्नासाठी देऊळ मॅनेज केले होते. ऐन वेळेस ठरवलेला भडजीबुवा मात्र कुठे गचकला कोण जाणे. त्या भडजीबुवाना कुठेतरी अचानक गावाला जावे लागले म्हणून त्यानी पर्यायी व्यवस्था केली होती. पर्यायी येणारे बदली भडजीबुवा दुसर्‍या एका लग्नात अडकले होते.
आमच्याकडे वेळ फारच थोडा उरला होता. नाईलाजास्तव आम्ही त्या बदली भडजीबुवाना एक फार महत्वाचे बोलायचे आहे. कोणीतरी तुमच्याकडे आलेला आहे सांगून बाहेर बोलावले. आणी बाहेर उभ्या ठेवलेल्या गाडीतून भडजीबुवाना किडनॅप केले. लग्न लावू झाल्यावर भडजीबुवांची माफी मागितली. त्यांची आशिर्वाद घेतले आणि त्याना घरी दक्षणावगैरे देऊन सुखरूप घरी सोडले.
त्या दिवशी आम्ही कोणीच सापडलो नाही. पण आल्यानन्तर कळाले लैच दंगा झाला होता. सुदैवाने भडजीबुवांच्या घरातल्यानी पोलीसकम्प्लेन्ट वगैरे काही केले नव्हते. म्हणून वाचलो.


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

बापरे

21

बरेच उद्योग केलेयस रे धम्या..

हो

22

हो ना..कॉलेजआयुष्य संपलं अन Sad आमचा अमिर ही निघुन गेला .

लिहा की

23

लिहा की तुमच्या आमिरबद्दल...

आमिरबद्द्

24

आमिरबद्द्ल लिहिले तर आम्चा साहरुख रागवायचा thinking

दोघांबद्दल लिही...करण जोहर

25

दोघांबद्दल लिही...करण जोहर येत असेल मीमवर तर नवीन स्टोरी तरी मिळेल त्याला....

दिपाली हास्य

>>एका

26

>>एका मित्राच्या करिनापायी आम्हाला चांगलाच अनुभव आला पळवुन नेऊन लग्न लाऊन देण्याचा
हा हा हा Laughing out loud धम्यालेका कसली आठवण अरुन दिलिस रे..
शेम टु शेम आसाच सीन आमच्या मित्राच्या बाबतीत पण घडला होता.
त्याच्या आईच्या भिती पोटी आम्ही आमचे फोन बंद करुन सगळ्यांनी माझे गाव गाठले. आठवडाभर गावला मुक्काम.
नवरा नवरीच आधिच बाहेरगावच बुकिंग करुन दिल होत.
पण आठवडाभराने मरण आलच, मित्राच्या मातोश्रिंनी सर्व मित्रांना फोनवुन समस्त पितांचा उद्धार केला होता.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

>>त्या

27

>>त्या सोनेरी काळातले काही क्षण उधार मागुन परत एकदा थोडसं जगायला हवं...
"तो" सोनेरी काळ? मग सध्याचा कुठलाय?
हास्य

आता नुसतीच

28

आता नुसतीच वेठबिगारी हो! दिवसभर हापिसाची ओझी वहायची आणि नंतर 'बायको बिचारी वाट पहात असेल..लवकर घरी पोचायला हवं वगैरे कंट्रोल्ड लाईफ आणि जबाबदार्‍या!' दंगा करायचा तरी कधी माणसानं?

आता नुसतीच

29

आता नुसतीच वेठबिगारी हो! दिवसभर हापिसाची ओझी वहायची आणि नंतर 'बायको बिचारी वाट पहात असेल..लवकर घरी पोचायला हवं वगैरे कंट्रोल्ड लाईफ आणि जबाबदार्‍या!' दंगा करायचा तरी कधी माणसानं?

तुमची ही अवस्था तर बायकोची कशी होत असेल? बिच्चारी!!!

हो ना...

30

बिच्चारी घरी वाट बघत बसते.. नि हा कट्टे आणि ढोसर्‍या करून रात्री उशीरा घरी जाणार!!!!
कुठली आलीए कंट्रोल्ड लाईफ????? उंडारणे तर चालूच आहे!!!!!

