"मला भिती वाटतेय रे चो".
भ्यायचे नाही.
"काल जे काही ऐकले ते मला जमणार नाही"
मी येउ का?
"तु कुठे हॉस्टेल मधे राहातोस?"
गेस्ट म्हणुन येतो.
"पण हे असे का?"
का ला उत्तर नाही. बर्याच प्रथा असतात. त्या पैकी ही. भिउन कसे चालेल. गंमत म्हणायचे आणि सोडुन द्यायचे.
"ह्यात काय गंमत आली आहे?.शिसारी आणणारे आहे हे सगळे"
ते बदलायची किंवा थांबवायची ताकद आहे का तुझ्यात. असेल तर थांबव.
"म्हणजे चार वर्ष जाच"
तेच तर सांगतोय्.तुला कधी हा अनुभव आला आहे का? रस्त्यावरुन चालतो आहेस. अचानक समोर घाणीने भरलेला फुटपाथ येतो. काय करतोस तेंव्हा? पुढे जाणे भाग आहे.जेवढ जमते तेवढ संभाळुन जातोसच की नाही. आणि तरी सुद्धा पाय भरला तर धुतोस. तसेच समज. भिती बद्दल म्हणतोस तर ती वाटणारच. पण ती चेहेर्यावर दाखवु नकोस. दाखवशील तर त्यांची शक्ती वाढते. तु एक काम कर. रामकी च्या मॅथ्स लेक्चरला तुझ्या चेहेर्यावर कसे भाव असतात तसा चेहेरा ठेव. आनंदी. कारण तो काय म्हणतो ते तुला कळतच नाही.
"हीहीही"
ग्रोइंग अप प्रोसेस सुरु झाली होती.
*********************************************************************
इंटर्रव्ह्यु ला चार जण होते.
एका भांड्यात चिट्ठ्या होत्या.
एकंदर दहा होत्या.
मुलाखतीला आलेल्या ५ उमेदवारापैकी चो ने पुढाकार घेतला.
"काय नाव"
चो.
"कुठे राहातोस?"
ठाण्याला.
"चिट्ठी उचल"
चो ने एक उचलली.
आज्ञा वाचली.
हाताचा वाडगा केला. बोटे महारोग्याची केली.
आणि गायला सुरु केले.
गॅरिबोंकी सुनो
वो तुमारी सुनेगा
तुमी एकी पेसा दोगे
वो दसी लाखी देगा.
नक्कल मस्त जमली होती.
सर्व सिनियर खुष.
विषेशतः एकी, दसी, लाखी वर.
पाठीवर थाप पडली.
त्या वातावरणाचा फायदा घेउन चो म्हणाला,
आणखी एक चिट्ठी काढु.माझ्या मित्राच्या ऐवजी. त्याला सोडाल का?
" आयला हे बेण हलकट दिसतेय. चल उचल"
दुसर्या चिट्ठीत "रात अकेली है" मिळाले.
सर,तुम्हाला तेच तेच बघुन कंटाळा आला असेल तर 'रात अकेली' आणि 'हुस्न के लाखो रंग' चे मिक्स करुन दाखवु का?
आणखी एक आगळा वेगळा कार्यक्रम सादर झाला.
"च्यामारी ह्याला 'दिंगंबर' चिट्ठी आली असती तर साल्याने काय केले असते काय माहीती"?
करुन दाखवु का? मला काहीही प्रॉब्लेम नाही. मी चाळीत राहाणारा. संडास बाहेर. ४ थी पर्यंत घरापासुन संडासापर्यंत दिगंबरच की. सवय आहे. कसे?
सगळे खो खो हसले.
आता ते दोस्त झाले होते.
बघा सगळेच माझ्या सारखे हलकट नसतात्. हा माझा मित्र वरण भात तुप वाला. कोमेजला असता ह्या सर्व प्रकाराने.
विचार करा. काही तरी वेडे वाकडे करुन बसला असता. राडा वाढला असता. कॉलेज मधे मौज करायलाच पाहीजे. दुसरा काही उपाय नाही का? विचार करा.
पुढील चार वर्षे त्या हॉस्टेल मधे रॅगींग झाले नाही.
बघा सगळेच
बघा सगळेच माझ्या सारखे हलकट नसतात्. हा माझा मित्र वरण भात तुप वाला. कोमेजला असता ह्या सर्व प्रकाराने.
विचार करा. काही तरी वेडे वाकडे करुन बसला असता. राडा वाढला असता. कॉलेज मधे मौज करायलाच पाहीजे. दुसरा काही उपाय नाही का? विचार करा.
पुढील चार वर्षे त्या हॉस्टेल मधे रॅगींग झाले नाही.
ह्म्म्म समोरचे एकण्याचा मनस्थीतले होते तर..
प्रत्येक वेळेस हा उपाय कामाल येईल असे वाटत नाहि हो....
-निखिल
मान्य
मान्य आहे.
आमच्याइथे एक अजबच प्रकार आहे. सगळे टवाळ लोकं (मी पकडून) आपसांत काहीही फडतूस विषय घेऊन एकमेकांचं रॅगिंग घेतो. बाकीच्यांची करमणूक होते, आम्हालाही जरा रग जिरवल्याचा आनंद!
असो. श्री. वि.प्र. यांनी आपल्या मूळ नावानेच लिहील्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
+१
श्री. वि.प्र. यांनी आपल्या मूळ नावानेच लिहील्याबद्दल त्यांचे अभिनंदन!
+२
श्री. वि.प्र. यांनी आपल्या मूळ नावानेच लिहील्याबद्दल त्यांचे अभिनंदन!
-निखिल
+३ श्री.
+३
श्री. वि.प्र. यांनी आपल्या मूळ नावानेच लिहील्याबद्दल त्यांचे अभिनंदन!
+ ४ श्री.
+ ४
श्री. वि.प्र. यांनी आपल्या मूळ नावानेच लिहील्याबद्दल त्यांचे अभिनंदन !!!
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
वा चो वा !
वा चो वा !