ह्म्म्म... ह

31

ह्म्म्म...
हेच आमचं कंट्रोल्ड लाईफ आहे सरकार!
मग कॉलेजमध्ये असताना (दारू,शिग्रेट ह्यांचा संबंध नव्हता तेव्हा.) किती उत घातला असेल ते घ्या समजुन हास्य

इडियट!

32

इडियट! आय मीन, द लाईफ, यू आर टॉकिंग अबाऊट, इज ऑल्वेज इडियट! सो एन्जॉय इट!

निषेध!!!

33

मराठी संस्थळावर इंग्रजीचा माज दाखवणार्‍या मोडकांचा निषेध!!!!

आय अ‍ॅग्री

34

आय अ‍ॅग्री विथ यु, मॅ'म!!!

:)

35

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

निषेधाचा

36

निषेधाचा निषेध!!!!!

सदर प्रतिसादात दहाच काय, एकही अक्षर रोमन लिपीमधील दिसलेले नाही.

द्म्या, हे

37

द्म्या, हे संकेतस्थळ कोणतं ते विसरलास काय?

असो. लेख चांगला लिहीला आहेस! पिच्चर पाहिला की बहुदा तुझ्यासारखीच अवस्था होईल माझी, असं दिसतंय.

ह्म्म्...चि

38

ह्म्म्...चित्रपट पाहुन धम्याची "शिकार" झालेली दिसते...

अजुन हा

39

अजुन हा चित्रपट पाहीला नाही, पण सगळे लोक चांगला आहे असे म्हणतात.

धम्याचा

40

धम्याचा आयडी पराने वापरायला घेतला की काय ?
धमालराव चालु फॉर्मात शिकारीचं घोडं पण तेवढं दामटवा की !!

जल्लां...मल

41

thinking
जल्लां...मला काय कल्लां नाय रे!

छान हो,

42

सिनेमा तसा ठिकठाक!

पुण्यातली लोकं कौतुकाचे शब्द तसे जरा मोजूनमापूनच उच्चारणार. बोला की जरा मोकळेपणे आवडला म्हणून.

असो.

बाकी छान आहे प्रकटन. आवडलं.

>>पुण्यातली

43

>>पुण्यातली लोकं कौतुकाचे शब्द तसे जरा मोजूनमापूनच उच्चारणार. बोला की जरा मोकळेपणे आवडला म्हणून.
हास्य आयला!! म्हणजे माझं पुणेरीकरण संपुर्ण झालं म्हणायचं! चला, आता आमची (अस्सल जाज्वल्य पुणेकरीण)अर्धांगिनी आम्हाला बारामतीचा गावंढळ वगैरे म्हणुन हिणवणार नाही तर wink

अर्धांगिन

44

अर्धांगिनी आम्हाला बारामतीचा गावंढळ वगैरे म्हणुन हिणवणार नाही तर

जगातील तमाम अर्धांगिनींना त्यांच्या अर्धांगांना काहीही म्हणायला / हिणवायला काहीही कारण / निमित्त लागत नाही.

पुर्वी

45

Laughing out loud
=)) Laughing out loud
=)) Laughing out loud Laughing out loud

पुर्वी एकदा पेठकरकाका काहीतरी सांगत होते..माझं नुकतंच लग्न झालेलं असल्यानं मी त्यांच्या सांगण्याकडं दुर्लक्ष केलं...... नको होतं ते दुर्लक्ष करायला Big smile

वेळ आहे का हो? खंब्याच्या साक्षीने सामुदायीक अश्रुपतनाचा कार्यक्रम कधी करुया? पेठकरकाका म्हणाले होते, कधीही सांग, आपण अ‍ॅरेंजमेंट करु Big smile

कद्दीपण...

46

कद्दीपण...

अरेच्चा!

47

असे आहे काय? उप्स.

हरकत नाही

48

हरकत नाही हो हास्य
आल इज वेल!! Big smile

मस्त रे

49

त्या..त्या साल्या एकेका हरामखोरांची आठवण येतेय, ज्यांच्यासोबत आयुष्याची ती सोनेरी वर्षं असाच दंगा करत घालवली.
कारण साम्यस्थळं इतकीच : कॉलेज, दंगा, आणि जिवापाड केलेली आणि निभावून नेलेली दोस्ती!

+१, अगदी असेच म्हणतो.
छान लिहलेस हो बाकी.
साला त्या शर्मन जोशीला जॉब मिळाल्यावर जेव्हा आमीर कोपर्‍यात जाऊन डोळे पुसतो तेव्हा आपल्याला बी साला लै गलबलुन आले होते.

जमेल तेव्हा शेप्रेट लेख टाकीन ह्यावर.

आपण पिक्चर

50

आपण पिक्चर लै एन्जोय केला.
त्या भाषणाच्या प्रसंगात भाषण करणार्‍या कलाकाराने मस्त जान आणलीय. त्याचा भाषणाचा आवेष पहाण्यासारखा आहे.


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

हॅहॅहे!... सह

51

हॅहॅहे!...
सहमत!

"विरु सहस्त्रबुध्दे एक बलात्कारी पुरुष हय.. ' इथुनच जी काय सुरुवात होते... आरारारा...

बाकी, ते चतुर-सायलेन्सर क्यारेक्टर म्हणे युगांडातुन आलेलं असतं...त्याला काय इथं यायच्या आधी गेल्या साली युगांडात टार्‍या भेटला होता काय? नक्कीच असेल म्हणुन ते असं पाठलागी झालं wink

ज ह ब ह र्‍या

52

खतरनाक
धमाल मुलगाचा लेख म्हणजे अलभ्य लाभच म्हणावे लागेल.
एका चित्रपटाने अखेर धमाल मुलाची "शिकार" केलीच.
असो लेख मस्तच रे धम्या... आपण नेहमी लिहित रहावे हीच विनंति.

सिनेमा पाहताना खळाळुन हसताना बायकोची नजर चुकवुन हलकेच डोळे पुसुन घ्यावे लागावे इतकी आठवण येतेय दोस्तांची!!

मस्त लिहिलय


-निखिल

झक्कास लेख रे!

53

पिक्चर पाहून "दिल चाहता है" मधल्या ३ idiotsची परत आठवण झाली.
लिही की रे धम्या नियमित! हास्य छान लिहितोस!

मस्त लिहिलयस

54

खरच झकास पिक्चर आहे

एवढ्या

55

एवढ्या समद्या मित्रांना घेवून खेळ बनवायचा आसल तर नाव "n ईडीयटस्" आस द्याव लागल.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

धम्या मस्त

56

धम्या मस्त लिखाण रे ! एकदम दिलसे.

माझे

57

माझे गरीबाचे चार वेडेवाकडे शब्द आपुलकीनं वाचुन मला उभारी दिल्याबद्दल सर्व n इडियट्स हास्य (आणि शहाणे लोकसुध्दा बरं का हास्य नाहीतर येऊन माराल मला!) ह्यांचे मनापासुन आभार! हास्य

मस्त रे धम्या...

58

मस्त रे धम्या...

ध. मु.

59

क ड क लेख

मस्तच

60

गुजरा हुवा जमाना आता नही दुबारा! धम्याचा आठवणींचा कल्लोळ आवडला. पिच्च्रर त लईच आवडला. सोणी वर लागला होता परवा.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मस्त.. धमु.. तू वर्णन

61

मस्त.. धमु.. तू वर्णन केलेल्या लग्नासारखी हुबेहुब एक आठवण माझ्याकडे पण आहे.. (काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही.. wink ) कारण त्यावेळी बाकी मित्रांची मनस्थीती कशीपण असुदे.. लग्न करणार्‍याची कशी असते हे फक्त मलाच माहिती आहे.. wink

अबे

62

अबे तेरी तो. म्हणजे तुम्ही सोत्ताच व्हय ते झेंडे लावणारे. लै भारी. मग बोलणार नाही वगैरे चालायचं नाय. गप गुमान लिवा बगू, नायतर तुमालाच किड्न्याप करून लिवायला भाग पाडण्यात येईल.

मस्त रे धमु

63

एकदा सगळी भुतावळ परत गोळा करुन त्या सोनेरी काळातले काही क्षण उधार मागुन परत एकदा थोडसं जगायला हवं...